स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य रचना आणि अंदमान येथे लिहिलेल्या उर्दू गजलांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर की अमर रचनाएं - हम ही हमारे वाली है या ध्वनीफीतीचे प्रोमो नुकतेच ऐकले/ पाहिले. अमिताभ बच्चन यांच्या घनगंभीर आवाजातील निवेदन या ध्वनीफीतीला लाभलं आहे. जसपिंदर नरूला, सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, स्वराधीश बलवल्ली, शंकर महादेवन, जावेद अली, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, शान आणि साधना सरगम अशा गुणी गायकांच्या आवाजात या रचनांचा आस्वाद घेता येईल.
