मला झोप हवी

वैभव कुलकर्नि's picture
वैभव कुलकर्नि in जे न देखे रवी...
19 Aug 2013 - 5:43 pm

म्हणल आज जरा शांत झोपावे पण छे झोपेण नाकच मुरडले आहे आताशा.
बहुतेक डोळ्यावरची बुबुळ रुसलीत माझ्यावरती ......

आतल्या बाहुल्या नुसत्याच फिरत आहेत इकडून तिकडे एखाद्या निशाचरासारख्या
आणि हि रात्रही काही थांगपत्ता लागून देत नाही..

मी रात्रीला विचारल , काही चुकलं काय माझे असा हा का आसूड या डोळ्यावरती
नेहमीप्रमाणे उत्तर काही मिळाले नाही ...फक्त एक करडा कटाक्ष्य आणि उजव्या काखेत माझ्या झोपेला घेऊन ती देसिनाशी झाली...

मग परत मी परत काहीतरी शोधत शून्य नजरेने त्या भिंतीकडे बघत गरगरणा-या पंख्याला सोबत घेऊन ......
मग मी पापणीच्या टोकाला थोडे बाहेर ओढत डोळ्यावरती झापड टाकायचा प्रयत्न केला , पण त्या पापण्याही काही हातात यायला तयार नव्हत्या .. बहुतेक पाण्याने निसरड्या झाल्या होत्या...

एव्हाना रात्रीचे १२ वाजले होते , घड्याळाकडे लक्ष गेले , सेकंदकाटा नुसती अंतरे कापत होता म्हणल थोडीशी वेळ थांबवून
त्याला झोप मागावी पण नंतर लक्ष्यात आले ते स्व:ताच २४ तास जागे ....मी काय झोप मागणार त्याला

मग जर डाव्या कुशीवरती लवंडलो ..... म्हणलं कुशीकडे तरी थोडी कुसेची भिक मागावी पण सगळा भार कुशीवरती पडल्यामुळे ती पण अखंड जागीच ....मी काय झोप मागणार तिला
मग डोळ्याच्या वरच्या कातड्याला जरा थंड तेल लावायचा प्रयत्न केला पण गारव्यापेक्ष्या आगच जास्त होत होती ... जीवाची नुसती तळमळ ..... तळमळ..
त्या आगीचा आ... एवढा मोठा होता कि धारीष्टच झाले नाही त्याच्याकडे झोप मागायचे..

मग मी विचारांपुढे हाथ जोडले नि हुंदके देत थोडे केविलश्या नजरेने बघितले आणि म्हणालो "थोडी उसंत घेउदे माझ्या मेंदूला"
आणि डाव्या हाताने नाडीचे ठोके मोजायला सुरुवात केली ..
इकडे बुबुळाची हालचाल मात्र चालूच होती ...

काही विचारांना माझी दया आली .. आणि ते माझ्या डाव्या मेंदूच्या मागून निघून गेले
पण काही विचार अजूनही त्या मेंदूला फटके मारत आहेत ..इकडे बुबुळाची हालचाल मात्र चालूच.. ...

म्हणल आज शांत झोपावे पण छे हो.... जागा राहण्याचा छंदच जडलाय आताशा मला

कविता

प्रतिक्रिया

अगो बाई .. प्रेमात पडला आहात का? अभिनंदन हा !!! ;-)