काटा हालेना, काटा चालेना
मित्रांनो!! तुमच्या सगळ्या शिव्या-शाप मंजुर पण माझ्या ह्या पापात जरा सहकार्य करा.
लवकरच आमच्या माजी विद्यार्थ्यांचा योगा कॅम्प होऊ घातलाय. कॅम्प उत्तर काही मनोरंजन कार्यक्रम आहेत त्यात मला 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे विडंबन सादर करायचं आहे.… काही यमक चालीत बसत नाहीयेत… वेळ कमी आहे म्हणून मिपादारी गाऱ्हाणं घालायला आलोय. कृपया मदत करावी.
काटा हालेना, काटा चालेना,
आम्ही खंत करी, काही केल्या खाली सरकेना.
पाहिल्या शिल्पाच्या सिडी,
म्हंटली तिजसवें गाणी,
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे.