दिपक कुवैत ह्यांच्या सोबत डोंबिवली कट्टा.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
20 Feb 2014 - 9:59 pm

प्रिय मिपाकरांनो,

आधी कळवल्या प्रमाणे, श्री.दिपक कुवैत ह्यांच्या बरोबर कट्टा करायचे ठरले आहे.

तारीख मात्र १ मार्च किंवा २ मार्च असेल.

बहुदा २ मार्च असलेली बरी , असे मला वाटते.

कारण १ मार्चला वल्लींबरोबर घारापुरी लेणी बघीतल्या नंतर त्याच दिवशी कट्टा करण्यापेक्षा दुसरा दिवस असलेला बरा, असे माझे मत आहे.

ठिकाण : नंदी पॅलेस

खर्च : आपापला (दिपक कुवैत स्पॉन्सर करत असतील, तर फार उत्तम)

खाणे-पिणे : सामिष आणि उचित पेयांसकट

वेळ : संध्याकाळी ठीक ७:३० (जास्त उशीर केला, तर जागेची मारामार आणि उगाच २/३ तास तिष्ठत बसावे लागते.)

चला तर मग, तारीख ठरवा.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा

भाते's picture

21 Feb 2014 - 12:34 pm | भाते

ओ मुक्त विहारि,
ऊत्त्सवमुर्ती दिपक यांनाच कट्टा स्पॉन्सर करायला सांगताय? काय हे!
याआधी आपण हेमांगी के यांच्या डोंबिवली कट्टयाच्या वेळी त्यांना (काहिही न बोलु देता) आपल्या खादाडीचे बिल भरायला लावले होते.
आता या कट्टयाच्या वेळी तुम्ही ऊत्त्सवमुर्तीकडुन आधीच स्पॉन्सरशिपची मागणी करताय!
पुढल्या वेळी ऊत्त्सवमुर्ती मिपाकर डोंबिवलीमध्ये कट्टा करायच्या आधी नीट विचार करतील. तेव्हा जरा जपुन…
त्यापेक्षा 'आपापला खर्च' हे ठिक आहे.

मुवि, दिपक,
हलकेच घ्या. :)

यशोधरा's picture

21 Feb 2014 - 3:04 pm | यशोधरा

ऊत्त्सवमुर्ती दिपक यांनाच कट्टा स्पॉन्सर करायला सांगताय? काय हे! >> हे मघाशीच माझ्या मनात आले होते! मग म्हटले, ही डोंबोवलीची प्रपंरा असणार :D

हलके घ्या हो मुवि :)

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:35 pm | बॅटमॅन

डोंबोवलीची प्रपंरा

'डोंबोली' अन 'प्रंपरा' हे शब्द अशुद्ध लिहिल्याबद्दल तुम्हांला किमान चार जिलब्या पाडायची शिक्षा दिली पाहिजे.

यशोधरा's picture

21 Feb 2014 - 3:41 pm | यशोधरा

अभ्यास वाढवा!

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:45 pm | बॅटमॅन

ऐला म्हणजे तुम्ही अगोदरच जिलब्या पाडल्यात होय! स्वारी बर्का ;)

यशोधरा's picture

21 Feb 2014 - 3:55 pm | यशोधरा

कुठ्ठे म्हणून न्यायची सोय नै तुम्हांला! तसे शब्द का वापरलेत त्याचा अभ्यास वाढवा. नुसते वाद घालत बसायचं आणि अभ्यासाच्या नावाने शून्य! :D

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:58 pm | बॅटमॅन

ठीक आहे, तुमचंच खोटं! खूष ;)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2014 - 3:59 pm | अत्रुप्त आत्मा

@आणि अभ्यासाच्या नावाने शून्य! Biggrin>>> =))

इरसाल's picture

22 Feb 2014 - 4:23 pm | इरसाल

नुसते वाद घालत बसायचं आणि अभ्यासाच्या नावाने शून्य!
अभ्यास असता तर उगा मिसळपाववर का तारे तोडत बसलो असतो. दुसरीकं कुटं नस्तो जेलो !

शुभेच्छा !! वृत्तांत टाकायला विसरु नका.

सानिकास्वप्निल's picture

21 Feb 2014 - 3:31 pm | सानिकास्वप्निल

मग म्हटले, ही डोंबोवलीची प्रपंरा असणार

असेच वाटले ;)

बाकी कट्ट्याला शुभेच्छा !!

कापूसकोन्ड्या's picture

21 Feb 2014 - 4:12 pm | कापूसकोन्ड्या

मुवि कट्टेवाले

अजया's picture

21 Feb 2014 - 4:15 pm | अजया

कट्ट्याला शुभेच्छा !

अगदी स्वप्नातही कोणीच हां विचार करणार नाही.शक्यच नाही.

अहो मूवी म्हणजे चैतन्य , मूवी म्हणजे नेतृत्व,
कलेसाठि दातृत्व अन कट्टा कार्यांच पितृत्व व् कट्टे करणारेचे मातृत्व।

मूवी म्हणजे उत्सवमूर्ती मूवी म्हणजेच अनंत कीर्ति
मूवी म्हणजे कट्याची जान ... मूवी म्हणजेच मिपाची शान,
मूवी म्हणजे रसिकंचे कान, मूवी मंजे दर्दीलोकांची मान।

मूवी जणु मायकेल जाक्सन चे गान, अन मूवी म्हणजेच जिवंचे फैन
त्यांच्या लेखाचा पहिला प्रतिसाद मूवी, अष्टविनायकाचा कोणाला नको असेल असा प्रसाद मूवी

थंडी त सुट्टीच्या पहाटे अचानक जाग येउन
पहावा लागलेला झी सिनेमाचा बिग्रेड रोमांस मूवी मूवी. पोकर टेबल वर स्ट्रेट फ्लशचा चांस मूवी।

मूवी म्हणजे खरं तर अजुन बरच काही पण लिखाणाला ही लेखनी समर्थ नाही.... म्हनुनच मूवी म्हणजे ही तर फक्त सुरुवातही नाही

शैलेन्द्र's picture

22 Feb 2014 - 10:32 am | शैलेन्द्र

वा .. शब्दांची रांगोळी ..

आत्मशून्य's picture

28 Feb 2014 - 4:07 pm | आत्मशून्य

रांगोळी आधी "राख" हा शब्द लिहायचा राहिला काय ;)

अनन्न्या's picture

22 Feb 2014 - 5:01 pm | अनन्न्या

कट्ट्याला शुभेच्छा!

भाते's picture

28 Feb 2014 - 3:39 pm | भाते

आत्ताच मिपा कट्टा नियोजन अधिकारी मा श्री. मुक्त विहारि यांच्याशी भ्रमणध्वनी वर झालेल्या संभाषणानुसार त्यांनी सुचवल्याप्रमाणे दिपक कुवैत ह्यांच्या सोबत डोंबिवली कट्टा रविवारी २ मार्चला करायचे नक्की झाले आहे. तेव्हा मिपाकरांनी संध्याकाळी ०७:३० पर्यंत नंदी पॅलेस येथे भेटावे असा मुविंचा निरोप आहे.