आमची प्रेरणा : ही भयभीषण कविता
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
विसर षंढ-गंध आता , जाळुनीया राख कर
वेड होते त्या मिपाला, मांडिशी तू भोंडला
वेड 'तात्या'ला तुझे जो, कायमीचा झोपला
यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर..
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे
चिंधड्या तव "कव्वितेच्या" फ़ाडती शेंबडी मुले
ना कुणी तुज तारीफेला , तू अपेक्षा लाख कर!!
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
कोण झोपे, काय झाले, ना इथे पडले कुणा
"भीक नाही , काव्य आवर" बाकी कुणी काही म्हणा
"जळ्ळीं मेली लक्षणे ती, हे रसीका तूच मर!"
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
दोष कोणा काय देऊ, आदिती तू सांग ना
र ला र नि ट ला ट गं , हा तुझा ठरला गुन्हा
काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
घेउनी मग दीर्घ पेंगा, घेतील कुठली गोळीही
शमवुनि कंडा जरा देतील त्यावर जांभई
वेदना अन घोरण्याची, मोज लांबी कानभर!
कुंथताति अक्षरे गे आदिती तू बास कर
कवी : श्रीयुत ले.की. बोले
प्रतिक्रिया
18 Aug 2011 - 1:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या पाशवीपणाची दखल घेण्याबद्दल मी श्रीयुत ले. की. बोले यांची फार्फार आभारी आहे.
आडात नसले तरी पोहोर्यात आले आहे ... हलकटपण
कविता आहे म्हणून आदिती म्हणण्याबद्दल क्षमा केली आहे.
18 Aug 2011 - 3:02 am | राजेश घासकडवी
एवढे सगळे विषय निवडूनही 'विडंबनाचं विडंबन' हा विषय मिळाला नाही! अभिजात काव्याला, त्यातल्या तरल संकल्पनांना असं शब्दांमध्ये पकडणं कठीण असतं. पण पुन्हा विषयोंका इल्जाम का द्यावा म्हणतो मी?
कविता आवडली. आदिती यांनी खेळकरपणेच घेतली आहे हे बघून बरं वाटलं.
18 Aug 2011 - 6:58 am | शहराजाद
हे तर खासच.
जाता जाता,
लेखक, कीस्कू बरं बोले?
18 Aug 2011 - 10:41 am | श्रावण मोडक
हाहाहाहा... हे 'लेकी बोले' आहे होय! बरं. :)
18 Aug 2011 - 4:50 pm | सुवर्णमयी
विडंबनाचा विजय असो.. आवडले.
मी आज मिपावर कविता लिहावी असे ठरवत होते.. घाबरून बेत रद्द करते आहे.
विडंबन नको रे बाबा... (नेमकी सून कोण ? तापलेल्या विडंबनाच्या तव्यावर उगाच कविता ठेवणे म्हणजे..)
18 Aug 2011 - 5:34 pm | श्रावण मोडक
छ्या... तुम्हाला सगळं उलगडूनच सांगायचं का? हे पहा -
दोष कोणा काय देऊ, सुवर्णमयी तू सांग ना
र ला र नि ट ला ट, हा तुझा गं ठरला गुन्हा
काव्य ना उरला खकाणा, हेच आता मान्य कर
कुंथताति अक्षरे गे सुवर्णमयी तू बास कर
;)
थोडा बदल केला आहे. सांभाळून घ्या. वृत्त, मात्रा चुकलं असावंच. :)
18 Aug 2011 - 5:37 pm | बिपिन कार्यकर्ते
हे ही लेकी बोलेच का?
18 Aug 2011 - 7:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
असं कसं, असं कसं? विडंबन आलं म्हणजे कविता प्रसिद्ध झाली. काय आजकालच्या कवी लोकांना एवढी शिंपल गोष्ट समजत नाही.
18 Aug 2011 - 1:38 pm | बिपिन कार्यकर्ते
श्री. मु. क्त. सुनीत यांनी श्री. ले. की. बोले यांची ही नितांत सुंदर कविता येथे देऊन आम्हा रसिकांवर खूपच मोठे उपकार केले आहेत. त्यांनी केलेल्या या साहित्यसेवेबद्दल आम्ही कातड्याचे जोडे करून त्यांना देण्याच्या विचारात आहोत पण जन्मजात कातडीबचाऊ धोरण अंगवळणी पडले असल्याने असले काही प्रत्यक्षात करण्याच्या भानगडीत पडलो नाही. असो.
आता तरी आदिती यांनी "भीक नको, काव्य आवर" (हे अर्थ आवर सारखे काही नसावे अशी अपेक्षा) या ओळी मनावर घ्याव्यात अशी मी समस्त वाकडेवाडी बु|| सर्वकला रसिक मंडळाच्या वतीने त्यांना नम्र विनंती करतो.
जय हींद जय म्हाराट्र!
18 Aug 2011 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा
ये लगा नेहेले पे देहेला.... :wink:
18 Aug 2011 - 2:58 pm | प्रियाली
हे कडवे इथे तय्यार आहे हे वाचलेच नव्हते. ;)
18 Aug 2011 - 3:47 pm | गणपा
हा हा हा..
हे जब्रा आहे.
चला या निमित्ते मुसुरावांना लिहिणास उद्युक्त केल्या बद्दल आदितीचे पण आभार :)
18 Aug 2011 - 4:17 pm | विजुभाऊ
गण्पाशी सहमत आदितीचे अभार
18 Aug 2011 - 4:30 pm | सहज
(थंड झाले खाकरे गं)
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Thu, 18/08/2011 - 01:53
(आमची बी एक )
Submitted by मुक्तसुनीत on Thu, 18/08/2011 - 01:55
ह्या वर्षीच्या जागतीक मराठी मॅगी नूडल काव्यपुरस्कारासाठी नाव सुचवतो!! :P
18 Aug 2011 - 8:56 pm | श्रावण मोडक
व्यनिमनीच्या गोष्टी? ;)
18 Aug 2011 - 7:52 pm | यकु
01:53
01:55
विडंबनाचा वेग सहजरावांमुळे लक्षात आला. विडंबकांना
_____/\०_
_____/\०_
_____/\०_
_____/\०_
अवांतरः कावळे उडाले स्वामी चे
मावळे बुडाले कामी विडंबन आले होते..
त्याचे
सोवळे उडाले मामी असे विडंबन करणार होतो.. पण हात आखडता घेतला कारण विडंबनाचा पुन्हा एखादा चौकार उडाला असता.
18 Aug 2011 - 10:59 pm | अत्रुप्त आत्मा
हात सैल सोडा...आणी लवकर लीहा...आमच्या मनात आता उत्कंठा लागून राहिलीये...कसली कडक सिक्सर पडलीये पहिल्याच वाक्यात...ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:
18 Aug 2011 - 8:49 pm | पैसा
:D
19 Aug 2011 - 12:23 am | पिवळा डांबिस
मनोरंजक कविता!
(अर्थात 'मोकलाया दाही दिशा' या कवितेखालोखाल!! तशी कविता शतका-शतकातून एकदाच होते!!!:))
परंतु 'भाडखाऊ' वगैरे लडिवाळ लेणी वापरता न येणं हे श्री. ले. की. बोले (च्यायचं प्रतिगामी मेणबत्तीजाळू मध्यमवर्गीय!!!!:() यांचं अपयश!!
पुशिशु!! (पुढील शिव्यांसाठी शुभेच्छा!!)
:)