सोनाक्षी म्हणे मिपाकरां - महाकट्टा त्वरें करा - नाचू टरारा टरारा... अत्यानंदे .

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
3 Mar 2014 - 6:14 pm

समस्त मिपाकर हो, सज्ज व्हा ‘पेन्थिसीलिया’ सोनाक्षी सह आपल्या ‘महाकट्टया’ साठी. हा महाकट्टा लवकरच होऊ घातला आहे, तोही खुद्द सोनाक्षीच्या संगनमताने. सल्लूच्या खर्चाने. हे कसे बुवा? तर त्याचीच ही कहाणी :

बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून आम्ही अक्षरश: भारून गेलो, आणि आमच्या मन:चक्षु समोर सोनाक्षीबाला आणि तिचे पेन्थेसिलिआच्या वेषातील रुपडे साकार झाले.

मग काय, लगेचच आम्ही तिला फोनून ही कल्पना सांगितली.

आधी तर “वैसे आयडीया तो ठीक लग रहा है, लेकिन पापा को पूछना पडेगा” वैग्रे जरा ओढेवेढे घेऊ लागली, पण “हमारे फ़ेमस मिपाकर इरसाल भाई डिरेक्ट करेंगे, बॅटमॅन भाय रिसर्च करेंगे, अपुन कॉस्चुम डिझाईन करेंगे और लिरिक्स लिखेंगे ” … असे, बॉलीवुडकरांना फक्त बंबैय्या हिंदीच कळते, असे समजून आम्ही म्हटल्याबरोबर चक्क मराठीत “अय्या खरंच, (‘अय्या’ हा आता लुप्त झालेला शब्द चक्क सोनाक्षीच्या तोंडून ऐकून आम्ही अगदी सद्गदित जाहलो) मी तर फॅन आहे तुम्हा सर्वांची, मी नक्की हा रोल करेन, पापाकोभी मना लूंगी. फायनान्स की चिंता मत करना, अब जल्दीसे महुरत निकलवा लो पंडितजी से, मै आजही सल्लुकोभी बताती हूं ” ... अशी एकदम हातघाईवरच आली.
... मला आश्चर्यच वाटले हे ऐकून, तेवढ्यात तिनं खुलासा केला, की ती रोजच्या शूटींग नंतर गरमागरम मिसळपाव खात खात मिपा वाचते, त्यामुळे तिला मिपाबद्दल सर्व माहिती आहे. “उद्या सकाळीच येतो आम्ही तुमच्या घरी, सगळी चर्चा करु ...”
मग दुसर्‍याच दिवशी सोनाक्षीबाला आली. सल्लूपण “ईस्पाईडरमैन ईस्पाईडरमैन, तूने चुराया मेरे दिल का चैन , ओ ओ … असे गुणगुणत हजर झाला. अकिलिस आणि पेन्थिसीलियाची ष्टोरी ऐकवता ऐकवता आम्ही ल्यापटॉप वर खटाटोप करून पिच्चर मध्ये त्यांचे रूप कसे दिसेल, हेही त्यांना दाखवले.

आपले रूपडे बघून सोनाक्षिने कहर लाजत “इश्श…” म्हणून दाद दिली. सल्लूही जाम खुष झाला, आणि “अरे पीछे वो मिपा पर पैजारसाब ने “ईस्पाईडरमैन’ का गाना दिखाया था, वैसा गाना जरूर होना मंगता है “ अशी त्याने फर्माईश केली.

मग बरीच चर्चा झाल्यावर पिच्चरची रूपरेषा ठरली, ती अशी:

आधी ‘पेन्थेसिलिआ की जवानी’ असा पिच्चर करायचा, मग त्याचे सिक्वेल म्हणून आणखी दोन पिच्चर, 'पेन्थेसिलिआ का इन्तकाम’ आणि ‘महासती पंथशीला’ असे करायचे. पहिला भाग प्रणय-रोमान्स वाला, दुसरा युद्धाचा, आणि तिसरा अध्यात्मिकतेने भरपूर, असा.

भाग १: ‘पेन्थेसिलिआ की जवानी’

या भागात सुरुवातीला पेन्थेसिलिआ एका महाकाय राक्षसी अस्वलाशी झुंज देउन त्याला बंदी बनवून आणते, असा साहसी प्रसंग दाखवायचा, मग तिचे उन्मुक्त जीवन, तिचे सनी लिओनि, मल्लिका, राखी वगैरेंसह आयटम बोंब डान्स दाखवायचे.
.

.
मग वंशसातत्यासाठी त्यांची टोळी पुरुषांशी संबंध ठेवायला बाहेर पडते, तेंव्हा सगळ्याजणी जलक्रीडा करत असता तिची अकिलिसशी झालेली अवचित भेट आणि प्रणय प्रसंग, अफलातून गाणी, जंगलातून पळापळी- झोंबाझोंबी, नृत्यांची धमाल, वगैरे वगैरे दाखवायचे.

.
पेन्थेसिलिआ - अकिलिस प्रथम भेट - चित्रकार: John William Waterhouse (1849-1917)

आता सल्लूला हवे असलेले गाणे:
अकिलीस अकिलीस … तूने चुराई मेरे दिल कि पीस …
देख के तेरे करतब यारा , दिल चाहे तुझे करू मै किस … हो हो ...

,
अकिलीस अकिलीस … तूने चुराई मेरे दिल कि पीस …
चित्रकार: John William Waterhouse (1849-1917)

शेवटी अकिलिस:

“जनम जनम वादा निभाऊंगा, तेरा साथ कभी ना छोडूंगा …
वादा मेरा करारा …
टरारा टरारा …
टरारा टरारा …
करुंगा तेरे घोडी को, खरारा खरारा …
टरारा टरारा …
टरारा टरारा … ”

असे गाणे म्हणत धमाल नाचतो, आणि हा भाग संपतो. या गाण्याची आयडीया सल्लूला इतकी आवडली, कि तो लगेच “टरारा टरारा” म्हणत नाचूच लागला.
.........

भाग २: ‘‘पेन्थेसिलिआ का इन्तकाम:

यात सुरुवातीला हरणाची शिकार करायला गेलेली असता पेन्थेसिलिआने फेकलेला भाला चुकीने तिच्या हिप्पोलाईट नामक बहिणीला लागून ती जागीच खतम झाल्याने ‘पेन्थेसिलिआ अगदी उदास होते, त्यातच “जनम जनम वादा निभाऊंगा” वगैरे वचन दिलेले असूनही एकदा दोघे नौकाविहार करत असता अचानक अकिलिस बेदर्दी बालमा बनून युद्धासाठी निघून जातो. पेन्थेसिलिआ अगदी दु:खी होते.

.
चित्रकार: John William Waterhouse (1849-1917)

आणि भग्न दिलाने रानावनात, समुद्राकाठी, वाळवंटात, बर्फाळ प्रदेशात अनवाणी गाणे म्हणत भटकते…

“… बेवफा बालम… सूना ये आलम… नही कटे सनम…
तेरेबिन ये दिन … तेरेबिन ये रात… कब होंगे फिर साथ…
आजा बालम…. बेवफा सनम…
.

... आणि शेवटी संतापाने अकिलिसने दिलेली माळ तोडून फेकत “बेवफा अकिलिस, मै तेरा इन्तकाम लूंगी” असा डायलाक मारते, तोच इंटरव्हल होतो.

त्यानंतर तुंबळ युद्ध, खणाखणी, आकाशातून उड्डाण करत एकमेकांवर केलेले वार वगैरे कत्तलखाना सीन दाखवायचे.

.

शेवटी अकिलिसचा भाला लागून पेन्थेसिलिआ पडते, अकिलिस तिचे शिरस्त्राण काढून बघतो, तेंव्हा त्याला ती पेन्थेसिलिआ असल्याचे समजते.

,
हे बघून अकिलीस दु:खाने अगदी व्याकुळ होतो, आणि:

“ ये मैने क्या किया…
अपनी मुहोब्बत का कत्ल किया…
अब डूबी मेरी जीवन नैय्या….
चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ”
चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ”

हे गाणे म्हणत खड्डा खणून तिचे कलेवर त्यात ठेऊन अकिलीस निघून जातो. प्रेक्षकांना दुरून भगवी वस्त्रे ल्यालेला एक भिक्षु येताना दिसतो, आणि हा भाग संपतो.

भाग ३: ‘महासती पंथशीला’

या भागात सुरुवातीला तो भिक्षु मृतवत पेन्थेसिलिआला जिवंत करतो, आणि दीक्षा देतो. पुढे ती ‘महासती पंथशीला’ म्हणून प्रसिद्ध होते, प्रवचने देत फिरू लागते.
.

तिकडे अकिलीस एका भयंकर सर्प-राक्षसाशी लढून त्याला ठार मारतो, आणि त्याने बंदी बनवलेल्या एका शापित देवतेची सुटका करतो.

.

देवता त्याचे आभार मानून त्याला सांगते, की पेन्थेसिलिआ अजून जिवंत असून योग्य वेळ आली, की तुझी-तिची भेट होइल. हे ऐकून अकिलीस तिच्या शोधात रानोमाळ दर-दर भटकतो. शेवटी एक दिवस उघडावाघडा, भूका-प्यासा अकिलिस पंथशीलेला दिसतो. ती त्याला ओळखते, पण तो तिला ओळखत नाही.

.
पंथशीला त्याला आश्रय आणि दीक्षा देते, आता तो ‘स्वामी अखिल-ईश’ होतो. एके रात्री तो झोपलेला असताना पंथशीला त्याच्याजवळ येते, आणि तिची कामना जागी होते. मागे ‘जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये” हे जुने हेमंत कुमारचे गाणे वाजते, परंतु ती स्वत:ला सावरुन परत जाते, तरीही तिच्या डोळ्यासमोर जुने प्रणय- प्रसंग येतच रहातात. तिकडे अकिलिसच्या स्वप्नात एक इच्छाधारी नागीन येउन सती पंथशीला हीच पेन्थेसिलिआ असल्याचे सांगते.

.
इच्छाधारी नागीन

मग तो पंथशीलाकडे जाउन बरेच डायलाक मारतो, पण ती आपल्या अध्यात्माच्या पंथापासून ढळत नाही. शेवटी जमिनीत पुरून ठेवलेली आपली तलवार काढून अकिलिस सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर जात जात दिसेनासा होतो.

.

बघता बघता एका महासिनेमाची आयडीया पक्की झाली, हे बघून सोनाक्षी भयंकर खुष झाली, आणि “अभी कॉफी बनाकर लाती हूं” असे म्हणत आत पळाली. कॉफी बनवताना तिला चक्क मराठी काव्य स्फ़ुरले:

सोनाक्षि म्हणे सल्लूला
तू अकिलीस, मी पंथशीला
त्रिभागे वर्णू लीला
प्रणय-युद्ध-शांतीची.

सोनाक्षी मिपाची अनन्य भक्त असल्याने (तिने आपला आयडी उघड करण्याचे मात्र खट्याळपणाने टाळले) तिने या महासिनेमाबद्दल अन्य सर्व निर्णय मिपाकरांवरच सोपवले आहेत.

तर लागा हो कामाला सर्व मिपाकर्स. आपला पहिला-वहिला सुपरहिट सिनेमा काढायला इरसाल साहेबांना सर्वजण मदत करुया.
डायरेक्टर इरसाल साहेब, रिसर्चर बॅटमॅन, हे तर ठरलेच. वर उल्लेखिलेली गाणी आम्ही लिहूच, अन्य गाणी मिपाकरांनी लिहावीत. शिवाय सकरीपट रैटर कोण ? मूजिक कुणाचे ? कोरियोग्राफर महागुरू कोणता गाठायचा ? फ़ाइट्ट माष्टर कोण ? आयटम सोंगं कुणाकुणाची असावीत? युद्धाचे वेळचे “अकिलीस, मै तेरा खून पी जौंगी” वगैरे डायलाग कोण लिहिणार ? असे सर्व प्रश्न तातडीने मिपाकरांना सोडवायचे आहेत. याखेरीज आणखी काय काय कल्पना सुचतील, त्या सर्व लिहा. त्वरा करा.

आणि मंडळी, कट्टयासाठी सज्ज रहा. जय हो.

संस्कृतीविनोदमौजमजाप्रकटनबातमी

प्रतिक्रिया

जेपी's picture

3 Mar 2014 - 6:20 pm | जेपी

मी पयला

बॅटमॅन's picture

3 Mar 2014 - 6:24 pm | बॅटमॅन

काय ती चित्रे, अन काय ते ड्वायलॉक, अन काय ती कल्पनाशक्ती. यावनी कथेला पार म्हाराष्ट्रात आणून सोडलेत बगा.
धन्य आहे चित्रगुप्तजी तुमच्या प्रतिभेची!!!!!!!!!

टरारा खरारा काय, छैय्या नैय्या काय अन पंथशीला काय, खतरनाक हसतो आहे =))

ट्रोजनकथेतून असले भारी रत्न बाहेर पडेल याची कल्पना असती तर अजून दहा उपाख्याने इन्क्लूड केली असती ;) =))

एक कडक सॅल्यूट _/\_

प्रचेतस's picture

3 Mar 2014 - 6:27 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

तर अजून दहा उपाख्याने इन्क्लूड केली असती

आयला मग करा की....

होवु दे शब्दांचा खर्च....

बॅटमॅन's picture

4 Mar 2014 - 1:01 am | बॅटमॅन

करणार करणार...या आठवड्यात ट्रोजन सेरीजमधील नवा लेख येणार.

आधी ‘पेन्थेसिलिआ की जवानी’ असा पिच्चर करायचा, मग त्याचे सिक्वेल म्हणून आणखी दोन पिच्चर, 'पेन्थेसिलिआ का इन्तकाम’ आणि ‘महासती पंथशीला’ असे करायचे. पहिला भाग प्रणय-रोमान्स वाला, दुसरा युद्धाचा, आणि तिसरा अध्यात्मिकतेने भरपूर, असा.

तीनही पिच्चरसाठी आमच्या आगाऊ शुभेच्छा...!!! :)

बाकी लेख मस्तचं.

मुक्त विहारि's picture

3 Mar 2014 - 7:48 pm | मुक्त विहारि

आवडला....

आत्मशून्य's picture

3 Mar 2014 - 7:53 pm | आत्मशून्य

पण लावनिला काय स्कोप हाय का ? नाय ?

शशिकांत ओक's picture

3 Mar 2014 - 7:57 pm | शशिकांत ओक

कॉमेडियन के रोल में कौन?
महाभारताचा पार फालुदा करून करून आता चित्तरगुप्ताला ग्रीक पुराणात घुसले... कुंभारणीच्या सेक्सी वेषात मासोळी सोनाक्षी सिन्हाला नाचवायला, झटपट कपडे काढू सल्लू नावाचा दबंगीलाल भेटतो ... दोघेही झटापटीत पटाईत... मडक्यांच्या विखुरलेल्या खापऱ्या... जणू दारासिंह व मुमु ची आठवण यावी. असा रोम रोम में बसने वाला रोमांस... .
"ए दिले नादान..." दिलरुबा खाजवत खाजवत गाणे गातेय ...
... लाईट, साऊंड, रेड्डी? व्हेयरीज् कॉमेडियन
यार... कपिल शर्माको बुलाओ... फोकट में मार्केटिंग भी कराएगा!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2014 - 8:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

चित्रगुप्तांच्या कल्पनेचा वारू उधळला म्हणजे तो युनिकॉर्न होऊन आकाशात उडायला लागतो... मग आमाला मज्जा मज्जा वाचायला मिळते... आता इतर मिपाकरांच्या धमाल कल्पनाविलासाच्या प्रतिक्षेत आहे +D

चौकटराजा's picture

4 Mar 2014 - 9:02 am | चौकटराजा

आम्चा एक मित्र फटू ग्राफर होता. त्याची बहीण अनिल कपूर कडे घरकाम करायला होती. चित्रसुष्टीत आर्ट डिपार्टमेंट मधे आमच्या मित्राचा लग्गा लागावा असा लकडा आमच्या मित्राच्या बहिणीने अनिल कपूर कडे लावला होता त्याप्रमाणे आमचा मित्र मुंबापुरीत दाखल झाला होता ( येथपर्यंत सत्यकथन) . आता कल्पना विस्तार------ एकदा हा माझा मित्र मला घेउन अनिल कपूर याचे घरी गेला. आन्या बाहेर शुटींगला गेलेला होता. सोनाक्षी त्यावेळी बारा वर्षांची असावी. ती शाळेतून नुकतीच घरी आलेली दिसत होती. ( युनीफॉर्म होता अंगावर ) . मी भितीवर टांगेलेले ते एक भव्य चित्र पहात होतो. अरे वा पिकासोने काढलेले दिसतेय ! " मी उदगारलो. नाही नाही हे आपले भारतातले आपल्या मातीतले चित्रकार आहेत. सोनाक्षी चक्क मराठीत बोलली. " काय म्हणतेस ? कोणी काढलंय ?" " कोणीतरी शरद म्हणून आहेत पण चित्राखाली कोपर्‍यात चित्रगुप्त म्हणून सही करतात मी त्यांची आर्डन्ट फॅन आहे ! " सोनाक्षी ने मला सांगितले.
आता तिने मी सर्वांची फॅन आहे असे म्हणून चित्रगुप्त काकांबरोबर इतर लोकांचे नाव का घुसडले असावे याचे संशीधन
ब्याटम्यान करतील. नाहीतर दुसरा एखादा कल्पना विलास मांडू ! हा का ना का !

स्मिता चौगुले's picture

4 Mar 2014 - 10:17 am | स्मिता चौगुले

सोनाक्षी सिन्हा , आनिल कपूरच्या घरी काय करत होती..:)

प्रचेतस's picture

4 Mar 2014 - 5:18 pm | प्रचेतस

सोनम बरोबर गजाल्या करायला गेली असेल.

चौकटराजा's picture

4 Mar 2014 - 5:30 pm | चौकटराजा

लहानपणी सोनाक्षी सिन्हा जत्रेत हरवली ती अनिल कपूरला सापडली. सोनम कपूर नेमकी त्याच जत्रेत हरवली ती शत्रूला
सापडली नावात सोने आहे असे म्हणून त्याने तिला " पाला पोसा बडा किया. शेम गोस्स्ट अन्याची . मग पुन्न्ना जाची त्याची नीट भेट झाली. पण अनिल कपूरच्या घरी वाढलेल्या सोनाक्षी ला चित्रगुप्त यांची फ्यान होण्याचा चानस मिळाला तो मिळालाच !

चित्रगुप्त's picture

4 Mar 2014 - 5:46 pm | चित्रगुप्त

व्वा. पेन्थेसीलियाची पण एकादी 'जुडवा बहन' ट्रॉयच्या जत्रेत हरवली होती, वगैरे कथा चौरा यांनी लिहावी.

चित्रगुप्त's picture

4 Mar 2014 - 3:13 pm | चित्रगुप्त

ही ती सोनाक्षी:
.

(आम्ही तिला जे पेन्थेसीलियाच्या वेषातील तिचे फोटो दाखवले होते, ते संपादकांना अप्रशस्त वाटल्याने काढून टाकले आहेत). तसे ते जालावर आहेत.

पाषाणभेद's picture

5 Mar 2014 - 10:36 pm | पाषाणभेद

पुन्हा चित्रगुप्तांच्या कल्पनाशक्तीचा वारू उधळला.
जालावरच्या लिंका द्या. त्या तर चालतीलच ना.

(मला पहिला!)

यसवायजी's picture

6 Mar 2014 - 12:12 pm | यसवायजी

मला पण

स्मिता चौगुले's picture

4 Mar 2014 - 10:19 am | स्मिता चौगुले

ये मैने क्या किया…
अपनी मुहोब्बत का कत्ल किया…
अब डूबी मेरी जीवन नैय्या….
चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ”
चल छैय्या- छैय्या- छैय्या-छैय्या… ”
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol

स्पा's picture

4 Mar 2014 - 10:22 am | स्पा

घंटा कायच कळला नाय

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Mar 2014 - 5:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

सोनाक्षीकाकु आणि सल्लुकाका मिपा वाचतात हे कळल्या मुळे धन्य झालो.
चित्रे बाकी झकास आहेत.

यसवायजी's picture

5 Mar 2014 - 7:35 am | यसवायजी

_/\_

इरसाल's picture

5 Mar 2014 - 10:33 am | इरसाल

खंग्री, मान गये उस्ताद.

सविता००१'s picture

5 Mar 2014 - 10:43 am | सविता००१

जबराट आहे एकूणच..
_________/\__________

ऋषिकेश's picture

5 Mar 2014 - 11:07 am | ऋषिकेश

__/\__
फक्त नमस्कार! शिसान!

पैसा's picture

5 Mar 2014 - 11:20 am | पैसा

बाकी त्या सोनाक्षीला मिपाकर मृत्युंजयाने दिलेले "स्टोनाक्षी" हे नाव डोक्यात पक्के बसले आहे. त्यात तिचा तो अभिनयविरहित दगडी चेहरा काय विचारता! अहाहा! तिला साधे भांडण करता येते काय? तर पुढे युद्धाच्या कथा!

बाकी तीच पात्रे घेऊन नव्या कथा निर्माण करण्यात तुम्ही प्रवीण आहातच! या कथेतला कल्पनाविलासही आवडला. फक्त ती 'स्टोनाक्षी' ची निवड का केली हे कळले नाही!

चित्रगुप्त's picture

5 Mar 2014 - 3:23 pm | चित्रगुप्त

फक्त ती 'स्टोनाक्षी' ची निवड का केली

...बॅटमॅनच्या या धाग्यात इरसाल यांनी “जर मी ह्यावर पिच्चर काढला तर पेन्थेसिलिआ चे काम फकस्त आनी फकस्त सोनाक्षी सिन्हालाच.” हे वाचून.

पैसा's picture

5 Mar 2014 - 7:38 pm | पैसा

इरसालभौंची आवड हीच आपली निवड! ;)

इरसाल's picture

6 Mar 2014 - 4:11 pm | इरसाल

मारा शिक्का !

मूळ कथा क्लिष्ट आणि नको त्या गोष्टींची वर्णन नको तितक्या बारकाईनं केलेली असल्यानं वाचवल्या नाहीत, पण तुमचा आटोपशीर कल्पनाविलास आवडला.

मला अतिशय तरुण झाल्यासारखे वाटते !

मदनबाण's picture

8 Mar 2014 - 9:46 am | मदनबाण

ह्म्म... मला वाटत आधीच्या धाग्याला पंख फुटले ज्यात मी प्रतिसाद दिला होता !
असो...
गाण्याचा... नाचण्याचा आणि सोनाक्षीचा विचार तेव्हा केला होता. ;) मला मात्र्र ती साडीतच एकदम "मस्त" वाटते. ;)
ज्या गाण्याचा उल्लेख पंख फुटलेल्या धाग्यात करावयाचा राहुन गेला होता तो इथे करतो, आणि ते गाणं सुद्धा इथे देतो.
सनी लिओनि, मल्लिका, राखी हे सगळे फुसके बार आहेत... बॉब्म तर लांबची गोष्ट ! आसिन जबरदस्त दिसते आणि तितकीच मादक नृत्य देखील करु शकते असा माझा दावा आहे...
आता ते गाणं... खरं तर त्याची बी यक इस्टोरी हाय बरं का !
मध्यंतरी हे गाणं मी ऐकल आणि पाहिलं... कारण या गाण्यामुळे माझी झोपमोड झाली ! तर... एके दिवशी मी रात्री मस्त झोपलो होतो अचानक डिजे चा आवाज कानावर पडु लागला, मी जागा होत स्वतःशीच बोललो... अरेच्च्या इतक्यात सकाळ झाली ? उठुन बघतो तर सगळीकडे अंधारच होता ! रस्त्यावरील सोडियम व्हेपरचे दीवे सुद्धा चालु होते,घड्याळ्यात पाहिले तर रात्रीचे बरोबर एक वाजले होते ! मग इतक्या रात्री इतक्या मोठ्या आवाजात डिजे ?पण आपल्या देशातली सध्य परिस्थीती पाहता हे काही अशक्य नाही असं म्हणुन मी डिजेच्या गाण्याकडे माझे कान लावले , तर काही तरी फायर ब्रिगेड, फायर ब्रिगेड असे बोल ऐकु आले ! च्यामारी रात्रीचा १ वाजला आहे आणि या लोकांचे हे फायर ब्रिगेड,फायर ब्रिगेड काय चाललयं ? मग त्याचे संगीत कानावर पडले,म्हंटल गाण्ं जरा ओळखीच आणि ऐकल्या सारखं वाटायला लागलं आहे, मग काय ! झोप दणदणत्या आवाजाने मोडलीच होती, मग संगणकावर बसुन तू-नळीवर हा फायर ब्रीगेडचा बंब नक्की कुठला ? ते शोधले. ;) ते गाणं खाली देतो :-

काही पण म्हणा... आसिन ने एकच ठुमका लावला आहे,पण काय सॉलिड्ड ! ;)
असो... मग ३ वाजे पर्यंत डिजे ने याची अनेक आवर्तने केली,मी ती संपण्याची वाट पाहत होतो... शेवटी ३ वाजता ही फायर ब्रीगेड ची गाडी घरी गेली आणि मी पाठ टेकवली.पण मग कोणीतरी रटाळ गाळं मोठ्या आवाजातल्या रेडियोवर सुरु केलं ती टेप सुद्धा बराच वेळ चालु होती... ते संपलं लगेच एका मंदीरात भजन सुरु झालं... मग काय आमच्या झोपेने एकदाचे राम-कॄष्ण-हरी म्हंटले !
जाउंद्या... तुम्ही ते वरच आयटम साँग बघा ! आणि बलमा बलमा चित्कारा ! ;)

चित्रगुप्त's picture

8 Mar 2014 - 10:22 am | चित्रगुप्त

@मदनबाणः बघितला व्हिडो. तुम्ही उल्लेखिलेला लेख कोणता?

या व्हिडोत आसिन अतिशय सुंदर दिसते आहे, यात वादच नाही, पण नाचणारीण कुणी दुसरीच बया आहे ना?

पिच्चरत्रयी बद्दल हा जो लेख लिहिला आहे, तो एका अर्थी सल्लू आणि त्याच्या पिच्चरांची रेवडी उडवण्यासाठीही आहे. फालतू कथानक, थर्डक्लास गाणी, बेकार डान्स वगैरे सलमानचित्रपटांना शोभेशी ही चित्रपट त्रयी. म्हणून त्यात सनी, मल्लिका राखी वगैरे, आणि 'ईस्पायडरमैन' वर बेतलेले गाणे. नको तिथे "चल छैय्या छैय्या छैय्या छैय्या" आणि अर्थशून्य "टरारा टरारा" ... सर्व बी ग्रेड पिच्चरांना शोभेसे.

साडीत सोनक्षी अप्रतिम सुंदर दिसते, पण (काढून टाकलेल्या) पेन्थेसिलियाच्या वेषातील चित्रांमधे पण ती शोभते.
ही चित्रे जालावरून बघण्याची सोय लवकरच करतो.
.

तुम्ही उल्लेखिलेला लेख कोणता?
ज्यात काढुन टाकलेला फोटो होता,आणि त्याच धाग्यात माझा प्रतिसाद देखील होता... असो.

पण नाचणारीण कुणी दुसरीच बया आहे ना?
हो... ती पोलंड ची Claudia Ciesla आहे { हे तिचे पहिलेच आयटम साँग आहे.}, तीने इतका नाच करुन देखील आसिनचा एक ठुमकाच भारी पडला आहे,आणि तेच मला दर्शवायचे होते. ;)

पिच्चरत्रयी बद्दल हा जो लेख लिहिला आहे, तो एका अर्थी सल्लू आणि त्याच्या पिच्चरांची रेवडी उडवण्यासाठीही आहे. फालतू कथानक, थर्डक्लास गाणी, बेकार डान्स वगैरे सलमानचित्रपटांना शोभेशी ही चित्रपट त्रयी. म्हणून त्यात सनी, मल्लिका राखी वगैरे, आणि 'ईस्पायडरमैन' वर बेतलेले गाणे. नको तिथे "चल छैय्या छैय्या छैय्या छैय्या" आणि अर्थशून्य "टरारा टरारा" ... सर्व बी ग्रेड पिच्चरांना शोभेसे.
ओक्के.

बाकी साडीतली "मस्त" सोनाक्षी... ;)
Sonakshi

आत्मशून्य's picture

8 Mar 2014 - 11:06 pm | आत्मशून्य

आसिनचे गजनीमधले हे गाणं लै आवडायचं श्रीदेवी नंतर अतिशय बोलके डोळे अस्लेल्या अभिनेत्री दोनच १ आसिन २ जेनेलिआ . पण हे फक्त डॉळ्यांबाबतच हां... अभिनय वगैरे नाही विचार करत. तरीही त्यात आसिन उजवीच. दशावतार आसिनसाठीच पाहिला होता :)

रमताराम's picture

8 Mar 2014 - 7:34 pm | रमताराम

काय अब्यास, काय अब्यास. _/\_

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2014 - 10:34 pm | नगरीनिरंजन

लईई भारी!

तिमा's picture

1 Jan 2015 - 7:39 pm | तिमा

इतका भारी लेख नजरेतून सुटलाच कसा म्हणे! त्यांवेळेस म्या शीक पडलो असणार!

मागे ‘जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये” हे जुने हेमंत कुमारचे गाणे वाजते,

त्यापेक्षा, पदमिनीचे 'मेरे अंग लग जा बालमा' हे पावसात भिजताना चे गाणे फिट्ट बसेल.

विवेकपटाईत's picture

4 Jan 2015 - 9:27 am | विवेकपटाईत

लेख आणि प्रतिसाद दोन्ही वाचताना मजा आली. काका, लेख मी पाव वर पाहिजेत.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jan 2015 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा

@‘महासती पंथशीला’ >>> =)))))

चित्रगुप्त's picture

2 Apr 2023 - 7:37 am | चित्रगुप्त

आपण असा काही लेख २०१४ साली लिहीला होता, हे मी पार विसरून गेलेलो होतो. काल नवीनच ओळख झालेल्या तरूण जोडप्यापैकी 'ती' मिरजेची असून आपल्या बॅटमनपंतांना ओळखते वगैरे बोलणे झाल्यावर खोदकाम करताना हा लेख सापडला. नवीन मिपाकरांसाठी वर आणतो आहे.

कंजूस's picture

2 Apr 2023 - 6:09 pm | कंजूस

असो.