मी शब्द तुला सुचलेला, उधळून लावीतो कविता
मी सूर उसवले दोन्ही, तिसर्याच्या उदयाकरता
बघणार्या नजरांमधले वाटेत थांबले अंतर
नजरेच्या क्षितिजाआडून सतरंगी जंतरमंतर
वाजवता रंग उद्याचे, शत-गंध मोकळे होती
ओघळत्या सेकंदांचे अडवून ठेवले मोती
देऊळ-खांबा पक्षी क्षत-पंख पुसे इवलासा
रदबदली अंधाराशी, हा निव्वळ फोल दिलासा
वितळत्या भूतकाळातून निसरडी पाऊले आली
घमघमत्या आज-उद्याशी आडवी-तिडवी रमली
कधी स्तब्ध उभ्या असलेल्या, डोंगरमाथ्याआडून
मुक्त स्वरांनी सरिता नाचते जाणीवा विसरून
प्रतिक्रिया
26 Jul 2013 - 12:04 am | अत्रुप्त आत्मा
छान आहे,पण शृंगार रस म्हणवा तसा फुलला नाही.
प्रेम रस मात्र भरपूर आहे. :)
26 Jul 2013 - 12:52 am | अभ्या..
शृंगार बिंगार तर सोडा, ओळीच्या शेवटाचे अक्षर शेम हाय एवड्च क्वालीफिकेशण मला तर दिसलं. :(
बाकी अजुन काय कोणाला आढ्ळल्यास समजावून सांगण्याची कृपा करावी ही नम्र विनंती.
गुर्जींना पण भर्पूर प्रेम रस कूठे दिसला कुणास ठाऊक. बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप झाले असावेत. ;)
26 Jul 2013 - 10:02 am | अत्रुप्त आत्मा
@बहुधा ते स्वतःच प्रेमस्वरुप
झाले असावेत. smiley>>> =))
26 Jul 2013 - 2:47 am | काकाकाकू
काहि कळले नाहि. कोणीतरी रसग्रहण करुन समजवून सांगेल का?
26 Jul 2013 - 7:50 am | स्पंदना
मला आवडली कविता, मधली दोन कडवी नाही समजली पण बाकिचे कळले अन आवडले सुद्धा!
26 Jul 2013 - 5:07 pm | म्हैस
अरे तुम्ही सगळे एव्हढ छान कस काय टाइप करताय? अवघड आहे बुवा.......