आहे ग आई मी सुखी समाधानी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू
येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं
प्रेमळ पती मला जपे फुलावाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर
आठवेल कसे आता मला ग माहेर
जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
बाहेरची कामे मला नाही ग सांगत
स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात
जीव लावतात मला सर्व मुलीवाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
नाही म्ह्टले तरी रोज आठवण येते
तेंव्हा मात्र मन माझे कासाविस होते
आठवत बसते तेंव्हा जुन्या आठवणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
शहरात झाले मी ग लहानाची मोठी
बाबांचा आशिर्वाद होता माझ्या पाठी
भावाचा आधार आहे माझ्या मनी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
संस्कार तुझे मी ग कोरले मनात
समर्थांची शिकवण ठेविली ध्यानात
सामर्थ्य मिळे देहा मना उभारणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
...........बी.डी.वायळ
प्रतिक्रिया
16 Jul 2013 - 3:46 pm | त्रिवेणी
खरच सगळ्या लेकींना असेच सासर मिळो
16 Jul 2013 - 4:23 pm | प्रभाकर पेठकर
समर्थांची शिकवण, सासरी जाऊच नका...
बाकी कविता छान आहे.
17 Jul 2013 - 4:05 am | निनाव
तुम्ही ऑफिस ह्या विषय पलीकडे देखील लिहिता , हे बघून सुखद वाटले. (हलकेच घेणे :) )
शिवाय , कविता छानच । अजून येऊ द्या । तुम्ही खूप छान लिहिता वेग-वेगळे विषय घ्या ।
18 Jul 2013 - 11:51 am | Bhagwanta Wayal
प्रतिक्रिया देणार्यांचे तसेच वाचकांचे मनापासुन आभार.