मित्रांनो!! तुमच्या सगळ्या शिव्या-शाप मंजुर पण माझ्या ह्या पापात जरा सहकार्य करा.
लवकरच आमच्या माजी विद्यार्थ्यांचा योगा कॅम्प होऊ घातलाय. कॅम्प उत्तर काही मनोरंजन कार्यक्रम आहेत त्यात मला 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे विडंबन सादर करायचं आहे.… काही यमक चालीत बसत नाहीयेत… वेळ कमी आहे म्हणून मिपादारी गाऱ्हाणं घालायला आलोय. कृपया मदत करावी.
काटा हालेना, काटा चालेना,
आम्ही खंत करी, काही केल्या खाली सरकेना.
पाहिल्या शिल्पाच्या सिडी,
म्हंटली तिजसवें गाणी,
आम्ही गळ्यांत गळे मिळवून रे.
गेलो प्रत्येक जिमच्या दारी,
हर्ष दरवळला मनी,
घामासवें गळाले अवसान रे.
चल ये रे, ये रे गड्या,
धावू जरा मारू बैठक्या,
पाया गोळे येवूनि, झालो हैराण रे,
हे पोटाचे अंगण,
आम्हां दिले आहे आंदण,
उणे करू आपण सारेजण रे.
योग करण्याचे किडे,
ह्यांची धाव आरोग्याकडे,
आपण करू फक्त पेयपान रे.
काटा हालेना, काटा चालेना
आम्ही खंत करी, काही केल्या खाली सरकेना
प्रतिक्रिया
10 Feb 2016 - 9:13 am | एस
काटा हालेना, काटा डुलेना
आम्ही खंत करी वजन कमी होईना
10 Feb 2016 - 9:30 am | बाजीप्रभू
परफेक्ट… नोंद घेतलीय.
10 Feb 2016 - 9:15 am | एस
हे पोटाचे अंगण ऐवजी हा पोटाचा रांजण करा.
10 Feb 2016 - 9:24 am | पैसा
=)) =)) ठार!
10 Feb 2016 - 9:30 am | बाजीप्रभू
परफेक्ट… नोंद घेतलीय.
10 Feb 2016 - 6:12 pm | विजय पुरोहित
एससाहेब अप्रतिम विडंबन कराल...
मनावर घ्याच...
10 Feb 2016 - 9:25 am | पैसा
जोर लगाके हैशा!!
10 Feb 2016 - 10:28 am | बाजीप्रभू
पाहिल्या शिल्पाच्या सिडी,
कुंथली तिजसवे बॉडी,
आम्ही डोळ्यांत डोळे मिळवून रे.
10 Feb 2016 - 6:07 pm | एस
कुंथलीऐवजी तिंबली करा.
10 Feb 2016 - 7:52 pm | बाजीप्रभू
मंजूर
10 Feb 2016 - 10:49 am | खेडूत
आम्हां खंत वाटे वेट कमी होईना!
11 Feb 2016 - 3:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
काटा हालेना, काटा डुले ना,
किती डायेट केले तरी चरबी हटेना,
ॠतुजाचे डाएटचे सल्ले,
शिप्लाचे योगाचे हल्ले
दमलो अस्था चॅनेल पाहुनी रे
झिजली जिमचीही पायरी,
ट्रेनर घाबरला मनी,
शेवटी त्याचे, गळाले अवसान रे.
चल ये रे, ये रे गड्या,
धावू थोडे मारु उड्या,
वजन माझे घटेल झर् झर रे आSSSS
हे पोटाचे रांजण,
मागे लोंबकाळणारे XXX,
( पर्याय :- आम्हाला दिले आहे आंदण)
कमी करू आपण, आकारमान रे.
व्यायाम करण्याचे किडे,
रोजच उपास घडे,
करुन पाहिले, फक्त पेयपान रे.
वजना मुळे एके दिनी,
काटा मोडुन गेला झणी
सोडुया नको तरी, आपण जिद्द रे आSSSS
काटा हालेना, काटा डुले ना,
किती डायेट केले तरी चरबी हटेना,
पैजारबुवा,
11 Feb 2016 - 3:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
ॠतुजाचे डाएटचे सल्ले,
शिप्लाचे योगाचे हल्ले
दमलो अस्था चॅनेल पाहुनी रे
ऐवजी
ॠतुजाचे डाएटचे सल्ले,
शिल्पा चे योगाचे हल्ले
दमलो अस्था चॅनेल पाहुनी रे
असे वाचावे
पैजारबुवा,
18 Feb 2016 - 12:05 pm | बाजीप्रभू
एकदम मस्त… तुम्ही तर पूर्ण नक्षाच बदलात... आवडलं आपल्याला… अशीच प्रेसेंट करणार. तुमच्या नवा सकट