काहिंच्या अस्तीत्वाच्या विळख्यात
गुदमरायला होते
सहवासाच्या वणव्यात
होरपळायला होते
काही जणांना पेटत्या आगपेट्या
बनायला आवडत
भाजलेल्या व्रणावर खोटे मलम ही
बनायला आवडत
उपदेशाचे कोरडे पाऊस
ही बरसतात
पावसात कोरडे रहायचे की ओले
हे ही तेच ठरवतात.
न्याय अन्यायाच्या परिभाषा
बदलल्या आहेत
अन्याय करणार्यांची लोकप्रियता
वाढतच आहे
आरोपीच्या पिंजर्यात
न्याय उभा आहे
अन्यायाच्या काळ्या कोटासमोर
उलट तपासणी होत आहे.
टाहो फोडुन सांगत आहे मी
आहे हो खरा
पण कोणास ठाऊक देवतरी देईल
का त्याला थारा?
प्रतिक्रिया
19 Aug 2013 - 4:49 am | स्पंदना
आरोपीच्या पिंजर्यात
न्याय उभा आहे
अन्यायाच्या काळ्या कोटासमोर
उलट तपासणी होत आहे.
टाहो फोडुन सांगत आहे मी
आहे हो खरा
पण कोणास ठाऊक देवतरी देईल
का त्याला थारा?
मग घेतात कायदा हातात लोक. कोल्हापुर भागात लागोपाठ अत्याचारी लोकांच्या घरादारांवर हल्ले केले. दिसतानी दिस्ते आपण्पण अन्याय करतोय अस, पण्मग आपल्या कृत्याने घरादाराची वाट लागते हे एकदा दिसायला लागल की आपोआप दहशत बसेल.
19 Aug 2013 - 2:19 pm | प्रसाद१९७१
काही जणांना पेटत्या आगपेट्या
बनायला आवडत >>>
पेटत्या आगपेट्या ? :-)