प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
27 Apr 2013 - 2:32 pm

ऐक राजा चाणक्यनीती
प्रेमात येते कशी उपयोगी
प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ
खेळता डोक्याने यश निर्भेळ
चाणक्य सांगतो काही युक्त्या
येती फळा जर भावना सच्च्या
सर्वात आधी हे जाण तू
प्रेमास तुझिया प्रमाण तू
दुसरा करीतो म्हणोनी केले
प्रेमवीर असे पराभूत झाले

जी तुला बहू आवडे
प्रेमाचे तिला असे वावडे
काय करशील अश्या प्रसंगी?
ऐक सांगतो युक्ति जंगी
विषय हलके टाळ तू
बुद्धिचातुर्य दाव तू
स्वप्निल गोष्टीस नकोच थारा
जुळतात कुठे त्या शोध तारा
असेल काय जे प्रिय तिला
त्यात असावी गति तुला
काम जरासे वेळ घेते
जुळता तारा गति येते

स्वप्नील पाखरू जर असेल ते
कविता करायचे शिकून घे
कार्य समजू नको सोपे
स्वप्ने आवरणे काम मोठे
येता पाऊस, धुके, वारा
पुरुष मित्रास नकोच थारा
संशय घ्यायचे काम नाही
परी विषाची नको परीक्षा

असता स्वभाव बहु बडबडा
काय करावे सवाल खडा
बोलायास तिला बहु आवडे
जरी पसंत ना तुला ते
काम ऐसे करीत जावे
बडबडीत नाव आपुलेच यावे
जमवून जर हे आणलेस तू
युद्ध अर्धे जिंकलेस तू
पुरुषस्वभाव हा जाण तू राजा
होतात खच्ची नाव दुजे येता
उगी समजती मग ही दुस-याची
ईथे आपणा वाव नाही
क्वचित काही प्रेमळ ऐकता
नाही हुरळून जायचे
स्वभाव आहे बडबडा
हे ना कधी विसरायचे
कसे ओळखावे ईथे
मने लागली जुळायला
जेव्हा शब्दांपेक्षा जास्त ईथे
नजर लागते बोलायला

ऐक आता सांगतो
काय करावेस तू
सुंदर अश्या कोणाच्या
पडलास जर प्रेमात तू
सौंदर्याला जरी असतो
सौंदर्याचा अभिमान फार
ऐकवू नकोस परि तिलाच
तिच्या दिसण्याचे गुणगान फार
कारण आहे सरळसोपे
ऐकवीतात तिला हेच सारे
तू आहेस वेगळा
असे वाटावे तिला
शस्त्र ईथे हे परजायचे
विषय अनोळखी काढायचे
सौंदर्याला सौदर्याच्या
जग बाहेरचे फिरवायचे
ती रति म्हणोनी तू
मदन व्हावास ऐसे नाही
नीटनेटके रहात जावे
गंड नको कसलाच काही
ईथे स्पर्धा असते फार
हेर ठेवावेत दोन-चार
कुठे जाते, काय करते
माहिती असावी तपशीलवार
आता संगतो हुकुमी एक्का
प्राण लाव कानाला
सौंदर्यापेक्षा जास्त लक्ष
द्यायचे तिच्या घराला
तिला जवळच्या जनांकडून
तुझी स्तुती कानी पडावी
मग काय बिशाद आहे
ती दुस-या कुणाची व्हावी
उद्दिष्ट्य आता तुझे
हेच असायला पाहिजे
तिच्याच घरात तिने तुझे
नाव ऐकायला पाहिजे
हा प्रकार हाताळण्या
कसब असावे लागते
चुकता नेम ईथे एकदा
काठिण्यपातळी वाढते
ईथे जमायचे तर
झटकन जमून जाते
अति समय लागता
नाद सोडून द्यायचे
ऐक चाणक्य तुला सांगतो
मंत्र बहु उपयोगी
जो डाव जिंकता न येइ
तिथे मोहीम थांबवावी

आता येइ प्रश्न कळीचा
कुणी पुढाकार घ्यायचा
तू प्रश्न टाकायचा का
तिचा प्रश्न झेलायचा
जटील आहे ऊत्तर तरी
सांगतो ढोबळ तत्त्वे
प्रसंगानुरूप वागावे
पुरुषाने हे खरे
नाना प्रकार मुलींचे
आपला प्रकार ओळखावा
न येता ओळखता
चाणक्यास पुसावा
कुणी झटकन निर्णय घेतसे ....(प्रकार -१)
कुणी वेळ लावीतसे..........(प्र-२)
कुणी जरासे घाबरट तर्.......(प्र-३)
कुणी बिनधास्त बोलतसे...... (प्र-४)
कुणाच्या घरी पिता करारी......(प्र-५)
कुणी मातेचे राज्य बघे........(प्र-६)
कुणाला मर्दानीपणा आवडे......(प्र-७)
कुणी सौम्यपणात रमे.........(प्र-८)
कुणाला आवडे घोडे, हत्ती.....(प्र-९)
तर कुणाला फुलपाखरे........(प्र-१०)
एक, तीन, पाच
सात आणि नऊ
तू प्रश्न पुसायचा
नको वेळ लाऊ
दोन, चार , सहा
आठ आणि दहा
समोरून प्रश्न येइल
असे काय ते पहा
विषम प्रकारात वरच्या
लगाम नाही सोडायचा
सम प्रकारात मात्र
जपायचे तू कोमल मना

राजा पुरे झाली एवढी
प्रेमातली चाणक्यनीती
शिकता येत नाही कधी
घरातच सारी युद्ध्नीती

हास्यकविताविनोद

प्रतिक्रिया

पुष्कर जोशी's picture

27 Apr 2013 - 2:51 pm | पुष्कर जोशी

भारी रे चाणक्या !

अभ्या..'s picture

27 Apr 2013 - 2:59 pm | अभ्या..

=)) =)) =)) =))
लैच दांडगा अनुभव बाबा. ____/\____
आम्हाला टैम्प्लीज ;)

अविनाशकुलकर्णी's picture

27 Apr 2013 - 3:15 pm | अविनाशकुलकर्णी

खुप मोठ्ठि व लांबडी कविता

चाणक्य's picture

27 Apr 2013 - 10:00 pm | चाणक्य

पण आता विषयच असा आहे की....... :-)

परिकथेतील राजकुमार's picture

27 Apr 2013 - 3:21 pm | परिकथेतील राजकुमार

अप्रतिम हो चाणक्यशेठ !

एकदम ज ह ब र्‍या !!

आयला हे तर युवतीपटवणसूत्रच की हो!!!! आवृत्ती करीन म्हंटो याची दररोज, कृतिशील उपासनेचे फळ लौकर मिळेल इन्शाल्लाह ;)

पोरगी असता तरणी ताठी
करिअर ओरिएंटेडच असे ख्याती
फक्त तिच्या फ्रेंडसर्कलसोबत सुरेख जुळवुन घ्यायची क्लुप्ती
हमखास फळा येतसे...

लळा तिच्याच फ्रेंडसर्कलचा हवा
सहवास त्यांचा आनंदवावा,
अन पगार महिना आकडी सहा
पोरगि गळा पडतच असे.

_____

पोरगी असता तरणी ताठी
करिअर ओरिएंटेड नसे हीच ख्याती
मग अंगभुत गुण व धाडसे हीच नीती
मुलिचे मन जिंकतसे...

रात्रि मस्त पहावा चित्रपट ओल्ड स्कुल
पहाटे पहाटे तोडून गुलाबाचे फुल
अंगणातल्या तिच्या स्कुटि
धोका पत्करुन नावे ठेवावे

कृति ही वाटे पोरकट
लिहणाराही वाटे बावळट
परंतु मुलीचा विरोध मात्र सफाचट
या कृतिने हमखास होतसे
_____

पोरगी असता तरणी ताठी
दिसे एकटीच तुम्हाला निर्वाणापाशी (निर्वाणा हे डिस्कोचे नाव आहे)
गोल चेहरा व चौकस अन निरागस भाव डोळ्याशी
लेडी लक उदंड ते जाहले

कॉलगर्ल भले ति नसे
पबचे तिकीट, ड्रिंक्स,व जेवण विकत घेणे पुरेसे
वरुन आपल्या ह्युमर, विटी जोक्स, व नॉन्सेन्सला ती भरभरुन हसे
विकेंड साजरा होइ.

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2013 - 6:24 am | टवाळ कार्टा

;)

संजय क्षीरसागर's picture

27 Apr 2013 - 10:59 pm | संजय क्षीरसागर

शिकता येत नाही कधी
घरातच सारी युद्धनीती

एकदम बॉस!

"मुली पहाण्यातले फ्रस्ट्रेशन" असा काहीतरी धागा आला होता ना काही महिन्यांपूर्वी - त्याला सणसणीत उत्तर आहे तुमची कविता.

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2013 - 6:25 am | टवाळ कार्टा

चायला तो "दाखवण्याच्या" प्रोग्रामसाठी होता

प्रभाकर पेठकर's picture

28 Apr 2013 - 3:38 am | प्रभाकर पेठकर

अरेरे..! बराच उशीर झाला आहे आता.

मुलालाच सांगतो वाचायला.

इन्दुसुता's picture

28 Apr 2013 - 7:22 am | इन्दुसुता

मजेदार आहे हो चाणक्यनीती !! :D

मदनबाण's picture

28 Apr 2013 - 7:23 am | मदनबाण

जबराट !

युक्त्या काही असतात खास
मिळते ज्याचे फळ झकास
प्रेम रसाचा आस्वाद मग
चाखता येईल अपार.... ;)

अप्पा जोगळेकर's picture

28 Apr 2013 - 11:52 am | अप्पा जोगळेकर

जबरदस्त !

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2013 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा

चाणक्य=निती =))

चावटमेला's picture

30 Apr 2013 - 12:38 pm | चावटमेला

आवडली ही कविता फर्मास..
युक्त्या आहेत खूप झक्कास.
जरि दिसती साध्या सरळ
अवघड आहे एक एक वळण
तरि सांगतो एक क्लृप्ती छोटी
खिशामाजी ठेवी सदा चाणक्य नीती :)

नि३सोलपुरकर's picture

30 Apr 2013 - 1:02 pm | नि३सोलपुरकर

" पुरुषस्वभाव हा जाण तू राजा
होतात खच्ची नाव दुजे येता
उगी समजती मग ही दुस-याची
ईथे आपणा वाव नाही "...... हे तर.१०००००%
____/\______

सुहास झेले's picture

30 Apr 2013 - 1:24 pm | सुहास झेले

अशक्य भारी... :) :)

भडकमकर मास्तर's picture

30 Apr 2013 - 3:52 pm | भडकमकर मास्तर

झकास जमली आहे कविता.. :)

अवांतर : स्वतःसाठी किती उपयोग केला या नीतीचा?

विसोबा खेचर's picture

30 Apr 2013 - 4:25 pm | विसोबा खेचर

लै भारी..

सुरमईश्याम's picture

30 Apr 2013 - 4:38 pm | सुरमईश्याम

भारीभ़क्कम अभ्यास...

प्रीत-मोहर's picture

1 May 2013 - 4:54 pm | प्रीत-मोहर

आता स्त्रियांची मदत पण करा. चिकणे पोरगे कसे पटवावे ह्याची ही नीती लिहाच म्हणते मी.

टवाळ कार्टा's picture

1 May 2013 - 5:42 pm | टवाळ कार्टा

फक्त गोड हसले की काम होते ;)

चाणक्य's picture

3 May 2013 - 9:46 am | चाणक्य

बरोबर सांगतायत. मुलांना वेगळं पटवायची गरजच काय ? हसलं की झालं की काम. 'हसली की फसली' म्हणतात ..पण मुलगी हसल्यावर फसणारी खरतर मुलंच असतात.

गोड हसताना अलगद डोळा मारला,तर नजरेचा तो तीर वर्मी बसतो ! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2013 - 7:59 am | अत्रुप्त आत्मा

@चिकणे पोरगे कसे पटवावे ह्याची ही नीती लिहाच म्हणते मी.>>> =)) नै नै...आधी चिकणी पोरं मंजे काय? याची व्याख्या ठरवा! ;)

टवाळ कार्टा's picture

1 May 2013 - 5:44 pm | टवाळ कार्टा

चिकणे पोरगे

आता कसे स्पष्टपणे लिहिले ....उगाचच गुण, स्वभाव वगरे जड शब्द नाहीत

उपास's picture

3 May 2013 - 2:08 am | उपास

जवळ जवळ सर्व क्लृप्त्यांशी सहमत :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 May 2013 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

नित्य करावे स्त्रोत्र पठण,
दुर होईल त्याचे एकले पण,
मग चाणाक्य देवा अर्पण,
पत्रिका करावी लग्नाची,

भर उन्हाळयात येई गारवा विसरा बालकवी हा आला तरुणकवी .