तो मेरे मि.पा.करों... अब हम देखने जा रहे है... मि.पा. के जाने आउर माने सदश्यों का एक ऐसा रंगीन कट्टा.. एक ऐसा रंगीन नजारा ..जिसमे, "ड्रामा है..ट्रॅssssजिड्डी है... कॉमेडी है"
(ढिश्श..क्लेमरः- धागा आध्यात्मिक असल्यामुळे स्मायल्या भरपूर असणार आहेत! त्यामुळे ऐहिकां'न्नी फिल्टर-लाऊण धागा पहावा..म्हणजे मणा'स त्रास होणार णाही!!! =)) ... )
खरं तर कट्टा ठरल्यापासूनच हा ड्रामा/ट्रॅजिडी/कॉमेडी सुरु झालेलं होतं. ते सगळ घडणार हे नक्कीही होतं.कारण... या विश्वाच्या अखंड पसार्यात या भूतलावर इये भाssssरत प्र-देशी अंतरजालावर आत्मभेट झालेल्या काहि व्यक्ति आणि वल्लींचा हा सुदिन ठरलेल्या दिवशी म्हणजे दिनांक १ मार्च रोजी उगवला. अता उगवला का म्हणायचे? तर तो मि.पा.च्या धुडगुसमय गोलार्धावर उगवणार्या एका तार्यानी ठरवलेला होता. सणमाणणीय (पांडू..शब्द बरोबर आहे ना रे!!! ) कट्टाकिंग मु.वि. म्हणजे, मि.पा.जगता-तील नावाला धरून जगणार्या लोकांपैकी एक असे असल्यामुळे कट्टा हा खरोखरच एक मुक्त विहार झाला.
आंम्ही पुणेकर मंडळी सक्काळच्या शिव्हगड येक्सप्रेसनी ठरल्या टायमाला गाडीसह निघालो. मी,प्रशांत,वल्ली,चिमी,सौंदाळा,सुडक्या,नादखुळा,धन्या(त्याच्या म हान भाच्यासह ) ,आणि चौ.रा.काका नसले,तरी त्यांच्या जाणिवेसह आंम्ही! =)) असे इकडनं मि.पा.ची पालखी घेऊन निघालो. या कट्ट्यात कुठ्ठेही नीट काहिही खायचं नाही हाच नियम असल्यामुळे पहिली काहि घटिका/पळे गेल्यानंतर गाडीत जे मिळेल ते आणि बाकिच्यांनी आणलेले असेल ते ,चरायला सुरवात झाली. फक्त कर्जतला आमचा 'वडा' झाला. गाडी शिंची १ मिनिटापेक्षा आधिक थांबलीच नाय,हिरमोड केलान मेलीनं! तरी दारावर येणार्या भाजिवाल्या सारखा एक वडापाववाला लाभला आणि हिंदि शिनेमातले हिरो/हिरवीण जसे पळत्या गाडीत एकमेकाचा हात 'धरतात',तसा प्रत्येकी एकेक वडापवचा ऐवज मी मिलवला आणि सदश्यांप्रती पोहोचवला! सुडुक आणि सौंदाळा हे मागच्या डब्यात-गेल्यामुळे त्यांना आंम्ही आणि आंम्हाला ते गाडिचे-कल्याण'होइपर्यंत मुकलेलो होतो. पन नंतर गाडी हलकी झाल्यामुळे- ते आंम्हाला जॉइन झाले. आणि जसे ते आले तसे अगोबा-हत्ती आणि धन्या या दोन दुष्टांनी सुडक्याशी युती करून त्याच्या गावाचं नाव सार्थ करत मला छळायला सुरवात केली. :-/ ( तोपर्यंत धन्याचा भाचा अगोबाच्या एकंदर डोक्यावर बसलेला असल्यानी =)) मी सुखी होतो! ) त्यापैकी काहि हल्ले मी 'दुर्लक्ष' - नावाचे मि.पा. हत्यार वापरून निर्जिव केले. पण नंतर थोडी सामुदाइक कत्तल केली. एव्हढे होइपर्यंत हुंबैच्या मंडळींशी मोबली-संधान सुरु होऊन कोण किती वाजेपर्यंत सि.एस.टी.ला येऊन थडकत आहे,याचे वृत्तांत येऊ लागले. मी आपला मुंबै ट्रेन प्रवासात दिसणार्या-मुंबैला टिपण्यात गर्क होतो. हि माझी लहानपणापासून अतिशय जवळीक असलेली मुंबई आहे. (याविषयीचा एक वेगळा धागा माझ्या मनात तयार होतो आहे... तो कधितरी मांडेनच!)
शेवट आंम्हाला गाडीने अगदी ठरल्या टायमाला म्हणतात,तसे बरोब्बर धा ला सिएसटी'त-पोहोचवले! पुढे येऊन बघतो तर आमचा नवपरिणित लिल्या त्याच्या चेहेर्यावरील मूळ आणि अता जिच्याशी विवाह झालेला आहे त्या---लीलेसह एका बॉक्सात चिक्कूच्या वड्या घेऊन मु.वि.न्ना शह द्यायला स्वागताला उभा होता. त्याच्या बरोबर एक होऊ घातलेला मि.पा.कर प्रसाद आपटे हा ही कॅमेर्यासह सज्ज होता. आणि पहिला धक्का मिळाला. कोण यावेत ओळखा बरं? अखिल मि.पा.जगताची नाडी-पक्की ठाऊक असलेले मि.ओक! आहे की नै धक्का? ;) नंतर हळूहळू श्री.किसनद्येव-सपत्निक,मकीताई,पिंगू(cstसर्वात पहिला हजर-या दाव्यावर अढळ असलेला आणि मु.विं प्रमाणेच मूळ-नाम सार्थ केलेला :D ),माझिही शॅम्पेन हे सर्व कॅम्पेन मधे आले. तेव्हढ्यात मु.वि.पण हजर झाले,आणि खेळा ला रंग भरू लागला. दिपककुवेत,सौरभ उप्स, आणि आणि आणि शेव्टी आला तो पां डुब्बा!!! =)) आल्या आल्या मी पांडुवरचा मस्तानीचा(खर्या नव्हे..प्यायच्या! ) मनातला-राग 'निघण्यासाठी त्याला मनसोक्त कुदवले. त्या दिव्य-प्र-संगा'चे छायाचित्रण प्रशांतनी केल्याचे मी हळुच पाहिले,आणि अजुन कुदविले! =)) मण-शांत झाल्यावर पुन्हा ओळख परेड होऊन आंम्ही मास्तरीण म.कि.ताईंच्या मार्ग-दर्शनाखाली ठेसनातून गेट वे ऑफ इंडिया कडे कूच केली.
आंम्हा सर्व इद्यार्थ्यांन्ना मकीताईने एका बसच्या रांगेत धरले. कुणितरी पायाचे अंगठे धरून हुबे र्हाऊ का? असा अवाजही टाकला...मगोमाग मि.पा.प्रथेप्रमाणे आपापल्या!!! असा उपआवाजही आला. आंम्ही बशीत बसलो आणि माझ्या-मुंबै चॅनल मधला आवडता डब्बल डेकरचा फोटू त्याच्या समोर हुबे र्हाऊन डब्बल-ढेकर देणार्या एका माणसासह मिळाला.
आणि अजुन एक धक्का म्हणजे या दिवशी शांत आणि उकाडा विरहीत मुंबैच्या रस्त्याच्या मझा घेता आला. बसही विशेष घाई नसल्याप्रमाणे पण योग्य वेळेत आंम्हाला घेऊन गेट वे ला पोहोचली. तोवर तिकडेही काहि धक्के आमची वाट पहात होतेच. धक्के मिळणं हे या कट्ट्याचं खास वैशिष्ठ्यच झालं. कोण असेल ओळखा बरं ??? अगदी कहिही ध्यानी आणि खरोखरच मनी नसताना... लाँच बुकिंग ऑफिसजवळ जमलेल्या मिपाकरात कोण होते??? आपले हजरजबाबी ..हबिबी हबिबीच्या देशातले... प्रभाकर पेठकर काका! :)
हाय कि नै धक्क्यांची शर्यत? आमचा आनंद शतगुणित झाला.
(येथुन खालचे तिनही फोटो:-स्पा...)
तिथे कंजूसकाका,पण्णासराव(चिरंsssजीव शंभरसह =)) ) आणि इतरही हुंबैकर मि.पा.मंडळी जमली होतीच
मग.. मास्तरीणबाई मकीताईने तेथेल्या आणि आम्हा-पोहोचलेल्या-अश्या येथल्या सर्व मि.पा.करांना अता रिंगण धरायला लाऊन मि.पा.वारी आणि मि.पा.ची पालखी.. या संकल्पना घट्ट केल्या. शूक..शूक करून सर्व वारकर्यांना आधी गप बसवलं. आणि मग सर्वांना (पुन्हा आपापल्या... ) तोंडानी शाळेतल्या सहलीसारखे 'नंबर' पुकारायला लावले..त्यात मागेपुढे होत होत तिसर्या किंवा चवथ्या पायरीला गणसंख्या भरली "२६" !
आणि माझे फिल्मी मन उघड ओरडले...
अगोबाचं कॅमेरा-लेन्स अश्या पुढच्या तयारीत लक्ष असल्यामुळे कुठलाही खौट बाँम्ब न पडता बाकिचेही सदस्य ओरडले... स्पेशल छब्बीस ! आजुबाजुची लोकं हे तिसर्या ग्रहावरचे अशांत-जीव असावे..असा समज करवून घेऊन पुढे सरकत होती. मग तिथे पहिला ग्रुप फोटो झाला. त्यात मी आणि काहि जण पेठकर काकांच्या पुढे जागा धरू लागल्यावर काकांनी, "रहा..माझ्या पुढेच उभे रहा,म्हणजे मला निराळं पोट झाकावं लागणार नाही!!!" =)) असा षटकार लगावला,आणि फोटू काढणार्या'ची लेन्स सुद्धा खदखदली! पेठकरकाकांच्या नंतरच्या विशेषतः लेण्यांमधल्या! काहि शिल्प्षटकारांमुळे... आयला नाय..नाय... षटकार शिल्पां'मुळे... (तरी विनोद झाला :D .. जाऊ दे समजून घ्या लोक्स! ) लेण्या हदरून त्यांना अनेक नवे ऐति हासिक आयाम मिळाले! (लेणिच्या डाविकडल्या गाळ्यातले कांकांचे षटाकर ज्यांनी अनुभवले त्याच कट्टेकर्यांना घारा पुरी'चे पुण्य-पूर्ण मिळालेले आहे.. ज्यांना पुण्यसंचय "हवा" असेल त्यांनी मला व्य.नि.करावा! )
असो..तिकिटे काढून आंम्ही गेट वे वरून घारापुरीकडे एकदाचे लाँच'लो! आणि मग खरा दंगा सुरु झाला तो लाँचवर!
प्राचीन अरबी युद्धात जसं सुरवातीला मुख्य योद्ध्यांची झुंज व्हायची तशी पिंगु-नादखुळा, ओककाका आणि कुणिही!, मी आणि अर्थातच... =)) !!! , लिलाधर आणि पांडू , परत मी आणि पांडु ,शिवाय मी आणि पांडुनी अधिच ठरवलेलं-ऑपरेशन-लिलाधर...अश्या काहि झुंजी होऊन लाँचला युद्धनौकेचं स्व रूप आलं! पण लाँचवर येता-जाता दोन्ही वेळेस खरा दंगा केला तो दोन बालविरांनीच.. धन्याचा भाचा प्रथमेश आणि पन्नासरावांचे-चिरंजीव शंभर!
(फोटो:-स्पा..)
परतीच्या प्रवासात तर वरती डेकवर ह्या दोघांनी त्या कडेला---बसलेल्या फॉरे-नरास आणि नारीस त्यांच्या पायावरनं उड्या मारून अशी प्रक्टीस दिली कि त्यांना आपला तो जुना 'पाय पसरून त्याच्यावर हताची कडी वाढवत उड्या मारायच्या खेळाचा (अंगठा-पाणिच ना हो ते? ) भोज्या सहज होता यावं! मग,मधेच दिपककुवेत यांनी सगळ्यांना चॉकलेटं-लाऊन एकंदरीत 'तह' घडवून आणला. अहो..पण हे सगळं दूर असू द्या, एक घडायचं घडलेलं सांगायचं र्हाऊन जायचं कि वो.. ही चाकलेटं येण्याआधीच मकिताई..चिमी..आणि सौ किसनदेव..यांनी "घरनं आणलेले पदार्थ" घेऊन गुप्त चराळ मंडळाची स्थापना लॉचच्या एका बाजूला करून , 'अनाहिता जागृती समाजाची' पताका तिथेही सक्रीय फडकवली. (या चर-काळात तिघिंनाही,..उरलेल्या मि.पा.जगाची जाणिव अजिब्बात नव्हती, ती जाणिव काहि घरगुती आणि खाजगी संवादात गुंतली असावी,असा आमचा नम्र अंदाज आहे! ;) ... )
लाँचिला पोहोचायला बराच येळ लागतोय हे पाहून मग सगळ्यांनी आपाप्ल्या कॅमेर्यांसह एकंदरीत "शूटींग" सुरु केले. नावेच्या चार बाजू.. अगोबा...सौरभ..आमचा प्रसाद, पांडू(नवकॅमेर्यासह..) ,आणि मी वरच्या मजल्यावरून सभोवतीची टिपा-टिपी सुरु केली.
लाँचिंग पिरियडवर पण्णास यांनी... असेच अजून गेलो तर पेठकरकाकांच्या गावी पोहोचू असा चौकार लावला! आणि होते होते मग...एकदाचे आंम्ही तिकडे पल्याड'ला पोहोचलो. पोहोचल्यावर न थांबता सगळे पुढे निघालो,वाटेतल्या स्टॉलवर कोकणिमेव्याचा अस्वाद घेत मधे एक शॉर्ट खादाडी थांबा ही जाहला.
तिथे घरनं आणलेले पदार्थ हे प्रकरण भुकाळलेल्या अनेकांनी एका मोकळ्यास्टॉलवर ठेऊन उडवलं आणि मग अवतरल्या मु.वि.स्पेशल "वड्या" खरोखर तोंडात टाकल्याक्षणी विरघळणार्या त्या चॉकलेटवड्या ...आहाहाहा...
(फोटो:-वल्ली...)
आंम्ही मु.वि. मु.वि... म्हणतच पायर्या चढायला सुरवात केली. वाटेत चहा झाला.(तिथेही पेठकर काकांन्नी चहा आणि चहावाले यावरून ५/६ षटकार लगावले..पेठकर काका ख्रिस गेल आहेत,बाऊंड्य्रा मारतच नाहीत! :D) शेवटी हाश हुश्श..करत येकदाचे वरती पोहोचलो. बघतो तर तिथली मनुष्यवंशाचा पुरावा सिद्ध करणारी काहि माकडे होती. काय लिला चालल्या होत्या!? ;) एका माकडानी तर माझा कोल्ड्रिंकची बाटली पळवली आणि पद्धतशीरपणे झाडावर जाऊन बूच उघडून प्यायली आणि परत बुच मारलं..देखिल!
यावरून-"बाटली हातात आल्यावर माणसाचं माकड होतं,इतकच सत्य नसून..माकडाचं ही याच गोष्टीनी बाटली असेपर्यंत तरी माणूस होतं" हे डिडक्टीव्हली प्रूव्ह झाल्याचा आणंद ..मज मणाला जाहला! =))
तिकिट काऊंटरवर "भारतीय नागरीकांस तिकिट दरः-१०रु.आणि विदेशी नागरीकांसः-२५० रु. असा राष्ट्रीय-भाव होता. पेठकरकाकांचा अजुन एक षटकार-(आजुबाजुच्या विदेशींन्ना पाहून) हळूच म्हणाले," थोडी तिकिटे जास्त काढा रे... १२५ ला विकू आपण!"
अश्या तर्हेने तिकिटे काढणे झाले.
आणि मग सगळ्यांना जे हवे होते ते सुरु झाले...
वल्लींच्या नजर आणि बुद्धिनी-लेणी दर्शन!
अता मी नजर आणि बुद्धी असं का म्हणतो..हा प्रश्न कुणाला पडत असेल तर..त्यानी एक ट्रीप वल्लीबरोबर करावी..हेच त्याचं एकमेव उत्तर आहे. कारण आपली बुद्धी..भावना कित्तीही सौंदर्यात्मक कलात्मक असली तरी तिला आभ्यासूप्रवृत्तीचे अधिष्ठान नसल्यामूळे..आपल्याला मूर्ती/शिल्पांमधली...दिसते ती फक्त भव्यता..दिव्यता..आणि भग्नता... या सर्व कलाकृतींना असलेला इतिहास,मूर्तीशास्त्र,पुराणकथा याचा आधार हा काहि अंतरज्ञानानी दिसणारा विषय नव्हे. त्यासाठी या विषबद्दल गाढ ममत्वबुद्धी असलेल्या अभ्यासकाची नजर आणि मेंदू बरोबर असावा लागतो... याच नजर आणि मेंदूचे नाव सागर बोरकर..ऊर्फ वल्ली आहे. तो आमच्या बरोबर होता म्हणून हा झाला तो घारापुरी भ्रमंती कट्टा... नाहितर घडली असती ती घारापोरी सहल! अता इथून पुढे मला काहिही बोलणे अशक्य आहे...
पुढे बोलतील ते ... वल्लीच! त्यामुळे अता आपण सार्यांनी आपले कान आणि मन त्या दिशेनी नेऊ..
वल्लींच्या धाग्याकडे ----- घारापुरीचे शैवलेणे
====================================
लेण्या पहात असताना अजून एक (काहिंना माहित असलेला!) पन आमच्यासाठी धक्काच! विजुभाऊ अवतरले.. आणि अजुन एक धक्का... मु.वि. कंजूस स्पा आणि सौरभ (त्यांना कामं असल्यामुळे..) विसर्जिले!
असो!
लेणिदर्शनानंतर परतीचा प्रवास हा पार्ट तसा विशेष नसल्यामुळे त्यातल्या विशेषाचे..म्हणजे पंचमपूरीवाला भोजनाचे रिपोर्टींग तेथे आलेले सर्व भो-जनी करतीलच.. (इथेच आंम्हाला सुहास झेले येऊन जॉइन झाले. ) शिवाय बाकि सदस्यांनीही काढलेल्या फोटोंसह यात प्रतिसादी-सहभाग नोंदवावा..विशेषतः कट्टेकर्यांच्या फोटोरुपानी!
(फोटो:-वल्ली...)
लेण्यांमधले (सर्व) फोटो या धाग्यावर न पाहता ते आपण वल्लींच्याच धाग्यावर माहितीसह पाहू असे सुचवून(आणि काहि फोटो टाकून) मी थांबतो!
(सदर धाग्यातले काही(नामनिर्देशित) फोटो हे वल्ली आणि स्पा यांनी काढलेले आहेत...उरलेले माझे. :) )
===================================
प्रतिक्रिया
3 Mar 2014 - 3:21 pm | नाखु
पहिला आणि वृतांत पाहिला..
3 Mar 2014 - 3:29 pm | माझीही शॅम्पेन
बुआ झकास सुरूवात , हा कट्टा इतका भव्य-दिव्य होता की चार-पाच मिपा-कारांनी लिहिल तरी बराच काही राहून जाईल !!! :)
14 Mar 2014 - 10:19 am | माझीही शॅम्पेन
सविस्तर प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला , वल्ली-च्या धाग्यावर दिलेली प्रतिक्रिया परत देतोय !!!
हा कट्टा नेहमी स्मरणात राहील , ह्या आधी बरेच वर्षा-आधी तिथे गेलो होतो तेव्हा काहीच कळल नव्हत..
वल्ली यांनी इतकी सुंदर माहिती दिली त्यांचाच देखरेखी खाली ती लेणी बांधली गेली असावी !!!
रच्याक ने सगळे फोटो घेतले पण वल्लींच्या पायाचा फोटो घेतला नाही !!!
संध्याकाळी बोटीच्या डेक अगदी पुढे बसून मक , विजुभौ , किस्ना , वल्ली , सौण्दला ह्याच्या बरोबर गप्पांचा मस्त कट्टा रंगला , समोर सूर्य असताला चालला होता त्यामुळे समुद्र सोनेरी होता , आकाश अगदी निळ-भोर , आकाशात सिगल्स पक्ष्यांची सोबत आणि जोरदार वारा .. काय काय सांगू , सगळ अप्रतिम आणि प्रेक्षणीय.
मधेच आमच्या बरोबरच्या छोट्या मिपाकराने फर्माईश केल्या नंतर विजु भाऊनी बासरी वाजवली....
सध्यकाळी पूर्ण दिवसाला स्मरणात ठेवताना हा कट्टा प्रेक्षणीय तर होतच पण वल्लीच्या अद्भुत माहिती , बुआ-नी शिव-मंदिरात म्हटलेले मंत्र , विजु-भाऊनी वाजवलेली बासरी ह्या मुळे अत्यंत श्रवणीयसुद्धा झाला !!!
3 Mar 2014 - 3:42 pm | नंदन
वृत्तांत! पेठकरकाकांचे अनेक कट्टे हुकले असले तरी त्यांनी ह्या जंगी कट्ट्याला हजेरी लावून कसर भरून काढली आहे.
इतर कट्टेकर्यांच्या वर्णन/फोटोच्या प्रतीक्षेत.
3 Mar 2014 - 3:48 pm | आत्मशून्य
केलेला दिस्तोय.
3 Mar 2014 - 3:50 pm | सानिकास्वप्निल
कसला वृत्तांत दिलाय आत्मा भाऊ +++११११
फोटो व वृ आवडेश
आता इनो घेणे आलेच ;)
3 Mar 2014 - 3:58 pm | भाते
आयला, कट्टयाला इतके अनपेक्षित धक्के मिळणार आहेत याची पुसटशी कल्पना असती तर माझी दातांची ट्रीटमेंट आहे हे मिपावरचे सुप्रसिध्द कारण देऊन हापिसला टांग मारली असती ना!
बरेच काही मिस केले मी! सचित्र वृत्तांत आवडला.
पु.भा. प्र.
3 Mar 2014 - 4:04 pm | पैसा
कसलं मस्त लिहिलंय!
3 Mar 2014 - 4:11 pm | शिद
मस्त खुशखुशीत कट्टा वृत्तांत... धमाल आली वाचून आणि फोटो पाहुन. एखादी ओळख परेड झाली तर आणखीन मजा येईल.
मला वाटते मिपा ईतिहासात बहुतेक पहील्यांदाच इतकी सारी मंडळी कट्ट्याला एकत्र हजर असतील. :)
3 Mar 2014 - 4:12 pm | ऋषिकेश
भले शाब्बास!
3 Mar 2014 - 4:16 pm | सुधीर
कट्ट्याची तहान वृत्तांतावर!
3 Mar 2014 - 4:18 pm | अत्रुप्त आत्मा
दोन र्हायलेले फोटू
१) सि.एस.टी.वरील "जमलेले" मिपाकर
डाविकडूनः- प्रशांत,पिंगु,नादखुळा,सौंदाळा,धन्या(भाच्यासह),(हाताची घडी) ओककाका, नीलवल्ली अगोबा =)) .., लिलाधर,प्रसाद आपटे,आणि सौ.लिलाधर. :)
२)स्वागतसज्ज लिला(वडी)धर...
================================
14 Mar 2014 - 3:06 pm | सस्नेह
लीलाधरांनी केल्या का वड्या ? मला वाटलं सौ. लीलाधरांनी !
3 Mar 2014 - 4:24 pm | किसन शिंदे
बुवा, एक नंबर लिहीलाय वृत्तांत!:)
वल्लीच्या वृत्तांताची वाट पाहतोय.
3 Mar 2014 - 4:29 pm | अजया
मस्त वृत्तांत आणि फोटो !
एक इनोचा फोटू लावुन टाका बुवा !
14 Mar 2014 - 3:08 pm | सस्नेह
मोठ्ठा इनो मंगताय !
बाकी हा कट्टा मिपा इतिहासात (सदस्यसंख्यने) सर्वात मोठ्ठा असावा !
3 Mar 2014 - 4:32 pm | साती
मस्तं मजा केलीत.
बराच मोठ्ठा झाला कट्टा!
3 Mar 2014 - 4:34 pm | अत्रुप्त आत्मा
डोंगरावर जाताना वाटेत स्टॉल बरेच होते...त्यात मला अवडलेले काहि कोरीवकाम केलेल्या कलाकृतींचे फोटो. पाय हलत नव्हता..लै मस्त मस्त होत्या एकेक कलाकृती!
3 Mar 2014 - 4:36 pm | बॅटमॅन
3 Mar 2014 - 4:39 pm | सुहास झेले
एक नंबर बुवा... कट्टा फर्मास झालाय. आता आमचा नोकरीचा शेवटचा दिस होता, नाय तर सकाळपासूनच हजेरी लावली असती. असो.. पंचम पुरीवालाकडे आपली धावती भेट झाली हेही नसे थोडके :)
.
.
3 Mar 2014 - 8:02 pm | भाते
ह्या फोटोत इनोची बाटली कुठे आहे? त्याशिवाय हा फोटो अपुर्ण आहे.
3 Mar 2014 - 4:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावर ब-याच दिवसानंतर एवढी मंडळी एकत्र आलेली दिसली आनंद वाटला. कट्ट्यात अजून तपशिलवार माहिती भरता आली असती, असे वाटले. बाकी, वल्लीशेठ, तुम्हा सर्वांना लेणी बद्दल माहिती सांगताहेत हे पाहून डोळे भरुन आले. नैतर क्यामेरा आणि त्यांचा असा दोघांचाच संवाद चाललेला असतो.(हलकेच घ्या शेठ)
बाकी, आपल्या लेखनात प्रचंड विनाकारण निरर्थक स्मायल्या दिसल्या नाहीत तेही पाहून बरं वाटलं. आभार. ;)
-दिलीप बिरुटे
3 Mar 2014 - 5:30 pm | प्रचेतस
हाहाहा.
अगदी खरंय. याखेपी मिपाकरांनी मला तोंड उघडायला लावायचेच असा चंग बांधला होता. त्यामुळे फोटो कमी काढता आले. अर्थात घारापुरी लेणी तशी फारशी मोठी नसल्याने २/३ तासांत अगदी व्यवस्थित पाहून टिपता आली.
3 Mar 2014 - 6:09 pm | प्यारे१
+१
3 Mar 2014 - 5:03 pm | सौंदाळा
मज्जा आली.
पहिल्याच कट्ट्याला तब्बल २५ दिग्गज मिपाकरांना भेटुन मस्त वाटले.
पेठकरकाकांचे फटके बुवा म्हटल्याप्रमाणे लाजवाब.
वल्लीदांकडुन याची देही याची डोळा शिल्पांबद्दल माहीती मिळाली.
विजुभौकडुन दुसर्या गुहेत शांत वातावरणात बासरी ऐकता आली.
मस्त कलंदर कडुन कोअर मुंबईची भरपुर माहिती मिळाली.
नादखुळांचे अनेक अनुभव ऐकायला मिळाले.
मुविंचा सळसळता उत्साह बघायला मिळाला.
परतीच्या प्रवसात ट्रेनमधे बुवांच्या अफलातुन कॉमेंट्स ऐकायला मिळाल्या. मज्जा आली.
3 Mar 2014 - 5:05 pm | सूड
मस्त झाला कट्टा. मुविंनी आणलेल्या वड्या अप्रतिम होत्या. माझ्या वाटणीच्या वड्या कोणी ढापल्या ते सांगा आधी, नशीब त्यांच्या कडे जास्तीच्या होत्या म्हणून !! नाहीतर मला मिळाल्याच नसत्या.
3 Mar 2014 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा
@ माझ्या वाटणीच्या वड्या कोणी ढापल्या ते सांगा आधी, >>>
3 Mar 2014 - 5:24 pm | प्रचेतस
जबरदस्त वृतांत.
आत्मुदांनी अगदी भरभरून लिहिलंय. मला लेणीवर्णन सोडून इतर काही लिहायला काहीच शिल्लक ठेवले नाही.
स्थलदर्शनाचा वृत्तांत लवकरच लिहिन.
बाकी बेस्टच्या पहिल्याच फोटूतला माणूस पाहून महाराष्ट्रातील आधुनिक जाणता राजा डोळ्यांसमोर आला.
3 Mar 2014 - 5:36 pm | धर्मराजमुटके
अहो मग त्या स्टॉलवर मोठमोठे दगड आणि विटा का ठेवल्या आहेत ? मला पहिले वाटले की चॉकलेटवड्या तोडण्यासाठीच ठेवले आहेत की काय ? :) (ह.घे.)
चांगल्या कट्ट्याला मुकलो.
3 Mar 2014 - 5:42 pm | मुक्त विहारि
मी थोडा लवकरच पळालो,
कारण ....
कारण.....
कारण.....
लवकरच सांगीतल्या जाईल.
3 Mar 2014 - 8:00 pm | भाते
मुक्त विहारि लवकरच सं.मं. कडुन मिपाचे अधिकृत 'कट्टा नियोजन अधिकारी' म्हणुन घोषित केले जातील
किंवा/आणि
सं.मं. कडुन मुवि सं.मं. मध्ये आल्याची घोषणा केली जाईल
किंवा/आणि
आणखी काही!
जाताजाता,
मुविंकडुन मुळ बातमी आम्हाला दिपक कुवेत बरोबरच्या डोंबिवली कट्टयात समजली आहे. (पाहिलेत मध्यवर्ती डोंबिवली कट्टयाला येण्याचे फायदे!)
3 Mar 2014 - 5:44 pm | अनन्न्या
आणि फोटोही!
3 Mar 2014 - 5:45 pm | यशोधरा
मस्त वृ! :)
3 Mar 2014 - 5:45 pm | स्पा
दणदणीत वृतांत .
एक नंबर्स मजा आली , माझ्यामते हा मिपाच्या इतिहासातील सर्वात मोठा भटकंती कट्टा असावा :)
3 Mar 2014 - 5:46 pm | स्पा
दणदणीत वृतांत .
एक नंबर्स मजा आली , माझ्यामते हा मिपाच्या इतिहासातील सर्वात मोठा भटकंती कट्टा असावा :)
3 Mar 2014 - 5:54 pm | विकास
मस्त वृत्तांत आणि फोटो! तेव्हढ्यावरतीच आम्हाला तृप्त झालो असे म्हणावे लागत आहे! ;)
3 Mar 2014 - 6:07 pm | आरोही
मस्त वृत्तांत ,फोटो हि छान....+)
3 Mar 2014 - 6:28 pm | कंजूस
येऊन आनंदित झालो .
लेणी पाहून स्तिमित झालो .
सर्वास भेटून संतुष्ट झालो .
ऐकून वल्लीला मुग्ध झालो .
वड्या (५)खाऊन तृप्त झालो .
दिल माँगे मोर !
सचित्र वृत्तांत पाहोनिया
प्रसन्न झालो .
9 Apr 2014 - 7:35 pm | दिपक.कुवेत
अगदि हेच बोल्तो. प्रतिक्रिया थोडि उशीरा आहे पण चलता है. धागा वर आल्याने परत सगळ्यांना ते सोनेरी क्षण नक्किच आठवतील. जाणकार म्हणतात त्या प्रमाणे.....सर्वाधीक उपस्थीती असलेला पहिला कट्टा.
3 Mar 2014 - 6:33 pm | रेवती
सुरेख वृत्तांत व चित्रे. ईनो घेण्यात येईल.
3 Mar 2014 - 6:42 pm | सुबोध खरे
कट्ट्यावर हजर न राहता आल्यामुळे फार वाईट वाटते आहे आणि इतर वर्णन ऐकून जळजळहि होत आहे. असो.
मिपा कर मोठ्या संख्येत जमले आणि त्यांनी एक छान सहल साजरी केली याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच. पुढचा कट्टा अजुन मोठा आणि मोठ्या आनंदात व्हावा अशी अपेक्षा आहे. येणे होईलच.
अजून विस्तृत वर्णन येऊ द्या. दुधाची तहान ताकावर
3 Mar 2014 - 6:42 pm | लीलाधर
वृत्तांत आणि फटू लैच भारी बघा
बुवेश लौकरच पूणे कट्ट्याला हजेरी लावण्याची विच्छा हाये लौकरच ठरवा :)
3 Mar 2014 - 6:47 pm | पिंगू
झक्कास सचित्र वृत्तांत.. वर्षभराची कसर या कट्ट्यात भरुन काढली..
आता पोपटी कट्टा करायचा आहे. तेव्हा पुढील कार्यक्रमासाठी तयारीत राहा..
3 Mar 2014 - 7:35 pm | मुक्त विहारि
है शाब्बास....
कोंबडी आणि अंडी हवीतच
3 Mar 2014 - 7:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
कट्टा भन्नाट झाला आहे यात वाद नाही. इतके भारी मिपाकर एकाच वेळी म्हणजे मिपाभाषेत लै भारीच ! बाकी अआंच्या कोट्या-दशकोट्यांनी सजलेला वृतांत एक लंबर... इनोविक्री वाढवणारा ;)
आता वल्लींच्या शिल्परसग्रहणाच्या प्रतिक्षेत... येऊंद्या लवकरच !
3 Mar 2014 - 8:14 pm | भाते
प्रभाकर पेठकर आणि विजुभाऊ यांचा.
अचानक धक्का देणे वैगरे ठिक आहे पण किमान आधी थोडीशी कल्पना तरी द्यायची होती ना!
तुम्ही इथे मुंबईत असेपर्यंत आणखी एखादा गुप्त कट्टा आयोजित केला असेल तर त्याचा आधी एक धागा काढावा ही (कट्टा नियोजन अधिकारी मुवि यांना) नम्र विनंती.
3 Mar 2014 - 8:29 pm | मस्त कलंदर
कट्टा लैच भारी झाला. इतके लोक होते की बोटीच्या प्रत्येक कानाकोपर्यात कुणी का कुणी होतंच. जाऊ तिकडे गप्पा चालल्या होत्या. इतक्या वेळेस घारापुरीला गेले परंतु त्या शिल्पांमध्ये काय कहानी दडलीय हे आत्ताच कळाले. वल्ली, त्यासाठी मनापासून धन्यवाद.
नेहमीप्रमाणे बर्याच आयडींना चेहरे लाभले.
गिरिजा उर्फ प्रसाद- मुद्दाम स्त्रीआयडी घेऊन वावरणारी व्यक्ती इतकंच मला याच्याबद्दल माहित होतं, आणि खरंतर तो त्याचे पहिले काही प्रतिसाद आणि त्यावरचा दंगा पाहता मला ट्रोल वाटला होता. शनिवारी आम्ही इतक्या गप्पा मारल्या की शेवटी त्याला," एवढा शहाणासुरता आणि बुद्धीमान प्राणी दिसतोस, तुला गिरिजा व्हायची अवदसा का आठवली?" असं विचारावं लागलं. सध्या मी त्याला गिर्जाकाका म्हणून संबोधतेय.
कंजूस- यांचे प्रतिसाद्च असतात बहुधा, धागे मला तरी काही आठवत नव्हते. नावावरून वाटतात तसे नाहीत, भरभरून गप्पा मारतात. मधूनच छान मिस्किल बोलतात.
पेठकरकाका- मराठीचा आग्रह धरणारे आणि पाककला पारंगत यापलिकडे ते इतके हजरजबाबी आहेत हे माहित नव्हतं. त्यांचे बुवा म्हणतात ते विनोद एकले नसले तरी बोटीत त्यांच्या या स्वभावाची चुणूक जाणवली.
असाच एक-- सौंदाळांचं डोकं जवळजवळ अगदी बोटीच्या छताला टेकलेलं. त्यांना त्यांची उंची विचारली तर पेठकरकाका पण त्यांच्याइतकेच उंच असावेत असं सौंदाळा यांचं म्हणणं पडल. विचारलं तर "आधी सहा एक होती, आता एक इंच कमी झाला आहे" असं उत्तर मिळालं. :-) कसं ते याचा खुलासा पेठकरकाकांकडून प्रत्यक्ष ऐकण्यात मजा आहे.
विजुभाऊंना पहिल्यांदाच भेटले. येताना डेकच्या टोकाशी ते, मी सौंदाळा, किसन, माझीही शँपेन यांच्याशी भारी गप्पा झाल्या.
शशिकांत ओक, माझ्या अंदाजाप्रमाणे अगदी धीरगंभीर वाटले. कदाचित इतक्या लोकांमधून माझं त्यांच्याशी जास्त बोलणं झालं नाही त्यामुळेही असं वाटलं असावं.
पिंगूला व्हेज पोपटी करण्याबद्दल दम भरलाय.
चुक्लात हो बुवा. तिथं मुकटा नेसून सूड आधीच बसला होता आणि शेजारी बहुधा प्रशांत-पन्नासराव होते. तुम्हाला सोडून आम्ही भडंग्/वेफर्सवरती ताव मारला याचा बदला असा नाय घ्यायचा हो..
पहा माझ्यासमोर कोण बसलं होतं ते.. विराज आमचं खाऊन झाल्यानंतर आला..
रांगेचा फायदा सकलांना.... तुम्हा-आम्हांला सर्वांना..
3 Mar 2014 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा
@रांगेचा फायदा सकलांना.... तुम्हा-आम्हांला सर्वांना..>>> परत एकदा आंगठा धरून हसलो... (कोण रे तो.."स्वतःचा का" - म्हणून आवाज टाकतोय??? =)) ..)
@चुक्लात हो बुवा. तिथं मुकटा नेसून सूड आधीच बसला होता आणि शेजारी बहुधा प्रशांत-पन्नासराव होते. तुम्हाला सोडून आम्ही भडंग्/वेफर्सवरती ताव मारला याचा बदला असा नाय घ्यायचा हो.. >>> मला नक्की तिकडे काय चाल्लं होतं तेच जाणून घ्यायचं होतं! कारण त्या'काळात आंम्ही(मी आणि पांडू..) इकडे लिलाध्रा'ला-घेत होतो!
5 Mar 2014 - 10:43 am | कंजूस
@मस्त कलंदर ,सही आवडली .
मागच्या वर्षी ट्रेकिँग आणि पर्यटन लेखांनी सुरुवात केली परंतु पहिलेच प्रतिसाद १) "अक्कल नसली तर चार चौघांत प्रदर्शन करू नये " ,२) "हे काय माझा जन्म झाला ,लग्न झाले ,मुले झाली छाप लेखन आहे" ३)"मोठ्या आशेने लेख उघडला पण --"
इत्यादी वाचून घाबरून लेख काढून टाकले .नंतर कळले त्यातल्या काही सह्या आहेत .आता निर्ढावलो परंतु "संपादन"ची सोय काढल्यामुळे माझ्या छोट्या मोबाईलमधून मोठे लेख टाकता येत नाहीत .
तूर्तास
उरलो मी प्रतिसादांपुरता .
3 Mar 2014 - 8:39 pm | धन्या
खुप मजा आली. माझ्या भाच्याने पन्नास यांच्या चि. शंभरसोबत धमाल केली.
गेल्या अडीच वर्षांपासून मिपाकर कुटुंबियांसारखे झालेत. पुण्यातील खादाडी म्हणू नका, नाणेघाट, रायगड, अजिंठा - वेरुळ, महाबळेश्वर इथल्या सहली म्हणू नका किंवा अगदी काल परवा झालेली चि. शंभरची मुंज म्हणू नका या सार्या आठवणींनी आपण एका मोठया कुटुंबाचे सदस्य आहोत ही जाणिव गडद होते.
अजून एका गोष्टीबद्दल आवर्जून लिहावेसे वाटते ते म्हणजे मिपाकरांनी त्यांच्या गावी गेल्यावर केलेला पाहूणचार. काल मुंबईकरांनी आम्हा पुणेकरांची अशी काही बडदास्त ठेवली. तीच गोष्ट बिरुटे सरांनी औरंगाबादला केलेल्या सरबराईची.
हा स्नेह असाच वृद्धींगत होवो.
3 Mar 2014 - 8:44 pm | मुक्त विहारि
मिपाकर ते करणारच....
बिंधास्त रहनेका...
3 Mar 2014 - 9:20 pm | निनाद मुक्काम प...
खुसखुशीत भाषेत अतिशय उत्कृष्ट शैलीत लिहिले गेलेला हा वृत्तांत वाचून रतात येउन कट्टा करण्याचे मनात येत आहे
त्याबाबत अधिकृत बातमी थोड्याच दिवसात
मूवी ह्यांनी आता मिपाचा निवासी कट्टा करण्याचे मनावर घेणे
अशी सुचना वजा विनंती आहे.
पेठकर काकांच्या सोबत छोटेखानी म्युन्शन कट्टा करायचा आहे ,तुमचा भारतीयांचा एवढा विशाल भव्य कट्टा पाहिल्यावर आता अनिवासी मंडळींनी आपापल्या देशात महाकट्टे आयोजित करावेत
आता परदेशात मूवी सारखा कट्टाबहाद्दर कुठून शोधायचा हाच खरा यक्षप्रश्न आहे.
3 Mar 2014 - 9:52 pm | भ ट क्या खे ड वा ला
शिंची नोकरी आडवी आली.
लय भारी इवेन्ट मिस केला
वल्लीनच्या लेखाच्या प्रतीक्षेत
भ खे.
3 Mar 2014 - 9:59 pm | मस्त कलंदर
बादवे, आम्हाला 'गिरिजा' मागील कथा कळलीय. स्पा कडून अधिक खुलाशाच्या प्रतिक्षेत!!
3 Mar 2014 - 10:48 pm | पैसा
असले गोंधळ उडवणारे स्त्रीवेषधारी आयडी काही मंडळींना मस्त शेंड्या लावतात. पण स्पाच्या वाटेला कध्धीच कसे जात नाहीत याचं कोडं आहे!
3 Mar 2014 - 10:41 pm | स्पा
माताय मि कसला खुलासा करायचा?
3 Mar 2014 - 10:44 pm | मस्त कलंदर
S PA चा!!
3 Mar 2014 - 11:08 pm | कवितानागेश
मी सांगू? मी सांगू? :P
3 Mar 2014 - 10:46 pm | खटपट्या
मस्त वृत्तांत
3 Mar 2014 - 11:11 pm | प्रचेतस
घारापुरी सफर कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता. आता योग म्हटल्यावर ही संधी सोडायची नाही असेच ठरवले होते. लेण्यांच्या भ्रमंतीसोबतच अजून एक आकर्षण होते ते समुद्रसफरीचे. २०/२५ मिनिटांत घारापुरीला पोहोचू असे वाटत असतांना ही समुद्रसफर तब्बल तासभराची झाल्याने समुद्रसहवास अंमळ जास्त वेळ अनुभवास मिळाला.
सोबतीला मिपाकरांच्या मनमुराद गप्पा चालूच होत्या. तासाभरताच घारापुरीच्या जेट्टीवर उतरलो. आम्ही तिघं चौघं आधीच भराभर लेण्यांपाशी पोचल्याने मागे रेंगाळलेल्या मंडळींनी चहापानासाठी थांबा कधी घेतला ते कळलेच नाही.
बाकी ह्या लेण्या भग्न असूनही अतिशय अप्रतिम आहेत. इथले मूर्तीभंजन हे इस्लामिक नसून पूर्तुगेझांनी आपल्या बंदूका, तोफा यांचे सरावासाठी लक्ष्य म्हणून ह्या मूर्तींचा वापर केला. हे पूर्णपणे शैव लेणे. ह्या लेणीत विष्णू आणि ब्रह्माला दुय्यमच स्थान दिलेले दिसले. इथल्या लेणीतले जवळपास सर्व द्वारपाल हे आयुधपुरुष शैलीतले वाटतात कारण ह्या द्वारपालांचा हाती शस्त्र अभावानेच असून बहुधा सर्वच एका बटू सोबत उभे आहेत. हे बटू नसून त्यांच्या हातीचे शस्त्र असावे. इथल्या भिंतीवरची शिल्पे अतिशय अप्रतिम आहेत. महायोगी शिव, नटराज, अर्धनारीश्वर, कल्याणसुंदर शिव, गंगाधरशिव, अंधकासुरवधमूर्ती अतिशय प्रत्ययकारी आहे. आणि ती मधली त्रिमुखी असलेली सदाशिवाची मूर्ती. काय कमालीची देखणी आहे ती.
उजवीकडच्या उपलेण्यांत योगेश्वर शिव तर डावीकडच्या उपलेण्यांत भैरव, अष्टमातृका आणि स्कंद आहेत.
अर्थात आता इथे यावर जास्त काही न लिहिता लेण्यांवरच्या स्वतंत्र वृत्तांतात अधिक लिहिनंच.
4 Mar 2014 - 12:13 am | शशिकांत ओक
कट्ट्याच्या धाग्यावर माझे दोन टाके
'नाडी-वाडी नंतर आधी तब्बेतीकडे लक्ष द्या ' असा प्रेमळ पण सज्जड दम कोण भरू शकतो ते चाणाक्ष मिपाकर समजून घेतील!
मिपाकर घारापुरीच्या लेण्यापहायला जात आहेत असे अचंब्याने मी म्हटले,' मग जरूर जा' असा आदेश मिळाला! लगेच मी तिकीटांची व्यवस्था केली. तोवर वल्लींचा धागा धावत होता. 'हा येतोय, तो येतोय' अशी वर्दी मिळत होती. त्यात आपण येणार म्हटल्यास काहींना विरस वाटायला नको, म्हणून मी प्लॅटफॉर्मवरच अवतरित व्हावे असे वाटले. असो.
सीएसटीवर लीलाधर कुटुंबियांनी आणलेल्या कोको चॉकलेट बर्फीच्या चविष्ट वड्यांचा स्वाद तोंडात घोळवतात असता मुक्त विहारींची एन्ट्री अन्य मिपाकरांसोबत झाली. सुरवातीला जुजबी ओळखी करून झाल्या. १११नं. बसमधून सर्व भारताच्या भव्य दरवाज्यापाशी थडकलो. वाटेवर शिरगणतीनुसार तिकिटे काढून झाली. चला, चला, चा तगादा ऐकत एका मोठ्या नावावरून दुसऱ्या करत सगळे सामावले गेले. बोटीचे दोरखंड ढिले झाले व तिने वेग घेतला. पहाता पहाता ताज हॉटेल व अन्य इमारती दूर सरल्या.
तरुणांना संकोच वाटू नये म्हणून मी कंजूस यांशी गप्पा मारायला लागलो. त्यांनी वेळोवेळी वडाळा, चेंबूर, बीएआरसी वगैरे किनाऱ्यावरील दिसणारी उपनगरे व ज्या लेण्यापहायला निघालो त्याबेटाची दुरून ओळख करून देताना त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा परिचय दिला. इतिहासातील काही दाखले व मंदिर रचनांचा काळ यावर त्यांचे विचार कथन करता करता किनारा आला. तासभर कसा पटकन गेला असे वाटले. लुटूपुटूतील रेलगाड़ी मागे टाकून मुक्त विहारींची कोको वडी तोंडात घोळवताच आणखी एक घ्यायला हात पुढे गेला, पण इतरांचा विचार करत हात मागे ओढला. वड्या मस्तच झाल्या होत्या. शिवाय स्वतःहून बनवून आणल्याचे अप्रूप होते. फटाफट पाऊले उचलत गूफेचा चढ चढायला लागलो. दुतर्फा दुकानातील माल खुणावत होता त्याकडे दुर्लक्ष करून शिवाची त्रिमूर्ति दिसली तेंव्हाच थांबलो. असो.
मी ही थांबतो. वल्लींचा माहितीपुर्ण धागा वाचायला.
4 Mar 2014 - 4:26 am | स्पंदना
१ वल्लीचा लेण्यांबद्दल माहिती सांगतानाचा चेहरा....सल्युट!
२ कोल्ड्रिंक पिणारे माकड...मी सांगितल होतं, गाढव कोल्ड्रिंक प्यायला शिकलेत म्हणुन. ;)
उगा मकी होती म्हणुन शिस्तीत जेव्हढे गेले तेव्हढे नग परत अले अस वाटतय.
बाकी सगळ्यांना पाहुन फार आनंद झाला.
4 Mar 2014 - 8:44 am | चौकटराजा
कट्टा लय पेशल झाल्याला दिसतुय! ते बेनं डबल ढेरकर तेजा फटू लय खास आन त्ये मोट्या व्हड्यांचा क्याटवॉक बी मायंदाळ ! म्या बी वोककाकान आन प्येटकर काकांपरमान आच्च्रर्य भ्येट करनार व्हतो पन र्हाईलं . आता प्येटकर ( तेंजा प्येटशांतीचा वेवसाय हाय ना ) काकास्नी भ्येटाया मस्कतात जायला लागनार भ्वोतेक ! बाकी त्ये पनासरावाचा दुप्पट आन धन्यारावाचा सवाशेर यांची कुस्ती लई बाहारी झाली असनार ! ब्वाला मस्तानी ( म्हण्जी दुधातली व्हो ) काटावर आल्याव पांडूनी धीली की कल्टी केली ? आसो . वल्लीशेट ला काई गाईड वाल्याचे पैशे न्हाई तर चा तरी पाजला का न्हाई ? आं ?
4 Mar 2014 - 8:59 am | मुक्त विहारि
तुम्हाला भेटायला ते स्वतः पुण्याला येत आहेत, असे खात्र्र्लायक सुत्रांकडून समजले.
4 Mar 2014 - 9:03 am | मदनबाण
मस्त वॄत्तांत ! :)
पेठकर काकांना कट्ट्यात पाहुन विशेष आनंद झाला. :)
4 Mar 2014 - 9:25 am | प्रचेतस
एक फोटू टाकायचाच राहिला की.
शिवपार्वतीच्या लग्नाचे पौरोहित्य करणारे ब्रह्मदेव गुर्जी आणि आजचे काळातील लग्नांचे पौरोहित्य करणारे आत्मु गुर्जी ह्या दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला.
4 Mar 2014 - 9:50 am | मुक्त विहारि
झक्कास....
वल्लींच्या तीक्ष्ण द्रुष्टीतून काही म्हणता, काही सुटत नाही.
4 Mar 2014 - 12:51 pm | सूड
>>दोन समव्यावसायिकांच्या अनुपम भेटीचा हृद्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला.
तर काय !! तेवढ्यात पण भटजींनी विचारलंनीत त्याला,"ऊच्चा किती भेटली रे !!" ;)
4 Mar 2014 - 1:02 pm | मुक्त विहारि
पण ह्या सोहळ्यांत आम्हा सगळ्यांना वल्लींचा सहवास आणि विवाह सोहळ्याच्या वर्णनाचा आनंद मनसोक्त मिळाला.
"वल्ली" नावाप्रमाणे वल्ली आहेतच पण शिवाय अवलिया पण आहेत.त्यांच्या ज्ञानाच्या खजिन्यातून किती मोती आणि माणके , निघतील, ते काही सागता येत नाही.
ज्यांना वेळ असून पण आळसामुळे, किंवा हट्टीपणामूळे, किंवा त्या लेण्यांत काय एव्हढे बघायचे? अशा विचारामुळे शक्य झाले नाही, ते हतभागी.
4 Mar 2014 - 3:16 pm | अत्रुप्त आत्मा
@"ऊच्चा किती भेटली रे !!" Wink>>> =)) आंssssss दुष्ट सुडूक! :-/ आमची परिभाषा उघड क्येली! =))
4 Mar 2014 - 10:27 am | प्रमोद देर्देकर
आयला पेठकर काका आणि विजुभाऊ एकत्र हळहळ हो नुसती कट्टा हुकल्याची .
कसला रंगीत कट्टा झालाय.
मला वाटते की मि.पा. च्या इतिहासातला हा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा कट्टा.
या कट्टयाला आमचे तात्या आले असते तर चार चाँद लागले असते.
असो.
वाचण खुणा साठवली गेली आहे. जेव्हा जेव्हा ऑफिस मध्ये कंटाळा येईल तेव्हा तेव्हा हा धागा
चवीचवीने वाचला जाईल.
धन्स
4 Mar 2014 - 10:40 am | सविता००१
खल्लास वृत्तांत... मस्तच
4 Mar 2014 - 10:48 am | प्रमोद देर्देकर
ओ मु. वि. षेठ इथे काही प्रभृतींची जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या.
चला सोनेरी अक्षरांत लिहुया
!! इये मराठिचिये नगरी ! मु.वि. झाले कट्टेकरी !!
धन्स
4 Mar 2014 - 9:26 pm | अत्रुप्त आत्मा
@ जे नव्याने कट्ट्याला आलेले आहेत त्यांची ओळख तरी द्या.>>>
डाविकडूनः-शशिकांत ओक,चिमी,सौ,किसनदेव,मकिताई,मागे किस्ना,शेजारी पिंगू,मधे मी,माझ्या जवळ विजुभाऊ,प्रशांत,त्याच्या मागे सौंदाळा,हिरवा-नादखुळा,मागे पेठकरकाका,त्यापुढे धन्या,नंतर त्याचा भाचा आणि चिं.शंभर..आणि त्यांच्या खोबणीत फक्त ५०,धन्याच्या नागे-प्रसाद अपटे,माझिही शँम्पेन,सूड,वल्ली,लीलाधर,प्रसाद गोडबोले...
4 Mar 2014 - 10:30 pm | शिद
छान ओळख परेड करुन दिलीत...धन्यवाद...!!!
4 Mar 2014 - 11:14 pm | आनन्दिता
गुरुजी फोटो पहाताना सुद्धा तुमच्या जागी अचानक एखादी स्माईली चमकुन जाईल की काय असा वाटतेय... =))
4 Mar 2014 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा
@एखादी स्माईली चमकुन जाईल की काय असा वाटतेय>>>
...........
5 Mar 2014 - 12:17 am | खटपट्या
आवो सायेब, ते स्मायल्यांचे ट्रेड शिक्रेट सांगाच आता. (कुठून काढता येवढ्या इसमायल्या ?)
4 Mar 2014 - 8:39 pm | विनोद१८
...अ.आ. ..छान वृत्तांत लिहीलाय, कट्ट्याला येउ न शकल्यामुळे खन्त वाटली.
विनोद१८
4 Mar 2014 - 10:49 pm | संजय क्षीरसागर
एकदम दिलखुष! आणि तुमचं हे टायटल स्पेशल छब्बीस देखिल खुमासदार.
15 Mar 2014 - 6:55 am | drsunilahirrao
मस्त, मस्त!
16 Mar 2014 - 3:01 am | प्रभाकर पेठकर
खरं पाहता घारापूरी लेण्या पाहण्यासाठी हा भरभक्कम स्वदेह दुबळ्या गुडघ्यांच्या आधाराने एवढ्याssssssssss पायर्यांवरून लेण्यांच्या पायावर घालावा लागेल ह्याची पुसटशी कल्पना जरी असती तर....... पण एवढे आमचे सौभाग्य कुठले? तिथे पोहोचल्यावरच जाणवले की आपल्या संकोची मनाने परतीचे दोर केंव्हाच कापून टाकले आहेत. एका दमात घारापूरीला हा पाणीपूरी आकाराचा देह पोहोचविणे शक्य नाही, आपले पितळ उघडे पडणार ह्या चिंतेने ग्रासलेले असतानाच कोणीतरी चहाची हाक दिली आणि मी ती संधी सोडली नाही. चांगले वीसेक मिनिटे विश्रांती मिळाली आणि नव्या दमाने, जुन्याच गुडघ्यांनी घारापूरी सर केली.
माहीतीपूर्ण सहल झाली. पण दुर्दैवाने स्मृती शक्ती क्षीण असल्याने (हल्ली जरा जास्तच क्षीण झाली आहे) वल्लींनी मनोभावे सांगितलेली सर्व मौल्यवान माहिती अगदी चित्तभावे ऐकली पण तिथेच घारापूरीतच प्रश्नपत्रिका सोडवायला आली असती तर किमान गुणांसाठीही कॉपी करण्यापलीकडे मला पर्याय नव्हता.
२६,२७,२८,२९,१ आणि २ पैकी एक दिवस पुण्यात आणि/किंवा एक दिवस मुंबईत कट्टा आयोजन करण्याचा विचार आहे. लवकरच तारीख ठरवितो.
16 Mar 2014 - 1:56 pm | यशोधरा
पुण्याच्या कट्ट्याची वाट बघत आहे.
16 Mar 2014 - 1:40 pm | पोटे
तिथे खाली हॉटेलात बिअर मिळते. ती प्यायली नाही का?
14 Jan 2015 - 3:11 pm | विजुभाऊ
पोटे ; पेठकरकाका आणि मी दोघानी तो मोका साधला