कधीकधी माझ्यातच पाहतो मी
एक बेहद्द नाममात्र घोडा
पाठीवरती जीन मखमली
पायी रुपेरी तोडा
म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर
इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ?
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
भव्य हिमालय तुमचा अमुचा
ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट ,
गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट.
बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट
कर्मठ जो प्राणी तो पोंचट.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा जो नुसतिच काडी
नाही खर्चिली कवडी दमडी
नाहि वेचिला दाम
श्रीराम जयराम जयजय राम.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी
षंढ सारी लेकरे
लेकरे उदंड जाली
अरुण उगवला पहाट झाली
झाले मोकळे आकाश
आकाश झाले थेन्गने अन
चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा
मज मोकल्या दाही दिशा.
कवी : श्री. कृपया हलके घेणें.
प्रतिक्रिया
2 Sep 2011 - 11:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेच्चा, मला वाटलं हे पण श्री. ले. की. बोले यांच्याच डायरीतून ढापून आणलं आहे.
असो.
3 Sep 2011 - 12:09 am | प्रियाली
अगदी अगदी!
मिपावर स्वरचित साहित्यच प्रकाशित करता येते असे मला वाटत होते. ;) हे तर चक्क ढापलेले आहे पण सु. ने. लागे यांची तक्रार येत नाही तोपर्यंत चालू द्या! ;)
2 Sep 2011 - 11:58 pm | रामदास
मज मोकल्या दाही दिशा.
(एक बेहद्द नाममात्र ) रामदास
3 Sep 2011 - 12:51 am | क्रेमर
पहिली दोन कडवी चांगली जमवली आहेत. शेवटची दोन अंमळ हूकलेली आहेत.
3 Sep 2011 - 1:10 am | श्रावण मोडक
कवितेचे शीर्षक यासंदर्भात बोलके आहे. हा फ्रायडे टाईमपास आहे. त्यानुसार कवितेचा आरंभ दमदार, पुढं मध्य लय, मग डळमळ, आणि शेवटाकडं कलाटणी अशा अंगानं ही रचना होत गेली आहे असं दिसतं. वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही. ;)
आणि या प्रक्रियेत पुढे ती कविता मनातले सत्यही व्यक्त करत जाते, हे नोंद घेण्याजोगे आहे. ;)
3 Sep 2011 - 1:17 am | अनामिक
वास्तववादी काव्याचा हा एक नमुना मानावयास हरकत नाही.
असेल असेल... वास्तववादी असल्याने एका पेग नंतर पहिलं कडवं ते ४थ्या पेग नंतर चौथं कडवं प्रसवलं गेलं असल्याची शक्यताही नाकारता येत नाही!
बाकी टिपी कविता आवडली हो मुसुशेठ!
3 Sep 2011 - 6:42 pm | परिकथेतील राजकुमार
अर्रेच्या !
मग खरेतर 'बुधवार टाईमपास' असे नाव नको होते का ?
3 Sep 2011 - 6:51 pm | श्रावण मोडक
ही कविता एनाराय मंडळींची (आपले देशी आयटीवाले त्यातच मोडतात म्हणा) आहे. त्यामुळं बुधवार नाही. कॉल असतो त्यादिवशी. इश्यू असतात. फ्रायडेला हे काही नसतं. म्हणून फ्रायडे टाईमपास आहे हा. ;)
3 Sep 2011 - 7:08 pm | परिकथेतील राजकुमार
म्हणजे गुडफ्रायडे आहे तर हा ;)
3 Sep 2011 - 2:23 am | मयुरा गुप्ते
शेवटच्या कडव्यापरर्यंत सर्व रस अर्थव्यवहारापासुन, वीररस,अद्भुतरस,रौद्ररस,शांतरस झिरपले आहेत.
//चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा
मज मोकल्या दाही दिशा//
ह्या वाक्यांनी तर ड्वाले पाणावले...
शुक्रवार आणि मोठ्या विकांताच्या शुभेच्छा मुसुशेठ!
3 Sep 2011 - 2:49 am | धनंजय
तेवढ्यामुळे "मोकलाया दाहि दिश्या" कविता डोळ्याखालून गेली...
(आजवर "मोकलाया दाही दिशा" ही प्रमाण-मराठीतच लिहिलेल्या कुठल्याशा प्रसिद्ध कवितेतली ओळ असावी असा माझा समज होता. आज शोधून संदर्भ सापडला, आणि समज सुधारून घेतला.)
3 Sep 2011 - 7:49 am | सन्जोप राव
टाईमपास आवडला. एरवी कपाळावर काही विचारी सुरकुत्या टाकून गंभीरपणे लिखाण करणार्या मुक्तसुनीतांनी शुक्रवारी रात्री केलेले हे लिखाण वाचून एखादा साधू हळूच चॉकलेट खाताना पकडला जावा तसे वाटले. (उपमा अर्थातच ढापलेल्या आहेत!)
3 Sep 2011 - 4:41 pm | चतुरंग
लांब विकांताच्या सुरुवातीला अनेक कविगणांच्या काव्यसुमनांचा संमिश्र साक्षात्कार व्हावा यात नवल ते काय?
ह्या कवितेचे नाव 'ढापलेली अक्षरे' असे ठेवावे का?
-रंगा
3 Sep 2011 - 6:53 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! पूर्वी आम्ही बुधवारची वाट बघायचो. आता शुक्रवारची वाट बघावी लागणार की काय?
3 Sep 2011 - 9:53 pm | राजेश घासकडवी
ही कविता पाहून आयकिआने प्रसिद्ध केलेल्या मोड्यूलर फर्निचरची आठवण झाली. शंभरेक कविता घेतल्या तर त्यांच्या ओळींच्या परम्युटेशन-कॉंबिनेशननी किमान दोनतीन कोटी कविता करता याव्यात असा आमचा प्राथमिक अंदाज आहे.
आमच्या कवितकसाठी मॉड्यूलर कविता तयार करण्याचं मोड्यूल लिहणार का?
राजेश
4 Sep 2011 - 12:14 pm | चिंतातुर जंतू
कधीकधी तुमच्यातच पाहतो मी
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
तरी कसे फुलतात ('संग्रहणी'य) गुलाब हे ताजे
न-अवांतरः 'औषधोपचार', 'नृत्य' किंवा 'गुंतवणूक' म्हटलेत ते बरे झाले, पण फलज्योतिष किंवा कृष्णमूर्ती या क्याटेगरीत घातल्याबद्दल कुणीतरी तुमची तक्रार संपादकमंडळाकडे करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
5 Sep 2011 - 9:34 am | ऋषिकेश
हा हा हा!!! :))