माझं सिंगल पॅरेंटिंग
इथे अबुधाबीला सीबीएसइ बोर्डच्या शाळांना मार्चच्या दुसया आठवड्यात सुट्टी पडून मुलीच केजि १ पूर्ण झालं. बायको आणि मुलगी सुट्टीसाठी मुंबईला रवाना झाल्या. एकाकीपणा मला खायला उठला. रोज रात्री ८ वाजता घरी आल्यावर पप्पाssssss …. म्हणून मुलगी गळ्यात पडायची आणि रात्री झोपेपर्यंत तिची चिवचिव चालू असायची. मित्रांचे फोन येऊ लागले, विकांताचे बेत ठरू लागले पण या वेळी मला कशातच इंटरेस्ट नव्हता. बायको आणि मुलगी कधी एकदा परत येतात अस झालं होत. पण काही कारणाने त्याचं मुंबईतल वास्तव्य वाढलं. इथे शाळा सुरु होऊन २ आठवडे लोटले तरी त्याचं येण होईना. मी तर पार कंटाळून गेलो. रोज सकाळी ८ ते रात्री ७ ऑफिस.