कबुतरांची सभा
पर्वा एका सरकारी हापिसात
कामासाठी गेलो होतो
आणी नेहमी प्रमाणे वाट बघत
ताटकळत उभा होतो.
कडेला वाटलं माणसं बोलताहेत
पण कबुतरं बोलत होती
कालच्या दिवसात काय काय झालं?
याचे हिशेब तोलत होती
पहिलं दुसर्याकडे पाहुन
मिष्किलपणे हसत होतं
आणी त्यांच्या गमती पाहुन
तिसरं मधिच घुसत होतं
काल म्हणे पहिल्याला
आख्खं कणिस मिळलं
पण दुसर्यानं धक्का दिला
आणी ते हवेतच गळलं
थोड्याच वेळात कबुतरांची
भली मोठ्ठी सभा भरली
आणी आज चरायला कुठं जायचं?
यावरच पहिली चर्चा ठरली