मागच्या शनिवारि २५ तरखेला पेपरमधे पतंग महोत्सवाची जहिरात पाहीली.तसा त्याचा आधिपासूनच गाजावाजा चालला होताच,त्यात मिपावर अहमदाबादच्या महोत्सवाचे वर्णन आणि फोटो पाहिल्यावर तर महोत्सव मुलांसाठी तरी पहायला हवा असे वाटले. मुख्य काम होते ते सुट्टीच्या दिवशी सकाळी बाहेर जाण्यासाठी नवर्याला राजी करणे.हो कारण रविवारी सकाळी९लापहिला खेळ होता ना!मग पेपर वाचताना हळुच त्याला महोत्सवाची तिकिट काढण्याबद्दल विचारले तरचक्क डोक 'हो' म्हणून हालल.पेपरात आणि मोबाइलमधे घातलेले डोके इतके सहज प्रतिसाद देत नाही म्हणून शंका आली.परत विचारुन खुंटा हलवून बळकट करावा काय?पण नकोच या नादात नकार आला तर खुंटच निसटायचा हातातून.पण नवर्याने बरोबर एकले असावे कानाने आणि मनानेही.कारण संध्याकाळी, उद्या जाउयात सकाळी असे सांगण्यात आले.
रविवारी नउ म्हणत म्हणत दहाला गाडी बालेवाडीच्या दिशेने निघाली.मुख्य प्रवेशव्दारापाशी हि मोठी रांग लागलेली गाड्यांची.शिवाय गाड्या परतही फिरत होत्या.नक्कीच उशीर झाल्याने प्रवेश बंद झाला असावा.पण प्रवेश मागच्या दाराने असल्याने हा गोंधळ.मग मर्गात तश्या पाट्या का नव्हत्या देवजाणे.आत गेल्यावर तर प्रचंद गर्दी.आधि गाडीसाठि जागा आणि मग मुख्य मैदानाकडे जायचे द्वार हे शोधणे आले.तिकीटे घेण्यासाठीहि भलीमोठी रांग,प्रवेशासाठी वेगळी रांग आणि परत जाणार्यांची घाइ.पुणेकर तसे उत्साहिच म्हणा.इथेतर बलबच्चे, आइबाबा,आजीआजोबांसकट सगळे उत्साहाने आलेले दिसले.मुलांची तर मान उंचावून पतंग दिसतायत का हे बघायची बाहेरुनच गडबड चालू झाली. रांग भराभर सरकत होती.पण बाहेर येणारेहि तेवढेच लोक्स.त्याचे कारण नंतर कळले.
मैदानात गेल्यावर मात्र खुप पतंग दिसू लागले.आधि मनसोक्त बघितले मग फोटो काढायची घाइ झाली.कारण एखादा पतंग मधेच उतरवुन दुसरा वर येइ.पतगाबरोबरच जोरदार गाणी,संगीत आणी डीजेचे सुत्रसंचालन जोरदार चालुहोते.तुडूंब गर्दितून जल्लोष उठत होता.शिवाय एकमागून एक अश्या चित्रपट तरकांचा प्रवेश हे दुसरे आकर्षण लोकांना होतेच.हे का होते देव जाणे.त्याशिवायही लोक आली असतीच की.
आकाशात मात्र सुंदर,वेगवेगळ्या आकाराचे पतंग विहरत होते.
त्यतलाच हा एक जेरीचा-
हा एक आकार
माशाचा हरंग खूप छान दिसत होता
हा भलामोठा व्हेल..
लांबशेपटिचा पतंग
हा पुणेवाला पतंग खास सिंगापुरहुन आला होता
छोटा भिम
झेप घेणारा मासा
वाघोबा
हा तर गाडीला बांधून ठेवला होता इतका जड
गरूड
रंगीत आकाश
एकाहुन एक पतंग होते.नवर्याला पास मिळाले होते(तरिच लगेच तयार झाला) त्यामुळे मैदनात जाउन पतंग उडवायचा आनंद मुलांना मिळाला.मज्जाच.एक मात्र जाणवले उन खुप असल्याने लोकांना उभे राहून वर बघणे त्रासाचे जात होते.कितिवेळ असे बघणार. त्यमुळे बाहेर जायला एवढी गर्दी हे आता कळले.बाहेर इतर दुकान होतीच.पण पतंगाबद्दल माहीति देणार काहि हव होत.
एकुणात पुणेकरांच्या नेहेमीच्या उत्साहाने आणि सुंदर पतंगानी मजा आली.
प्रतिक्रिया
1 Feb 2014 - 7:40 pm | मुक्त विहारि
छान व्रुत्तांत...
1 Feb 2014 - 7:58 pm | कैलासवासी सोन्याबापु
अरे वा पुण्यनगरीत आता हे पण नसे उणे!!!! ( तरी काही पेठकरी हे काय थेर म्हणुन नाके उडवतीलच)!! पण ह्या शोभेच्या पतंगबाजीत काय राम नाय!!!! असली मजा आहे तेज बरेली मांजा वापरुन "रखके सटाक" (मांजा ला मांजा टच झाल्या बरोबर) समोरच्याची पतंग उडवणे!!! जब-या मजा असते ह्या युद्धात!! समझा बिना विमानाच्या पण तित क्याच त्वेषाने लढलेल्या "डॉग फाईट्स" !!!
1 Feb 2014 - 8:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
चक्क पुण्यातही आता पतंगमहोत्सव? सुंदर आहेत पतंग !!!
1 Feb 2014 - 8:08 pm | जेपी
देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा देवा श्रीगणेशा
1 Feb 2014 - 8:21 pm | आतिवास
पतंग सुरेख आहेत. आवडले.
1 Feb 2014 - 8:27 pm | अजया
मस्तच! आम्हाला इथे हे रंगीबेरंगी पतंग पाहुन इतकी मजा आली तर प्रत्यक्ष बघायला तुम्हाला किती मजा आली असेल!
2 Feb 2014 - 12:25 am | भ ट क्या खे ड वा ला
छान, लेख आणी फोटो सुद्धा
तश्या पाट्या का नव्हत्या देवजाणे
हे तर नवलच
2 Feb 2014 - 12:26 am | भ ट क्या खे ड वा ला
छान, लेख आणी फोटो सुद्धा
तश्या पाट्या का नव्हत्या देवजाणे
हे तर नवलच,
2 Feb 2014 - 1:14 am | रेवती
पंगत महोत्सवाबरोबरच पुण्यात पतंग महोत्सवाची सुरुवात झालेली बघून बरे वाटले.
2 Feb 2014 - 1:26 am | सस्नेह
अन वर्णन. सुरेख आहेत एकेक पतंग.
2 Feb 2014 - 5:13 am | अत्रुप्त आत्मा
लैच भारी!!! :)
-------------
झेप घेणाय्रा माश्याच्या वरचा लाल क्रुद्ध = अगोबा! =))
2 Feb 2014 - 12:17 pm | इशा१२३
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
@सोन्याबापु : पतंग युद्धात मजा खरीच पण पुण्यात कुठले एवढे पतंग आणि युद्ध.त्यामुळे हे बघायलाही मजा आली. :-)
@अजया : अजून बरेच आकाराचे रंगगीबेरंगी पतंग होते.छान दिसत होते सगळे.
@अत्रुप्त आत्मा:अगोबा :-))
2 Feb 2014 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान फोटो, छान वृत्तांत.
-दिलीप बिरुटे
3 Feb 2014 - 10:48 am | ऋषिकेश
महोत्सव चांगला झाला असे कळले. माझ्या मुलीला तिचे आजोबा घेऊन गेले होते. ती 'आडे बापडे केवडे "पंङङ"' बघुन बेहद्द खूश होती :)
3 Feb 2014 - 2:43 pm | मदनबाण
वाह...
गेल्या कित्येक वर्षात मी पतंग उडवला नाहीये. :(
आमच्या बिल्डींगच्या गच्चीवर एकदा मी पतंग उडवत होतो... बराच वेळ प्रयत्न करुन सुद्धा तो जास्त वर जात नव्हता, कारण हवा तशी वाहत नव्हती. मग शेवटी बर्याच वेळाने तो मस्त उडायला लागला ! पतंग वर नेताना खुप मजा येते... जरा थोडीशी ढिल द्यायची आणि मग लगेचच मांजा खाली भराभर ओढायला लागायचे की पतंग सरसरुन वर येतो... असे बराच वेळ केल्यावर आकाशात फक्त छोटासा त्रिकोणच दिसेल इतका पतंग वर गेला होता. दोन्ही हाताची ध्यानमुद्रा करुन, त्या बोटांच्या आत फिरकीचे बाहेरचे दांडे ठेवायचे की ती गरगर फिरत भराभर मांजा सोडु लागते ! असा बराच उंच गेल्यावर मला घरातले काम आठवले, मग फिरकी गच्च्चीतल्या पाण्याच्या पाइप मधे घट्ट अडकवुन घरी गेलो...जवळपास २०-२५ मिनीटांनी परत गच्चीवर आलो तर... पतंग तसाच मस्त उडत होता. :)
4 Feb 2014 - 8:51 am | दिपक.कुवेत
अरे मग बाणाला लावुन उडवायचा ना!!! हाकानाका......
4 Feb 2014 - 9:56 am | मदनबाण
:)
3 Feb 2014 - 3:07 pm | जेपी
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:
3 Feb 2014 - 3:17 pm | मृत्युन्जय
मस्तच आलेत सगळे फोटो. पतंगही जबर्या. वर्णन छान. गरुडाचा मस्त वाटतो आहे.
3 Feb 2014 - 5:37 pm | अनन्न्या
मुलं खूश झाली असतील अगदी!
नवर्याला पास मिळाले होते(तरिच लगेच तयार झाला) हे मात्र पटले.
3 Feb 2014 - 9:04 pm | मोदक
मस्त फोटो..!! :)
4 Feb 2014 - 8:52 am | दिपक.कुवेत
मजा आली वाचुन आणि फोटो बघुन.
4 Feb 2014 - 6:02 pm | इशा१२३
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ,ऋषिकेश,मदनबाण ,जेपी,मृत्युन्जय,अनन्न्या,मोदक,दिपक.कुवेत प्रतिसादाबद्दल आभार.
5 Feb 2014 - 8:19 pm | पैसा
मजा आली सगळे फोटो बघून!
6 Feb 2014 - 7:11 pm | इशा१२३
धन्यवाद पैसाताई!