'क्वीन' : कंगनाच्या सहज-सुंदर अभिनयातून साकारलेली स्त्री-मुक्तीची अनोखी कथा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
12 Mar 2014 - 11:23 am

.
'क्वीन' हा कंगना रनावतचा नवीन सिनेमा. याचे कथानक काय आहे,त्याला किती स्टार मिळालेत, अन्य अभिनेते कोण कोण आहेत, संगीत कुणाचे, वगैरे काहीही माहिती नसताना निव्वळ त्यात 'कंगना आहे' म्हणून हा सिनेमा बघितला, आणि अगदी कृतकृत्य झालो.

अगदी सुरुवातीलाच खास पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी, नृत्य वगैरे बघून पुढे हे असलेच 'हम आपके' बघावे लागणार की काय, असे वाटून जरा धास्तावलो,पण तेवढ्यात 'रानी' (कंगना) शी ठरलेले लग्न विजय मोडतो, आणि रानी स्वतःला खोलीत कोंडून घेते, आणि त्या विवाह-सोहळ्यातून आपली सुटका होते.

दुसर्‍या दिवशी रानी खोलीतून बाहेर निघते, आणि सुरवंटाने स्वतःभोवती विणलेल्या कोशातून बाहेर पडलेल्या फुलपाखराची फडफड, त्याचे आकाशात विहरण्याचे स्वप्न आणि त्यासाठी केलेली धडपड, असे वेगळेच वळण ही कथा घेते.
विजय आणि रानी लग्नानंतर हनिमूनसाठी पॅरिसला जाणार असतात. लग्न मोडले, तरी रानी एकटीच पॅरिसला जाते. आयफेल टॉवर बघण्याचे तिचे स्वप्न, पण प्रत्यक्षात मात्र तोच आयफेल टॉवर तिच्या उरात धडकी भरवतो.
पॅरिसमधे 'विजयलक्ष्मी' शी झालेली तिची मैत्री, तिच्याबरोबर केलेली भटकंती आणि नृत्याची धमाल, पर्स-चोराशी झटापट, अश्या प्रसंगातून रानी चे एक वेगळेच रूप साकार होऊ लागते.
. ..
.

पुढे ती अ‍ॅमस्टरडॅमला जाते, तेंव्हा तिथे तिला नाईलाजाने एक आफ्रिकन, दुसरा रशियन आणि तिसरा जपानी, अश्या तरुणांबरोबर एकाच खोलीत रहावे लागते. त्यांच्याशी दोस्ती झाल्यावर अ‍ॅमस्टरडॅममधील गंमती, आणि भटकंती.
.

पुढे विजयलक्ष्मीने दिलेले सामान पोचवायला म्हणून त्यांचे रेड लाईट एरियात जाणे, तिथला पोल डान्स, निरागस गंमतीदार खरेदी, तिला भारतीय खाद्यपदार्थ करून दाखवण्याचे मिळालेले आव्हान, अश्या अनेक मजेदार प्रसंगातून सिनेमाची कथा वेगाने पुढे सरकत जाते. अधून मधून फ्लॅशबॅक तंत्रातून चपखलपणे दाखवलेल्या प्रसंगांतून एकीकडे 'विजय' ची खास पुरुष-वर्चस्वाची मानसिकता, तर इकडल्या विजयलक्ष्मी आणि रेड लाईट एरियात काम करणार्‍या उन्मुक्त, तरीपण कुटुंबासाठी झटणार्‍या तरुणींचे विश्व तिच्यासमोर स्पष्ट होत जाते.

तिच्या शोधात अ‍ॅमस्टरडॅमला आलेल्या विजयशी तिची भेट होते, त्यातून पुढे काय होते हे, आणि विशेषतः कंगनाचा सहज-सुंदर, सशक्त-सक्षम अभिनय, वेगळीच पटकथा, चपखल संवाद, पॅरिस आणि अ‍ॅमस्टरडॅममधील उत्फुल्ल जीवन दर्शवणारे नानाविध प्रसंग, तसेच कथेच्या ओघात पूर्ण सिनेभाभर अधून मधून येणारे छोटे-छोटे खुमासदार प्रसंग, या सर्वांसाठी हा सिनेमा एकदातरी अवश्य बघावा.

संस्कृतीकलानृत्यसंगीतविनोदसमाजमौजमजाचित्रपटछायाचित्रणप्रकटनआस्वादसमीक्षाबातमीअनुभवमतशिफारसमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

12 Mar 2014 - 11:27 am | प्रमोद देर्देकर

मला त आत्तापर्यंत कंगना बद्दल जेवढे ऐकायला मिळाले त्या वरुन तिचे सगळे चित्रपट बघावेसे वाटतात पण सवड मिळत नाही. ती खुप चांगली कलाकार आहे.

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 11:30 am | आत्मशून्य

तीचे चित्रपट तसे टिपिकल नसतात.

आत्मशून्य's picture

12 Mar 2014 - 11:28 am | आत्मशून्य

हम्म.

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 12:03 pm | चलत मुसाफिर

'क्वीन'बद्दल सर्व समीक्षक इतके भरभरून लिहीत आहेत, की हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता अपार वाढली आहे. लवकरच योग येईल अशी आशा करतो.

बर्‍याच जणांकडून स्तुती ऐकली आहे. नक्की बघेन!

विकास's picture

12 Mar 2014 - 6:50 pm | विकास

असेच म्हणतो!

( ऋषिकेशच्या प्रतिसादाखाली "असेच म्हणतो" असे म्हणायची वेळ कायम येत नसल्याने ही संधी सोडत नाही! ;) )

सुहास झेले's picture

12 Mar 2014 - 12:38 pm | सुहास झेले

नक्की बघणार.... खूप चांगले रिव्यू आलेत :)

सुहास झेले's picture

14 Mar 2014 - 1:44 pm | सुहास झेले

काल बघितला... निव्वळ अप्रतिम. उगाच काही बडेजावपणा नाही. गाणीसुद्धा श्रवणीय. कंगनाच्या फिल्मी करिअरला जबरदस्त वळण मिळणार ह्या सिनेमानंतर. आवर्जून बघा आणि थेटरात बघा :)

एकदा तरी बघावा असा नक्कीच आहे, पण बरेच प्रश्न शेवट येईपर्यंत अनुत्तरित राहतात. तिने शेवटी तरी थोडा कणखरपणा दाखवावा असं सारखं वाटत होतं. आपल्याला धुडकावून लावणार्‍याशी इतकं गोडगोड कसं बोलू शकतं कोण!!

स्पंदना's picture

14 Mar 2014 - 1:12 pm | स्पंदना

कारण नाऊ इट डज नॉट मॅटर!!
राग येतो तो अपेक्षा असली तर. नसेलच अपेक्षा तर कसला राग?

>>राग येतो तो अपेक्षा असली तर. नसेलच अपेक्षा तर कसला राग?

हा विचार केलाच नाही राव!! मी बहुतेक तो प्रसंग कशाशी तरी कम्पेअर करुन घोळ घातला. उत्तरासाठी धन्यवाद. :)

मंदार दिलीप जोशी's picture

12 Mar 2014 - 5:03 pm | मंदार दिलीप जोशी

बघायला हवा

मुक्त विहारि's picture

12 Mar 2014 - 6:22 pm | मुक्त विहारि

असेल तर.....

पैसे देवून अजिबात बघणार नाही.....

चित्रगुप्त's picture

12 Mar 2014 - 8:36 pm | चित्रगुप्त

पैसे देवून अजिबात बघणार नाही.....

पैसे देवून बघण्यासारखे जे थोडेसेच सिनेमे असतात, त्यापैकी हा नक्कीच आहे. पैसे वाया जाणार नाहीत.

आत्मशून्य's picture

13 Mar 2014 - 12:03 am | आत्मशून्य

अहो, प्रत्येक सुंदर गोष्ट विकत, थोडीच घ्यावी लागते.

मुव्ही जालावर आला की बघीन. मलाही कंगना आवडते.

याच परिक्षणाची वाट पहात होते.. खुप उत्सुकता आहे चित्रपटाबद्दल..

कानडाऊ योगेशु's picture

12 Mar 2014 - 7:05 pm | कानडाऊ योगेशु

एकूण इंग्लिश विंग्लिश धाटणीचा चित्रपट वाटतोय.सवड मिळताच पाहणेत येईल.

नाही. मेलोड्रामा वगैरे काहीही नाही. ओव्हरअ‍ॅक्टींग तर अजिबात नाही.

वरील गोष्टी इंग्लिश विंग्लिश मध्ये आहेत असं म्हणणं असेल तर तीव्र असहमती.

स्पंदना's picture

14 Mar 2014 - 1:35 pm | स्पंदना

शीरीदेवी म्हणजेच ओव्हरअ‍ॅक्टींग. असा निदान माझा स्वतःचा अनुभव आहे.

बॅटमॅन's picture

18 Mar 2014 - 12:42 am | बॅटमॅन

असेल, तसंही असेल. इंग्लिश विंग्लिश मध्ये तसं दिसत नाही असं मत आहे. असो.

आत्मशून्य's picture

15 Mar 2014 - 5:19 am | आत्मशून्य

इंग्लिश विंग्लिश मध्ये आहेत असं म्हणणं असेल
तर तीव्र असहमती.

अतिशय सहमत. चांगल्या कथेच कसे मातेर करावं याचा उत्तम नमूना म्हणजे इम्ग्लिश विन्ग्लिश. ते सुधा एका मराठी व स्त्रीने दिग्दर्शित केलेला बघून एक मिपाकर म्हनूण महा शरम वाटली :(

अत्रुप्त आत्मा's picture

12 Mar 2014 - 7:20 pm | अत्रुप्त आत्मा

बहुतेक उद्याच बघेन!

विवेकपटाईत's picture

12 Mar 2014 - 7:27 pm | विवेकपटाईत

बघण्याचा विचार करतो आहे.

चित्रगुप्त's picture

12 Mar 2014 - 8:51 pm | चित्रगुप्त

या चित्रपटावरील लोकसत्तातील दोन लेख:
http://www.loksatta.com/manoranja-news/hindi-movie-queen-400043/
http://globalmarathi.com/OpenPage.aspx?URL=http://www.loksatta.com/manor...

स्पंदना's picture

14 Mar 2014 - 1:18 pm | स्पंदना

एका साध्या प्रोटेक्टीव्ह घरातुन आलेली अन उध्वस्त झाल्यासारखी वाटणारी मुलगी. जी समोर आलेल्या आव्हांनांनमुले बदलत जाते अस काहीस चित्रण आहे. यात कोठेही फिरुन्न्कोणाला जिंकण्याचा अट्टाहास नाही. फक्त समोर ठरवलेली वाट हरवल्याने गोंधळुन जाऊन त्याच वाटेचा अट्टाहास धरलेली एक व्यक्तीरेखा कंगनाने अतिशय सुरेखरित्या उभी केली आहे. स्वतःच काहीही मत नसलेली एक मुलगी, तिचं ते हास्य, निरागस चेहरा.
खुप दिवसांनी काहीतरी साधंसुधं सुरेख पाहिलं.

तुमचा अभिषेक's picture

16 Mar 2014 - 1:12 am | तुमचा अभिषेक

परवाच बायकोने हा चित्रपट चांगला आहे बघूया का असा विषय काढला तेव्हा हम्म बघू (म्हणजे ठरवू) असे म्हणालो, आणि आता हे परीक्षण आणि खालचे पेड नसलेले ओरिजिनल प्रतिसाद. लागलीच माहेरी असलेल्या तिला फोन लावला आणि ऑनलाईन बूकींग चेक केले. अगदी हाऊसफुल्ल असा नाहीये, करंट बूकींग मध्येही जमेल आरामात, तर लेट टू लेट पुढच्या विकांताबद्दल जमवू नक्कीच..
बाकी आवडो न आवडो, या परीक्षणाबद्दल धन्यवाद :)

पाषाणभेद's picture

16 Mar 2014 - 5:06 am | पाषाणभेद

छान परिक्षण

भडकमकर मास्तर's picture

17 Mar 2014 - 6:47 pm | भडकमकर मास्तर

आवडला... उत्तम सिनेमा आहे.. थेटरात जाऊन पहावा...

ओक्के, मग थेट्रात जाऊन बघते. ती मजा वेगळीच!
अवांतर: हसी तो फसी बघते बघते म्हणत अजून र्‍हायलाय.

स्पंदना's picture

19 Mar 2014 - 4:50 am | स्पंदना

हंसी तो फंसी च टायटल फसलंय. ओक्के ओक्के!!

'क्वीन' आवडला. त्याबद्दल बरेच बोलुन झाले आहे त्यामुळे अधिक लिहित नाही फक्त कंगनाच्या अभिनयापेक्षा संवादलेखनाने जिंकले आहे असे वाटले. पटकथेवर यथाप्रथा अधिक काम करायला हवेच होते. दुसर्‍या भागात कास्टिंगही सुधारता आले असते. तरी चित्रपटाची कथावस्तु व फ्रेश कल्पनाच इतकी रोचक आहे की अभिनयादी अंगांतील किंचित कमतरता झाकली जाते. संगीत पीसेसमध्ये चांगले, तरी चित्रपट एकुणात स्मरणीय झाला आहे. नक्की बघा.