डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
28 Jan 2014 - 8:48 pm

मिपा वरील एक आदरणीय व्यक्तीमत्व (हेमांगी के) सध्या भारतात आल्या असून,
एक,दोन फेब्रूवारीच्या सुमारास त्या डोंबिवलीला आहेत.

नक्की वेळ,तारीख आणि ठिकाण (अर्थात डोंबिवली मधीलच) त्यांना विचारून ३१ ता.च्या सुमारास ठरेल.

पुरुष मंडळींपैकी ज्यांना यायचे असेल, त्यांनी मला व्य.नि. करावा, ही विनंती.

भगिनींनी, अजया ताईंना व्य.नि. करावा.

पुढील रंगतदार कट्यांची घोषणा लवकरच.

मौजमजामाहिती

प्रतिक्रिया

इरसाल's picture

28 Jan 2014 - 8:50 pm | इरसाल

मजा आहे राव. करा लेको कट्टे करा, खा खा मजा करा.

मुक्त विहारि's picture

28 Jan 2014 - 9:14 pm | मुक्त विहारि

का असे करू या,

तुम्ही जेंव्हा इथे याल तेंव्हा एक दोन-चार तास वेळ काढा.

आपण करू या कट्टा.

इरसाल's picture

29 Jan 2014 - 9:21 am | इरसाल

एक कट्टा बडोद्याला पण करायचा आहे...

कधी ? कधी ? कधी ?

वाटल्यास खर्च माझ्याकडुन. आणी हो इथेही राणीची नसली तरी सयाजीरावांची बाग आहे बरं.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2014 - 9:45 am | प्रभाकर पेठकर

कमेठी बाग का? व्वा वा! कट्टा सहकुटुंबच करा. छोट्यांना आवडेल अशी छोsssट्टीशी झुक-झक गाडी (माझे लहानपणीचे प्रचंड आकर्षण), प्राण्यांचे पिंजरे आणि मोठ्यांसाठी विस्तिर्ण हिरवळ. शांतता आणि पक्षांचे आवाज. एक संपूर्ण निवांतपणा.

'गोल्डरश' वाल्या हेमांगीके का?

कट्टेकर्‍यांना गोल्ड (ड पूर्ण) द्या म्हणा. बाकी लांबूनच शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

28 Jan 2014 - 9:15 pm | मुक्त विहारि

होय, त्याच....

मोनार्क पण त्यांनीच लिहीले होते.

जेपी's picture

28 Jan 2014 - 9:17 pm | जेपी

पुनश्च शुभेच्छा .

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2014 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! ह्या कट्ट्याला यायला जरूर आवडले असते. हेमांगी के यांचे लेखन आवडीने वाचतो.

कट्ट्याला अनेक शुभेच्छा !

आता पुढच्या कट्ट्याला आमच्या साठी वेळ काढा, ही नम्र विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jan 2014 - 11:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद ! विनंती करुन कशाला लाजवताहात ? तिथे असतो तर कट्ट्यांची मजा थोडीच चुकवली असती? आलो की भेटूच.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jan 2014 - 10:57 pm | बिपिन कार्यकर्ते

शुभेच्छा!

मात्र बंधुलोकांनी एकाला व भगिनीसमाजाने दुसरीला व्यनि करावा हे काही कळलं नाही ब्वॉ! असो.

कवितानागेश's picture

28 Jan 2014 - 11:39 pm | कवितानागेश

आपण उलट करुन बघुयात की, काय होतय ते. :P

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2014 - 12:59 am | प्रभाकर पेठकर

भगिनींची 'बंधू' म्हणून आणि बंधूंची 'भगिनी' म्हणून नोंद होईल.
भगिनी तर पँट आणि टी शर्टात येऊ शकतील. मात्र बंधुंना साडी किंवा पंजाबी ड्रेस म्हणजे फार अवघडच होईल.

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2014 - 5:03 pm | टवाळ कार्टा

=))

अजया's picture

29 Jan 2014 - 8:35 am | अजया

=))

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jan 2014 - 5:41 pm | बिपिन कार्यकर्ते

चावट्ट माऊ! ;)

कारण,

पुर्वीचे मिपा आणि सध्याचे मिपा, थोडे वेगळे आहे.

टवाळा आवडे विनोद , असे जरी असले तरी...

आजकाल टवाळगिरी करतांना बर्‍याच वेळा भान रहात नाही.

म्हणूनच अशी उपाययोजना करायला लागली.

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2014 - 5:08 pm | टवाळ कार्टा

आजकाल टवाळगिरी करतांना बर्‍याच वेळा भान रहात नाही.

????
उदाहरण???

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jan 2014 - 5:39 pm | बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो. उदाहरण????

हे बंधु भगिनी सेग्रेगेशन फारच होतंय का काय?

- (सगळ्या काळातलं मिपा बघितलेला)

अजया's picture

29 Jan 2014 - 8:33 am | अजया

मला पण! ;)

हा प्रतिसाद बिकांच्या प्रश्नाखाली हवा आहे!

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jan 2014 - 5:42 pm | बिपिन कार्यकर्ते

तिथेच आहे! काळजी नसावी! :D

टवाळ कार्टा's picture

29 Jan 2014 - 5:04 pm | टवाळ कार्टा

फुटीर....मिपास्तानाची मागणीसुध्धा लवकरच होईल

समीरसूर's picture

29 Jan 2014 - 2:25 am | समीरसूर

हेमांगीके यांच्यासोबतच्या या कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!! त्यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखिकेसोबत कट्टा अनुभवायला मजा आली असती. फोटो नक्की टाकावेत ही विनंती आणि सविस्तर मजकूर पाहिजेच पाहिजे. :-)

--समीर

प्रमोद देर्देकर's picture

29 Jan 2014 - 8:29 am | प्रमोद देर्देकर

वा मु.वि. वा तुम्हाला सा. ___/\__/\_

मानलं तुम्हाला माझ्या मागिल प्रतिसादांत मी तुम्हाला "कट्टा नियोजन अधिकरी"
म्हंटलं होतं ते काहि उगाच नाही ब्वॉ.
!कट्ट्यास हर्दिक शुभेच्छा !

दिपक.कुवेत's picture

29 Jan 2014 - 8:37 am | दिपक.कुवेत

नेहमीप्रमाणेच फोटोसहित वॄत्तांत चवीचवीने वाचुच. मुवि आपलं प्रॉमीस लक्षात आहे ना?

किंवा

डोंबिवलीला येण्यापुर्वी व्यनि केलात तरी चालेल.

श्रीरंग_जोशी's picture

29 Jan 2014 - 8:56 am | श्रीरंग_जोशी

कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!!

अमेरिकेत राहणार्‍या मिपाकरांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व मिपा कट्ट्यामध्ये (जॅक डॅनियल्सनंतर) हेमांगी करत आहे हे पाहून समाधान वाटत आहे.

कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!!

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2014 - 4:45 pm | सानिकास्वप्निल

कट्ट्याला शुभेच्छा !!!

मुक्त विहारि's picture

30 Jan 2014 - 5:11 pm | मुक्त विहारि

तारीख : २ फेब्रुवारी २०१४ (रविवार)

ठिकाण : मॉर्डन कॅफे, फडके रोड , डोंबिवली (पुर्व) स्टेशन पासून चालत ५/६ मिनिटांवर आहे.

वेळ : सकाळी १० वाजता.

प्यारे१'s picture

30 Jan 2014 - 5:29 pm | प्यारे१

>>मॉर्डन

अशा नावाचं हॉटेल असणं शक्य नाही. ;)

प्रचेतस's picture

30 Jan 2014 - 10:12 pm | प्रचेतस

मॉर्डन हा बोली भाषेतील शब्द आहे. पुण्यात असलेल्या मॉडर्न कॉलेज अथवा मॉडर्न कॅफे अशा जगप्रसिद्ध ठिकाणांना बरेच पुणेकर मॉर्डन कॉलेज अथवा मॉर्डन कॅफे असेच म्हणतात. ;)

प्यारे१'s picture

30 Jan 2014 - 10:22 pm | प्यारे१

डोंबिवली ला देखील मोठा सांस्कृतिक इतिहास असल्याने डोंबिवली मध्ये देखील अशीच बोली भाषा असू शकते असं सुचवायचं/ म्हणायचं आहे का?

मुवि शेठ हलकं घ्या हो!
अजया मॅडमनी खाली विशेष सूचना दिलेली आहेच. :)

भावना महत्त्वाच्या!! नै का प्यारेकाका? अध्यात्माच्या वाटेवर चालणार्‍याच्या वागण्यात असा विरोधाभास बरीक शोभत नाही हो !!

मुक्त विहारि's picture

31 Jan 2014 - 12:02 am | मुक्त विहारि

सॉरी हां.. जरा चूकच झाली...

आदूबाळ's picture

30 Jan 2014 - 11:18 pm | आदूबाळ

शक्य आहे

http://en.wikipedia.org/wiki/Morden

अजया's picture

30 Jan 2014 - 5:38 pm | अजया

ंमॉडर्न कॅफे,फडके रोड असे वाचावे!

मुक्त विहारि's picture

31 Jan 2014 - 12:00 am | मुक्त विहारि

संपादकांना नम्र विनंती.

मॉडर्न कॅफे... फडके रोड... असा बदल करता येईल का?

बाकी मुवि आदरणीय वैगेरे लिहून लाअजवू नका हो. मला एकदम म्हातारं झाल्यासारखं वाटलं. इतक्या कमी वेळात धडपड करुन कट्टा आयोजनासाठी अजया आणि तुमचे मनापासून धन्यावाद. बाकी भेटूच २ तारखेला.

भ ट क्या खे ड वा ला's picture

31 Jan 2014 - 10:14 am | भ ट क्या खे ड वा ला

येतोय.
मुक्त विहारी ,तुम्ही क ट्ट क री अशी सही का करत नाही ?

भाते's picture

31 Jan 2014 - 10:43 am | भाते

कट्टयाला मीसुध्दा येतोय.

सुबोध खरे's picture

31 Jan 2014 - 10:52 am | सुबोध खरे

मी पण

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Feb 2014 - 4:07 am | निनाद मुक्काम प...

@ठिकाण : मॉर्डन कॅफे, फडके रोड , डोंबिवली (पुर्व) स्टेशन पासून चालत ५/६ मिनिटांवर आहे.
सुप्रसिद्ध फडके रोड वर असे लिहितो , सहज सापडेल
कट्याला शुभेच्छा

कट्टयाला उपस्थित मिपाकर - हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भ ट क्या खे ड वा ला, विनोद१८, स्पा आणि मी
कट्टयाचा सविस्तर वृत्तांत येईलच लवकर.

शैलेन्द्र's picture

2 Feb 2014 - 1:25 pm | शैलेन्द्र

वा , मस्त, आम्ही अडकलोय च्यायला नाशिकला..

कट्टा झक्क जमलेला. बाकी सविस्तर प्रतिसाद लिहिन. सध्या रात्र थोडी सोंग फार :-(

प्रभाकर पेठकर's picture

7 Feb 2014 - 8:59 pm | प्रभाकर पेठकर

सध्या रात्र थोडी सोंग फार

अहो चालायचंच. आमच्याकडेही रात्रीची सोंग फाssssर असतात.