तुम्हाला कोणत्या (प्रमाणेतर) मराठी बोलीभाषा येतात अथवा परिचय आहे? सोबत बोलीभाषांमधील शब्दार्थ चर्चा

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
15 Jun 2014 - 6:01 pm

मोकळेपणाने सांगावयाचे झाल्यास मला स्वतःला एकही बोलीभाषा येत नाही. परंतु मराठी विकिपीडियाच्या मराठी विक्शनरी या (ऑनलाईन शब्दकोश) बन्धू प्रकल्पासाठी

१) मराठीच्या बोलीभाषांमध्ये असलेल्या पण प्रमाण मराठीत न वापरल्या जाणार्‍या शब्दार्थांची नोंद घेणे.
२) एखाद्या (कोणत्याही) शब्दास प्रमाण मराठीत वापरात नसलेला पण बोलीभाषेत असलेल्या समानार्थी शब्दांची नोंद घेणे

* किमान शब्दार्थ तर नोंदवावेतच पण शक्यतोवर वाक्यात उपयोगाची उदाहरणे आणि जाणकार असल्यास व्याकरण विषयक अधीक माहितीही आवर्जून नमुद करावी.

* हे या धाग्याचा मुख्य उद्देश आहेत. धागा महाराष्ट्र आणि बृहनमहाराष्ट्रातील सर्व बोलीभाषा आणि तदनुषंगिक भाषा विषयक चर्चेसाठी आहे. तेव्हा एखाद्या बोलीभाषेचे नाव यादीत नसलेतरीही चर्चा करता येऊ शकेल तसेच यादीत जोडण्यासाठीही आपण सुचवू शकता.

*मालवणी, बेळगावी, चित्पावनी, कदोडी / सामवेदी, झाडीबोली, नागपूरी, अहिराणी, तावडी, चंदगडी, वऱ्हाडी, देहवाली, कोल्हापुरी, कोकणी, आगरी, तंजावर, जुदाव, लेवा, मराठवाडी, गोंडी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, कैकाडी, वाडवळ / वडवली/ळी, डांगी, गोरमाठी, मोरस मराठी

**यादीत नसलेली या बोली भाषांची नावे मिळाली काणकोणी, नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड,पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडीया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, 'आरे मराठी', जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, ढोरकोळी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी यातील नावे यादीत जोडावी वाटल्यास प्रतिसादात नोंदवावे. (बोलीभाषांची नावे बोलीभाषा या नात्याने आंतरजालावरील जाणत्यांच्या नोंदीतून घेतली आहेत. काही ठिकाणी अपरिहार्यतेने जातींची/समाजांची नावे दिसत असलीतरी येथील उल्लेख केवळ भाषिक उद्देशाने आहेत जातीय उद्देशाने नाहीत.)

*धाग्याचा मुख्य उद्देश विकिप्रकल्पासाठी असल्यामुळे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त समजले जातील.

* एक पेक्षा अधिक बोलीभाषा येत असल्यास आपणास ज्या बोलीची माहिती अधिक आहे ती नोंदवावी

* सूची:मराठी बोलीभाषांमधील शब्द अद्याप स्वतंत्र सूची तयार न झालेल्या बोलींकरताची सामायीक सूची.

* सूची:कोल्हापूरी_बोली

* सूची:कोकणी भाषा

* सूची:चित्पावनी बोलीभाषा

* सूची:कादोडी बोली/ सामवेदी बोली

* सूची:वाघ्ररी बोलीभाषा/वाघरी

* सूची:कोलामी बोलीभाषा

*एथनालॉग कोड कोकणी [knn], वर्‍हाडी-नागपुरी [vah], गौळण [goj] सामवेदी [smv] अहिराणी [ahr], Bhalay [bhx], Far Western Muria [fmu], गोवळी [gok], Indo-Portuguese [idb], कतकरी [kfu], खानदेशी [khn], कोरकु [kfq], Korlai Creole Portuguese [vkp], Lambadi [lmn], Mawchi [mke], Nihali [nll], Noiri [noi], Northern Gondi [gno], Northwestern Kolami [kfb], Palya Bareli [bpx], Pardhan [pch], Pauri Bareli [bfb], Powari [pwr], Rathwi Bareli [bgd], Seraiki [skr], Tulu [tcy], Vaagri Booli [vaa], Varli [vav], Vasavi [vas], Waddar [wbq].


देवीचे खुळ : " बोल, वळेखन माऊली की जय....

माऊली मातानू वट्यापर पुजा करवा लाग्या होता...

देस्तान मारा माऊली मातान खंदुर लागव करी मनक्या,

ये मारा माऊली ना शरण व देवो दयाळी मारा व बाई ...

इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोली त बोलो बोल मारा भाई....

तारु नाम लवू मारा आई..तारा गायन करु मारा आई..

येलकाऱ्‍या मान मनक्या होतो, खुराळ्याना घरमा पावन होती आई..

खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई..

ये लागो लिला मारा व आई.2 तारा नाम लवू मारा देवी व.... आई बुन्ना बेका होता आई....

आई देस्ताना दोन पातर कऱ्‍या होत्या, पण इंद्रसभा बेखी होती

जण बहा पण देस्ताना भक्ती चली होती ये देस्ताना हुंमडा पडलाग्या आई...

न्हाना मोठानू देस्तान थायो मारा आई व थायो लीला मारी व आई.......

बोल वळेखन माऊली की जय.....

*सौजन्य: मराठी विकिपीडिया

**हे टाकणकार समाजातील देवीचे खुळ आहे, वाघ्ररी या मराठीच्या बोली भाषेतील हे लोककाव्य सतिश मालवे या मराठी विकिपीडिया सदस्याने मराठी विकिपीडियावर आणले होते.

**या काव्याचा मराठी विकिप्रकल्पांकरता अनुवाद करून मिळाल्यास हवा आहे. ह्या धाग्यावरील लोकभाषा/बोलीभाषा विषयक प्रतिसाद आणि अनुवाद प्रताधिकार मुक्त होत आहेत असे गृहीत धरले जाईल. प्रतिसादांसाठी धन्यवाद

अद्भुतरससंस्कृतीसंगीतधर्मकविताभाषा

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

16 Jun 2014 - 10:38 pm | कवितानागेश

अर्थ कळत नाहीये हो.

माहितगार's picture

17 Jun 2014 - 9:08 am | माहितगार

होय अर्थ नीटसा लागत नाहीए. खास करून देस्तान, खंदुर, मनक्या, येलकाऱ्‍या, बुन्ना, बेका, दोन पातर कऱ्‍या, बेखी, हुंमडा, थायो या शब्दांचे अर्थ कुणाला माहित असल्यास द्यावेत. इंद्रसभा शब्दाचा या गीतातील नेमका संदर्भ काय असेल असाही प्रश्न पडला.
* इंद्रसभा करी मारा आई व...2 ये बोली त बोलो बोल मारा भाई.... (संदर्भ लक्षात आला नाही )

ज्या शब्दांचे अर्थ लागतात असे वाटते ते असे अर्थात सुधारणा सुचवल्यास अर्थ लागण्यास सोपे जाईल.
*वट्यापर = ओट्यावर का वडाच्याच्या पारावर ?
*करवा लाग्या = करू लागलो ?
*मातानू, मातान = मातेच्या
* मारा = माझी आमची
* तारु तारा= तुझे तुमचे
* ये मारा माऊली = हे माझी माऊली
* ना शरण = च्या शरणात
* दयाळी = दयाळू
* न्हाना = लहान
* थायो = थोर ?

कुणाला माहिती असेल अथवा अर्थ लागत असेल तर माहिती द्यावी. मला वाटते टाकणकार समाजातील नवीन पिढी इंटरनेट फ्रेंडली आहे त्यांच्या पैकी कुणाचे केव्हातरी लक्ष जाईल आणि माहिती देतील.

देस्तान म्हणजे बहुधा कुलदेवता/कुल दैवत असावे ? खुऱ्‍याळ हे पण कुल देवतेचे नाव असावे. पण "खुराळ्यानी इंद्रसभा भरी होती या खुराळ्याना घरमा खेलती आई.." हि ओळ अद्याप नेमकी समजली नाही.

माहितगार's picture

17 Jun 2014 - 9:50 am | माहितगार

"व " हा शब्द, महाराष्ट्रात स्त्रीयांना संबोधीत करताना वापरल्या जाणार्‍या 'ग' या मराठीतील शब्दा प्रमाणे असावा अशी शक्यता वाटते जसे आईग, ताईग.

(चुभूदेघे)

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jun 2014 - 10:27 am | llपुण्याचे पेशवेll

चांगले काम केलेत टाकलेत ते. कोणी या समाजातील अथवा ही बोली जाणणारा भेटला तर त्याला वाचून अर्थांतर करून दे म्हणून सांगिन.

माहितगार's picture

21 Feb 2016 - 11:17 am | माहितगार

धागा जरासा अद्ययावत करुन वर काढत आहे.

स्वामी संकेतानंद's picture

21 Feb 2016 - 4:17 pm | स्वामी संकेतानंद

मला या यादीपैकी झाडीबोली, नागपुरी आणि पोवारी ह्या बोली येतात. पण पोवारी ही मराठीची बोली नसून हिंदी गटातली स्वतंत्र बोलीभाषा आहे. तसेच छत्तीसगढी ही सुद्धा हिंदी गटातली आहे. भिलीबद्दल मला फारशी माहिती नसली तरी ती पण मराठीची बोली असेल असे वाटत नाही. माडिया ही गोंडीची बोली, द्रवीड भाषागटातली. हलबी पण बहुतेक द्रविड गटात येते.निमाडीही हिंदी गटातली बोली. असो, श्री. माहीतगार ह्यांना नेमकी कोणत्या बाबतीत मदत हवी आहे ते अजून लक्षात आलेले नाही. महाराष्ट्रात बोलल्य जाणार्‍या फक्त मराठीच्या बोली की महाराष्ट्रातील कोणत्याही भाषेच्या बोलींची माहिती हवी आहे?

माहितगार's picture

21 Feb 2016 - 5:03 pm | माहितगार

व्यक्तिशः महाराष्ट्र+बृहन्महाराष्ट्रात (सद्य अथवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलल्या जाणार्‍या सर्वच बोलींना (मग मूळ भाषागट कोणतेही असूदेत) मी मराठी म्हणतो. - (संक्षेपात माझी ही व्याख्या भाषाशास्त्रीय नाही, प्रमाणमराठीच्या माझ्या व्याख्येसाठी वेगळा धागा केव्हातरी काढेन)- आणि अधिकाधीक बोलीभाषेतील शब्द माझ्या माझ्या व्याख्येतील (प्रमाण)मराठीत उपलब्ध असावेत आणि मराठी विक्शनरी या आंतरजालीय विकि-शब्दकोशातून उपलब्ध होऊ शकल्यास पहावे असा (माझा) हेतु आहे. अर्थात बोली म्ह़णून स्वतंत्र ओळख पुसणे असा उद्देश नसल्यामुळे महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोलींच्या शब्द-सूची मराठी विक्शनरीत उपलब्ध असल्यास त्यांच्या शब्द संग्रहाच्या मराठीतील अधिक वापरास साहाय्यभूत होऊ शकेल.

मराठी विक्शनरी हा प्रकल्प शब्दार्थ, शब्दसूची, शब्द व्याकरण आणि अजून गोष्टींसाठी मराठी भाषेस प्रभावीपणे उपयूक्त ठरणारा असु शकेल असे वाटते. त्यात शब्दांचे परस्पर लेखन योगदान केले तर दुशात साखर, केवळ इथेच माहिती मिळाली तर दुध मिळाल्याचा आनंद (साखर आम्ही घालुन घेऊ :) )

माहितगार's picture

21 Feb 2016 - 5:09 pm | माहितगार

बेसिकली विक्शनरी प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वांनाच उअयूक्त ठरावा म्हणून व्याख्या अधिकाधिक व्यापक-सर्वसमावेशक आणि प्रसंगी लवचिक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे एखादी बोली बोलणारा मुलगा/गी प्रमाणमराठी अभ्यासत अथवा संवादात वापरत असेल तर एकमेकांचा शब्द व्यवहार एकमेकांना वापरणे सोपे जावे. मराठी विक्शनरीत शब्दाचे भाषाशस्त्र नमुद करता येईल नाही असे नाही परंतु विक्शनरी प्रकलाचा उद्देश व्यापक असला म्हणजे माणसासाठी भाषा असे होईल आणि भाषेसाठी माणूस असे कमी होईल.

स्वामी संकेतानंद's picture

21 Feb 2016 - 5:16 pm | स्वामी संकेतानंद

बृहन्महाराष्ट्रातील(सद्य किंवा मूळच्या) महाराष्ट्रीयनांकडून बोलली जाणारी बोली, कोणत्याही भाषागटातील>> हे जरा प्रॉब्लमॅटिक आहे. समजा मूळ महाराष्ट्रीयन पण आता ओडिशात स्थायिक झाल्याने ओडियाच किंवा ओडियाची एखादी बोली बोलणारा एखादा समूह असेल तर?
मला वाटते मराठी शब्दांचा संग्रह करायला मराठी बोलींपुरते मर्यादित असावे. किंवा महाराष्ट्रातील बोलींच्या शब्दांचा संग्रह करताना महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित रहावे. म्हणजे दोन्ही उद्देश साध्य होतात. उदाहरणार्थ, तंजाउर मराठी बोलींचे शब्द टाकले तर बृहन्महाराष्ट्र पण येतो, मात्र 'मराठी' या वर्गीकरणाखाली. माडीयातील शब्द मात्र 'मराठी' खाली न टाकता, 'महाराष्ट्रातील बोली' या गटात टाकावे. अशाने गोंधळ उडणार नाही. माडियाला मराठीत ढकलणे फार विचित्र होईल. हे शब्द मराठीत वापरले जावे हा उद्देश स्त्युत्य आहे, पण वर्गीकरण करताना मात्र भाषाशास्त्राच्या नियमांनुसारच झाले तर उत्तम!

यशोधरा's picture

21 Feb 2016 - 4:29 pm | यशोधरा

व्हेर इज द सूची धागा फॉर मालवणी भाषा? मालवणी अ‍ॅंड कोकणी डिफरट भाषाज यू क्नो!

स्वामी संकेतानंद's picture

21 Feb 2016 - 4:31 pm | स्वामी संकेतानंद

यु मस्ट प्रोवाइड एटलिस्ट २० युनिक वर्ड्स ऑफ मालवणि फॉर्‍ द्याट, यु सी!

यशोधरा's picture

21 Feb 2016 - 4:32 pm | यशोधरा

आय व्हेरी वेल कॅन बरंका.

स्वामी संकेतानंद's picture

21 Feb 2016 - 4:33 pm | स्वामी संकेतानंद

देन डु इट फास्ट हां!

यशोधरा's picture

21 Feb 2016 - 4:35 pm | यशोधरा

कोनला द्यायाचं? तुमाला?

स्वामी संकेतानंद's picture

21 Feb 2016 - 4:39 pm | स्वामी संकेतानंद

नाइ, आमाले नाइ, त्या विकिपेडियाच्या पानावर तुमाले द्या लागन. तेति जाउन मालवनीमंदे एडिट करुनस्यानि २० सब्द टाकून द्या मंग पाय्जान मज्या!

आरे द्येवा, कामालेच लावता न मंग काय.

माहितगार's picture

21 Feb 2016 - 5:17 pm | माहितगार

सूची:मालवणी बोलीभाषा
आधी पासूनच उपलब्ध आहे. (त्यामुळे त्या सूचीत भर घालण्याचे आश्वासन तुम्हाला पाळणे आले :))

सध्या उपलब्ध सर्व पाने (सूची नामविश्व)
या दुव्यावर उपलब्ध आहे. आणि जो पर्यंत उद्देश (बृहनधरून)महाराष्ट्रातील भाषांबद्दल शब्दकोशीय आहेत तो पर्यंत सूची:आणि पानाचे नाव लिहा आणि होजाओ शुरु अवघड क्या है ?

यशोधरा's picture

21 Feb 2016 - 5:19 pm | यशोधरा

ओके. पाहते काय आहे ते.

सतिश गावडे's picture

21 Feb 2016 - 4:31 pm | सतिश गावडे

आमच्या रायगड जिल्ह्याच्या महाड, पोलादपूर, माणगांव, रोहा हे तालुके आणि श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांचा समुद्र किनार्‍यापासून दूर असलेला ग्रामिण भाग इकडे एक बोली भाषा आहे. मला नांव माहिती नाही मात्र सूडच्या म्हणण्यानुसार ही "बाणकोटी" आहे. बाणकोट हे रायगडच्या हद्दीला लागून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील एक गांव आहे. कदाचित रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड, मंडणगड आणि दापोली या तालुक्याच्या ग्रामिण भागामध्ये हीच भाषा बोलली जात असावी.

माहितगार's picture

21 Feb 2016 - 5:31 pm | माहितगार

हम्म त्यांच्याच पुढाकाराने मराठी विकिपीडियावर बाणकोटी बोलीभाषा हा लेख लिहिला गेला आहे. त्यानंतर अजूनही कुणीतरी त्याला वाढवले आहे. अर्थात मराठी विक्शनरीवर वर सुचवल्या प्रमाणे शब्द सूची जोडल्यास अतीउत्तम

सतिश गावडे's picture

21 Feb 2016 - 6:29 pm | सतिश गावडे

ते विकी पान माझ्या वरच्या प्रतिसादाशी बरेचसे मिळते जुळते आहे.

आशी कशी मानसां रं तुमी? जल्ली भाषा बोलतांव नि तिचा नाव म्हायत नाय?

मातृभाषा शब्दशः म्हणले तर माझी कन्नड. पण वापर नाही. मला प. महाराष्ट्रातली मराठी ही बोली भाषा म्हणून येते. मराठवाड्याशी जवळीक असल्याने बीड, नांदेड भागातली मराठी चांगली समजते. सोलापूर सीमाभागात असल्याने तेलुगु व कन्नड अत्यल्प अशी समजते. काही मित्रांमुळे तूळू, गोरमाटी, कैकाडी व सावजी भाषा समजते. बोलता येत नाही. सोलापुरात रायचुर भागाकडचे काही लोक स्थायीक आहेत. त्यांची तेलुगु व थोडी कन्नड अशी भाषा असते ती पण समजते.
आपल्या प्रकल्पात सहभाग नोंदवू शकत नाही पण शुभेच्छा.

माहितगार's picture

21 Feb 2016 - 5:41 pm | माहितगार

कन्नड लिपी आणि भाषेत कम्फर्टेबल आहात ? एक वेगळी मदत मागता आली असती.

गोरमाटी, कैकाडी व सावजी या बोलीच्या शब्दांचा अथवा वाक्यांचा अल्पसा परिचय या धाग्यावर जरी दिला तरी हरकत नाही.

कन्नडबद्दल क्षमस्व. नाही एवढी कम्फर्टेबल.
बाकी नमुने/परिचय देईन या धाग्यावर.

सस्नेह's picture

21 Feb 2016 - 5:16 pm | सस्नेह

त्या कोल्हापुरी सूचिवाल्या लिंकेत 'तेज्यायला' या शब्दाचा 'त्याच्या आईला' असा सात्विक अर्थ वाचून आईशप्पत भडभडून आलं =)

माहितगार's picture

21 Feb 2016 - 5:38 pm | माहितगार

:( काही विपरीत असे घडले आहे का ? विक्शनरीत संबधीत (बोली)भाषेत जे अर्थ जसे आहेत तसे देणे अपेक्षीत आहेत.(शीष्टाचाराचे आणि सभ्यतेचे निकष शब्दकोशात लावणे अभिप्रेत नाही - केवळ वापरणार्‍याला माहित असावे म्हणून एखादा शब्द वापर शीष्ट संमत नसल्याचे नमुद करता येते. त्यामुळे सुयोग्य तो बदल करावा अथवा सुचवावा. अर्थात कुठे साशंकता असल्यास सहसा दुजोरा मिळवण्याचा पयत्न करावा अथवा साशंकता असल्याचे सूचीत - अथवा शब्दार्थ पानावर नमुद करावे.

आवं त्ये तसंच ह्ये 'त्याच्या आईला'......म्होर्लं शब्द ज्यान्ह्या त्यान्हाप्लं अ‍ॅड कराय्चे आस्त्याय मनात्ल्या मनात.
म्हयी आमच्याकं तं कर्तोय ब्वा आम्हि.