आजकाल(म्हणजे अगदी गेली ५ वर्ष सुद्धा)फेसबुकवर ब्राम्हण/ब्राम्हणेतर वादाला नुस्तं उधाण आलय.प्रत्येक जण अगदी आपापली पेजेस करण्यापासून ते ग्रुप्स तयार करण्यापर्यंत अगदी पेटलाय. मी जेंव्हा स्वतःला ब्राम्हण समाजातला घटक म्हणुन पाहातो,आणी आपल्या ऐतिहासिक चुका/घोडचुका तसेच आपल्या समाजबांधवाचे/भगिनिंचे त्याच चुकांची पुनरावृत्ती करणारे वर्तन पाहतो.तेंव्हा मला मोठी गंमत वाटते.आपल्या धर्मातल्या अन्यायी भुमिका/वर्ण श्रेष्ठत्वाचे अहंकार...इत्यादी अनेक गोष्टी आहेत.त्या पाहायच्या नाहीत.समजुनही घ्यायच्या नाहीत. केवळ विरोधकांना नामोहरम करणारी आत्मप्रौढीकडे झुकणारी खंडन/मंडन प्रक्रीया चालु ठेवायची. जातिचे अंधाभिमान/दुराभिमानही बाळगायचे आणी वर पुन्हा हिंन्दूसमाजाच्या/भारतीयत्वाच्या ऐक्याच्या गप्पाही मारायच्या.या दोन्ही भुमिका परस्पर विरोधी/परस्पर विसंगत आहेत हे तर समजुनच घ्यायचं नाही. पुरोगामी विचार मांडणार्यांचा द्वेष करायचा,आणी घेतल्याच काही पुरोगामी भुमिका मनावर तर त्या फक्त प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठी एक धोरण/स्टॅटॅजी म्हणुन घ्यायच्या. असा हा सर्व आपल्या समाजजीवनाचा थक्क करणारा पसारा आहे.मी अनेकदा या जातवादी विद्वानांना निरनिराळ्या भुमिकांवरून छेडलं आहे. उदाहरणादाखल यातली ब्राम्हणश्रेष्ठत्वाची भुमिका काय म्हणते हे आपण पाहू...
ब्राम्हण हे श्रेष्ठ/ज्ञानी असतात... यावर आपण असं विचारलं की,''आपल्यातच जे मूर्ख/मंद/कमी बुद्धीमत्तेचे आहेत त्याचं काय?'' तर ही वस्तुस्थिती आहे,असं न मानता आरोप आहे असं समजुन.''आंम्ही कधी असं म्हटलं की ''फक्त'' ब्राम्हण(च) श्रेष्ठ/ज्ञानी असतात म्हणून!?'' अशी पलटी मारली जाते...मग आपण विचारवं,''आपलं नक्की म्हणणं काय मग?...'' तर , ''अहो जो विद्वान असेल तो(च) ब्राम्हण'' असं दुसरं अजुन पलटी खाणारं उत्तर मिळतं(यातुनच पुढे गुणाधिष्ठित चातुर्वर्ण्याचं सर्मथनंही ऐकायला मिळतं..)...मग आपण त्याच अनुषंगानी शेवटचा प्रश्न टाकावा..की, ''असं जर का आहे,तर मग ब्राम्हणांनी किंवा त्यांनी मागणी केल्यामुळे त्यांच्या धर्म अध्वर्यूंनी,समाजाच्या गुणात्मक विभागणीची आणी पुनर्रचनेची चळवळ का हाती घेतली नाही?'' किंवा येत्या काहि दिवसात ती तुंम्ही हाती घेणार काय?'' तर यावर एकतर उत्तर मिळत नाही..किंवा परिपूर्ण कांगावेखोर पणानी,,,''हेच तुंम्ही दुसर्या जातिंना सांगा...'' वगैरे स्वरुपाची उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आणी तत्वात जिंकायला येणारी ही माणसं व्यवहारात जरा सुद्धा मनमिळाऊ आणी माणुसकी दाखवणारी नसतात,,,याचा माझ्यासारख्याला पुनःप्रत्यय येतो.
ब्राम्हण ब्राम्हण म्हणुनी माझे
पेव फुटलेले आहे
धुळीत बसलेले ते वादळ
पुन्हा उठले आहे.
जिथे पहावे तेथे आमचे
बोर्ड टांगले आहेत.
ज्याला हवे त्या तागडीत
सोइने तोलले आहेत.
जय परशुराम,जय वामन
ह्याच घोषणा आहेत
नक्की कुणाचा ''बळी'' द्यायच्या
हे लोक तयारीत आहेत?
इतिहास/वर्त-मान तपासायची
गरजच संपली आहे
भयगंडाच्या आत धिटाई
हिंसक झाली आहे.
संघटनांच्या बळा'साठी
घटना हव्या आहेत
तोंडात तत्व नैतिकतेची
मनात(मात्र)शिव्या आहेत.
आपले चेहेरे डागाळलेले
कधि दिसणार आहेत?
आणी ते पहायला कुणाच्या हतात
आरसे... असणार आहेत?
''ते'' काहिही म्हणोत परंतू
चिखल माझ्या घरात आहे.
मी मात्र सामाजिक स्वच्छतेच्या
ऐन...मोसमा/भरात आहे.
===================================================================
प्रतिक्रिया
27 May 2013 - 4:37 pm | आशु जोग
बॅटमॅन
आपण मांसाहार करतो अशी जाहीरात करणार्या जातीतले आय मीन कॅटेगरीमधेले आपण दिसता.
27 May 2013 - 4:40 pm | बॅटमॅन
मांसाहाराची जाहिरात नाही पण फालतू बिनबुडाच्या कारणांसाठी मांसाहाराचा विरोध करणे आणि त्याला व्यसनाच्या पंगतीला बसवणे या मूर्खागमनीपणाचा मी निषेध करतो. आणि या निषेधाची जाहिरातही करतो. येणी पिराब्ळेम?
27 May 2013 - 4:47 pm | गवि
का नाही बॅट्या? त्या कम्बख्त* लोकांना खाद्यविश्वातला उरलेला ७५% आनंद मिळवून द्यायचा असेल तर जनहितार्थ मांसाहाराची जाहिरात करावीच असं माझं मत आहे. ही पहा हल्लीच फस्त केलेली सुरमई थाळी:
मी मांसाहार करतो. मला त्याचा अभिमान आहे आणि त्या तांबड्या रश्श्याचा भुरका माझ्या समस्त शाकाहारी बंधुभगिनींनी मारावा आणि मोक्ष मिळवावा अशी माझी मनापासून इच्छा आहे असं उंच मानेने म्हणत जा.
* तळटीपः कम्बख्त हा शब्द शाकाहारींना अपशब्द म्हणून वापरण्याचा उद्देश नसून "हाय कंबख्त तूने पीही नही" मधला संदर्भ आहे. हो शब्दात सेफ असावे नेहमी.. :)
27 May 2013 - 4:50 pm | बॅटमॅन
ओक्के गविशेठ, तुमच्यासाठी कायपण! मांसाहाराची जाहिरातपण ;)
गर्व से कहो हम मांसाहारी हैं ;)
27 May 2013 - 5:13 pm | अत्रुप्त आत्मा
@गर्व से कहो हम मांसाहारी हैं >>>
29 May 2013 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
काडीच टाकायची होती तर जरा स्वच्छ शुद्ध भाषेत टाकायची होती. अशा अशुद्ध भाषेच्या भिजलेल्या काडीने मस्तपैकी भडका उडण्याची शक्यता फार कमी आहे +D
24 May 2013 - 11:11 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
"सी"ग्रेडी लोकांकडुन ब्राम्हणद्वेश सोडुन अजुन काय अपेक्षा करणार??
दिवस उगवला, ब्राम्हणांना चार शिव्या दिल्या की झालं काम. प्रोडक्टीव कामाच्या नावानी बोंबा-बोंब.
साला, सर्व जाती-धर्मांना, स्त्रियांना शिक्षणाची समान संधी मिळवुन देणारे कोण होते हो? ब्राम्हणच होते ना ते? का "सी"ग्रेडी लोकं आली होती ह्या चांगल्या कामाची सुरुवात करायला?
ज्यानी त्यानी आपापल्या जाती-धर्माचा अभिमान जरुर बाळगावा, पण त्याचा दुसर्याला त्रास होऊ देऊ नये म्हणजे झालं.
साला, कर्तुत्वाला मान द्यायला शिका की जरा जात-पात नं विचारात घेता.
24 May 2013 - 11:58 pm | ५० फक्त
अजुन शंभरी भरली नाही का ? अरेरे, एक मुळ लेख आणि त्यापेक्षा मोठे दोन प्रतिसाद वाया गेले. असो, बुवा तब्येत कशी आहे आता ?
25 May 2013 - 12:12 am | काळा पहाड
कालः फार वर्षांपूर्वी जेव्हा मी लहान होतो, तेव्हा माझ्या पिढीच्या आवडीचे विषय वेगळे होते. वर्तमानपत्रात येणारी गावसकर, सुभाष चंद्र बोस इत्यादी थोरांच्या चित्रांची कात्रणे काढून ती वहीत डकवणे हा त्यातलाच एक प्रकार. एका वर्तमान पत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय सुंदर चित्र आलं होतं. त्यांच्यावर शाळेत एक धडा होता आणि ते महान होते हे मी ऐकलं होतं. बाकीचं समजायचं ते वय नव्हतं. मी ते कापलं आणि एका पुठ्ठ्यावर डकवून त्याचा एक फोटो तयार केला. तो मग आमच्या रेडियोवर ठेवून दिला. माझ्या आई वडीलांनी ते पाहीलं आणि ते अवघडले (मला हे आत्ता सुद्धा स्वच्छ आठवतंय). तो फोटो तिथे ठेवू नये असं त्यांनी मला समजावून पाहीलं. पण 'का' या माझ्या प्रश्णाला ते उत्तर देवू शकले नाहीत. मग तो फोटो तिथेच राहीला. त्यातले बाबासाहेब हे प्रेमळ दिसायचे किंवा तसं मला वाटायचं. बरेच दिवस किंवा वर्षे तो तिथेच असावा. गांधीजी, नेहरू, आंबेडकर, शिवाजी महाराज हे लोकोत्तर महान पुरुष होते असं ठाम मत असण्याचं ते वय होतं. हाच प्रकार एका बुद्धाच्या कपाटावर चिकटायच्या मॅग्नेटीक बिल्ल्या बद्दल.
आजः श्री. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्ती बद्दल मला आदर जरूर वाटतो, पण आत्मियता वाटत नाही. आरक्षणाच्या राजकारणाने बाकी काही झाले असेल न झाले असेल, मी माझ्या जातीचा कडवा समर्थक बनलो आहे. मला त्यांच्या बद्दल किंवा महात्मा फुलेंबद्दल आत्मियता वाटली ही असती, पण महामूर्ख बहुजन नेत्यांनी नव-समाजाला सुद्धा विभागण्याचं काम केलय आणि आपली ओळख आता जास्तच जातीनिहाय बनत चालली आहे. त्यामुळे जे ब्राह्मण पुरोगामी विचारांचं समर्थन करतात, ते माझ्या मते चुकतायत. हा समाज कधीही जात विसरू शकत नाही तर स्वत्:ची जातहत्या करून काय फायदा?
ता.क. सध्या माझ्या घरात कुठेही बाबासाहेब, किंवा शिवाजी महाराजांचा फोटो नाही.
25 May 2013 - 12:31 am | प्रसाद गोडबोले
>>>
अगदी अगदी हेच माझ्या मनात आहे !!
ह्या धाग्याच्या निमित्ताने काही समविचारी माणसे भेटली ...भारी वाटले !!
25 May 2013 - 12:33 am | बॅटमॅन
काही अंशी हेच मत.
25 May 2013 - 12:40 am | बाबा पाटील
बामन लेखनी विसरु शकत नाही आणी मराठा तलवार्,मराठ्याच्या पोराला शिवाजी महाराज कोन ? हे कधीच शिकवावे लागत नाही,महाराजांच नाव घेताच त्याची छाती आपसुकच रुंदावते,शिवाजी महाराज की म्हणुन आरोळी आली की त्याच्या तोंडुन आपसुकच "जय" कधी बाहेर पडते हे त्यालाही कळत नाही.या गोष्टी जन्मतःच रक्तातुनच येतात. काही ही करा जिन्स(गुणसुत्रे) बदलु शकत नाहीत
25 May 2013 - 12:50 am | काळा पहाड
शिवाजी महाराज मराठा होते हे कळवल्याबद्दल धन्यवाद. बाकी तुम्ही डॉक्टर आहात असे वाचले. तलवार ठेवलीय की नाही दवाखान्यात? दररोज प्रॅक्टीस सुद्धा असू दे. जर ठेवली नसेल तर निदान दररोज स्वत:चे रक्त तरी चेक करत चला. नाही, बदलायची गुणसुत्रे प्रॅक्टीस च्या अभावाने.
25 May 2013 - 12:55 am | बाबा पाटील
तलवार नाही पन शिवरायांचा पुतळा ठेवलाय... तुम्हाला काही अडचन्,काळा पहाड कशाला वैयक्तीक घेतोय भाउ,तुम्हाला काही टोचल होत का राव.
25 May 2013 - 1:18 am | काळा पहाड
एका डॉक्टरनं अजून अशा विचित्र रक्त बिक्त व जीन्स विचारात अडकून पडावं हे टोचलं होतं. आजकाल चिल्ली पिल्ली पण असा विचार करत नाहीत राव. त्यांनाही जीवशास्त्र माहीती असतं. कुणाचं रक्त आणि कसली छाती घेवून बसलाय! खंडोजी खोपडे, बाजी घोरपडे हे मराठा नव्हते का? आणि बाजी प्रभू देशपांडे, मोरोपंत पिंगळे, शिवा न्हावी हे मराठा होते का? जिवा महाला कोण होता हे माहितिये का?
25 May 2013 - 11:31 am | बाबा पाटील
पण राघोभरारी,आणी दुसरा बाजीराव पन माहिती आहे,आण्णाजी दत्तो बद्दलही बरिच माहिती आहे,इंग्रजांच्या मदतीने स्वतःचच आरमार बुडवणारे नानासाहेब पेशवेही माहिती आहेत्,इतिहास जाउ द्या हो,आताचे पंधरपुरचे बडवे आणी नाशिक (त्र्यंबकेश्वरचे)पुजारीही चांगलेच माहिती आहेत.आणी मागचे ६० वर्ष देशाचे रक्त पिणारे नेहरु गांधी घराणही माहिती आहे.यादी बरिच मोठी आहे साहेब पन आता आवरतो घेतो.
25 May 2013 - 11:36 am | बाबा पाटील
समाजात चांगल्या वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात्,फक्त आपण कोनाकडुन काय घ्यायच हे ज्याचे त्याने ठरवावे.बाकी या रिकाम्या चर्चेला माझ्याकडुन पुर्णविराम.......
25 May 2013 - 12:50 am | बॅटमॅन
या गोष्टी घरादारातून दिल्या जाणार्या ट्रेनिंगचा परिणाम आहेत. मी स्वतः मराठ्यांपेक्षा मराठाळलेले ब्राह्मण पाहिलेत, तसेच ब्राह्मण वाटावेत असे मराठेही पाहिलेत. यात ब्लड आणि गुणसूत्रांचा काऽही संबंध नाही.
25 May 2013 - 1:13 am | अत्रुप्त आत्मा
टंकनकष्ट वाचवल्या बद्दल धण्यवाद्स!
हेच बोलायला आल्तो.
27 May 2013 - 10:55 am | मालोजीराव
खरच धन्यवाद बॅटमॅना…या धाग्यामुळे बुवांची अवस्था वाईट झाली आहे…कालच त्यांच्या १० पैकी ८ बोटांना बँडेज पाहून ड्वोले पाणावले
27 May 2013 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा
@या धाग्यामुळे बुवांची अवस्था वाईट झाली आहे…कालच त्यांच्या १० पैकी ८ बोटांना बँडेज पाहून ड्वोले पाणावले >>> =)) महाराज....ओ महाराज... मला या मालिजिंची बोटे छाटण्याची आज्ञा द्या पाहू!!! =))
27 May 2013 - 4:32 pm | बॅटमॅन
अरेरेरेरे....आता तर उरलेली २ बोटेपण बँडेजने मढवावी असे वाटतेय ;)
25 May 2013 - 2:49 am | फारएन्ड
महाराजांच नाव घेताच त्याची छाती आपसुकच रुंदावते,शिवाजी महाराज की म्हणुन आरोळी आली की त्याच्या तोंडुन आपसुकच "जय" कधी बाहेर पडते हे त्यालाही कळत नाही.>>>
मराठा, ब्राह्मणच काय पण कोणत्याही मराठी पोराला यापेक्षा वेगळे काही करताना पाहिलेले नाही. ते ब्रिगेड ई. वाले लोक त्यांच्या राजकारणामुळे यापेक्षा काही वेगळे असल्याचे काल्पनिक चित्र निर्माण करतात.
25 May 2013 - 7:00 pm | पिलीयन रायडर
इथे तुम्ही मराठा ही जात म्हणुन हा शब्द वापरत आहात...
इथे सगळी कडे मराठा ऐवजी मराठी (जात नव्हे तर महाराष्ट्रातला माणुस या अर्थी..) टाकलत तरीही ते बरोबरच आहे.
ब्राहमण घरातही महाराजां विषयी तेवढाच आदर असतो. राजे मराठा होते की आणखी काही ह्या क्षुल्लक तपशीलाने फरक पडत नाही.
25 May 2013 - 7:13 pm | मोदक
पुस्तक - प्रश्न आणि प्रश्न
लेखक - अनिल अवचट
लेखाचे नाव - बलुतेदारी
पान नंबर - १७९ व पुढे.
जातीव्यवस्था आणि बलुतेदारी यांवर वाचनीय लेख.
25 May 2013 - 9:51 pm | मैत्र
पुलंनी मैत्र या पुस्तकात या ब्राह्मणवाद किंवा मराठा वा इतर तथाकथित सवर्णांचे वागणे यावर अतिशय उत्तम लेख लिहिला आहे. त्यात राजर्षी शाहू महाराजांचे गुणवर्णन अप्रतिम आहे आणि अतिशय मार्मिक दाखले आहेत.
अतिशय वाचनीय आणि त्याहून जास्त चिंतनीय आहे..
27 May 2013 - 4:01 pm | पुष्कर जोशी
ब्राह्मण्य आणि मराठ्य हि दोन समाजातील वैशिठ्ये आहे त्याशीवाय समाज पुढे जायचा नाही... जसे समाजात शिक्षक आवश्यक तसे बलोपासक सुधा आवश्यक .... जसे soft architect aani developer दोन्ही आवश्यक तसेच ...
आता ब्राह्मण्य आणि मराठ्य म्हणजे काय ते विचारू नका ... म्हणजे झाले
27 May 2013 - 4:06 pm | पुष्कर जोशी
आणि ब्राह्मण्य आणि मराठ्य हे दोन्ही गुण प्रत्येकात असतातच फक्त कौटुंबिक वातावरणाने एकदा गुण जास्त बहरतो... घरी जर आई बाबा दोघेही डॉक्टर असतील तर आपसूकच मुलाना औषधांची नवे पाठ होणारच त्याना आवडू किवा नावाडू ...
जसे आजोबांपासून सगळे सांडग स्वयंसेवक असतील तर अपोपाप्च नेतृत्व गुण आणि कार्यकर्ता गुण येतात ....
27 May 2013 - 4:08 pm | पुष्कर जोशी
मराठ्य = मारठ्य
सांडग = संघ
28 May 2013 - 10:48 am | वेल्लाभट
कोकणस्थ पिक्चर आला. त्याची चांगली वाईट परिक्षणं ऐकली, वाचली. एकूणच कोकणस्थांचं नाव घेऊन त्याभोवती हवी ती कथा बांधली गेली आहे, असं जाणवलं. फेसबुकावर कम्युनिटी यायला लागल्या कोकणस्थांचं नाव खराब करणा-या. एकूणच कोकणस्थ चर्चेत आले. तसं आपल्या समाजाला ट्रेंड फॉलो करायचं चांगलं माहिती आहे... सद्ध्या कोकणस्थ ट्रेंड मधे आहेत असं म्हणायचं.
मग समाजातले बाकी वर्ग कसे मागे रहावेत? तेही उद्योग करायला लागतील, आमचा समाज असा, आमचा समाज तसा. 'मराठा' असं मोठ्ठ्या अक्षरात लिहिलेला टीशर्ट घालून मी बघितलं परवा एकाला. हसू आलं. इंग्रज खूप हुशार होते. त्यांनी समाजाची ही वर्गवार, जातिवार रचना बघितली आणि तेंव्हापासून रुजलेल्या ईर्शा, चढाओढ, दुजाभाव या बीजांना व्यवस्थित खतपाणी घातलं.
आजही तो मळा सुपीक आहे. आरक्षणं, आंदोलनं, हक्कांची लढाई अशी रसाळ फळं त्या मळ्यात पिकतायत. अशिक्षित मंडाळी सोडा, शिक्षित लोकांचीही वैचारिक पातळी अजून भुईतच आहे.
खरं तर,
'भारतीय समाजाला दोनच गोष्टी येतात. आपली 'लाल' करणं, किंवा दुस-याचं 'काळं' करणं.'
29 May 2013 - 1:39 pm | मृत्युन्जय
गुर्जींनीच काढला आहे ना धागा? की आयडी हॅक झाला म्हणायचा?
असो. जय परशुराम. जय शिवाजी ;) . आता काय करायचे?
29 May 2013 - 2:10 pm | अत्रुप्त आत्मा
@सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी ;-)