रजा आणि विश्रांती

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
5 Feb 2014 - 10:03 am

थकलात ? कंटाळलात? जरा विश्रांती घ्या. रजा घ्या.
विश्रांती घेउन थकला असाल तरी विश्रांतीमधून विश्रांती घेउ नका.काम करायला लागू नका.
फक्त अधिक विश्रांती घ्या. आराम करा. काम करुन लवकरच थकणार आहात.
कामातील बदल ही विश्रांती असते असं गांधीजी म्हणतात. असं काही वाचण्यात आलं तर सर्वप्रथम तुमच्या वाचनाच्या सवयीत बदल करा.
वाचनातून विश्रांती घ्या. मिळेल तिथून घ्या. ती फार काही केवढ्याला मिळेल असं नाही. तिची वेगळी थेट किंमत द्यावी लागत नाही.
किंवा किंमत देउन विकत नेहमीच घेता येत नाही. तुम्हाला जे मिळताहेत ते सोडणं म्हणजेच विश्रांती.
कामातून विश्रांती घेता तशी खाण्यातूनही घ्या. खाणं हीसुद्धा एक विश्रांतीच आहे, असं मानत असाल तर असं मानणं सुरु ठेवा. म्हणजे तुमची विश्रांती सुरुच राहिल.
सुरु राहण्यावरनं आठवलं , गाडी सुरु राहते ते ती अधून मधून थांबल्यामुळेच. त्यामुळे थांबत थांबत जा. किंवा नुसतेच थांबा . जाउच नका.
जाउन जाउन जाणार कुठे? तीच तीच स्टेशनं गाठून पुन्हा पहिल्याच स्टेशनाला यायचं असेल तर मुळात जायचं कशाला ?
जाण्यापेक्षा थांबणं चांगलं. गाडी चालत राहिल्यामुळे तिच्यावर प्रचंड खर्च होतो. गाडिनं चालायचच नाही म्हटलं की खर्चही नाही.
शांत, निवांत ती पडून राहू शकते. थंडगार स्थितप्रज्ञ लोखंडी रेल्वेचा डबा हा तुमचा आदर्श हवा.
अर्थात आदर्श हवा हे मुंबैत मोठ्यानं म्हणू नका. सी एम असाल तर खुर्ची जाइल. नसाल तर प्रमोशन होइल.
पण प्रमोशन केल्यावर काम करावं लागेल. विश्रांती गमावून बसाल.
तस्मात् , श्शsssss
शांत बसा.
निवांत बसा.
मला धरुन हाणायची इच्छा सोडून द्या आणि चार घटका आराम करा ; मलाही करु द्यात.
शुभप्रभात.
;)

--मनोबा

जीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

5 Feb 2014 - 10:39 am | यसवायजी

आयुष्य हे नदीसारखं आहे, वाहणं थांबलं की डबकंच!!!
कशाला त्या खार्‍या समुद्रात जाउन जीव देताय?? इथेच थांबा. डबकं राहण्यातच खरी मजा आहे. कसं अगदी हिरवं, थंडगार.. शेवाळ.. ;)
शांत बसा.
निवांत बसा...

आवडल्या गेल्यालं हाये.

आतिवास's picture

5 Feb 2014 - 10:43 am | आतिवास

काय झालं?
म्हणजे, पुन्हा काय झालं? ;-)

मदनबाण's picture

6 Feb 2014 - 2:19 am | मदनबाण

रजा आणि विश्रांती या दोन्हींची गरज आहे ! ;)
पण या दोन्ही गोष्टी मला मिळणे सध्या तरी अशक्य आहे ! ;)
थोडक्यात... लगे रहो ! ;)

अर्धवटराव's picture

6 Feb 2014 - 2:46 am | अर्धवटराव

असच एक वाक्य आठवलं... दिवसभर पुरेशी विश्रांती घ्या जेणे करुन रात्री नीट झोप लागेल :D

आत्मशून्य's picture

6 Feb 2014 - 2:52 am | आत्मशून्य

तुम्हाला जे मिळताहेत ते सोडणं म्हणजेच विश्रांती.

हे छान लिहलय. पण याच्या विरोधि ओळही लिहुन या वाक्यालाही विश्रांती दिली हे जास्त आवडलं!

मन१'s picture

6 Feb 2014 - 7:37 am | मन१

सर्व वाचक्-प्रतिसादकाम्चे मनःपूर्वक आभार!

सुनील's picture

6 Feb 2014 - 9:26 am | सुनील

लेख कालच वाचला होता. परंतु विश्रांतीची वेळ असल्याने प्रतिसाद दिला नव्हता! ;)

पैसा's picture

8 Feb 2014 - 6:35 pm | पैसा

म्हणून प्रतिसाद द्यायला उशीर केलाय. मग काय मनोबा, रजा कधी घेताय?

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Feb 2014 - 3:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

रजा विश्रांती हे दोन विरुध्द अर्थी शब्द आहेत असे नम्र पणे नमुद करतो.

(अनुभवी)

नीलमोहर's picture

11 Mar 2016 - 3:17 pm | नीलमोहर

अहाहा.. किती स्वप्नं जागली मनात,
दोन दिवस सुट्ट्या आहेत, मस्तपैकी फॅन लावून हातात पुस्तक घेऊन बेडवर जमेल तेवढं लोळण्याची..
झोपण्याची इच्छा आहे.. आमेन :)

चित्रगुप्त's picture

25 Apr 2018 - 5:55 am | चित्रगुप्त

.
.

श्वेता२४'s picture

25 Apr 2018 - 11:25 am | श्वेता२४

वाचताना आपण विश्रांतीच घेत आहोत असं वाटलं. पण तुमच्या लेखातील हे वाक्य वाचनातून विश्रांती घ्या वाचलं. तस्मात वाचन पण बंद