रजा आणि विश्रांती
थकलात ? कंटाळलात? जरा विश्रांती घ्या. रजा घ्या.
विश्रांती घेउन थकला असाल तरी विश्रांतीमधून विश्रांती घेउ नका.काम करायला लागू नका.
फक्त अधिक विश्रांती घ्या. आराम करा. काम करुन लवकरच थकणार आहात.
कामातील बदल ही विश्रांती असते असं गांधीजी म्हणतात. असं काही वाचण्यात आलं तर सर्वप्रथम तुमच्या वाचनाच्या सवयीत बदल करा.
वाचनातून विश्रांती घ्या. मिळेल तिथून घ्या. ती फार काही केवढ्याला मिळेल असं नाही. तिची वेगळी थेट किंमत द्यावी लागत नाही.
किंवा किंमत देउन विकत नेहमीच घेता येत नाही. तुम्हाला जे मिळताहेत ते सोडणं म्हणजेच विश्रांती.