यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?
"यांबू , सौदी अरेबिया , मध्ये राहणारे कुणी मिपाकर आहेत का?"
प्रिय मिपाकरांनो,
सध्या मी भारतात आहे.
गेले काही दिवस मी जॉबच्या शोधात होतो.
तो मिळाला.
मी जॉइन करत असलेली कं. कॅनेडीयन असून, सध्या त्यांचे काम यांबू,सौदी अरेबिया, इथे सुरु आहे.
पुढील ३/४ महिने मला यांबूलाच रहावे लागणार आहे.
माझा मुळचा पिंड कट्टा करणे, हाच असल्याने, तिथे पण एखादा मस्त कट्टा करावा, असा बेत आहे.
मागच्या वर्षी मी दुबईला पण कट्टा केला होता.
ह्यावर्षी भारतात पण बरेच कट्टे केले.
आता एक मस्त यांबू-कट्टा पण होवू देत.