राशी चक्रम

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
26 Apr 2013 - 9:25 am

मेष पुसे वृषभा ,सिह दिसला का तुला ,
वृश्चिक पाहुनी कन्या पळती ,
कर्क,मीन,कुंभात दडती ,
धनु पाहुनी मकर विचलित होतो,
मिथुन जना आनंद

भूछत्रीकविता

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

26 Apr 2013 - 9:31 am | परिकथेतील राजकुमार

काव्यरस:
भूछत्री

प्रचंड सहमत आहे.

बाकी, अधे मधे लोकांचे लेखन वाचायला आणि त्यावर चांगली-वाईट टिपणी द्यायला पण येत चला मिपावरती.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Apr 2013 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

मस्त उपाध्यांना दाखवा!

महेश नामजोशि's picture

26 Apr 2013 - 11:48 am | महेश नामजोशि

माझे वडील ज्योतिषी होते. ते जिवंत असतांना मला कधीही शिकण्याची इच्छा झाली नाहि. ते गेल्यानंतर मी एकदा त्यांचे कपाट उघडले आणि एक एक पुस्तक मी काढत होतो तेव्हा मला त्याबद्दल कुतूहल वाटले. त्यानंतर मी त्याचा अभ्यास चालू केला. मी त्यावेळी खोपोलीला एका कंपनीत नोकरी करीत होतो. सहज मित्रांबरोबर चर्चा करायचो तेव्हा मी सांगितलेले बरोबर यायचे असे जेव्हा होऊ लागले तेव्हा खूप मजा यायचि. एकदा एका साहेबांनी मला त्यांचे भविष्य विचारले आणि मी काही तरी त्यांना सांगितले ते त्यांना पटले. तेव्हा त्यांनी सांगितले कि माझा मृत्यू कसा होईल ते सांग. मी त्यांना म्हणालो कि हे कधी सांगायचे नसते. तेव्हा त्यांनी मला आव्हानच दिले कि तुला येते का बघु, मी विमा प्रतिनिधी आहे. त्यानंतर मी त्यांना सहज म्हणालो तुम्हाला पाण्यात बुडून मृत्यू येईल. त्यावर ते म्हणाले कधी येईल. तेव्हा मी म्हणालो असे सांगणे कठीण आहे तरीही संग म्हणाले त्यावर मी म्हणालो आठ दिवसातही येऊ शकतो. माझे मित्र व मी आश्चर्यचकित झालो जेव्हा खरोखरच आठच दिवसांनी ते मुंबईला गेले असतांना खोपोलीला परत यायला निघाले असताना बसमध्ये जागा नाही असे कंडक्टर म्हणाला तरीही विनंती करून चढले व ती बस वाशी खाडीत पडून त्यांचा मृत्यू झाला . ते पाण्यात बुडून मेले. आमचा विश्वासच बसेना. त्यानंतर बरीच वर्षे त्याचा अभ्यास मी सोडून दिला होता. काही वर्षांनी मला परत अभ्यास करावासा वाटला. मी माझ्या पत्रिकेचा अभ्यास करू लागलो तेव्हा दिसून आले कि माझ्या आयुष्यात चाळीशीनंतर बदल आहे. त्याकरिता मला तयार व्हावे लागेल पण मी पदवीधारक नव्हतो. म्हणून मी उस्मानिया विद्यापीठातून B.A. ची पुस्तके घरी मागवून B.A. केले. त्यानंतर Thane College मध्ये प्रवेश घेऊन Law चा अभ्यास चालू केला कारण माझ्या पत्रिकेतील तुळेच्या शनिमुळे कायद्याचा अभ्यास जमू शकत होता. त्याच दरम्यान मला अचानक धनलाभ होईल असे मला वाटत होते. त्यावेळेस बर्याच कंपनीत Voluntary Retirement Scheme चालू होत्या. मला अंदाज होता आपलीही कंपनी पुढे हि स्कीम काढेल तर आपण तयारीत राहु. आणि असेच घडले मी काही कंपन्यात इंटरव्यू देऊन आलो तेथे हेच सांगितले कि आमच्या कंपनीत voluntary स्कीम येणार आहे व ती घेऊन मी तुम्च्यायेथे नोकरीस येइन. त्यांनाही आश्चर्य वाटायचे पण दोन कंपन्यांनी मला सांगितले तू नक्की आमच्या येथे ये. त्या काळात कोम्पुटर्वर काम करणारे लोक खूपच कमी होते. कारण नुकतीच ती सुरवात होती. मला नेहमीच शिकायची खूप आवड असल्यामुळे मी आमच्या ऑफिसमध्ये कोम्पुटर आणायला लावून शिकून घेतले होते. त्यावेळी लोटस व वर्डस्टार होते. मला अगदी ठरवल्याप्रमाणे Voluntary चा फायदा मिळाला व मी नवीन ठिकाणी कामावर रुजू झालो. आता तिथेही मी अठरा वर्षे नोकरी करून निवृत्त झालो व पुन्हा तिथेच सल्लागार म्हणून नोकरीस आहे.
भविष्य हा गूढ विषय आहे. प्रथम हे समजून घेतले पाहिजे कि कुठलाही ज्योतिषी असे ठाम सांगू शकत नाही कि त्याने सांगितलेले भविष्य बरोबर येईल कारण हे शास्त्रच अंदाजावर आधारित आहे.

ज्योतिष हे माणसाच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहांवरून सांगितले जाते. पत्रिकेतील ग्रह, त्यांची एकमेकांवर असलेली दृष्टी, ग्रहाची महादशा, कुठच्या राशीत ग्रह आहे अशा अनेक मुद्द्यांची सांगड घालून वर्तवले जाते.

मला आलेल्या निरनिराळ्या अनुभवांवरून पारंपारिक पद्धतीच्या पुढे जाऊन पत्रिकेचा तौलनिक अभ्यास करतो. त्याप्रमाणे मला आतापर्यंत खूपच आश्चर्यकारक व समाधानकारक परिणाम मिळाले आहेत. मी हे नेहमीच सांगतो कि ज्योतिषाचा आपण फक्त आधार घ्यायचा व आपली वाटचाल सुरु ठेवायची. आमच्या घरातील स्वप्नीलला त्याचे अनुभव आले, त्याच्या मुलाच्या आजारात चिंताजनक स्थिती आली होती तेव्हा तारीखवार कधी बरे वाटेल, डॉक्टरची भेट कधी मिळेल याची माहिती मी दिली होती, त्याच्या बहिणीचा विवाह कसा जमेल याची किती काळजी होती. तिचे केस जातील हे मी सांगितले होते व तिला अव्यंग चांगला नवरा मिळेल हे सांगितले होते. गेली दोन वर्षे सुरेंद्र पत्रिका घेऊन येत होता. कित्येक वेळेला पत्रिका जमून सुधा करू नकोस असे सांगितले होते यावेळी मात्र पत्रिका आल्याबरोबर पत्रिका बघून मी त्याला सांगितले कि माझ्याकडून तरी सिग्नल ओके आहे. मुलाची चौकशी कर. बाकी सर्व ठीक आहे. मुलगा खरोखरच उत्तम आहे. इतका छान अव्यंग मुलगा तिला उत्तम जोड मिळाली. माझ्या दोन्ही मुलींच्या पत्रिका बघून मी पत्नीला सांगितले कि जावई चालत घरी येतील आणि तसेच झाले. त्यांना स्थळे बघायला लागली नहित. त्यांनी प्रेमविवाह केला. मी जावयांच्या पत्रिका बघितल्या नहित. असेच परिणाम बाहेरच्या माणसांनाही मिळाले आहेत. एक वृद्ध गृहस्थ भ्रमिष्ट अवस्थेत घर सोडून निघून गेले होते. त्यांना शोधणे मोठे अवघड काम होते. मी त्यांच्या नातेवाईकांना कल्पना दिली कि ते चालू असणारया वाहनात बसून गेले आहेत व सापडले तर दोन दिवसात सापडतील. नंतर नक्षत्र बदलामुळे सापडणार नाहीत. त्यांनी रेल्वे स्टेशनवर चौकशी केली तेव्हा ते भायखळ्याला सापडले. त्यानंतर २५ जुलै महापूर, ते सापडलेच नसते. अशाच तर्हेने एका केसमध्ये एक तरुण माणूस कोमामध्ये गेला होता व डॉक्टरांनी आशा सोडून दिली होती व त्याला घरी घेऊन जायला सांगितले होते. त्याच्या नातेवाईकांनी मला सांगितले तेव्हा त्याला आणखीन पंधरा वीस दिवस आयसीयू मध्ये ठेवा असे सांगितले. तो शुद्धीवर येईल व पूर्ण बरा व्हायला सहा महिने लागतील असे सांगितले. तो माणूस आता उत्तम आहे.
हे सर्व पारंपारिक पद्धतीच्या विपरीत सांगितलेले निर्णय होते. पण उत्तम अनुभव आले.
एक पत्रीका तुम्ही दहा ज्योतिषांना दाखवली तर दहा प्रकारे निर्णय देतील. कारण प्रत्येकाची बघण्याची दृष्टी निरनिराळी असते. जसे दहा डॉक्टरांकडे गेले तर दहा वेगवेगळी औषधे ते देतील. एकच केस दहा वकील निरनिराळ्या प्रकारे लढवतील. प्रत्येक वकील वेगवेगळा पुरावा शोधेल.

मला ज्योतिष बघायला अजिबात वेळ मिळत नाही. तरीही मी जेव्हा अगदि कोणताच उपाय शिल्लक राहत नाही फक्त तेव्हाच फक्त मित्रांना सांगतो कि या हरकत नाहि. पण असा अनुभव येतो कि तेच सूत्र लावून सगळ्यांचे भविष्य बरोबर येत नाहि. त्याला अर्थात बरीच कारणे असतात. जर अचूक आले असते तर सर्व भविष्यकार श्रीमंत झाले असते. पण तसे नसते. फारच थोड्या लोकांचे बरोबर सांगता येते. त्यामुळे त्यात जास्त फंदात पडू नये.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 Apr 2013 - 5:55 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तुम्ही अचूक भविष्य सांगू शकता वगैरे सगळ ठिक आहे पण हे सगळं इथे कां लिहीलेय ते कळले नाही.
असो.
बाकी कविते (?) बद्दल काय लिहावं?

सविस्तर प्रतिक्रिया आवडली.

त्याचबरोबर तुमचे अंदाज चुकलेहि असतील. त्याबद्दल पण लिहू शकाल का?

अग्निकोल्हा's picture

27 Apr 2013 - 10:17 am | अग्निकोल्हा

एका विशीष्ठपध्दतिने मी प्रेडिक्शन केल्यास ते कधिच चुकत नाही असा लोकांचा गाढा अनुभव आहे. पण मला ज्योतिष बघायला अजिबात वेळ मिळत नाही. तरीही मी जेव्हा अगदि कोणताच उपाय शिल्लक राहत नाही फक्त तेव्हाच फक्त मित्रांना सांगतो कि या हरकत नाहि.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2013 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

जर-दुसर्‍याला प्रॉब्लेम आला तर-मला सोल्युशन देता येतं

अशी सही घ्यावी म्हणतोय. http://www.easyfreesmileys.com/smileys/music-118.gif

अग्निकोल्हा's picture

28 Apr 2013 - 4:52 pm | अग्निकोल्हा

फक्त तुम्ही मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल...? याची जाणिव ठेवा.

अवांतर:- माझा मुळ प्रतिसाद "मलाही भविष्य सिध्दी प्राप्त आहे." हा "उपरोधिक" म्हणून लिहला होता... असो. तुमची सही अन तुमचीच वही... पायजे ते लिवा..

अमोल केळकर's picture

27 Apr 2013 - 10:57 am | अमोल केळकर

दांडगा अभ्यास दिस्तोय की तुमचा. चालू ठेवा

अमोल केळकर

तिमा's picture

27 Apr 2013 - 3:26 pm | तिमा

या भारताचे एकदा अचूक भविष्य वर्तवून टाका बुवा. वाट बघण्याचा कंटाळा आलाय.