शब्द शब्द

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
17 Jul 2013 - 11:47 am

शब्द शब्द शब्दातच सारे

शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा
वडवानळ जळ शब्द पसारे
एक एकट्या एकांताचे
कूस छत्र घर शब्द सहारे

मुक्या जाणिवा गभुळ जखमा
आतुर माया शब्द शहारे
नभ संचित आकाश पवन घन
शब्दच वेडे ऋतु झरणारे

खोल ओंजळी लाव्हा अंकित
खुपणारे सल शब्द बोचरे
शब्द उतारा सकल प्रार्थना
आत्म संहिता शब्द खरे

.....................अज्ञात

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

17 Jul 2013 - 12:00 pm | यशोधरा

सुरेख.

वेल्लाभट's picture

17 Jul 2013 - 12:24 pm | वेल्लाभट

क्लास! सुपर्ब! भाव, लय, वजन, सगळं मस्त आहे! वाह.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

17 Jul 2013 - 12:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

रेखिव रचना:

मुक्या जाणिवा गभुळ जखमा
आतुर माया शब्द शहारे
नभ संचित आकाश पवन घन
शब्दच वेडे ऋतु झरणारे

पण कां कोण जाणे या वेळेस जरा जमवून आणल्या सारखी वाटली.
काका, रागावू नका, पण मला असे वाटले, कां मलाच नीट कळली नाही?

अज्ञातकुल's picture

17 Jul 2013 - 12:37 pm | अज्ञातकुल

ह्म्म्म्म्म............................... :)