काही अठवणी...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
26 Jul 2013 - 10:17 pm

काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या

काही आनंदी...सुखाच्या
काही त्रासिक...दु:खाच्या
काही केवळ..जनातल्या
कित्येकांच्या..मनातल्या!

काही..हसर्‍या मुलांच्या
काही..गळल्या फुलांच्या
देठांनाही सोडून गेल्या..
उमलणार्‍या कळ्यांच्या!

काही माझ्या गावाच्या
काहि..तर,नुसत्या नावाच्या
काही...दूरं देशांच्या
तळहातांवरिल..रेशांच्या!

काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!

बेबंदिच्या अठवणी काही..
मुक्त मोकळ्या वाटांच्या
फुलांनिही बहरून यावे
अश्या गोजिर्‍या क्षणांच्या

अठवणींच्या प्रदेशा बा
घ्यावा अमुचा सलाम
मुक्त मोकळी श्वसने अमुची...
एरवी फक्त गुलाम...!
==============================
https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/1013210_488468174572807_1569204451_n.jpg
==============================

शांतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Jul 2013 - 10:41 pm | प्रचेतस

वाह बुवा.
सुंदर आठवणी.
शेवटची दोन कड़वी बेहद्द आवडली.

मोदक's picture

26 Jul 2013 - 11:20 pm | मोदक

बुवा - एक सुधारणा...

काही..मंद वासांच्या
काही..धूंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!

काही..मंद वासांच्या
काही.. बेधुंद श्वासांच्या
तिच्या माझ्या मिठितल्या
धुंद मोहक स्पर्शांच्या!!!

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2013 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

तू म्हणतोस ते बरोबर,पण...

अगदी सिरियसली सांगतो...

आपापल्या वयातला फरक पहाता... तुझा अँगल तुझ्यासाठी,आणी,माझा अँगल माझ्यासाठी ठीक आहे. :)

तुम्ही शिनीयर शिटीझन आहात हे (तुम्हीच म्हटलेले) मान्य करूनही.. ;-)

कूंद मोहक स्पर्शांच्या

माझा आक्षेप कुंद या शब्दावर आहे. बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2013 - 12:26 am | अत्रुप्त आत्मा

@(तुम्हीच म्हटलेले) >>> म्हणजे नै का? :p

@माझा आक्षेप कुंद या शब्दावर आहे. >>> असू द्या!!! http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif
@बाकी भावना पाहता हा शब्द अस्थानी आहे.>>> ती भावना तुंम्हाला (तुमच्या सध्या असलेल्या वयात!) तशी दिसते आहे! म्हणून शब्द "अस्थानी" वाटतोय!

अता माझं पश्टिकरण बगा---
तिच्या माझ्या मिठितल्या
कूंद मोहक स्पर्शांच्या!!!>>>असा स्पर्श जेंव्हा वरवरचा वाटत असतो तेंव्हा तो सुखावणारी धुंदी देतो,पण जेंव्हा या स्पर्शातली खरी खोल ओढ कळते,तेंव्हा तो स्पर्श शरिरा इतकाच मनाच्या गाभ्याशी जाऊन भिडतो,अगदी खोल उतरतो...मुरतोही...म्हणूनच तो थंडीत दाट धुकं पडलेल्या वातावरणासारखा,उबदार/समजदार...म्हणजेच कूं....द भासतो! ... म्हणून मी वयातला(माफक असला,तरी महत्वाचा असा... http://mimarathi.net/modules/smileys/packs/Example/10.gif ) फरक अधीच सांगितला होता...! त्यामुळे आमचा शब्द अस्थानी नसून बरोब्बर "अ"स्थानीच पडलेला आहे. :)

धमाल मुलगा's picture

27 Jul 2013 - 1:04 am | धमाल मुलगा

च्यायला! कुंद वातावरण थंडीत दाट धुकं पडल्यानंतरचं नसतंय. पाऊस पडणार,पडणार वाटतं पण पडत नाही तेव्हाचं दमटसं, ओलसरसं दाटून आलेलं वातावरण असतं त्ये कुंद वातावरण म्हणतात (असं मला वाटतं. )

- धमु खोत.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2013 - 1:14 am | अत्रुप्त आत्मा

राजाधिराज...धमुराज..आपलेच बरोबर आहे... :) आमचा प्रतिक्रीया ल्याह्याच्या जोसात रूर्‍तु चुकलाच! :)

मोदक's picture

27 Jul 2013 - 1:20 am | मोदक

आन्ना..गपा आन्ना गपा.. :-))

चौकटराजा's picture

27 Jul 2013 - 10:45 am | चौकटराजा

धनराव , तुमच्याकडं कान टोचायचा चिमटा हाय काय ?
@ आअ कवितेचा फॉर्म व कन्टेन्ट दोन्ही आवडले. बुवा बेडशाच्या लेंण्यांपेक्षा गूढ आहात आपण ! कुठं कपाळावरील टिळ्याचा विचार तर कोठे गाल्यावरल्या तिळाचा विचार ! व्वा !

स्पा's picture

27 Jul 2013 - 11:30 am | स्पा

कुंद , शेवाळलेल्या वातावरणात .. धुकट वाटेवरून .. ओल्या रानातून ती अचानक समोर दिसते ...
आकाशातून थेंब थेंब हलकेच खाली येत असतात. निळा काळसर उजेड आस्ते आस्ते कमी होत असतो ..मधूनच वीज आकाशात घुमत असते
आणि रानातल्या पडळी समोरच्या गंजलेल्या फाटकात ती उभी असते, नुकताच कोसळू लागलेला पाउस अंगावर घेत ...

;)

बाकी शेवाळलेले, धुकट वातावरण जेव्हा असते तेव्हा विजा चमकत नाहीत असा अनुभव आहे.

स्पा's picture

27 Jul 2013 - 11:40 am | स्पा

असा अनुभव आहे.

तुमच्या आणि आमच्या वयातला फरक पाहता , दोघांना वेगवेगळा नुभव येणे शक्य आहे

-- अतृप्त स्पा

प्रचेतस's picture

27 Jul 2013 - 11:44 am | प्रचेतस

हा अनुभव सार्वत्रिक असतो. एकदा अनुभवाची बेशर्त स्वीकृती करून तर पहा.

प्रभाकर पेठकर's picture

27 Jul 2013 - 1:15 am | प्रभाकर पेठकर

माननिय कविवर्य सुरेश भट ह्यांची 'क्षण' ही कविता आठवली.

किसन शिंदे's picture

27 Jul 2013 - 1:44 am | किसन शिंदे

वाह!! एकदम अप्रतिम. बुवांच्या खास ठेवणीतले शब्द.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Jul 2013 - 11:07 am | ज्ञानोबाचे पैजार

हा बुवा भलताच अत्रूप्त दिसतोय, आठवणीतुन बाहेरच यायला मागत नाही.

बुवा श्रावण सुरु होतोय, लवकर लायनीवर या, नाहीतर

मम आत्मन :
श्रुतिस्मृति पुराणोक्त,
फलप्राप्त्यर्थं
श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ्यं

अशी सुरुवात करण्या ऐवजी

काही अठवणी...उन्हातल्या
काही अठवणी...पावसातल्या
काही नुसत्या...तालातल्या
काही गुलाबी...गालातल्या

अशी झाली तर यजमानांची पंचाईत होईल.

बाकी कविता बेहद्द आवडली

स्पा's picture

27 Jul 2013 - 11:24 am | स्पा

वाह

जबराट रोम्यांटिक कविता हाय ;)

अवांतर : बाकी ज्यात त्यात चुका काढून , उगाच किडे करणाऱ्या मोदक रावांचा जाहीर निषेध .
वयानुसार वागा मोदक राव ;)

कवितानागेश's picture

27 Jul 2013 - 12:59 pm | कवितानागेश

वयानुसार वागा मोदक राव>>
कोणाच्या वयानुसार??? :(

कविता छानच.

कविता छानच >>

कोण कविता..?? ;-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2013 - 1:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर... बस इतकेच !!!