चाळीस हजारी

निनाद's picture
निनाद in जनातलं, मनातलं
23 Jan 2014 - 5:36 am

मराठी विकिला चाळीस हजारी टप्पा गाठायला आता अजून फक्त १९१ लेख हवे आहेत.
२७ फेब्रुवारी या मराठी दिवसाच्या आधी मराठी विकीला चाळीस हजार लेखांच्या टप्प्यावर घेऊन जाऊया! या साठी अजून जवळपास महिन्याभराचा कालावधी आहे.

विकिवर कस्काय लिहायचे बॉ?
मराठीविकिवर लेखन करणे अगदी सोप्पे आहे. आपल्याला हवा तो शब्द शोधपेटीत शोधायचा तो लाल रंगात आला तर त्यावर टिचकी द्यायची की लेखनाची खिडकी उघडेल त्यात लिखाणास सुरुवात करायची. झाले!

मी काय लेख लिहू?

असा प्रश्न असल्यास आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याचा शोध घ्या. काही सापडले नाही तर लेख लिहून टाका. आपले आवडते विषय छंद यातले अनेक लेख लिहिता येतील.
किंवा एखादा इंग्रजी लेख दिसला आणि त्याचा मराठी दुवा दिसला नाही तर तो लेख लिहा. सगळा लेख लिहिलाच पाहिजे असे नाही. पण किमान १०० शब्दांची ओळख तरी लिहावी. विकि कॉमन्स वर असलेली चित्रे आपल्या लेखात लावता येतात.

नवीन त काय नाय् बॉ!
काही वेळा आधीच असलेल्या लेखात मोलाची भर घालता येईल. हे ही महत्त्वाचेच आहे. अगदी एका वाक्याची भर घालायलाही स्वागतच असेल.
लेखांची आणि पानांची शीर्षके (नावे) शक्यतो मराठी भाषेतच (देवनागरी लिपीत) असावीत असा मात्र मराठी विकिचा दंडक आहे.

अजून?
लेखन करताना आंतरविकिदुवे दिले तर लेखाचे मूल्य वाढते. हे दुवे देण्यासाठी चौकोनी कंस [[ ]] वापरता येतो. उदारहरणार्थ, [[बे एरिया]] या विभागामध्ये सुमारे २% [[मराठी]] भाषीक राहतात. यातले [[बे एरिया]] आणि [[मराठी]] हे आपोआप त्या त्या पानांवर जाणारे दुवे बनतील. शिवाय आपले विकिपान इंग्रजी पानाला जोडावे. जमले तर वर्गवारी करावी. म्हणजे शोध सोपा होतो.

मदत
याशिवाय काहीही मदत लागली तर मला विचारा. किंवा चावडी अथवा प्रचालकांना विचारा. तत्परतेने मदत मिळेल!
चला मग कामाला लागू या. आपल्या मराठी विकिला आता पुढे नेऊ या!

मुक्तकसमाजशिक्षणमौजमजाविचार

प्रतिक्रिया

निनाद's picture

23 Jan 2014 - 5:43 am | निनाद

दुवा राहिला होता... :)
https://mr.wikipedia.org/wiki/मुखपृष्ठ

आयुर्हित's picture

24 Jan 2014 - 11:34 pm | आयुर्हित

नुकताच आतिवास यांचा भीमनी घंटी आपली संस्कृती, आपला इतिहास वाचायचा तो इंग्रजीतून! हे वाक्य वाचण्यात आले.

यावरच विचार सुरु असतांना, जीवनभाऊ यांच्या स्वच्छ मन यातील 'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड' हे वाक्य आवडले.

नंतर आपला लेख वाचतोय. मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jan 2014 - 6:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडीफार भर घालेन.

-दिलीप बिरुटे

निनाद's picture

31 Jan 2014 - 3:51 am | निनाद

नक्कीच वाट पाहत आहे तुमच्या लेखनाची. तुमचे औरंगाबाद विषयक बरेच लेखन बाकी आहे... ;)

पैसा's picture

28 Jan 2014 - 8:22 pm | पैसा

लिहायला नक्कीच आवडेल. पण त्यासाठी विकिचे सदस्य असणे आवश्यक आहे का?

निनाद's picture

31 Jan 2014 - 3:54 am | निनाद

पैसाताई विकिवर सदस्यत्व आवश्यक नसते. पण घेतलेत तर तुम्ही काय काय काम केले याचा लॉग तुमच्या नावाने राहील. यामुळे मागोवा घेणे सुलभ होते. म्हणून सदस्यत्व घ्या असे म्हणेन. शिवाय काहीवेळा काही सुविधा सदस्यांनाच उपलब्ध असतात त्याचा लाभ मिळतो. :)
लिखाणासाठी स्वागत आहे. काही मदत लागली तर कळवा.

निनाद's picture

31 Jan 2014 - 3:50 am | निनाद

आयुर्हित - तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून आपले इतिहास लेखन आपणच केले पाहिजे. यासाठीच मराठी विकि महत्त्वाचा ठरतो. तेथे इतिहास विषयक लेखन करण्यास आपले स्वागतच असेल. यासाठी इतिहास हे दालन पाहा. मला स्वतःला खूप माहिती विकिवरूनच कळली. जसे की भारतीयांनी ग्रीकांना युद्धात हरवले होते. 'इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने अलेक्झांडरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.' मला शिकवलेला इतिहास फक्त हेच सांगायचा की भारतीय राजा हरला आणि मग त्याने अल्क्ष्येंद्राला 'राजाला राजा सारखे वागवावे' असे सांगितले. असो!