" मॅडम, भीमनी घंटी इकडं आहे, या बाजूने या," माझ्या सहका-याचा आवाज.
मी गुजरातमध्ये ऑफिसच्या कामासाठी आले आहे. दोन आदिवासी गावांना भेट देऊन इथे चालू केलेल्या काही कार्यक्रमांची नोंद करायची आहे. इथं एक डॉक्युमेंटेशन टीम आहे - तिचं प्रशिक्षण आणि कामाची नोंद असा दुहेरी उद्देश आहे. सोबत माझी कार्यक्रमाची पाहणी पण करून होईल. सगळा कार्यक्रम आधीच ठरवलेला आहे.
आदल्या दिवशी एकाने मला हळूच, "जाम्बुघोडा जवळच आहे तिथून. जाऊ यात का वेळ मिळाला तर?" असं विचारून घेतलं आहे. " काय आहे तिथं पाहण्यासारखं?" या प्रश्नावर "हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती" असं उत्तर उत्साहाने मला मिळालं. पण एकंदर मी देवभक्त नाही हे माझ्या टीमला माहिती आहे. म्हणून एकजण लगेच पुढे सांगतो, " तिथं मस्त जंगल आहे, तुम्हाला आवडेल ते खूप. ते एक अभयारण्य आहे...". पूर्ण टीमच्या मनात तिकड जायची इच्छा आहे त्यामुळे मी नकार द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. "काम पूर्ण झालं पाहिजे पण आपण ठरवलेलं, बरं का" अशी फक्त मी सगळ्यांना आठवण करून दिली आहे कालच.
आम्ही पंचमहाल जिल्ह्यात आहोत. वडोदरा शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर. येताना रस्त्यावर आम्हाला पावागड दिसतो. हा पहाडी किल्ला आहे आणि १६ व्या शतकातल्या संस्थानाची राजधानी होती इथं. आम्ही वेळ नसल्याने तिकडे जात नाही पण एकदा जाण्यासारखी दिसती आहे जागा. रस्त्यावरच्या जाहिराती वाचून तिथं आता 'रोप वे'ची व्यवस्था आहे हे कळत - म्हणजे पर्यटक मोठया संख्येने येत असणार इथं.
आम्ही 'झंड हनुमान' या ठिकाणी पोचतो. 'झंड' शब्दाचा अर्थ काय याबद्दल आधी मी विचारलं, पण कोणाला सांगता नाही आलं नेमकं - पण झंड म्हणजे भव्य असणार. वाटेत मोहाची झाडे आहेत भरपूर आणि त्यांच्या फुलांचा मंद वास वेडावून टाकतो आहे. काही आदिवासी स्त्रिया आणि पुरुष मोहाची फुले गोळा करताना दिसतात. ती विकून थोडेफार पैसे मिळतात त्यांना - या काळात ती एक उपजीविकाच असते त्यांची. एप्रिल महिन्याचे दिवस असल्याने जंगल हिरवं नाही पण एकदम थंड आहे हवा. पावसाळ्यानंतर हे जंगल कसं दिसत असेल याची नुसती कल्पना करूनही मी एकदम ताजीतवानी होते. अर्थात एप्रिल-मे या काळातही जंगलाच सौंदर्य वेगळच असतं हे काही मुद्दाम सांगायला नको.
हनुमानाची २१ फूट उंच मूर्ती देखणी आहे. इथं फोटो घ्यायला बंदी आहे, त्यामुळे मी डिजीटल कॅमेरा उघडला नाही. गाडीचा चालक आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो. तो सांगतो की, पांडव त्यांच्या वनवासाच्या बारा वर्षांनतर म्हणजे अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षी या परिसरात राहिले होते. अर्जुनाने एका बाणाने जमिनीतले पाणी मोकळे करून पांडवांची तहान भागवल्याची एक गोष्टही तो मला सांगतो. आता हा झरा कोरडा पडला आहे पण पावसाळ्यात तो ओलांडणे अवघड असते असेही तो सांगतो. आता रामायणातला हनुमान महाभारतातल्या पांडवांच्या भेटीला इथं कशासाठी आला होता हे मात्र त्याला सांगता येत नाही. मी विचारल्यावर सगळेजण हसतात फक्त - एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं की फक्त हसायचं हे धोरण सगळीकडे दिसतं! असो, काहीतरी कथा असेल ती, शोधायला हवी.
पुढे आहे 'भीमनी घंटी'. मला खर तर गुजराती चांगलं समजतं, त्यामुळे घोटाळा व्हायला नको होता. पण तरीही कुठेतरी आपल्यावर मातृभाषेचे संस्कार जास्त खोल असल्याने 'घंटी' म्हणजे एका मोठया 'घंटेचं' - देवळात असतात त्या 'घंटेचं' - चित्र माझ्या नजरेसमोर येतं. 'ही घंटी भीम कशासाठी वाजवत असेल' असा विचार मी त्यामुळे करते आहे मनातल्या मनात. त्यामुळे 'भीमनी घंटी' पाहिल्यावर क्षणभर माझा विरस होतो. मग माझ्या लक्षात येतं की, मराठी, हिंदी, गुजराती अशा भाषांची सरमिसळ केलीय मी म्हणून घोटाळा झालाय; मग मी स्वत:शीच हसते. कारण माझ्यासमोर जे काही दिसत ते आहे एक प्रचंड मोठं जातं - त्याच्या आकारामुळे आणि पांडवांच्या इथल्या वास्तव्याच्या कथेमुळे ते झालं 'भीमाचं जातं' - भीमनी घंटी!
अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षात भीमाने 'बल्लवाचार्याचे' काम केले ही कथा आपल्याला माहिती आहेच. त्यावेळी हे जातं वापरलं गेलं होत का? म्हणजे या भागाची बरीच प्राचीन पाळेमुळे आहेत म्हणायची. हल्ली असली काही माहिती शोधायची म्हणजे इंटरनेट हे एक हाताशी असलेलं सोपं साधन झालं आहे. नव्या-जुन्याचा हा संगम मला नेहमी गंमातीदार वाटतो. आपली संस्कृती, आपला इतिहास वाचायचा तो इंग्रजीतून!
त्या जात्याच्या आसपास मला एकावर एक रचलेले भरपूर दगड दिसतात. "हे काय आहे?" माझा स्वाभाविक प्रश्न. आता माझ्या टीमला माझ्याकडून कधी आणि कोणत्या प्रश्नांची अपेक्षा करायची याचा अंदाज आलेला आहे एव्हाना. आमच्यातला एकजण सांगतो, "इथं पडलेल्या दगडांतून आपल्या मनातलं घर बांधायचं आपण. ते जर स्थिर राहिलं, (म्हणजे ते एकावर एक रचलेले दगड खाली पडले नाहीत) तर आपल्या ख-या आयुष्यात आपल्याला आपण इथं बांधलेल्या घरासारखं घर मिळतं. स्वत:च्या मालकीच्या घराची आपली इच्छा पूर्ण होते इथलं घर टिकलं तर." माझे सहकारी उत्साहाने दोन मजली, तीन मजली घर, चार मजली घर बांधतात. त्यांच्यात ते घर 'बांधताना' लहान मुलांसारखा उत्साह आहे.
अनेक धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या 'इच्छापूर्तीच्या' काही ना काही धारणा, समजुती आढळतात. मला माझ्या सहका-यांच्या डोळ्यात एक स्वप्न दिसते. मला एकदम जाणवत की अशा प्रकारच्या 'इच्छापूर्ती' च्या धारणा म्हणजे काही फक्त अंधश्रद्धा नाही. जे बेघर आहेत, जे जन्मभर भाड्याच्या घरात राहत आहेत ज्यांचे स्वत:च्या मालकीचे घर नाही, ज्यांची सध्याच्या घरात कुचंबणा होते आहे .. अशा लोकांच्या मनात एक आशा जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम ही जागा करते आहे. एका नजरेत मला तिथे अज्ञात लोकांनी आशेने बांधलेली असंख्य घरं दिसतात. किती लोकांना आत्ताच्या त्यांच्या जगण्यातून पुढे जाण्याची उमेद हवी आहे, एक नवा रस्ता हवा आहे त्याच एक चित्रच तिथं आहे. माझ्या हृदयात वेदनेची एक कळ उठते. मी तिथं घर 'बांधत' नाही - पण मी आता इतरांना हसतही नाही. 'इथं ज्यांनी घरं बांधली आहेत त्या सर्व लोकांना त्यांच्या स्वप्नातले घर मिळो' अशी एक प्रार्थना माझ्या मनात उमलते.
आम्ही परत फिरतो. येताना परिसरात असंख्य पोलिस दिसले होते, आता त्यांच्या संख्येत आणखी भर पडली आहे आणि अधिकारीही दिसत आहेत. मी एक दोन पोलिसांकडे पाहून हसते, तेही हसतात. एका अधिका-याला मी विचारते, "आज कोणी व्ही. आय. पी. येणार आहेत का?" एक अधिकारी हसतो पण उत्तर देत नाही. मी पुढे म्हणते, "सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला माहिती न देणे मला समजू शकते. पण मीही सहज, फक्त कुतूहल म्हणून विचारते आहे. तुमची संख्याच आहे हा प्रश्न मनात आणणारी." दुस-या अधिका-याला माझ्या साधेपणाची बहुधा खात्री पटते. तो सांगतो, " गुजरातचे सरन्यायाधीश (मुख्य न्यायाधीश?) येत आहेत इथं दर्शनाला. तुम्ही आधीच लवकर आलात ते बरं केलंत. आता कोणत्याही क्षणी साहेब येतील आणि तुम्हाला अर्धा पाऊण तास थांबायला लागलं असतं ते परत जाईपर्यंत." मी त्याचे आभार मानते.
त्या पाहुण्यांच्या आधी आमची भेट झाली या जागेला आणि वेळ वाचला याचा आम्हाला आनंद होतो. पोलिस उगाच त्रास देत नाहीयेत कोणाला पण वेळ तर गेलाच असता आमचा वाया. आम्ही निघताना समोरून गाडयांचा ताफा येतो. मी उगीच गाडया मोजते. एक, दोन, तीन ..... वीस गाडया धूळ उडवत येतात. सबंध जिल्ह्याची यंत्रणा आज याच कामात दिसते आहे. आज खरं तर कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हे मुख्य न्यायाधीश जाम्बुघोडा इथं आलेले आहेत. एकदा मला मोह होतो त्या दृश्याचा फोटो काढावा म्हणून. पण मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही - उगीच कशाला पोलिसांचं लक्ष वेधून घ्यायचं?
तर राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनीही आमच्यासारखी ' थोडं काम आणि थोडी मजा' अशी योजना केलेली दिसते आहे. आमच्या मौजेचा खर्च कोणी उचलला आहे ते मला माहिती आहे - पण या साहेबांच्या मौजमजेच्या खर्चाचा बोजा कोणावर पडणार? - असा एक प्रश्न माझ्या मनात येतोच. उत्तर अर्थातच माहिती आहे आणि पर्याय नसल्याने आपण ते स्वीकारलेलं पण आहे.
त्या न्यायाधीशांनीही 'भीमनी घंटी' ला त्यांच्या स्वप्नातले घर बांधलं की नाही ते मला माहिती नाही. कदाचित नसेलही - स्वतःचं घर असणारे भाग्यवान लोक आहोत आम्ही. कदाचित स्वप्नं पाहण्याइतका निरागसपणा आता आमच्यात उरलेला नाही. जगताना सारखी बुद्धीची तलवार वापरून आम्ही स्वप्नं पाहण्याची ताकद गमावली आहे का?
आपण सुखी असतो तेव्हाच फक्त बुद्धीवादी असण्याची चैन आपल्याला परवडते का? हाही एक प्रश्नच! अनुत्तरीत प्रश्न!
**
*अन्यत्र पूर्वप्रकाशित

वाचने
13576
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह!!
आभार
In reply to ह!! by आतिवास
आतिवासताई हा लेख तुम्ही खूप
आभार. पुढच्या वेळी असं होऊ
In reply to आतिवासताई हा लेख तुम्ही खूप by क्रेझी
भीमनी घंटी
जाते आणि घरोटा
In reply to भीमनी घंटी by भ ट क्या खे ड वा ला
कोणती कविता?
In reply to जाते आणि घरोटा by सुनील
अरे घरोटा घरोटा
In reply to कोणती कविता? by आतिवास
जातं 'घरघर' असा आवाज करतं
In reply to अरे घरोटा घरोटा by कवितानागेश
जात्याचा आकार
In reply to भीमनी घंटी by भ ट क्या खे ड वा ला
जात्याचा व्यास फार
In reply to जात्याचा आकार by आतिवास
सरस मजानी वात छे । तमारु एक
(No subject)
In reply to सरस मजानी वात छे । तमारु एक by कंजूस
नेहमीप्रमाणेच उत्तम पण किंचित
+१
In reply to नेहमीप्रमाणेच उत्तम पण किंचित by बॅटमॅन
आवडलं!
लिखाण आवडलं. नेहमी आवडतं.
अवांतरः तुम्ही थोड्या 'नाही
In reply to लिखाण आवडलं. नेहमी आवडतं. by प्यारे१
अवांतरः तुम्ही थोड्या 'नाही रे' वाल्या का असता नेहमी? Winkअसते का? खरं तर आणखी थोडी असायला हवी आहे मी - पण कधीकधी आपल्याच नादात राहिलं की ते धूसर होतं काही काळ :-( बाकी तुम्ही मांडलेल्या सगळ्या मुद्यांवर माझे विचार (उत्तरं नव्हे) मांडायचं म्हटलं तर तो एक स्वतंत्र लेख होईल. पण थोडक्यात सांगायचं तर : अंमलबजावणी करताना केवळ अर्थकारण त्रासदायक नसतं तर त्यामागे राजकारण, समाजकारण, जीवनविषयक दृष्टिकोन, समाजाची परंपरागत रचना, पर्यायांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव, मर्यादित संधी, स्पर्धा, स्वार्थ, असंवेदनशीलता, योग्य धोरणांचा आणि कधीकधी धोरणं योग्य असली तरी अंमलबजावणीचा अभाव, उपजीविकेचे बदलते स्रोत, गरीबी, आरोग्यसेवा पुरेशा आणि चांगल्या नसणे ..... असे असंख्य पैलू असतात. त्यांची कॉम्बिनेशन्स दरवेळी बदलत राहतात .... परिणाम मात्र कमी-अधिक त्याच स्वरुपाचा होतो. आणि या जंजाळात जे नेहमी मागे राहतात - त्यांची बाजू मला दिसत राहते .... अर्थात ही कोंडी फोडणारे लोक आहेत, लोकांच्यात ती ताकद आहेच. या लेखातही 'स्वप्नं पाहण्याच्या' लोकांच्या ताकदीचा उल्लेख आलेला आहे. हं! आता 'केस स्टडी' लिहा म्हणत असाल तर गोष्ट वेगळी :-)बरंच काही पटण्यासारखं. काही न
In reply to अवांतरः तुम्ही थोड्या 'नाही by आतिवास
लेख आवडला पण..
मोडकांचं नाव मुद्दामच टाळलेलं
In reply to लेख आवडला पण.. by राही
राही यांचे प्रतिसाद वाचनीय
In reply to मोडकांचं नाव मुद्दामच टाळलेलं by प्यारे१
प्यारे आणि राही या दोघांचेही
राहींचे शैलीबद्दलचे निरीक्षण
In reply to प्यारे आणि राही या दोघांचेही by बॅटमॅन
उत्तम वाचनिय लेख... तुमचे
जरुर
In reply to उत्तम वाचनिय लेख... तुमचे by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या एवढ्या भटकंतीत कोठेतरी एखाद-दुसरा आशादायी स्फुलिंग जरूर दिसला असेल. त्यांचाबद्दलचे तुमचे लिखाणाही वाचायला फार आवडेल.जरुर लिहीन. जाताजाता: अनेक वाचकांना हा लेख 'नकारात्मक' का वाटला असावा याचा विचार करतेय. :-)मी तुमच्या लिखाणाला नकारात्मक
In reply to जरुर by आतिवास
+ १००००
नेहेमीप्रमाणेच सुंदर लिखाण
१००% सहमत
In reply to नेहेमीप्रमाणेच सुंदर लिखाण by Atul Thakur
लेख आवडला.
या ओळी...
जातं प्रचंड आवडलं
मारुतीराया कधिही कुठेही
In reply to जातं प्रचंड आवडलं by अर्धवटराव
अरे किती सुरेख शिल्प आहे हे!
In reply to मारुतीराया कधिही कुठेही by प्रचेतस
सिद्धेश्वर मंदिर, टोके
In reply to अरे किती सुरेख शिल्प आहे हे! by यशोधरा
वल्ली शेट ,,, दंडवत....
In reply to सिद्धेश्वर मंदिर, टोके by प्रचेतस
+१००
In reply to वल्ली शेट ,,, दंडवत.... by मुक्त विहारि
वा! अगदी 'पुराव्याने शाबित'
In reply to मारुतीराया कधिही कुठेही by प्रचेतस
बाकी हा हनुमान-भीम भेटीचा सर्वच प्रसंग प्रक्षिप्त आहे असे माझे मत.सहमत. पण अशा कथा कसलाही अभिनिवेश न ठेवता वाचल्या/ऐकल्या की छान वाटतात. त्यातून त्या त्या काळच्या समाजाचं अंतरंग काहीसं उलगडतं आपल्याला - म्हणजे तसं निदान वाटतं तरी!जय बजरंगबली !!
In reply to मारुतीराया कधिही कुठेही by प्रचेतस
वल्लीशेठच्या श्रीमंतीबद्दल
In reply to जय बजरंगबली !! by अर्धवटराव
मारुतीराया कधिही कुठेही
In reply to जातं प्रचंड आवडलं by अर्धवटराव
मारुतीराया कधिही कुठेही कोणालाही भेटु शकतो...हे बरीक खरं, अगदी मान्य!लेख आवडला...
हं! शोधला संग्रहात, पण नाहीये
In reply to लेख आवडला... by मुक्त विहारि
(No subject)
धावते पण सुंदर वर्णन.
सुंदर लेख..
न्यायसंस्थेला असे प्रश्न
In reply to सुंदर लेख.. by चिगो
न्यायसंस्थेला असे प्रश्न विचारणे किंवा तसा विचारही मनात आणणे, ह्यालान " न्यायसंस्थेचा अवमान" मानल्या जाते, असे ऐकीवात आहे.. Winkहं! जोवर 'मनातले विचार' (अप्रकट विचार) न्यायसंस्थेला कळत नाहीत, तोवर चिंता नाही आपल्याला ;-)आवडला
लेख तर आवडलाच पण मिपाकरांनी
वा..
मारु वडोदरा
धन्यवाद.
In reply to मारु वडोदरा by संतोषएकांडे
छानच लेखन!
यू स्टोल माय वर्ड्स.
In reply to छानच लेखन! by ऋषिकेश
सुंदर लेख
आभार