कविता

समृद्ध भारत

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
30 Apr 2013 - 10:07 pm

भारताची समृद्धी
रस्त्यांच्या कडे,कडे,ने दिसते,
पूर्वी टिन चे डब्बे घेवून बसत ,
आता स्टील ची लोटी दिसते

हास्यकविता

मरणे कठीण झाले

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
30 Apr 2013 - 4:31 pm

मरणे कठीण झाले

जगणे कठीण झाले, मरणे कठीण झाले
शोधात सावलीच्या, पळणे कठीण झाले

ना राहिले जराही विश्वासपात्र डोळे
झुळझूळ आसवांचे झरणे कठीण झाले

हंगाम अन ऋतूही विसरून स्वत्व गेले
हा ग्रीष्म की हिवाळा, कळणे कठीण झाले

कलमा, बडींग, संकर; आले नवे बियाणे
पंचांग गावराणी पिकणे कठीण झाले

बाभूळ, चिंच, आंबा; बागा भकास झाल्या
मातीत ओल नाही, तगणे कठीण झाले

सोंगे निभावताना मुखडा थिजून गेला
माझी मलाच ओळख पटणे कठीण झाले

एकाच वादळाने उद्ध्वस्त पार केले
आयुष्य हे नव्याने रचणे कठीण झाले

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलवाङ्मयकवितागझल

दृष्टी दोष

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
30 Apr 2013 - 3:50 pm

बदलली नजर तुझी लेन्स लावूनी,
हसत होतीस त्या आधी मला बघोनी,
नयनात तुझ्या सदा मी होतो आधी ,
जडली कशी तुज नजरेची व्याधी
लावलास जसा तू कॉनट्याक्त लेन्स
नजरेत तुझ्या झालो मी नोन्सेन्स . ,

भूछत्रीकविता

ट्रेफिक सेन्स

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
29 Apr 2013 - 10:33 pm

सखे पाहून तुज साडीत लाल,
थांबलो,जाहलो मी बेहाल,
पाहून तनास हळद पिवळी,
सावरलो नजर झाली बावळी ,
पाहून हातात चुडा हिरवा,
भासलीस मज तू ट्रेफिक सिग्नलच नवा,
चाललो पुढे मी आधार शोधण्या नवा

कॉकटेल रेसिपीकविता

तू

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
29 Apr 2013 - 12:11 am

ओठांवर चिकटलेल्या मधाच्या
थेंबासारखी तू
.
पापण्यांच्या काठावर तरळणार्‍या
पाण्यासारखी तू
.

कविताप्रेमकाव्यमुक्तक

जीवनाचे कोडे

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
28 Apr 2013 - 11:45 pm

रविवार च्या सुंदर सकाळी,आठी पडली माझ्या भाळी ,
घराचा केला धोबी घाट ,लावली तिने रविवार ची वाट,
अहो,कालचे उरलेले गिळा ,चादरी धुवून नीट पिळा ,
आलेला राग गिळोनी ठेवल्या चादरी पीळोनि,
आता उभे राहिलात का असे?,साक्षात मला ती जगदंबा भासे,
लवकर तुम्ही स्टुलावर चढा ,कोपऱ्यातली कोळ्याची जाळी काढा,
करुनी सुंदर रविवार चा राडा,वाचला तिने कामांचा पाढा,

अभय-लेखनकविता

प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
27 Apr 2013 - 2:32 pm

ऐक राजा चाणक्यनीती
प्रेमात येते कशी उपयोगी
प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ
खेळता डोक्याने यश निर्भेळ
चाणक्य सांगतो काही युक्त्या
येती फळा जर भावना सच्च्या
सर्वात आधी हे जाण तू
प्रेमास तुझिया प्रमाण तू
दुसरा करीतो म्हणोनी केले
प्रेमवीर असे पराभूत झाले

हास्यकविताविनोद

राशी चक्रम

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
26 Apr 2013 - 9:25 am

मेष पुसे वृषभा ,सिह दिसला का तुला ,
वृश्चिक पाहुनी कन्या पळती ,
कर्क,मीन,कुंभात दडती ,
धनु पाहुनी मकर विचलित होतो,
मिथुन जना आनंद

भूछत्रीकविता

प्रवास

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
25 Apr 2013 - 6:22 pm

प्रवास चालू आहे माझा
शून्याकडून क्षितिजाकडे
.
.
अथक,
अविरत
.
.
थांबता नाही येणार मला
खूप थकलोय, पण
थांबलो तर मन रागावेल
आणि पाय तर चालायला नकार देतायत
जाऊन जाऊन कुठे पोहोचणार?
क्षितीज तर एक रेघ..
आणि शून्य? ते काय?
सुरवात केलेल्या बिंदुला
गोल फिरून पोहचणारी
एक वळसे घेणारी रेघच ना?
.
.
मग का चालावे?
पण मन, ते का ऐकत नाही?
मनालाच ठाऊक
विचारले जरी
सांगता थोडीच येणार आहे त्याला?
आणि सांगितलेच तरी
कळणार कोणाला इथे?
जाऊ दे

करुणशांतरसकवितामुक्तक

नाटकी बोलतात साले!

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
25 Apr 2013 - 11:07 am

नाटकी बोलतात साले!

कोणीतरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे
नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

भुकेचा प्रश्न सुटणारा नाही, तुझ्या भाषणाने, पण;
तू वाचाळ नाहीस अशी, खात्री तर पटली पाहिजे!

राजसत्ताच कोपली बघ, तुझ्या श्रमाच्या कमाईवर
तुझी शक्ती मनगटात तू, पूर्ण एकवटली पाहिजे

रावणांच्या राज्यात पुन्हा, सीता एकाकी पडलीय
भूमीच्या मुक्तीसाठी, तुझी काया झटली पाहिजे

देच तुतारी फुंकून तू, इथेच, याच स्थळी, अशी की;
क्रिया येथे आणि प्रतिक्रिया, दिल्लीत उमटली पाहिजे

अभय-गझलमराठी गझलवीररसअद्भुतरसरौद्ररसकवितागझल