.
( चाल: पाऊले चालती पंढरीची वाट -)
लाटणे सोबती सोडीना ती पाठ
मनी संसाराची सोडावी का वाट ... | धृ |
भांडूनिया सारी चाळ ओरड्याने
जमता रिकाम्या घरी शुकशुकाट ... लाटणे
खाष्ट दुष्ट सारे नातेवाईक ते
साधुनिया संधी, न बसती मुकाट ... लाटणे
चुकविता प्रहार मी लाटण्याचा
कसा त्या बयेचा वाढे थयथयाट ... लाटणे
मनी खंत धरता नसे तडजोड
झेला भांडीफेक एका पाठोपाठ ... लाटणे
.
प्रतिक्रिया
11 May 2014 - 12:55 am | आयुर्हित
एक किस्सा आठवला:
एका न्यायालयात नवरा बायकोच्या घटस्पोटाची केस दाखल झाली.
न्यायाधीश आरोपीला विचारतात: काय हो,किती वर्षे झाली लग्नाला?
आरोपी: २५ वर्षे झालीत.
न्यायाधीश: ती स्वयंपाक करून तुम्हाला खावू पिवू घालते ना?
आरोपी: होय
न्यायाधीश: मानसिक रोगी आहे का आपली बायको?
आरोपी: नाही.
न्यायाधीश: मग काय हो, घटस्पोट का हवाय?
आरोपी: माझी बायको मला घरातील भांडी फेकून मारते.
न्यायाधीश: केव्हापासून?
आरोपी: लग्न झाल्या दिवसापासून.
न्यायाधीश: मग तेव्हा का नाही मागितला घटस्फोट?
आरोपी: नाही, तसे मी प्रत्येक वेळेला तिने फेकलेली भांडी चुकवायचो की!
न्यायाधीश: मग आत्ता एवढ्या २५ वर्षांनी का मागताय घटस्फोट?
आरोपी: खरे म्हणजे आता तिचा नेम पक्का झालाय!
11 May 2014 - 1:44 pm | पैसा
भारी विडंबने लिहिताय!
11 May 2014 - 6:09 pm | वेल्लाभट
सहीआहे....
13 May 2014 - 12:59 pm | विदेश
आयुर्हित, पैसा, वेल्लाभट
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार !