दादा कोंडके यांची मनापासुन माफी मागुन...
१७/५/२०१३ रोजी गणरायाचरणी मंत्र्याच साकडं ह्या गीतात थोडफार बद्दल करुन व शीर्षक बदलुन पुन्हा प्रकाशीत करीत आहे, तरी सर्व वाचक बंधु-भगिनींनी वाचुन प्रतिक्रिया जरुर कळवाव्यात.(चालः काठी न घोंगड घेऊद्या की र )
शाल आणि श्रीफळ घेऊद्या की र...।
मला बी मंत्री होऊ द्या की...॥धॄ॥
मी निवडुन आल्यावर ।
करेन जनतेचा उध्दार ।
बंगला बांधीन एक सुंदर ।
तो तुमच्याच पैशावर ।
फॉरच्युनर गाडी घेऊ द्या की र...।
मला बी मंत्री होऊ द्या की...॥१॥
मग जाईन दिल्लीला ।
पी.एम्.ला भेटण्याला ।
मंत्री पद मागण्याला ।
दिल्या वचना जागण्याला ।
राजभवनावर शपथ घेऊ द्या की र...।
मला बी मंत्री होऊ द्या की......॥२॥
मंत्री पद मिळाल्यावरी ।
करीन परदेशाची वारी ।
सर्व काँट्रॅक्ट माझ्याच घरी ।
मलाई एकटाच खाईन सारी ।
आदर्श घोटाळ्याची मला सवय होऊ दे...।
सवय होऊ दे...मला मंत्री होऊ दे...॥३॥
भ्रष्टाचाराचा तोडीन आळा ।
काळा पैसा करीन गोळा ।
गावागावांत माझ्याच शाळा ।
कंपन्यांना लाविन टाळा ।
खोका घरी येऊ द्या की र ...।
मला बी मंत्री होऊ द्या की......॥४॥
कार्यालये जी सरकारी ।
ती खाजगी करीन सारी ।
योजना आणिन भारीभारी ।
कामगारंना बसविन घरी ।
कामगारांचे पैसे खाऊ द्या की र...।
मला बी मंत्री होऊ द्या की......॥५॥
प्रतिक्रिया
26 May 2013 - 9:12 pm | ईन्टरफेल
खुप छान लिहिले आहे ! आवड्ले
27 May 2013 - 7:25 am | Bhagwanta Wayal
तिसऱ्या कडव्यात करेक्शन झाले नाही तरी समजून घ्यावे.घोटाळा करुन घेऊद्या की र |मला बी मंत्री होऊ द्या की||3||