कविता

" धन्य आज दर्शनाने तुझ्या -"

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
19 Jul 2013 - 12:42 pm

नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया
रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या ||

आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया
डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया ||

चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया
ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या ||

तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया
शेवटी मला पावला देवा तूच विठू राया ||

व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या
डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया ||

धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या
आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया ||

.

अद्भुतरसकविता

१ प्रश्न

वैभव कुलकर्नि's picture
वैभव कुलकर्नि in जे न देखे रवी...
19 Jul 2013 - 11:17 am

१ प्रश्न विचारला गाजराला - तोंड तुझे जमिनीत तरी घेतोस कसा तू श्वास?.
उत्तर अगदी सरळ आहे जसा बाळाचा आईच्या नाळेतून प्रवास .

मग प्रश्न विचारला त्याच्याच पानाला - हाथावरती रेष्या एवढ्या तुझ्या,तुझ्या भविष्याचे काय रे?
पाऊस आला तर भिजायचं , वारा आला तर झुलायचं बाकी असं काहीच नाय रे.

१ प्रश्न नारळाला - पोटात एवढे पाणी तुझ्या , तुला जलोदर नाही का होत?
वेड्या.... पाण्यासाठीच जन्मलोय मी, फुगवून माझे पोट.

कविता

~देवा आता हार मान तू~

वैभव कुलकर्नि's picture
वैभव कुलकर्नि in जे न देखे रवी...
18 Jul 2013 - 8:50 am

~देवा आता हार मान तू~

देवा आता हार मान तू
बघुनी खालचे तांडव सारे
दिलास जन्म मानवास तू
पण झाले सगळे वानर साले

उभा केला तुला देवळात
अन उद्बत्तीचे सुवास वारे
तुझ्याच पायावरती सजले
मांसाचे ते ढेर सारे

तुला छीनले दगडातुनी
अन तुझे कोरले देह सारे
हाती चिपळ्या नास्तिकांच्या
मुखी मात्र तुझे नाव रे

उद्गाता तू चराचराचा
उरी तुझ्या हा विश्व भार रे
तुला जमीनीत गाढण्याआधी
देवा आता तू खाली धाव रे

कविता

झालंया सगळ येगळ आता ..

वैभव कुलकर्नि's picture
वैभव कुलकर्नि in जे न देखे रवी...
18 Jul 2013 - 8:38 am

झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ
आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ

सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल
बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल

भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर
भाकरीनभी ओ ळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल

पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर
पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर

आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर
शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर

कविता

" हे असे चालायचेच!! "

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
18 Jul 2013 - 2:39 am

बोललो न मी काही न काही होते बोलायचे
न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!

गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे
ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे !

काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे
थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे !

तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते
मग तोच म्हणाला ,
जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !!

बोललो न मी काही न काही होते बोलायचे
न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!

करुणकवितागझल

"गूढ" (बेडसे लेणी-एक गूढानुभव!)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
18 Jul 2013 - 1:26 am

डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
https://lh5.googleusercontent.com/-tkEOgsr5S-M/UOmt3DVjXiI/AAAAAAAAV9U/7WHZmVxHVx8/w702-h468-no/IMG_3695.JPG
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?

संस्कृतीकविता

कधीतरी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
17 Jul 2013 - 6:33 pm

धुसफूस भावनांची विसरू कधीतरी
जरी आठवून ढाळू अश्रू कधीतरी

आणू कुठून सांगा शोधून एक मित्र
जो ना म्हणेल कधीही 'भेटू कधीतरी'

मग मोट अनुभवांची बांधू कधीतरी
संधी पुढे आम्हीही साधू कधीतरी

जैसे तुम्ही करावे, तैसेच भरावेही
होईल हे तुम्हाला, लागू कधीतरी

आम्हासही कधी, पुसतील लोक सारे
आम्हीही मग अलिप्त, राहू कधीतरी

कक्षा जरी स्वतःच्या जाणू सदा तरी
आकाश बंधनांचे भेदू कधीतरी

आहोत तेच आपण, जाणू कधीतरी
'तो' मी कधीतरी, 'तो' तू कधीतरी

मागू आम्हास आम्ही काहीच ना अपूर्व
कुण्या चेह-यास हासू मागू कधीतरी

मराठी गझलशांतरसकवितागझल

कृष्ण तो आतला ...

आतिवास's picture
आतिवास in जे न देखे रवी...
17 Jul 2013 - 4:49 pm

रोजचाच त्याने
धावा हा घेतला
गूढ डोहाच्या तळात
उभा अंगार पेटला.

युद्धे घमासानी
हळू प्राण हा बेतला
श्वासामागे श्वास
कसा, न कळे रेटला.

निसटून गेले, त्याचे
भय ना मातीला
उणे काही नाही
भेद जागत्या वातीला.

प्रपंच देहाचा
उन्मळे रातीला
पावसाची लय
अशी अखंड साथीला.

अदूर सुदूर
घन कधीचा मातला
झोपाळला आहे
परी कृष्ण तो आतला.
**

शांतरसकविता

शब्द शब्द

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
17 Jul 2013 - 11:47 am

शब्द शब्द शब्दातच सारे

शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा
वडवानळ जळ शब्द पसारे
एक एकट्या एकांताचे
कूस छत्र घर शब्द सहारे

मुक्या जाणिवा गभुळ जखमा
आतुर माया शब्द शहारे
नभ संचित आकाश पवन घन
शब्दच वेडे ऋतु झरणारे

खोल ओंजळी लाव्हा अंकित
खुपणारे सल शब्द बोचरे
शब्द उतारा सकल प्रार्थना
आत्म संहिता शब्द खरे

.....................अज्ञात

अद्भुतरसकविता

सासर-पण-माहेर

Bhagwanta Wayal's picture
Bhagwanta Wayal in जे न देखे रवी...
16 Jul 2013 - 12:37 pm

आहे ग आई मी सुखी समाधानी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू
येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं
प्रेमळ पती मला जपे फुलावाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर
आठवेल कसे आता मला ग माहेर
जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

बाहेरची कामे मला नाही ग सांगत
स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात
जीव लावतात मला सर्व मुलीवाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी

संस्कृतीकविता