जय परशुराम...जय वामन!!!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
22 May 2013 - 6:12 pm

आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्‍यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू...

ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्‍या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.

ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे
पेव फुटलेले आहे
धुळीत बसलेले ते वादळ
पुन्हा उठले आहे.

जिथे पहावे तेथे आमचे
बोर्ड टांगले आहेत.
ज्याला हवे त्या तागडीत
सोइने तोलले आहेत.

जय परशुराम,जय वामन
ह्याच घोषणा आहेत
नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या
हे लोक तयारीत आहेत?

इतिहास/वर्त-मान तपासायची
गरजच संपली आहे
भयगंडाच्या आत धिटाई
हिंसक झाली आहे.

संघटनांच्या बळा'साठी
घटना हव्या आहेत
तोंडात तत्व नैतिकतेची
मनात(मात्र)शिव्या आहेत.

आपले चेहेरे डागाळलेले
कधि दिसणार आहेत?
आणी ते पहायला कुणाच्या हतात
आरसे... असणार आहेत?

''ते'' काहिही म्हणोत परंतू
चिखल माझ्या घरात आहे.
मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या
ऐन...मोसमा/भरात आहे.
===================================================================

शांतरससंस्कृतीधर्मकवितासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

22 May 2013 - 6:43 pm | प्रसाद गोडबोले

हास्यास्पद लेख . सध्या इतकेच बोलतो .
बाकी पॉपकॉर्न घेवुन बसलोय ....पुढे सविस्तर प्रतिसाद लिहावा काय ह्याचा विचार करत ...

अत्रुप्त आत्मा's picture

22 May 2013 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

हास्यास्पद काय काय आहे? ते नोंदवा!

अर्धवटराव's picture

22 May 2013 - 8:18 pm | अर्धवटराव

समाजमन हे सगळं किती लवकर स्विकारतं हेच बघायचं.

अर्धवटराव

सूड's picture

22 May 2013 - 8:48 pm | सूड

गेल्या वीकेंडचा प्रसंगः अ ब आणि क मित्र स्टेशनावर उभे आहोत.
अ: अरे हीच ना ती आपल्याला शिकवायला होती. किती मेकअप थापून यायची.
बः सीकेप्यांची असणार्...त्यांना भारी हौस असते आपण ब्राम्हणांसारखे सुंदर दिसतो हे दाखवायची.
क: सुंदर दिसण्याचा आणि ब्राम्हण असण्याचा संबंध काय?
बः तुला माहित नाही रे, गप बस. म्हणूनच त्यांच्यात मुंज करतात. आपण ब्राम्हणांसारखे आहोत हे दाखवायला.
कः मुळात मुंज ब्राम्हणांतच करतात हा गैरसमज आहे.
अ: सोनारांच्यातही करतात.
कः अर्थातच!! माझी पण झालीये.
बः हो, पण तुम्ही आमचं सगळं ब्राम्हणांसारखं असतं असं दाखवायचा अट्टाहास करत नाही.

जात, जी आपल्याला बाय डिफॉल्ट मिळालीये तिचा किती अभिमान असावा एखाद्याला. बरं अशा लोकांना किती आणि कसं समजवावं तेच कळत नाही.

टीपः वरील प्रसंग उदाहरणादाखल दिला असला तरी खरोखर घडलेला आहे. यात काही विवादास्पद वाटल्यास संपादकांनी प्रतिसाद उडवल्यास हरकत नाही.

शैलेन्द्र's picture

22 May 2013 - 9:39 pm | शैलेन्द्र

घाग्यात लई म्हंजे लैच पोटेंशीयल हाये..

(जाणव्याने पाठ खाजवायची स्मायली कल्पावी)

अशोक पतिल's picture

22 May 2013 - 10:18 pm | अशोक पतिल

प्रामाणिक व परखड लेख !

संचित's picture

22 May 2013 - 10:32 pm | संचित

अगदि खरे बोललात तुम्हि. आज्कल ऊत आल आहे अशा संघटनांना. बिनापुराव्याचे विनाकारण आणि बिन तर्काचे post करत असतात बरेच. याना आवारा कोणी.

आशु जोग's picture

22 May 2013 - 10:44 pm | आशु जोग

जातींवर आधारीत संघटना, संमेलने याबाबत आपले काय मत आहे ? आत्माजी

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2013 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा

@याबाबत आपले काय मत आहे ? आत्माजी>>> खरं म्हणजे हे मत माझं नसून मला पटलेलं असं स्वा.सावरकरांचं आहे... ते सारांश रूपानी देतो.

जी लोकं जातिच्या बाबतीत हळवी किंवा प्रामाणिक आहेत अश्यांसाठी सावरकर म्हणतात,की सांप्रत काळात जातीय संघ काढावे लागणं हे आमच्या हिंन्दूसमाजाचं वास्तव आहे.परंतू त्या जातसंघांचा/संम्मेलनांचा उपयोग पोटजाती मोडून एकजाती बनणं...जसे की ब्राम्हणातल्या सर्व पोटजाती मोडून एकच ब्राम्हण जाती बनणं,हा पहिला टप्पा नंतर सर्व जाती मोडून एक हिंन्दूजाती बनणं हा दुसरा वा अंतिम टप्पा.

म्हणूनच सावरकर सहासन/सहभोजनाच्या चळवळी चालवत होते. त्यांना जाती मोडायच्या कार्यक्रमातील हा(ही) एक उपाय वाटत होता. तो उपकारक की कसा...ते आपण सोडून देऊ.पण मला आजही तो आवश्यक वाटतो. या मार्गानी तर या मार्गानी...माणसांना शेवट हिंन्दू ही तरी एक जात अस्मितादर्शक म्हणून मिळते आहेच ना! शिवाय सावरकरांचाही हिंन्दूजाती होण्यातला अभिमान हा धर्माभिमानाच्या विरोधी पण संस्कृतीच्या चांगल्या मुल्यांच्या बाजूनी आहे.
त्यांची सात प्रकारच्या बंदी मोडायची योजना ही अंतिमतः हिन्दूजातीच्या व्यापक एकिकरणाचीच भुमिका आहे. हे ही लक्षात ठेवलेले बरे!

जातींवर आधारीत संघटना, आणी संमेलने या मार्गानी व याच हेतूनी चालणार असतील तर आमचा त्याला पाठिंबा! पण दुर्दैव असं की तिथेही धर्ममतांचच प्राबल्य आणी जान्वी घाला वगैरे विषमतावादाचाच प्रसार अढळतो आहे. :(

आशु जोग's picture

23 May 2013 - 9:21 am | आशु जोग

मोठमोठी जातीय संमेलने होतात पण त्यामधून काही जोडणी होत असेल तर व्हावी

मात्र आपण एकत्र येऊन इतर जातींना शिव्या हा कार्यक्रम असेल तर ते टाळले पाहीजे.

अनिरुद्ध प's picture

23 May 2013 - 1:54 pm | अनिरुद्ध प

हिन्दु हि जात नसुन हा धर्म अथवा जीवन पद्धती आहे असे मला वाटते.

ह्म्म... एकमेकांचा द्वेष करुन काय मिळते ते ज्याचे त्यालाच ठावुक !
आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.
फेसबुक म्हणण्या पेक्षा जालावर म्हंटल्यास जास्त योग्य होईल असे वाटते.
असो....
खालील वाक्य गुगलुन पाहिले तरीही द्वेषच पाहिला मिळेल...
शिवचरित्राला डसलेला विषारी नाग

ईथेही द्वेष :-
http://2.bp.blogspot.com/-K-3bIUZ46CQ/T5Pz3LfEuXI/AAAAAAAAAOY/m9sYYfaMR8...
http://4.bp.blogspot.com/-qzK9WZTtH24/T5P16Ci4NuI/AAAAAAAAAOg/vNJBRl33bt...

याच विषया सारखा मिपावरील धागा :-
"शिवरायांच्या बदनामीची केंद्रे"

***
संपादक मंडळींनी हा प्रतिसाद अयोग्य वाटल्यास, तो उडवल्यास किंवा संपादित केल्यास माझी हरकत नाही.

अँग्री बर्ड's picture

22 May 2013 - 11:05 pm | अँग्री बर्ड

असहमत ! गेले तीन वर्षे संभाजी ब्रिगेड बरोबर येनकेनप्रकरेण नडतोय, आमचा अनुभव वेगळा आहे.

आदूबाळ's picture

22 May 2013 - 11:43 pm | आदूबाळ

काय आहे तुमचा अनुभव?

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2013 - 12:15 am | अत्रुप्त आत्मा

@ गेले तीन वर्षे संभाजी ब्रिगेड बरोबर येनकेनप्रकरेण नडतोय, आमचा अनुभव वेगळा आहे. >>> तो नक्कीच वेगळा असणार.कारण संभाजी ब्रिगेडही मराठाजातिच्या हितासाठीच झटणारी संघटना आहे.मग शिवधर्मात किति का लोकशाहीवादी/मानवतावादी तत्व असेनात! धर्माच्या पोथ्या बरं/वाइट काहिही म्हणोत,माणसं स्वार्थप्रेरित हेतूनीच वागणार यात शंका नाही.

अँग्री बर्ड >>> तुंम्ही माझ्या भुमिकेशी सहमत आहात काय? ते बोला... फॉर एक्झँपल--- संभाजी ब्रिगेड आणी सर्व ब्राम्हण विरोधी चळवळी संपल्या किंवा त्या आता नाहीत असं क्षणभर गृहित धरा आणी मला सांगा की आपल्या हिंन्दू/वैदिक धर्मातील वर्णवर्चस्वाच्या/विषमतावादाच्या/स्त्री-अन्यायाच्या वाइट्/अनैतिक गोष्टी धर्मातून काढून टाकायला तुंम्ही आमच्या सह येणार का? हे सांगा!

प्रसाद गोडबोले's picture

23 May 2013 - 12:16 am | प्रसाद गोडबोले

आपला लेख हास्यास्पद का वाटला ह्या बद्दल हा सविस्तर प्रतिसाद

जय परशुराम...जय वामन!!!

गेली कित्येक वर्ष मि कित्येक ब्राह्मण लोकांना ओळखत आहे , तेही चांगले कट्टर . पण जय परशुराम जय वामन असे बोलताना कोनालाच पाहिले नाहीये . जास्तकरुन कट्टर ब्राह्मण लोक लोक "मोरया" किंव्वा "जय हो " किंव्वा "हरि ॐ" किंव्वा "जय जय रघुवीर समर्थ" असा घोष करुन गप्पा सुरु करतात . परशुराम , वामन ही नावे ब्राह्मणांपेक्षा ब्रिगेडी लोक जास्त वापरतात For obvious reasons . मी आजवर कोणाही ब्राह्मणाच्या घरात परशुरामाची मुर्ती देवघरात पाहिले नाहीये . आणि वामनाची तर मुर्तीच पाहिली नाहीये .
( अवांतर १ : इथे आमच्या आवडीच्या लेखकाने नुकतीच कविता टाकलीये , त्यात वामनाचा उल्लेख केलाय उगाचच . अर्धे मुर्धे पुराणातले संबंध उचलायचे अन वाट्टेल तसे त्याचे अर्थ लावायचे ही एक खुप सर्वसामान्य मानसिकता झाली आहे आजकाल आणो तो जास्त मोठ्ठा प्रश्ण आहे .)

आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.

आजकाल ? काय बोलता राव ? ब्राह्मण ब्राह्मणेतर १८व्ता शतका पासुन चालु आहे , आजकाल फक्त हत्यारं बदलली आहेत.

आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत.

बरं . ब्राह्मणांनी आपल्या धर्मातील अन्यायी भुमिका सोडली आहे असे माझे ठाम मत आहे . जाणत्या वयात आल्यापासुन मी जितके काही प्राह्मण लोक पाहिलेत त्यातला एकही जातीयता पाळणारा मला भेटलेला नाहीये. कित्येक मित्रमैत्रिणींनी आणि बहिणींनीही अंतर्जातीय विवाहही केलेत जे घरी अ‍ॅक्सेप्टही झालेत .
मात्र वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल मी ठाम आहे . तो असायला काहीच हरकत नाही . ४८ ला घरें जळाली , नंतर कुलकायद्यात जमीनी गेल्या . नंतर आरक्षनाच्या समान संधी मुले नोकर्‍या गेल्या . उरला सुरला जो अभिमान आहे तो पोकळ आहे त्याने आरक्षण मिळणार नाही नोकर्‍या मिळणार नाहीत मग तो ठेवणे न ठेवने हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
(अवांतर२ : लहानपणी आजोबांनी एक घड्याळ दिलं होतं . ते बंदपडुन कित्येक वर्षं झाली . दुरुस्त व्हायची शक्यताही नाही . कोनी भंगारातही घेणार नाही ....म्हणुन काय टाकुन देवु ?? )

केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची.

असेलही , पण त्यातली मतेरीयलाईझ काहीतरी झालय का ? उलट ब्राह्मण द्वेषाने ओतप्रोत भरलीली १७६० पुस्तकं तुम्हाला दाखवतो , अन ती किती मटेरीयलाईझ होत आहेत हे तुम्हाला दादोजी कोंददेव सांगतील .
(अवांतर ३: श्री पुरुषोत्तम खेडकर ह्यांचे एक अप्रतिम पुस्तक आहे माझ्याकडे .पत्ता द्या पाठवुन देतो तुम्हाला . माईनकाम्फ ची आठवण नाही आली तर बोला )

जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे

वर म्हणल्याप्रमाणे पोकळ अहंकार बाळगायला हरकत नसावी . का त्याबद्दल सुध्दा अ‍ॅटॉसिटी लावणार आता ?

आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही.

जाट लोक स्वतःला अभिमानाने जाट म्हणवुन घेतात ...तसेच राजपुत ...तसेच भैया बिहारी लोक ...तसे बंगाली ...तसेच मारवाडी ...तसेच सरदार...तसेच मल्लु मल्लु !!
ह्याने आजवर तरी भारतीयत्वाच्या हिंदुत्वाच्या ऐक्याला बाधा पोचली नाहीये . ब्राह्मणांनी अभिमान बाळगला तर असे काय आकाश कोसणार आहे देव जाणे ? डायवर्सीटी ही होतीच , वर्णाभिमानही होतेच अन ते असुनही आपण एकत्र होतो एकसंध होतो कदाचित हिंदु धर्माची ताकत होती .

आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.

तुम्ही किती ब्राह्मणांशी बोलुन हा निष्कर्ष काढयात ? त्यातले किती जण उच्चशिक्षित होते ? किती जणांना सध्याच्या सामाजिक न्यायाचे चटके बसले होते ? किती जण त्या चटक्यातुन सावरलेले होते ?
काही मोजक्या अत्यल्प माहीती वरुन जनरलायझेशन करण फार डेंजरस सिंप्टम आहे .

आता
१) तुम्ही कदाचित पुण्या मुंबईचे ( क्वचित नाशिकचे) दिसताहात. एकडाव सातार्‍यात कोल्हापुरात येवुन विद्रोही साहित्य संमेलन अटेंड कराच .
२) तुमचा लेख आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी ह्या प्रकारातला वाटला . ३.५ % लोकांनी पोकळ अहंकार बाळगला तर तर त्यावर चर्चा करायची की राज्यामधल्या सर्वात पावरफुल जातीचे प्रतिनिधी ओपनली हिंसेची भाषा करतात , अन संधी मिळाल्यावर ते करुनही दाखवतात ह्यावर चर्चा करायची ?
३) राहता राहिला प्रश्न हिंदुत्वाचा : ब्राह्मणो वर्णानाम गुरु : अर्थात ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे अशा अर्थाचा श्लोक लहानपणी शिकवला जातो म्हणुन बरेचशे ब्राह्मण हिंदुत्ववादाचे समर्थक दिसतात . त्यांना सामाजिक न्याय मिळाला की ते भानावर येतात ... येतील हळु हळु भानावर ...
(अवांतर ३ :हिंदु नावाचा धर्मच नाही असा एक शोध नुकताच वाचनात आला आहे तो मी जमात के लोकांकु फारवर्ड करत आहेच )

असो.
खालील स्वाक्षरी नीट पहावी ही अतिनम्र विनंती .

आदूबाळ's picture

23 May 2013 - 11:23 am | आदूबाळ

गिरिजाभाव, तुमच्या प्रतिसादाच्या निमित्ताने कायम पडत असलेला एक प्रश्न विचारतो.

ज्या गोष्टीच्या असण्यानसण्यात आपलं कोणतंच कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा अभिमान कसा काय वाटू शकतो बुवा?

(हे म्हणजे "मला दाढी उगवते याचा मला अभिमान आहे" असं म्हणण्यासारखं आहे)

आणि हा प्रश्न तुमच्याइतकाच खेडेकर प्रभृति* मंडळींनाही लागू आहे.

*पुरुषोत्तम खेडेकर आणि ह मो मराठे हे दोघेही श्रेष्ठ दर्जाचं विनोदी साहित्य लिहितात "असं माझं मत आहे".

प्रसाद गोडबोले's picture

23 May 2013 - 11:33 am | प्रसाद गोडबोले

वाह , मोठ्ठा फिलॉसॉफिकल प्रश्न विचारलात , बरें वाटलें .

ज्या गोष्टीच्या असण्यानसण्यात आपलं कोणतंच कर्तृत्व नाही त्या गोष्टीचा अभिमान कसा काय वाटू शकतो बुवा?

ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय २ मध्ये म्हणतात की ह्या सगळ्या मनाच्या भावना संस्कारांमुळे निर्माण होतात . सुख दु:ख , कडु गोड तसेच मग ह्यात अभिमान गर्व हेही आलेच की .
एकुणच मनाला जे जे काही भासते ते सारे संस्कारामुळे भासते .( इथे संस्कार ह्या श्ब्दाचा अर्थ पुर्वानुभवातुन (स्वतःच्या वा इतरांच्या ) मिळालेली माहीती . आजच्या भाशेत ट्रेनिंग सेटचे मॉडेल .)

अवांतर १ : ही चर्चा फिलॉसॉफिकल आहे अन ह्या धाग्यावर अवांतर आहे , पुढील गप्पा खरडवहीतुन !
अवांतर २ : मी सध्या एका मुस्लिम देशात आहे आणि इथे बरेच लोक अभिमानाने दाढी ठेवताहेत . मीही ठेवली आहे अन मला त्याचा अभिमान वाटतोय ...संस्कारांमुळे !!

पैसा's picture

23 May 2013 - 11:42 am | पैसा

पुरुषोत्तम खेडेकर आणि ह मो मराठे हे दोघेही श्रेष्ठ दर्जाचं विनोदी साहित्य लिहितात

पुरुषोत्तम खेडेकर मी कधी वाचले नाहीत. पण तुमचं एकूण वाचन चांगलं आहे म्हणून सांगते, ब्राह्मण घरातही दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रियांवरचे अन्याय आणि शोषण काय कोटीचं असू शकतं हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठे यांचं "बालकांड" वाचा.

सूड's picture

23 May 2013 - 1:47 pm | सूड

>>ब्राह्मण घरातही दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, स्त्रियांवरचे अन्याय आणि शोषण काय कोटीचं असू शकतं हे माहिती करून घ्यायचं असेल तर ह.मो. मराठे यांचं "बालकांड" वाचा.

सहमत !!

प्रचेतस's picture

23 May 2013 - 2:55 pm | प्रचेतस

त्याचा उत्तरार्ध 'पोहरा' पण सुरेख आहे.

अनिरुद्ध प's picture

23 May 2013 - 3:08 pm | अनिरुद्ध प

अहो वाचायला वेळ आहे का ईथे आणि ते सुद्धा पुस्तक ? त्यापेक्षा z marathi वरिल उमाझो कार्यक्रम बघितला तरि पुरे.

पैसाताई - बालकांड आणि पोहरा वाचलंय. तुम्ही म्हणता त्याच्याशी सहमत आहे.

मी हमोंच्या "ब्राह्मणांना कुठवर झोडपणार" या पुस्तकाविषयी बोलत होतो.

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 12:52 am | अत्रुप्त आत्मा

@आपला लेख हास्यास्पद का वाटला ह्या बद्दल हा सविस्तर प्रतिसाद --- सर्वात अधी सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

@गेली कित्येक वर्ष मि कित्येक ब्राह्मण लोकांना ओळखत आहे , तेही चांगले कट्टर . पण जय परशुराम जय वामन असे बोलताना कोनालाच पाहिले नाहीये . जास्तकरुन कट्टर ब्राह्मण लोक लोक "मोरया" किंव्वा "जय हो " किंव्वा "हरि ॐ" किंव्वा "जय जय रघुवीर समर्थ" असा घोष करुन गप्पा सुरु करतात . परशुराम , वामन ही नावे ब्राह्मणांपेक्षा ब्रिगेडी लोक जास्त वापरतात For obvious reasons . मी आजवर कोणाही ब्राह्मणाच्या घरात परशुरामाची मुर्ती देवघरात पाहिले नाहीये . आणि वामनाची तर मुर्तीच पाहिली नाहीये --- मी या घोषणांचा ''आधार'' गेली पाच वर्ष(किंवा दहा वर्ष असं आगे/मागे काहिही असू शकेल कदाचित) चाललेल्या सामाजिक घडामोंडीवरुन घेतलेला आहे. तो ब्राम्हणांच्या घरात किंवा तोंडात असतो असं कुठेही म्हटलेलं नाही.त्यापूर्वी ब्राम्हण समाजात हे काहिही मला पाहायला मिळालेलं नाही. हल्ली चालणार्‍या ब्राम्हण संम्मेलनांमधे परशुरामाचा फोटो असतो,आणी त्याची हार घलुन पुजा होते. हे आपणास ठाऊक नाही काय? तसेच घरामधेही परशुरामाचे फोटो दिसायला लागले आहेत. फेसबुकवर तर परशुराम जयंती फोटो...आणी ''जय परशुराम'' ही घोषणा देऊनच साजरी केली जाते आहे, हे तरी सत्य आहे ना? आणी लेखाला/कवितेला दिलेलं नाव हे घोषणा म्हणून नव्हे,तर लेखाच्या विषयाच्या अनुषंगानी दिलं आहे,हे तरी समजुन घ्या. अता परशुराम/वामन ही नाव ब्रिगेडी लोकं वापरतात याचं कारण काय आहे? हे सांगा बरं ! मोठ्या चर्चेचा विषय आहे हा... माहितीये तुंम्हाला? सांगा मग!

@( अवांतर १ : इथे आमच्या आवडीच्या लेखकाने नुकतीच कविता टाकलीये , त्यात वामनाचा उल्लेख केलाय उगाचच . अर्धे मुर्धे पुराणातले संबंध उचलायचे अन वाट्टेल तसे त्याचे अर्थ लावायचे ही एक खुप सर्वसामान्य मानसिकता झाली आहे आजकाल आणो तो जास्त मोठ्ठा प्रश्ण आहे .) ---- अहो माझ्या लेखन प्रीय वाचक:श्री... अर्धे/मुर्धे संबंध उचलुन मी काहि मांडत नाही हो! या परशुराम/वामन सिंड्रोमचा अभ्यास मी गेली ८ वर्ष करतो आहे. मी त्याच्या बाजूनी आणी विरोधात लिहिलं गेलेलं असं बरच वाचलं आहे,शिवाय मी ही ति कथा वाचली आहे.

@आजकाल ? काय बोलता राव ? ब्राह्मण ब्राह्मणेतर १८व्ता शतका पासुन चालु आहे , आजकाल फक्त हत्यारं बदलली आहेत --- हे मलाही ठाऊक आहे,पण मी गेल्या काहि वर्षात जे ''उधाण'' आलय,त्यामुळे तसं म्हटलय हो! तुंम्ही माझी विधानं शांतपणे आणी समजुन/उमजुन वाचा हो...!

@बरं . ब्राह्मणांनी आपल्या धर्मातील अन्यायी भुमिका सोडली आहे असे माझे ठाम मत आहे . --- बाप रे...! कमाल आहे तुमची..असो! आधी तुंम्ही अन्यायी भुमिका आहेत हे जाता जाता मान्य केलतं त्या बद्दल धन्यवाद. अता मला सांगा... '' ब्राम्हणच श्रेष्ठ असतो'' हे विधान बरेचदा निरनिराळ्या अनुषंगानी ऐकायला मिळतं,हे काय अन्यायी भुमिका सोडल्याचं लक्षण मानायचं का?

@जाणत्या वयात आल्यापासुन मी जितके काही प्राह्मण लोक पाहिलेत त्यातला एकही जातीयता पाळणारा मला भेटलेला नाहीये. --- एकही??? एकही भेटलेला नाही...??? खरच, फार धाडसी विधान करता ब्वा तुंम्ही .. असो. वादासाठी हा मुद्दा मी मान्य करतो,पण तरिही मला सांगा ,ब्राम्हणातल्या ब्राम्हणात पोटजातिंच्या भ्रामक अहंता हा काय प्रकार आहे हो? आमच्या कोकणस्थांनी सर्व ब्राम्हणात स्वत:ला श्रेष्ठ समजणं/देशस्थांनी आपणच खरे धर्माचार पाळणारे ब्राम्हण असा गंड बाळगण/कर्‍हाड्यांनी अजुन काही आणी बाकिच्या पोटजातिंनी आणखि असच काही.. ही सगळी जातीयता ''पाळल्याचीच'' लक्षणं आहेत. यावर आमच्या एका कोकणस्थ मित्रानी टाकलेला टाँट मला कायम अठवतो...तो म्हणाला, ''जगात जाती दोनच,कोकणस्थ आणी इतर'' हा टाँट त्यानी नेहमीच्या देशस्थ कोकणस्थ चिडवा चिडवीच्या पार्श्वभूमीवर टाकलेला असला, तरी ही मानसिकता काय दाखवते???

@कित्येक मित्रमैत्रिणींनी आणि बहिणींनीही अंतर्जातीय विवाहही केलेत जे घरी अ‍ॅक्सेप्टही झालेत --- काहि सन्माननीय अपवाद जमेला धरले,तर ही गोष्ट सत्य आहे की आज/काल अंतर जातीय विवाह होतात याच कारण, आर्थिक ''गणितं'' जमली आणी ''क्लास'' एकच असला तर जात असली नसली काय? काहिहि फरक पडत नाही...म्हणून अंतरजातीय विवाह होतात, मी अंतरजातीय लग्न ''लावताना'' अनेकदा वधू/वरांना काहि प्रश्ण विचारत असतो..पण मी वर नोंदवलेले सन्माननीय अपवाद सोडले तर अंतर जातीय विवाहांपैकी शेकडा ९५ टक्के मुला मुलिंना आपण अंतर जातीय विवाह का करतो आहोत याच उत्तर ठाऊकच नसलेलं मला अढळलं आहे. केवळ आर्थिक आणी क्लासचं(वर्गाचं)गणित जमलं म्हणूनच हे विवाह होतात हेच मला निदर्शनाला आलेलं आहे.

@मात्र वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल मी ठाम आहे . तो असायला काहीच हरकत नाही . --- हे घ्या..! आपण स्वतःच वरती जातीयता पाळणारा ''एकही'' पाहिला नाही असं म्हणता, आणी ''वर्ण श्रेष्ठत्वाच्या अहंकाराबद्दल आपण ठाम आहात'' ,असंही म्हणता--या दोन विधानांचा अर्थ काय घ्यायचा हो??? तुंम्हाला जर खरच असं वाटत असेल की तुंम्ही ''वर्ण श्रेष्ठ आहात'' तर माझ्या लेखनाचा उद्देश आणी कारण बरोबर आहे हेच सिद्ध करून देताय तुम्ही...

@४८ ला घरें जळाली , --- हा एकच मुद्दा या चर्चेच्या बाहेरचा आहे,कारण हा सामाजिक मुद्दा नाही,हा राजकीय मुद्दा आहे... (माझ्या अंदाजा नुसार, तो 'गांधिवध/हत्या---गोडसे प्रकरण' असा आहे...बरोबर ना?) त्यामुळे हा मुद्दा वरिल चर्चेत लागू पडत नाही...तरिही माझं मत ''ब्राम्हणांवर या बाबतीत सरसकट अन्याय झाला'' असच आहे...हा दुसर्‍या चर्चेचा विषय आहे...असो

@नंतर कुलकायद्यात जमीनी गेल्या .नंतर आरक्षनाच्या समान संधी मुले नोकर्‍या गेल्या .---ही दोन्ही प्रकरणं वकिली आणी कायद्याच्या संदर्भातली असल्यामुळे मी त्या प्रांतातलं काहि नोंदवत नाही,पण मला सांगा हे होण्याची ''वेळ'' का आली हो!? खरच तुंम्हाला ब्राम्हणांचा सामाजिक इतिहास माहित आहे काय? वैदिक धर्म म्हणजे अत्ताचा आपला हिंन्दू धर्म एक समाज व्यवस्था म्हणून जितक्या पूर्वी लागु झाला,,,तेंव्हा पासून ते भारत स्वतंत्र होई पर्यंत वैदिक धर्मानी ब्राम्हण/क्षत्रियांची विषमतावादी अन्याय्य मुल्य हताशी धरून,त्यांच्या आर्थिक उद्धाराची सोय पाहिलि होती का नाही हे सांगा? अगदी त्या काळात ब्राम्हण आणी क्षत्रीयांमधल्या सर्वच्या सर्व लोकांचं हित त्यातुन साधलं गेलेलं नव्हतं हे मलाही मान्य आहे. (जसं अत्ताच्या काळात आरक्षणाचे लाभ त्या त्या वर्गातल्या राजकारणामुळे ठराविकांच्याच पदरी पडतात,तसच आपल्यातही होतं असं माझं मत आहे)... मग सामाजिक न्यायाच्या भुमिकेतून कुळ कायदा आणी आरक्षण हे त्या त्या अन्याय सोसलेल्या/समान संधी न मिळालेल्या वर्गाच्या दृष्टिनी न्याय्य नाही का? की तुमचं यावर म्हणणं,''आंम्ही अन्याय केलेच नाहीत'' असं आहे... असं असेल तर विषयच संपला.

@उरला सुरला जो अभिमान आहे तो पोकळ आहे त्याने आरक्षण मिळणार नाही नोकर्‍या मिळणार नाहीत मग तो ठेवणे न ठेवने हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. --- हा प्रश्न वैयक्तिक नाही... जातीय प्रश्न कुठल्याही पातळिवरचा असो,तो सामाजिकच असतो...म्हणून ''पोकळ'' वाटला न वाटला तरी तो अभिमान जातीय आहे,सबब तो सोडला पाहिजे.

@(अवांतर२ : लहानपणी आजोबांनी एक घड्याळ दिलं होतं ते बंदपडुन कित्येक वर्षं झाली . दुरुस्त व्हायची शक्यताही नाही . कोनी भंगारातही घेणार नाही ....म्हणुन काय टाकुन देवु ?? ) --- हे,,,घड्याळाचं उदाहरण ''पोकळ'' जातियतेसाठी देणं हास्यास्पद आणी विसंगत आहे. कसं त तुलना करून पहा---

१)लहानपणी आजोबांनी एक घड्याळ दिलं होतं .--- हे भेट म्हणून दिलं किंवा कसही दिलं असलं,तरी जात ही आपल्याला अशी'च कुणिही ''भेट'' दिलेली नाही. तो आपल्या सामाजिक अव्यवस्थेचा भाग आहे त्यामुळे हा मुद्दा फोल.

२)ते बंदपडुन कित्येक वर्षं झाली . दुरुस्त व्हायची शक्यताही नाही . कोनी भंगारातही घेणार नाही .... --- पण जात अजुन बंद पडलेली नाही ती ''चालु'च'' आहे... पुढचे दोन मुद्दे तर त्यामुळे चुकतातच चुकतात..पण तिन्हींचा एकत्र अनुषंग लावायचा झाला तरी घड्याळा सारखं मोलाचं काम जात करत नाही, उलट सगळा ''काळ'' तिनी खराब केलाय त्या मुळे हा मुद्दा तर पूर्ण फोल

३)म्हणुन काय टाकुन देवु ?? --- खरच नका टाकू.आपल्याला आपल्या सुहृदांनी अत्यंत प्रेमानी दिलेल्या वस्तु आपण टाकत नाहीच...जतन करतो,कारण ती वस्तू आपल्या आणी त्यांच्यातल्या प्रेमाचं प्रतिक असते. एका अर्थी आपण ती वस्त्तू एक स्नेहपूर्ण अठवण म्हणूनच जपत असतो... हे आपल्या मनाच्या जिवंत पणाचंही लक्षण आहे. पण... जातिचं मात्र असं होत नाही, आपण म्हणता त्या मतानुसार जात निरुपयोगी आणी पोकळ झालेली आहे, आणी मुळात ती काही घड्याळा सारखी चांगली ''भेट'' नाही तर मग ती टाकणं/विसर्जन करणं हेच योग्य आणी आवश्यकही आहे. (मी नेहमी असं म्हणतो,की ''एकाही धार्मिक मुल्याला ऐहिक मुल्यांचे मुद्दे उदाहरणादाखल देखिल लागू पडत नाहीत,किंबनुना ते विसंगतच ठरतात'' याचा आज पुनःप्रत्यय आला..असो )

@असेलही , पण त्यातली मतेरीयलाईझ काहीतरी झालय का ? --- असेलही नाही हो, आहेच! आणी आपण सकारात्मक खंडन/मंडनाकडे येत नाही तोपर्यंत मटेरियलाइझ काय आणी कसं होणार? त्याशिवाय हे शक्य तरी आहे का?

@ उलट ब्राह्मण द्वेषाने ओतप्रोत भरलीली १७६० पुस्तकं तुम्हाला दाखवतो , अन ती किती मटेरीयलाईझ होत आहेत हे तुम्हाला दादोजी कोंददेव सांगतील . --- हे खरं आहे की ब्रिगेडी जे काहि करत आहेत हा ब्राम्हणांचा नुस्ता विरोध नसून द्वेषच आहे.आणी मी सर्व ब्रिगेडी पुस्तकं वाचली आहेत/वाचत असतो/वाचत रहाणरही...

@(अवांतर ३: श्री पुरुषोत्तम खेडकर ह्यांचे एक अप्रतिम पुस्तक आहे माझ्याकडे .पत्ता द्या पाठवुन देतो तुम्हाला . माईनकाम्फ ची आठवण नाही आली तर बोला ) --- अगदी बरोबर... माईनकाम्फच! पुस्तकाचं नाव सांगा.माझ्याकडे ते नसेल, तर घेइन मी. इथे पुण्यात ब्रिगेडी सर्व काही मिळते.

@वर म्हणल्याप्रमाणे पोकळ अहंकार बाळगायला हरकत नसावी . का त्याबद्दल सुध्दा अ‍ॅटॉसिटी लावणार आता ? --- पोकळ अहंकाराचं विवेचन झालय...त्यामुळे परत काहि सांगत नाही... आणी अ‍ॅट्रोसिटी जातिचा अहंकार बाळगल्या बद्दल नाही हो लागत... असो!

@जाट लोक स्वतःला अभिमानाने जाट म्हणवुन घेतात ...तसेच राजपुत ...तसेच भैया बिहारी लोक ...तसे बंगाली ...तसेच मारवाडी ...तसेच सरदार...तसेच मल्लु मल्लु !! --- हां... हा तर नेहमीचा मुद्दा आहे... 'इतर जाती जातियता पाळतात,मग आंम्ही का पाळू नये?' असा तो मुद्दा! आमच्या मित्राचं वसंत व्याख्यान मालेतलं भाषणातलं वाक्य अठवलं या निमित्तानी.ते भाषण हिंन्दू/मुस्लिम प्रश्णावर होतं,पण दोन्ही विषयातला प्रवृत्त्ती धर्म एकच असल्यामुळे इथेही ते लागू पडतं---ते वाक्य असं, की--- ''ते कट्टर पणा करतात/सनातनी रहातात/जातीयता पाळतात, मग आंम्हीही तेच सर्व केलं तर बिघडलं काय? त्यामुळे ते चिखलात खेळतात..म्हणून आंम्हीही चिखलात खेळणार!...चिखलात खेळायचा हक्क दोघांचा'' यावर माझी टिप्पणी अशी की,''सामाजिक खरूज/रोग होऊन सामाजिक आरोग्याचा बळी गेला तरी चालेल...पण,मी चिखलात खेळणारच!!!''

@ह्याने आजवर तरी भारतीयत्वाच्या हिंदुत्वाच्या ऐक्याला बाधा पोचली नाहीये. --- पुन्हा ते...च! अहो,विषमतेमुळे ऐक्य कसं राहु शकतं हो? मजा आहे बाबा... आपल्या या भ्रामक ऐक्याच्या कल्पनेला बाबासाहेब अंबेडकरांनी अतिशय समर्पक उपमा दिलि आहे,ते हिंन्दू समाजाला ''कांद्या/बटाट्याचं'' पोतं म्हणतात. विषमतेच्या पोत्यात एकत्व आणी पोत्यातून ''जमिनिवर'' सोडलं की व्यापक अनेकत्व... एका अर्थी अपंगत्वच! असो..

@ब्राह्मणांनी अभिमान बाळगला तर असे काय आकाश कोसणार आहे देव जाणे? >>> अहो महाराज,ब्राम्हणांनी नव्हे,,,तर कुणीच हा अभिमान बाळगू नये तेच सर्वांच्या हिताचं आहे,पण मी जो स्वजातिनिर्मूलनाचा पक्ष घेतला आहे,त्याच्या मर्यादेत मला हे फक्त आपल्या ब्राम्हणांबद्दल म्हणावं लागतं...असो!

@डायवर्सीटी ही होतीच , वर्णाभिमानही होतेच अन ते असुनही आपण एकत्र होतो एकसंध होतो कदाचित हिंदु धर्माची ताकत होती . --- हे असूनही आपण एकत्र(?) एकसंध(?????) होतो,तर मग खर्‍या अर्थानी हिंन्दू ताकद दिसायला शिवाजी पर्यंत थांबावं का लागलं हो??? त्या आधी सगळा अंधःकारच आहे....शिवाजीच्या आधीचा सारा इतिहास पहिला तर त्याला तुमचा हा मुद्दा लागू पडतो? असं खरच तुंम्हाला वाटतं? शिवाजीनी धर्म समाजकारणातून/राजकारणातून बाजुला केला म्हणून हिंन्दू एक झाले, हे कसं विसरता येइल? आजच्या सार्‍या हिंन्दुत्वाचा ''आधार'' शिवाजी आहे, हिंन्दूधर्म नव्हे..हे तरी लक्षात येतय का तुमच्या???

@तुम्ही किती ब्राह्मणांशी बोलुन हा निष्कर्ष काढयात ? त्यातले किती जण उच्चशिक्षित होते ? किती जणांना सध्याच्या सामाजिक न्यायाचे चटके बसले होते ? किती जण त्या चटक्यातुन सावरलेले होते ?
काही मोजक्या अत्यल्प माहीती वरुन जनरलायझेशन करण फार डेंजरस सिंप्टम आहे . --- हा सगळा निष्कर्ष मी ज्यांच्याशी बोलुन काढला ते सर्व ब्राम्हणच होते हो. आणी दुसरे जातवाले कसे घेऊ मी यात? मला दुसर्‍या जातिशी या विषयावर कसं बोलता येइल? ते स्वजातिनिर्मूलनाच्या विसंगत नाही का होणार सांगा बरं?
आणी या विषयात बोलून मत जाणून घेतली, ती लोकं उच्चशिक्षित/सामाजिक न्यायाचे चटके बसलेली/चटक्यातून सावरलेली... अशी सगळी होती... जी माझ्या मताची अगदी अपवादात्मक/तोंडदेखली भेटतात त्यांना मी संपर्कात ठेवायचा प्रयत्न करतो...त्यांना पुरोगामी विचारांची पुस्तकं सांगतो/देतो... बास... सध्या यापेक्षा आणखि काय करणार?

@आता
१) तुम्ही कदाचित पुण्या मुंबईचे ( क्वचित नाशिकचे) दिसताहात. एकडाव सातार्‍यात कोल्हापुरात येवुन विद्रोही साहित्य संमेलन अटेंड कराच . --- मी पुण्याचा आहे. आणी विद्रोही संमेलनांचे सगळे रिपोर्ट मला मिळत असतात.तसेच मी विद्रोह्यांची भाषणं ऐकायला वेळ मिळेल तसा सगळीकडे जात असतोच
@ २) तुमचा लेख आग सोमेश्वरी अन बंब रामेश्वरी ह्या प्रकारातला वाटला . ३.५ % लोकांनी पोकळ अहंकार बाळगला तर तर त्यावर चर्चा करायची की राज्यामधल्या सर्वात पावरफुल जातीचे प्रतिनिधी ओपनली हिंसेची भाषा करतात , अन संधी मिळाल्यावर ते करुनही दाखवतात ह्यावर चर्चा करायची ? --- आगही रामेश्वरी आहे,आणी मी बंबही रामेश्वरीच नेतो आहे,हे वरिल चर्चेवरून आपल्याला पटावं ही अपेक्षा. बाकि पोकळ अहंकाराविषयी आणी ''ते जात पाळतात,मग आंम्ही का नाही?'' या विषयीही वर बोललोच आहे.

@३) राहता राहिला प्रश्न हिंदुत्वाचा : ब्राह्मणो वर्णानाम गुरु : अर्थात ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे अशा अर्थाचा श्लोक लहानपणी शिकवला जातो म्हणुन बरेचशे ब्राह्मण हिंदुत्ववादाचे समर्थक दिसतात .
--- बघा..बघा कसा प्रोब्लेम होतो जातीय भुमिका ठेऊन चांगलं करायला गेल्यामुळे.तुंम्म्ही म्हणता ब्राम्हण हा सर्व वर्णाचा गुरु आहे...हे वचन लहानपणी शिकलं जातं,''म्हणून'' ब्राम्हण हिंदुत्ववादाचे समर्थक दिसतात... म्हणजे हे शिकवलं गेलं नाही,आणी पर्यायानी ब्राम्हणाला, आपण सर्व वर्णांचे गुरु असल्यामुळे त्यां वर्णांचं हिंन्दुत्वाच्या माध्यमातून हितं साधलं पाहिजे...अशी शिकवण मिळाली नाही तर बरेचशे ब्राम्हण या बाकि समाजाचं हित साधायच्या चांगल्या कार्यक्रमात येणारच नाहीत. त्यापेक्षा हे अस्लं काहितरी खोटं/अहंकारी आणी आपल्याच नैसर्गिक मर्यादेला कमिपणा आणणारं ''ब्राह्मणो वर्णानाम गुरु'' नावाचं मुल्य देण्यापेक्षा सरळ ''जिथे जखम तिथे मलम'' देणारा सावरकरी-प्रेरणेतून तयार झालेला आमचा स्वजातिनिर्मूलनाचा उपाय किति उपकारक आहे....? सांगा बरं ? :)

@त्यांना सामाजिक न्याय मिळाला की ते भानावर येतात ... --- सामाजिक न्याय मिळण्यासाठी मी केलेलं किंवा माझ्या माथि असलेलं सामाजिक पाप मी कबुल करून ते धुवुन काढायला नको का? त्याशिवाय कसा मिळणार ''सामाजिक न्याय?''

@येतील हळु हळु भानावर ... --- जेंव्हा मी ब्राम्हण वर्णाला(मला)-- धर्मानी दिलेल्या सोई-सवलती/ जातिचे अधिकार/हक्क्/फायदे, हे विषमता वादी/अन्याय्य आहेत हे समजून घेऊन स्वतःला सांगू लागलो,तेंव्हाच मला हळू हळू भान येऊ लागलं ही माझी वस्तुस्थिति आहे. असं खरं आणी सजग भान आल्यानंतरच सामाजिक न्याय मिळत असतो...आणी तो मिळाला न मिळाला तरी एक कर्तव्य म्हणून मी ''माझा कार्यक्रम'' चालू ठेवणार!

@(अवांतर ३ :हिंदु नावाचा धर्मच नाही असा एक शोध नुकताच वाचनात आला आहे तो मी जमात के लोकांकु फारवर्ड करत आहेच ) --- हा ज्यांचा कुणाचा शोध आहे,तो ''त्यांचा'' शोध नसून एक मूलभूत वास्तव आहे. हिंन्दू हा धर्म असं आपण सोईखातर म्हणतो,पण मूळ धर्म वैदिक आहे...हिंन्दू हे वैदिक धर्माच्या कक्षेत येणार्‍या सर्व सांस्कृतिक परंपरांचं एकत्रित नाव असं म्हणता येइल. :)

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2013 - 1:59 am | प्रसाद गोडबोले

सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे .
बहुतांश म्हणणे पटलेले नाही ( कन्व्हिन्सिंग वाटले नाही ) ह्यावर अजुन प्रतिवाद घालता येईल पण एकुणच आपली मते कन्व्हर्ज होतील अशी काही चिन्हे नाहीत .
I agree to disagree here . :)

अवांतर : लास्टली , डार्विन म्हणतो त्या प्रमाणे "सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट" ह्या निसर्गनियमा नुसार , जो परिस्थितीशी जुळवुन घेईल तो जगेल ...
आता आपण म्हणता तसे सगळा स्वाभिमान/वर्णाभिमान विसरुन जाणे हे परीस्थितीशी जुळवुन घेणे असेल (भारतीय परिस्थितीत) किंव्वा मी म्हणतो त्याप्रमाणे स्वाभिमान/वर्णाभिमान जागृत ठेवुन , शार्प ठेवुन स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणे हे परिस्थितीशी जुळवुन घेणे असेल (जागतिक परीस्थितित... एकुणच जागतिक घडामोडी अन पोलरायझेशन पाहता मला तरी हे वाटत आहे )
एनीवेज , निसर्ग कोणाला कौल देतो हे पाहण्यापर्यंत आपण जगु अशी परशुराम चरणी प्रार्थना करतो , का वामन चरणी करु ? ;)

|| जय हो ||

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 2:24 am | अत्रुप्त आत्मा

@सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे . >>> :)

@बहुतांश म्हणणे पटलेले नाही ( कन्व्हिन्सिंग वाटले नाही ) >>> ठीक आहे.

@ह्यावर अजुन प्रतिवाद घालता येईल पण एकुणच आपली मते कन्व्हर्ज होतील अशी काही चिन्हे नाहीत .
I agree to disagree here . smiley >>> अगदी बरोब्बर ओळखलत तुंम्ही :)

@अवांतर : लास्टली , डार्विन म्हणतो त्या प्रमाणे "सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट" ह्या निसर्गनियमा नुसार , जो परिस्थितीशी जुळवुन घेईल तो जगेल ... >>> खरं आहे. :)

@आता आपण म्हणता तसे सगळा स्वाभिमान/वर्णाभिमान विसरुन जाणे हे परीस्थितीशी जुळवुन घेणे असेल (भारतीय परिस्थितीत) >>>परिस्थितीशी जुळवुन घेणे म्हणून मी हे म्हणत नाही... असो!!!

@किंव्वा मी म्हणतो त्याप्रमाणे स्वाभिमान/वर्णाभिमान जागृत ठेवुन , शार्प ठेवुन स्वतःचे वेगळे अस्तित्व जपणे हे परिस्थितीशी जुळवुन घेणे असेल (जागतिक परीस्थितित... एकुणच जागतिक घडामोडी अन पोलरायझेशन पाहता मला तरी हे वाटत आहे ) >>> वेगळं अस्तित्व जपायचय ना...जपा...जपा,फक्त ते भ्रामक असल्यामुळे विरोध संपल्यानंतर/किंवा बोथट झाल्यानंतर कोलमडून पडेल याची जाणिव ठेवा. :)

@एनीवेज , निसर्ग कोणाला कौल देतो हे पाहण्यापर्यंत आपण जगु अशी परशुराम चरणी प्रार्थना करतो , का वामन चरणी करु ? smiley >>> हवी त्याच्या चरणी करा,पण जगा मात्र नक्की! :-p

@|| जय हो || >>> ॥मंगलमय हो॥ http://www.mimarathi.net/modules/smileys/packs/Example//16.gif

प्रसाद गोडबोले's picture

24 May 2013 - 2:42 am | प्रसाद गोडबोले

ओके . लेट्स सी !!

कालोह्यं निरवधिर्विपुला च पृथ्वी!

:)
---------------------------------------
लेखनसीमा

काळा पहाड's picture

25 May 2013 - 1:32 am | काळा पहाड

मी पुण्याचा आहे.

मग बरोबर आहे. हुशार ना तुम्ही! बाकी प्रतिसादावर अतिशय डिटेल मध्ये लिहायची इच्छा आहे. पाहूया.

प्यारे१'s picture

23 May 2013 - 12:17 am | प्यारे१

स्तुत्य प्रयत्न आहे.

काळा पहाड's picture

23 May 2013 - 1:55 am | काळा पहाड

आत्ता पर्यंत तरी परशुरामाची मुर्ती पाहीली सुद्धा नव्हती पण आता घ्यावीच म्हणतो. कुठे मिळेल?

अनिरुद्ध प's picture

23 May 2013 - 3:13 pm | अनिरुद्ध प

चिपळुण येथे श्रीपर्शुराम मन्दिर आहे तिथे मिळण्याची दाट शक्यता आहे.

स्पंदना's picture

23 May 2013 - 5:19 am | स्पंदना

मस्त हो आत्माजी!
तुमच्या सारखे आरसा पाहणारे आणि चार जरी लोक जमले तरी बराच फरक पडेल.
तुम्ही दिलेला सावरकरांचा उल्लेख अतिशय स्पृहणीय.
परवाच मिपावर;ज्या शेतकर्‍यांच्या जोरावर रोज ताटात अन्न दिसतय त्यांच्यासाठी लिहिलेल्या कवितेवर हा असला हास्यास्पद अन घाणेरडा वाद घातला गेला त्याच अतिशय वाईट वाटल.
एखादा पुराणाचा दाखला देउन नवी काही संक्ल्पना मांडायला गेल की "भावना" दुखावण्याची ही प्रवृत्ती जातियवादाला खतपाणी घालणारी आहे.

मराठे's picture

23 May 2013 - 5:38 am | मराठे

सहमत

आशु जोग's picture

23 May 2013 - 9:38 am | आशु जोग

अपर्णाताई

मागे साधारण असाच एक प्रतिसाद दिला होता
तोच इथे उधृत करतो

प्रसाद गोडबोले's picture

23 May 2013 - 11:19 am | प्रसाद गोडबोले

एखादा पुराणाचा दाखला देउन नवी काही संक्ल्पना मांडायला गेल की "भावना" दुखावण्याची ही प्रवृत्ती जातियवादाला खतपाणी घालणारी आहे.

पुराणातले अर्धे मुर्धे संदर्भ उचलुन त्याला व्वाट्टेल तसे अर्थ लावणे आणि एका विशिष्ठ जाती विरुध्द पोलरायझेशन करणे ह्याला काय अर्थय ?
शिवाय हे म्हणजे मऊ लागतय म्हणुन कोपरानं खणण्यातला प्रकार झाला ... हिंदु(आणि ब्राह्मणही) ऐकुन घेतात म्हणुन वट्टेल ते बोला , कौन क्या उखाडलेगा ही मेन्टॅलिटी झालीये ...

पुराणवाल्यांनीही फतवा डिक्लीयर करण्याची धर्मसुधारणा (अमेंडमेन्ट) करुन घेतली की सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली तुम्ही वाट्टेल ते खपवुन घ्यायला तयार व्हाल नै !!

फारएन्ड's picture

23 May 2013 - 7:38 am | फारएन्ड

असे नग सर्व जातींमधे पाहिलेले आहेत. कोणाला आपल्या बुद्धीचा, तर कोणाला आपण(च फक्त) "वाघ" असण्याचा किंवा मर्द असण्याचा, तर कोणाला खास आपल्या जातीचे समजले गेलेले एखादे कौशल्य इतरांना न जमण्याचा अभिमान/गर्व असतो. तुम्हाला ब्राह्मणांकडून हे ऐकू आले म्हणून येथे लिहीले हे समजते, पण त्यात 'सिलीनेस' सोडला तर बाकी काही नाही. जोपर्यंत जातीवरून लोकांचे मूलभूत अधिकार नाकारले जात नाहीत, एखाद्या जातीला घाऊकरीत्या गुन्हेगार ठरवले जात नाही व त्या जातीत जन्मलेला प्रत्येक माणूस वाईटच कसा होता हे ठसवायचे प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत ते क्षुल्लक वाटते.

माझ्या मते 'ब्राह्मणांनी' ने सुरू होणारी सर्वच्या सर्व वाक्ये चुकीची आहेत (आणि हे या लेखासंबंधी नाही, एकूणच) - दोष वा गुण काहीही दाखवणारी. इतर जातींबद्दलही हे खरे आहेच, पण इतर जातींबद्दल असे घाऊक लिहीलेले फारसे दिसले नाही.

ह्या एकाच वाक्यावर जातिव्यवस्थेचा डोलारा आजतागायत टिकून आहे. जेव्हा समाजातील काही गट इतरांना जन्मापासूनच तुच्छ ठरवतात तेव्हा त्यापाठी केवळ पोकळ अभिमान नसून समाजाचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नियंत्रण स्वत:च्या हाती ठेवणे हा प्रमुख उद्देश असतो. ह्या विषमतावादी विचारसरणीला धर्माचे समर्थन नसेल तर काळाच्या ओघात तिची धार बोथट होत जाते. मात्र जिथे धर्मच विषमतेचे समर्थन करतो तिथे समतावादी विचारांचा प्रसार करणे अवघड होऊन बसते. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड संख्येने पुरोगामी विचारवंत आणि कार्यकर्ते होऊन गेले तरीही आज महाराष्ट्र जातीयवादात तसूभरही मागे नाही.

स्वजातीच्या हितसंबंधांना धक्का लागत नसेल तेव्हा एकत्र राहायला समाज तयार असतो. पण एकत्र राहणे आणि एकत्र येणे यात फरक आहे. तुरळक प्रमाणात आंतरजातीय विवाह होत असले तरी मुख्यत: सत्तेची लढाई लढतांना प्रत्येक जात इतर जातींवर कुरघोडीचे राजकारण करतच असते. याचे मुख्य कारण म्हणजे आपण खऱ्या अर्थाने एक समाज म्हणून जगत नसून केवळ सोयीची शय्यासोबत करत आहोत. जेव्हा स्वत:च्या कर्तृत्वाविषयी शंका निर्माण होऊ लागतात तेव्हा, "माझे रक्त इतरांच्या रक्ताहून श्रेष्ठ आहे" या विचारसरणीचा आधार घेणे भाग पडते. "माझे कर्तृत्व इतरांहून श्रेष्ठ असले पाहिजे" असे ज्यांना वाटते त्यांना स्वत:च्या रक्ताचा दर्जा तपासण्याची गरज पडत नाही.

सौंदाळा's picture

23 May 2013 - 10:36 am | सौंदाळा

काल-परवाच चेपुवर पर्वतीवरच्या 'मराठी साम्राज्याचे संस्थापक श्रीमंत पहिले बाजीराव पेशवे' या नावाच्या पाटीवर अत्यंत अर्वाच्य शब्दात गरळ ओकलेले दिसले.
आणि तो मान छत्रपती शिवाजी आणि संभाजी यांना मिळाला पाहीजे म्हणे.
स्वराज्य आणि साम्राज्य मध्ये फरक असतो सांगितले पाहीजे कोणीतरी यांना.
मराठी 'स्वराज्याचे' संस्थापक हे निर्विवाद्पणे छत्रपती शिवाजी असले तरी 'साम्राज्याचे' संस्थापक पहिले बाजीराव पेशवेच.

मालोजीराव's picture

23 May 2013 - 11:09 am | मालोजीराव

'साम्राज्याचे' संस्थापक पहिले बाजीराव पेशवेच.

पुण्यश्लोक शाहू छत्रपती

(छत्रपती शाहूबद्दल आदर असुनही)
पुर्णपणे असहमत.
पुण्यश्लोक शाहू छत्रपती यांना मी संस्थापक म्हणण्यापेक्षा मालक म्हणेन.

सौंदळा.आपल्या बुद्धीला कोपरापासुन साष्टांग दंडवत.....एक लक्षात घ्या बाप बाप असतो,मराठा स्वराज्य आणी साम्राज्याचे स्वामी फक्त छ्त्रपती शिवरायच.........

श्रीगुरुजी's picture

24 May 2013 - 8:25 pm | श्रीगुरुजी

>>> मराठा स्वराज्य आणी साम्राज्याचे स्वामी फक्त छ्त्रपती शिवरायच.........

पूर्णपणे सहमत! फक्त एक बदल सुचवू इच्छितो. वरील वाक्यात मराठा शब्दाऐवजी मराठी हा शब्द जास्त योग्य ठरेल.

बाबा पाटील's picture

24 May 2013 - 8:52 pm | बाबा पाटील

मराठा हा शब्द प्रातिनिधीक आहे,जो या महाराष्ट्राच्या मातीत राहतो तो मराठा/मराठी,जो संतांच्या ओव्या गातो तो मराठा,भागवत धर्म पुजतो तो मराठा,आया बहिणींच्या अब्रुसाठी आणी देशासाथी प्राण वेचतो तो मराठा या अर्थाने तो शब्द घेतला होता.

श्रीगुरुजी's picture

24 May 2013 - 8:58 pm | श्रीगुरुजी

या अर्थाने मराठा हा शब्द वापरला असेल तर तोच शब्द योग्य ठरेल.

बाबा, स्वराज्य आणी साम्राज्य मधील फरक तुमच्या बुद्धीला समजला की मग वाद-विवाद करायला या.
स्वरज्याचा नकाशा आणि पहिल्या बाजीरावाच्या काळात वाढलेल्या साम्राज्याचा नकाशा बघा समजत असेल तर.
सातार्‍याची गादीच जिथे पेशव्यानी (बाळाजी विश्वनाथ) स्थापन केली तिकडे कसले आलेत बाकिचे संस्थापक.

का इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडताय.
बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले.२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यु झाला. हि बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. इदच्या मुहुर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वत:ला बादशहा म्हणून जाहिर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहुंची सुटका केली. मात्र येसुबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहु महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिध्द केले होते, शाहुने गादिवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहुने सुरुवातीला समजुतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहुंचा नाईलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहुंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावुन घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहुंचा पक्ष बरोबर असुन त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहुंच्या बाजुएन गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहुंनी आपले वर्चस्व सिध्द केले. शाहुंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणुन नेमले आणि सेनाकर्ते असा किताबहि दिला. राज्य रयतेच्,त्याचे रक्षणकर्ते छत्रपती,त्यांनी सरसेनापती जाधवांच्या आणी इतर सहकार्‍यांच्या मदतीने महाराणी ताराराणीबरोबर लढाईनंतर सातारची दुसरी गादी स्थापन केली. आणी सायबा तुमच्या इतिहासात पेशवे सातारच्या गादीचे संस्थापक....लय म्हणजे लयच भारी....जय महाराष्ट्र.....

सौंदाळा's picture

25 May 2013 - 8:20 pm | सौंदाळा

विकीपिडिया चोप्य-पस्ते केल्याबद्दल आभारी आहे.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5
पुढील इतिहास 'संशोधनाला' शुभेच्छा.

बाबा पाटील's picture

25 May 2013 - 8:35 pm | बाबा पाटील

टंकायचा कंटाळा...आणी तुम्ही किंवा मी कितीही स्वतःच्या मनाने काहीही म्हटलो तरी सत्य किंवा जे घडुन गेलय ते बदलणार आहे का ?

सौंदाळा's picture

25 May 2013 - 8:39 pm | सौंदाळा

सत्य किंवा जे घडुन गेलय ते बदलणार आहे का ?

नाही.
जय महाराष्ट्र

मुळात सगळ्याच जाती ह्या जाती भेद पाळतात त्यामुळे त्या मुळे ब्राम्हण समाजाला दोष देऊन काहीही उपयोग नाही.
अगदी मराठा ते हरिजन लोकातही ही जातीभेद अगदी निष्ठुरतेने पाळले जातात मग ब्राम्हण समाजाला दोष देऊन काय उपयोग. मुळात आपल्या समाजाच्या म्हंजे सगळ्याच जातींच्या मानसिकतेत बदल घडायला हवा तरच हे वाईट दोष दुर होतील. मी स्वता ब्राम्हण असुनही माझे मित्र हे सगळ्या जातीतील आहेत व आम्ही ऐकमेकांकडे जेवायला जात असतोच त्याच वेळी मला जर मदत लागली तर ते धाउन येतात व त्यांच्या अडचणीला मी मदत करतो. मुळात प्रत्येकानेच आपापले दोष दुर केले तर जाती भेद हा प्रकार राहणारच नाही.

श्रीगुरुजी's picture

23 May 2013 - 2:50 pm | श्रीगुरुजी

>>> आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.

वर्तमानकालातले ब्राह्मण नक्की कोणत्या ऐतिहासिक चुकांची/घोडचुकांची पुनरावृत्ती करत आहेत?

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2013 - 9:50 pm | अत्रुप्त आत्मा

@वर्तमानकालातले ब्राह्मण नक्की कोणत्या ऐतिहासिक चुकांची/घोडचुकांची पुनरावृत्ती करत आहेत? >>> अजुनही आपापल्या गोटात चालणार्‍या चर्चां मध्ये (लहान मुलांदेखत) तथाकथित जातीय गुणांच्या मक्तेदारीची/किंवा नैसर्गिक रित्या ते गुण आपलेच असल्याची भाषा वापरली जाते.

उदा-
१)"अरे...तो काठावर का होइ ना...? पास होणारच,शेवटी ब्राम्हण आहे तो!!!"

२)''अमक्या तमक्या जातीतला(किंवा-मिश्र जातिचा) असून नाव कमवलन हो बेट्यानी... अहो शेवटी आई(किंवा-वडील) ब्राम्हणच आहेत ना!!!''

३)''काय रे ? मुंजिला काय नाही म्हणतोस? ब्राम्हण आहेस की ****?''

४)''नको त्या जातित पोरगी दिलि की जन्माला हे असलच यायचं काहितरी''

या प्रकारची अनेक जातीय संस्करणातली वाक्य आहेत जी आपल्या ब्राम्हण समाजात आजही बोलली जातात...या मागे जात या घटका बद्दलच वैज्ञानिक अज्ञान असो...अगर सर्व माहित असूनही जातिच्या अहंते मुळे हे बोललं जात असो... काळाप्रमाणे भाषा फक्त बदलली आहे... मूळ ऐतिहासिक भुमिका तीच चालू आहे. अजाणतेपणी/गैरसमजानी/अज्ञान/लबाडी...या पैकी कोणत्याही गोष्टीमुळे असेल पण हे आजही ''चालू'' आहे... हे आपण माहित असुनही नाकारणार का? मी हे सर्व माझ्या लहान पणा पासून ऐकतो आहे... या धाग्यात काहि जण असंही म्हणत आहेत,की असले अवगुण प्रत्येक जातीत आहेत... होय..मी ही मान्य करतो आहेत,कारण जातिचा रोग हा हिंन्दु समाजाचा स्थाईभाव आहे... आणी मला जात निर्मूलनाच्या कामात स्वतःच्या जातिवर सकारात्मक टीका...प्रबोधन या गोष्टी आवश्यक वाटतात... हे व्यसनाच्या रोगासारखं
आहे. जो पर्यंत मी व्यसनी आहे.हे मला मान्य होत नाही.मी स्वतःला (व्यसनरुग्ण असल्यामुळे) ''व्यसनी'' म्हणत नाही, आणी त्या अनुषंगानी लोकांनी लावलेले ''बोल'' शांतपणे ऐकत नाही...तोपर्यंत मला त्यातून बाहेर पडायचा ''रस्ता'' हाती लागणार नाही. म्हणून स्वजातीवर टीका/प्रबोधन हे जाति निर्मूलनाचं पहिलं तत्व आहे.

कारण आपण फक्त ब्राह्मण समाजातिल ईतर कार्यक्षेत्र निवडुन त्यात काम करणारया लोकान्च्या वर्तना बद्दल बोलत आहात.

श्रीगुरुजी's picture

24 May 2013 - 12:42 pm | श्रीगुरुजी

वरील वाक्ये तुम्ही नक्की कोणत्या आणि किती ब्राह्मण कुटुंबात ऐकली याची मला कल्पना नाही. पण माझ्या परिचयाच्या, नातेवाईकांच्या व स्वतःच्या कुटुंबात वरील किंवा वरील अर्थाची वाक्ये मी ऐकली नाहीत. त्यामुळे वर्तमानकाळातील ब्राह्मण ऐतिहासिक घोडचुका करत आहेत हा निष्कर्ष तुम्ही किती कुटुंबांच्या अनुभवावरून काढला हे तुम्हालाच ठाऊक.

माझ्या दृष्टीने ब्राह्मणांच्या ऐतिहासिक घोडचुका दोन. त्या म्हणजे अस्पृश्यता व इतर जातींना शिक्षणापासून वंचित ठेवणे. या दोन्ही चुका वर्तमानकालात अस्तित्वात नाहीत. वरील किंवा वरील अर्थाची वाक्ये तुमच्या पाहण्यातल्या काही थोड्या कुटुंबात बोलली गेली असली तरी ती कुटुंबे म्हणजे संपूर्ण ब्राह्मण समाज नव्हे.

पिलीयन रायडर's picture

24 May 2013 - 1:51 pm | पिलीयन रायडर

अशी वाक्ये मीही कुठेही ऐकली नाहीत..
खरतर.. ब्राह्मण घरांमध्ये एकंदरीतच जातीद्वेष कमी पाहीलाय मी.. व्रुथा अभिमान तर लांब राहिला.
ब्राहमण आहे म्हणजे संस्कार चांगले असतील, वागणे चांगले असेल, वाचन - संगीताचि आवड असेल असा (संस्कार जे आई वडीलांच्या हातात असतात त्या बद्दल) समज पाहिला आहे. पण ब्राहमण आहे म्हणुन हुषार असेलच, नाव कमावेलच , पैसा मिळवेलच अशा (आपल्या हातात नसलेल्या) गोष्टींबद्दल गैरसमज पाहीले नाहीत.
आणि हे ही पाहिलय की आपण ब्राहमण आहोत ह्याची जाणिव त्या व्यक्तीला असेल वा नसेल , ब्राहमणेतरांना ती जास्त असते. आणि त्या हिशोबाने वागवताना अनुभवलय. अनेकदा ब्राह्मणला अभिमान असल्यापेक्षा इतरांना त्याचं (सुप्त) कौतुक असलेलंही पाहिलं आहे.
अर्थात हे माझे अनुभव आहेत.. मत नाहीत.. आणि हेच सर्व घरांम्मध्ये घडत असेल असा माझा काही समजही नाही.
तुम्ही चे.पु बद्दल जे लिहीत आहात, त्यामध्ये मी सुद्धा मध्यंतरी भरपुर अ‍ॅक्टिव्ह होते. तिथे माझेही भरपुर वाद - चर्चा झाली आहे. पण ब्राहमण स्वतःचे कौतुक करताना जेवढे दिसतात त्यापेक्षा जास्त त्यांच्या विरुद्ध लोक गरळ ओकताना दिसतात. (हरामदास असमर्थ.. वगैरे तुम्ही वाचले आहे का?) आता व्रुथा अभिमान बाळगण्यापेक्षा हे जास्त घातक नाही का? खेडेकरांच्या पुस्तकाबद्दल तर लिहायलाच नको. त्यात जे लिहीलं होतं ते मला जास्त भयंकर वाटतं. त्यापुढे "जय परशुराम" आणि "गर्व नाही माज आहे मला ब्राहमण असण्याचा" फारच क्षुल्लक गोष्टी आहेत. तुम्ही ब्राहमण लेखकाचे असे एखादे "मारुन टाका", "संपवुन टाका" असे महान संदेश दिलेले पुस्तक पाहीले आहे काय?

स्वजातीचे प्रबोधन ही एक चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही रस्ता चुकलाय असं वाटतय.
आणि तुम्ही हे करत रहाल तोवर (तुम्ही माना अगर न माना) पण तुम्हाला ब्राहमण (= शत्रु) समजुन कोणी हल्ला चढवेल तर प्रबोधन आवश्यक आहे की संरक्षण?

तुम्ही जे आदर्शवादि विचार मांडत आहात ते आदर्श जगातच शोभुन दिसतील जेथे कुणीही कुणाचाही द्वेष करत नाही. पण दुर्दैवाने जग तसे नाही. त्यामुळे अगदी डसला नाही तरि सापाला फुत्कार तरी टाकु द्या...

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 3:22 pm | अत्रुप्त आत्मा

@ब्राह्मण घरांमध्ये एकंदरीतच जातीद्वेष कमी पाहीलाय मी.. >>> मी जातिव्देषाबद्दल नव्हे,जातियतेबद्दल बोलतो आहे.

@ पण ब्राहमण स्वतःचे कौतुक करताना जेवढे दिसतात त्यापेक्षा जास्त त्यांच्या विरुद्ध लोक गरळ ओकताना दिसतात. (हरामदास असमर्थ.. वगैरे तुम्ही वाचले आहे का?) आता व्रुथा अभिमान बाळगण्यापेक्षा हे जास्त घातक नाही का? खेडेकरांच्या पुस्तकाबद्दल तर लिहायलाच नको. त्यात जे लिहीलं होतं ते मला जास्त भयंकर वाटतं. त्यापुढे "जय परशुराम" आणि "गर्व नाही माज आहे मला ब्राहमण असण्याचा" फारच क्षुल्लक गोष्टी आहेत. तुम्ही ब्राहमण लेखकाचे असे एखादे "मारुन टाका", "संपवुन टाका" असे महान संदेश दिलेले पुस्तक पाहीले आहे काय? >>> विरोधी लोक गरळ ओकतात,ते फारच टोकाला गेलेत,ते स्वतः तेव्हढे सज्जन नाहित की त्यांनी अशी टीका करावी..... ''हे'' सर्व मलाही मान्य आहे.पण मी याचा प्रश्ण मांडलेला नाही.या संदर्भात जो वोरोध/खंडन-मंडन करायचं,ते पुन्हा ''तोच-तोच''पणा करून कसं साध्य होइल? यामुळे त्यांना दररोज आपण आरोप करायची नविनवि साधन उपलब्ध करून देत नाही काय? आपल्यातल्या आपल्या धर्मातल्या ज्या वाइट मुल्यांमुळे त्यांना भांडायची ''संधी''/कारणं मिळतात,ती नष्ट करायला हवीत,आणी त्याकरिता ती वाइट आहेत,हे आपल्याला मान्य व्हायला हवं असं माझं मत आहे.

@आणि तुम्ही हे करत रहाल तोवर (तुम्ही माना अगर न माना) पण तुम्हाला ब्राहमण (= शत्रु) समजुन कोणी हल्ला चढवेल तर प्रबोधन आवश्यक आहे की संरक्षण? >>> जागं केल्याबद्दल आभारी आहे... धन्यवाद!!!!!

@पण दुर्दैवाने जग तसे नाही. त्यामुळे अगदी डसला नाही तरि सापाला फुत्कार तरी टाकु द्या...>>> __/\__/\__/\__

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2013 - 1:58 pm | प्रभाकर पेठकर

१,२,३ एवढ्या टोकाची वाक्ये मी तरी माझ्या ६० वर्षांच्या आयुष्यात ऐकलेली नाहीत.

४. जाती बाहेर मुलगी न देण्याचे प्रकार इतर जातीतही आहेत.

समाज बदलत आहे. अजून बराच कालावधी, कदाचित २-३ पिढ्या (राजकारण्यांनी जातीचे राजकारण करणे सोडून दिल्यास), लागतील मानसिकता बदलायला. जात व्यवस्था टिकून राहावी आणि आपली पोळी व्यवस्थित भाजून घेता यावी अशा विचारांच्या स्वार्थी राजकारण्यांना अभय देऊन इतर बाबींवर चर्चा करणे वेळेचा अपव्यय ठरेल.

मराठा समाजात (माझ्या सासुरवाडीस) मराठा जातीच्या अभिमानाची अनेक वाक्ये कानावर पडली आहेत तसेच ब्राह्मणांच्या हेटाळणीचे सुरही ऐकले आहेत. ९६ कुळी मराठाही इतर जातीच्या (त्यांच्या दृष्टीने खालच्या जातीच्या) लोकांना 'वेगळी' वागणूक पूर्वी तरी द्यायचे. पंगतीला काटकोनात पाट मांडणे ही प्रथा आत्ताआत्ता पर्यंत चालू होती. असे ऐकले आहे. हल्ली रोटी व्यवहार होतात पण 'बेटी' व्यवहार अजून होत नाहीत. म्हणजे ते स्विकारण्याची मानसिकता अजून नाही.

आपल्या जाती बाहेर लग्ने होऊ नयेत असे कमी अधिक प्रमाणात प्रत्येक जातीत प्रयत्न असतात.

श्रीगुरुजी,पिलीयन रायडर, आणि काकाश्री यांच्या प्रतिसादांशी सहमत !
ब्राम्हण पोट जातींमधे जसा दुजाभाव असतो,तसा इतर जातीं मधे देखील असतो,याचे उत्तम इदाहरण पहायचे असेल तर कोणत्याही विवाह नोंदणी कार्यालातील नोंदणी रजिस्टर चाळावीत.
ब्राम्हणांच्या यादीत फक्त कोकणस्थ असे अपेक्षा लिहलेल्या जास्त पहायला मिळतील तर इतर जातीत ९६कुळीच हवा किंवा तत्सम मागणी सहज पहायला मिळेल.
माझ्या माहितीतल्या अनेक कोकणस्थ मुलींनी इतर जातीत विवाह केल्याचे पाहिले आहे.मध्यंतरी जेव्हा कोकण रेल्वेतुन प्रवास केला होता,तेव्हा समोरच बसलेल्या एका जोडप्या बरोबर माझ्या गप्पा चालल्या होत्या,समोरचा व्यक्ती आयटी मधलाच होता त्यामुळे माझी त्याच्याशी बोलता बोलता अनेक विषयांवर चर्चा चालली होती,अचानक त्याने मला विचारले तुम्ही ब्राम्हण आहात का ? क्षणभर मला समजलेच नाही असे का विचारले असेल ! मग त्यांना मी विचारले की हे तुम्हाला कसे कळले,त्यावर त्याने मला उत्तर दिले तुमच्या एकंदर बोलण्यातुन...(संभाषणात कोणतीही जातीय चर्चा नव्हती,आयटी क्षेत्राशी संबंधीतच जास्त होती)मी परत विचारले बोलण्यातुन कसे समजले ?त्यावर त्यांनी उत्तर दिले सर्व शब्दांचे स्पष्ट उच्चार्,आणि माझी बायको ब्राम्हणच आहे त्यामुळे ते पटकन जाणवले !तसेच माझी बायको कोकणातली आहे,कोकणस्थ ब्राम्हण. आमचे ऑफिस मधेच प्रेम जमले आणि लग्न केले.
मी स्वतः कधीच कोणाला त्याच्या जाती संबंधी माहिती विचारत नाही,आणि आडनावा वरुन देखील मला समोरचा कोणत्या जातीचा आहे ते कळत नाही आणि ते कळावे अशी माझी इच्छा देखील कधीच नसते...
पंरतु मी ब्राम्हण आहे असे समोरच्याला माझ्या आडनावावरुन कळल्यावर तिरस्कार युक्त वर्तनाचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.माझे अनेक घनिष्ठ मित्र अब्राम्हण आहेत आणि ते या जगात वेगवेगळ्या देशात असुन सुद्धा आमची मैत्री अजुनही अबाधित आहे.

जाता जाता :--- माणसाने माणसा सारखे वागले तरी पुष्कळ आहे असे मला नेहमी वाटते !

तसेच मदनबाण यान्च्याशी सुद्धा सहमत्,तसेच श्रीगुरुजी यान्नी म्हत्ल्याप्रमाणे,जर अस्प्रुष्यता वगैरे जरी त्या काळात हे क्रुत्य जरी ब्राह्म्णानी केले असतील तरि त्या कळात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुद्धा सर्वप्रथम ब्राह्मणानीच केला.त्या साठी सन्त एक्नाथान्चे नाव प्रथम घेतले जाते.

एका मित्राच्या घरी वास्तुशांत होती. सहज म्हणून मी विचारलं की मी त्यादिवशी घरीच आहे मदत वैगरे हवी असली तर सांग. सगळं ब्राम्हणांनीच करायचंय, तू नको येऊस मदतीला. यावर शेजारी उभ्या माझ्या कोब्रा मैत्रिणीने त्याला चार शब्द ऐकवावे अशी अपेक्षा होती माझी, पण तिने फक्त एक स्माईल दिली. ग्रूपमधल्या कोणीही त्याची कानउघडणी केली नाही. वेळ मारुन न्यायची म्हणून वास्तुशांतीला हजेरी लावली मी, पण आता पुन्हा त्या घरी गेलो की मला ते शब्द आठवतात.

सहज म्हणून मी विचारलं की मी त्यादिवशी घरीच आहे मदत वैगरे हवी असली तर सांग. तर तो म्हणाला सगळं ब्राम्हणांनीच करायचंय, तू नको येऊस मदतीला.

हे असं अपेक्षित आहे बरोबर? नैतर वाचून कन्फ्यूज होतंय.

सूड's picture

24 May 2013 - 8:26 pm | सूड

कर्रेक्ट !!

जे.जे.'s picture

24 May 2013 - 10:24 pm | जे.जे.

येथे तुमचा गैर समज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यान्ची वास्तुशांतीची पुर्व तयारी कदाचीत आधिच झालि असेल आणि वास्तुशांती चे सकाळचे विधि / मन्त्र पठण - जे फक्त भटजीन्निच करायचे असतात - त्याबद्दल ते बोलत असावेत. काहि लोक भटजीन्ना ब्राम्हण म्हणतात - यावरुन तुमची कदाचित गल्लत झालि असणार.

सूड's picture

24 May 2013 - 11:08 pm | सूड

मलाही तसंच वाटलं होतं की गैरसमज तर झाला नाही ना माझा, पण गैरसमजाला जागाच नव्हती. ते लोक घरीच स्वयंपाक करणार होते येणार्‍यांसाठी आणि त्यासाठी स्वयंपाकाला किंवा पंगतीत वाढायला मदतीला कोण कोण येणार यावर चर्चा चालू होती. बरं एक विचार असा केला की सोवळ्यात असेल सगळं, पण ज्याच्याकडे वास्तुशांत होती तो स्वत:सुद्धा काही ब्राम्हण नव्हता. मग अशी कमेंट यायला कारण काय हे कळायला काही मार्ग नव्हता. विसरलो होतो, आता विषय निघाला तेव्हा पटकन आठवलं.

अमोल खरे's picture

25 May 2013 - 8:39 pm | अमोल खरे

>>पण ज्याच्याकडे वास्तुशांत होती तो स्वत:सुद्धा काही ब्राम्हण नव्हता.

मग ब्राम्हणांना नावं कशाला ठेवताय. तो जो नॉन ब्राम्हण मित्र होता त्याच्या जातीला ठेवा वाटल्यास. सोप्प आहे.

सूड's picture

27 May 2013 - 12:00 am | सूड

मग ब्राम्हणांना नावं कशाला ठेवताय. तो जो नॉन ब्राम्हण मित्र होता त्याच्या जातीला ठेवा वाटल्यास. सोप्प आहे.
मी यात ब्राम्हणांना कुठे नावं ठेवलीयेत सांगाल का? कोणी त्याला सुनवावं अशी अपेक्षा मी केली असेल तर ती मैत्रीच्या नात्याने केली होती. मैत्रीण कोब्रा होती हे लिहीलं गेलं म्हणून तेवढंच तुम्हाला झोंबलं असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे.

अमोल खरे's picture

28 May 2013 - 9:54 am | अमोल खरे

एक मिनिट कशाला, दोन मिनिटे घे चल. मुद्दा एवढाच आहे की तु आणि जो मुलगा तुला बोलला ते दोघे अब्राम्हण. तो जे बोलला ते तुला नाही आवडलं, पण तुला ते त्याला सांगायची / तुझ्या भाषेत "सुनवायची" हिंमत नाही. त्यासाठी तुला मदत हवी एका ब्राम्हणाची. दोन जण बोलत असताना (ह्या केस मध्ये तुम्ही दोघे), तिस-याने (म्हणजे तुझ्या ग्रुप मधल्या ब्राम्हण मुलीने) मध्ये बोलायचं नसतं हा सिंपल एटिकेट आहे. कितीही मैत्री असली तरी हा एटिकेट नेहेमीच पाळला जातो, विशेषतः धार्मिक बाबतीत. तुला इतकंही माहित नाही हे नवल आहे. परत ती मुलगी म्हणजे काही पुरोहित नाही जी अधिकाराने काही बोलु शकेल. असो. माझा मुद्दा शांतपणे लक्षात घेऊन विचार कर. आणि आणखीन एक गोष्ट. मिपावर आणि आजुबाजुलाही माझे अनेक अब्राम्हण मित्र आहेत. मी कोणालाही जात विचारत नाही. पण कोणी ओढुन ताणुन माझ्या जातीवर टिका केली तर मी गप्प पण बसणार नाही. ह्या चर्चेला माझ्याकडुन इथेच पुर्णविराम.

स्पा's picture

29 May 2013 - 1:38 pm | स्पा

यप्प

पिशी अबोली's picture

23 May 2013 - 3:12 pm | पिशी अबोली

मला एक कळत नाही, जर तुम्ही या ब्राह्मण्/ब्राह्मणेतर वादाच्या कुठल्याच पक्षात नाही आहात, तर अशा विनाकारण चर्चा करायचं कारण काय?
आपण जातींवरुन बोलायचं नाही हे तत्व आपल्यापुरतं. या बाबतीत जग आपण बदलू शकत नाही. मग अशा चर्चा चालू करुन पुरोगामित्वाचा आव का आणावा?

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2013 - 9:45 pm | अत्रुप्त आत्मा

@जर तुम्ही या ब्राह्मण्/ब्राह्मणेतर वादाच्या कुठल्याच पक्षात नाही आहात, तर अशा विनाकारण चर्चा करायचं कारण काय?>>> अगदी बरोब्बर!!! मी या दोन्ही पक्षात नाही...! माझा पक्ष सावरकरांनी सांगितलेला ''हिंन्दू जाती'' होण्याचा पक्ष... किंवा भारतीय संविधानानी सांगितलेला ''भारतीय'' होण्याचा पक्ष... मला सरकारी-सामाजिक नियमांमुळे जन्म-जात ''लावावी'' लागत असली तरीही मनानी/आचरणात मी हिंन्दू किंवा भारतीय म्हणुनच जगणार...वागणार!!! हा माझा खरा पक्ष. :)

@आपण जातींवरुन बोलायचं नाही हे तत्व आपल्यापुरतं. या बाबतीत जग आपण बदलू शकत नाही.>>> मी तेच तर म्हणतोय ना... ''आपण'' जग बदलायचच नाही...आपण स्वत:लाच बदलायचं,आपले सामाजिक दोष/चुका समजुन घेऊन मान्य करून मनानी..आचारानी जातिविहिन व्हायचं आणी आजच्या काळाला उपकारक असणार्‍या मानवतावादी मुल्य शिकवणार्‍या सावरकरी ''हिन्दूजातीत'' किंवा भारतीय संविधानानी दिलेल्या ''भारतीय'' या जातीत रुपांतरीत व्हायचं... यासाठीच मी कवितेच्या शेवटुन दुसर्‍या कडव्यात ''आपला चेहेरा पाहण्यासाठी आरसा'' असं रुपक वापरलेलं आहे.

@मग अशा चर्चा चालू करुन पुरोगामित्वाचा आव का आणावा? >>> मी पुरोगामित्वाचा आव बिल्कुल आणलेला नाही...मी मनानी/आचारानी पुरोगामीच आहे. आपण हा निष्कर्ष कश्याच्या आधारे काढलात...मला अंदाज येत नाही.

पिशी अबोली's picture

24 May 2013 - 12:17 am | पिशी अबोली

मूळ लेखातील
मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.

आणि प्रतिसादातील
मला सरकारी-सामाजिक नियमांमुळे जन्म-जात ''लावावी'' लागत असली तरीही मनानी/आचरणात मी हिंन्दू किंवा भारतीय म्हणुनच जगणार...वागणार!!!
हे मला जरा विसंगत वाटले. कारण तुम्हाला जरी जात 'लावावी' लागत असली तरी तुम्ही त्या समाजाचा एक घटक म्हणून बोलत आहात. ब्राह्मण समाजाचा घटक म्हणून या गोष्टीकडे पाहणे हे एका अर्थी आत्मनिरीक्षण झाले. ते इथे जाहीरपणे मांडावेसे का वाटावे हे मला कळले नाही. जर तुम्ही जात मनातून काढून टाकली असेल तर 'मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो' हा उल्लेख का हे नाही समजले.

मला तुमच्या लेखात 'मी ब्राह्मण आहे आणि तरी मी हा असा विचार करतो' असा एक टोन कुठेतरी जाणवला. त्यामुळे मला त्यात मांडलेले विचार पूर्णतया निरपेक्ष वाटले नाहीत; पण त्यात पुरोगामी निरपेक्षता दाखवण्याचा प्रयत्न फार वाटला. म्हणून मी 'पुरोगामित्वाचा आव' असा शब्दप्रयोग केला. अर्थात ही फक्त माझी समज आहे.

वैयक्तिकरित्या तुमची आणि माझी मते बरीचशी सारखीही असू शकतात. पण ते जाहीर व्यासपीठावर मांडून काय साध्य करायचं होतं ते कळलं नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा

@वैयक्तिकरित्या तुमची आणि माझी मते बरीचशी सारखीही असू शकतात. पण ते जाहीर व्यासपीठावर मांडून काय साध्य करायचं होतं ते कळलं नाही.>>> असो!!!!!

रानी १३'s picture

23 May 2013 - 3:39 pm | रानी १३

बुवानी फक्त विड्बन पाडावीत....... बाकी सुज्ञास सान्गनी न लगे.....

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2013 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा

@बुवानी फक्त विड्बन पाडावीत....... बाकी सुज्ञास सान्गनी न लगे.....>>>आपली अपेक्षा कळली...धन्यवाद! :)

चौकटराजा's picture

23 May 2013 - 5:53 pm | चौकटराजा
अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2013 - 9:54 pm | अत्रुप्त आत्मा

@काय बोलणार ?
चौकटराजा ->>> चौ.रा.काका बोला हो.....! राग आला माझ्या लेखनाचा तर चार हाणा बिंधास! :)
पण मनात काहि ठेऊ नका...बोला,,, अहो इथे नाही बोलणार तर कुठे मग? :)

चौकटराजा's picture

24 May 2013 - 7:56 pm | चौकटराजा

तांत्रिक कारणामुळे तर्री मिसळीत पडली नाही त्यामुळे फकस्त काय बोलणार असा मथळा आला.
बाकी आम्हाला चित्पावन असण्याचा , मराठी असण्याचा, भारतीय असण्याचा अभिमान वगैरे आहे. आम्ही आंतरजातीय (?) विवाह् केला .( देशस्थ मुलीशी ) त्यातून आमच्या " चित मधले वाईट गुण कळले व आम्ही कोठे पेशल आहोत हे ही उमगले.या विवाहातून काही शिकायला मिळाले. ब्राह्मणात टोकाचे लोक आहेत. तसेच ते ब्राह्मण नसलेल्यामधेही आहेत. आमचा द्वेष कसा केला जातो. व काही प्रमाणात आदरही. याचा अनुभव लहानपणापासून आलेला आहे.आता स्वातंत्र्यानंतर आमचा द्वेष करण्याची, त्यासाठी २००० वर्षाचा इतिहास उकरून गरळ ओकण्याची फॅशन व पॅशन निर्माण झाली आहे.आमच्या लहानपणी सर्रास उल्लेखिलेली जात असलेली भुतयोनी आता नाश पावली आहे.( अत्रुप्त आत्म्याची ऐशी तैशी झाली आहे ) काही काळ लोटला की धर्म जात याना अंगठ्याने पाणी देण्यासाठी लोक सरसावतील.कदाचित त राष्ट्र ही कल्पनाही मोडीत निघेल. शेवटी सगुण साकार देवाचा नम्बर लागेल.किती काळ लागेल याला हे सांगता येत नाही.

शैलेन्द्र's picture

24 May 2013 - 9:41 pm | शैलेन्द्र

+१

प्रचेतस's picture

24 May 2013 - 8:56 am | प्रचेतस

हा घ्या वामन
a

आणि हा घ्या परशुराम :)
a

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 9:22 am | अत्रुप्त आत्मा

:-)

उद्दाम's picture

29 May 2013 - 12:56 pm | उद्दाम

वामनाचा पाय गुढग्यात वाकत नव्हता काय?

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2013 - 1:02 pm | प्रसाद गोडबोले

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 May 2013 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

रशियन सैनिकांची परेड पाहिली आहे का ? वामन रशियन असावा असा दाट संशय येतोय. नाहितरी इंद्राने बळिचा काटा स्वतः न काढता राज्याबाहेरच्या शक्तीला (वामनाला) बोलावूनच काढला होता. त्यामुळे त्याकाळी आपला स्वर्गलोक रशियाच्या जागी होता असे म्हणून आपण रशियावर हल्लेखोरीचा आरोप करायला हरकत नाही. आपल्या पार्टीची मत वाढवायला छान आयडिया आहे. बोला, उद्याच्या मोर्चाला कोणकोण येणार ? +D

बॅटमॅन's picture

29 May 2013 - 1:39 pm | बॅटमॅन

बरोबर आहे, आर्य नाहीतरी बाहेरूनच आलेले होते ;)

मालोजीराव's picture

24 May 2013 - 3:29 pm | मालोजीराव

बुवा आज हात लय दुखत असल नाय…टायपून टायपून :))

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2013 - 3:35 pm | अत्रुप्त आत्मा

@टायपून टायपून>>> =)) अच्रत...हल्कत...बव्लत.... =))

अशोक पतिल's picture

24 May 2013 - 9:12 pm | अशोक पतिल

ब्राह्मण असो वा अन्य कोनतीहि जात, चागल्या व वाइट गोष्टी या असताततच. ब्राह्मणांमध्ये अनुसरणीय बाबी या जास्त प्रमाणात आहेत हे निशंषंनीय! ब्राह्मण घरात लहानपनापासुन मुलांना जे सस्कांर होतात ते अन्य जातिही अनुकरन करतात.अपवाद म्ह्णुन काही ब्राह्मण हे व्यसनी, मांसाहारी वा अन्य विकारी जरी असले तरी हे प्रमाण अजुनही नग्यणच म्हनावे लागेल.

बॅटमॅन's picture

24 May 2013 - 11:43 pm | बॅटमॅन

मांसाहाराला व्यसन आणि विकाराच्या पंगतीत बसवलेले पाहून छातीत एक कळ आली, आणि (कोंबडीसोबतची गिरवी तिखट लागल्याने) डोळे पाणावले.

(कट्टर नॉनव्हेजप्रेमी खा'मण'(भरून)) बॅटमॅन.

मालोजीराव's picture

27 May 2013 - 10:51 am | मालोजीराव

तात्काळ निषेधाचा धागा उघडावा…किंवा सामिष धागे वर आणावेत

प्रसाद गोडबोले's picture

27 May 2013 - 11:35 am | प्रसाद गोडबोले

निषेध म्हणुन आज आम्ही एका कोंबडीचे बलिदान द्यायच्या निश्चय केला आहे .