प्रतिभावान संगितकार -श्री.आनंद मोडक यांचं निधन...
माझ्यासाठी आनंद मोडक म्हणजे, मुक्ता आणि साजणवेळा .. मुक्ता हा चित्रपट सर्व बाबतीत श्रेष्ठ दर्जाचा होता.आणि त्यातलं आनंद मोडकांचं संगीत म्हणजे,त्या काळातही अत्यंत वेगळ..आणि चालू मराठी चित्रपट संगीतामधे उजवं,असं होतं.मला त्यातल्या गाण्यांची प्रथम ऐकल्यापासून जी भुरळ पडली ती आजही कायम आहे. निसर्गकवी ना.धो.महानोर यांची गीतं जेव्हढी अप्रतिम..तेव्हढच त्यांना मिळालेलं मोडकांचं संगीत श्रेष्ठ, अशी एखाद्या क्षेत्रातली जोडगोळी शोभावी अशी ती कलाकृती होती.
काहिश्या वेगळ्या फरकानी,हाच प्रकार ग्रेस यांच्या साजणवेळां'बद्दलही होता. ग्रेसांच्या एरवी अगम्य वाटणार्याही रचनांचं सार मोडकांच्या संगीतानी कसं सहज सोप झालं होतं.ग्रेसांच्या गीतांचा अर्थ, हा भावनेचा वेध घेऊन मनापर्यंत पोहोचवणारा असा हा किमयागार __/\__ आनंद मोडक..
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर आहेच. पण त्याहुन त्यांच्या अत्यंत साध्या...नम्र..व्यक्तिमत्वाला मनःपूर्वक नमस्कार!
अत्ता १० दिवसापूर्वी त्यांनी फेसबुकावर,वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्या सर्वांचे धन्यवाद दिले,तेंव्हा मनातील बोल प्रकट केले ते असे होते,
============================
मित्रांनो ,
गेली तीनहून अधिक वर्षे फेसबुकवर वावरतोय...पण आजपर्यंत म्हणजे त्यापूर्वीच्या आयुष्यातही कधी माझा वाढदिवस मी जाहीर केला नव्हता ..कित्येकदा तर रेकॉर्डिंगच्या /नाटकाच्या तालामीन्च्या निमित्तानं मुंबईमध्ये असायचो ...त्यामुळे शुभेच्छा पत्रे अगर फोन अगर एसेमेस यांचा वाढ दिवशी अभावच असायचा ..अत्यल्प संखेमध्ये .अगदी जवळचे नातेवाईक आणि सख्खे मित्र यांच्याकडून दाखल घेतली जाई ...गेल्या वर्षी प्रथमच १३ मे या दिवशी एका मित्राने अगदी सक्काळी सक्काळी फेसबुकवर अभिनंदन केले ..पण त्याला विनंती करून मी ते हटवायला सांगितले ...पण या वर्षी अनपेक्षितपणे दैनिक लोकमत मध्ये माझा फोटो आणि वाढदिवसाच्या अभिनन्दनाचा मजकूर प्रसिद्ध झाला आणि मग १३ ,१४, १५ या तारखांना माझा वाढदिवस आहे असे समजून माझ्यावर फोन,sms, आणि FB वर शुभेच्छांचा वर्षाव झाला ...खरं तर प्रसिद्धीउन्मुख अगर त्यासाठी तहानलेल्यांच्या या जगात मी जगावेगळा..थोडा विचित्र आणि लो प्रोफाईल मध्ये खुश असणारा ..अनपेक्षित अशा .या प्रेमळ भडीमाराने क्षणभर सुखावलो खरा पण गुदमरलो ...इतक्या मंडळींना माझ्याबद्दल वाटणा-या कौतुकभरल्या प्रेमाच्या प्रचीतीने चकीत झालो ...हे कधी माझ्या जाणीवेतही नव्हते ...किंबहुना मी स्वस्त:ला कुरूप वेडे पिल्लू समजत आलोय ..त्यामुळे कुणाकडूनही कधी अशा प्रेमाची अपेक्षाच केली नाही ( कारण अपेक्षा ठेवली कि अपेक्षा भंगाचे दु:ख अटळ..हे फार लहानपणी उमगलेले ..).त्यामुळे खरं गांगरून जायला झालं... तेंव्हा या सगळ्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .. ( आणि शक्यतोवर माझी जन्मतारीख येथेच विसरून जा ...ही विनंती ...तुम्हा सर्वांच्या चिरकाल प्रेमाची साक्ष पटलीये ..त्यामुळे दर वर्षी याच्या पुनरावृत्तीची गरजच नसावी ....तुम्हा सर्वांचे पुनश्च हार्दिक आभार आणि अनेकोत्तम शुभेच्छां....
============================
इतका साधा माणूस... तितक्याच साधेपणाने आज अनंताच्या प्रवासाला गेला...मागे त्याचे सर्व सूर ठेऊन!
___/\___
प्रतिक्रिया
23 May 2014 - 4:26 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरेरे, वाईट वाटले बातमी ऐकुन.
एक मनस्वी कलाकार आज आपल्यातून निघुन गेला.
श्रध्दांजली,
23 May 2014 - 4:38 pm | ऋषिकेश
वाईट वाटले
आदरांजली
23 May 2014 - 4:38 pm | प्रसाद प्रसाद
आदरांजली
23 May 2014 - 4:44 pm | अमोल केळकर
श्रध्दांजली !
अमोल केळकर
23 May 2014 - 4:49 pm | जेम्स बॉन्ड ००७
श्रद्धांजली..
23 May 2014 - 4:54 pm | संजय क्षीरसागर
मागच्या फिल्म फेस्टिवलमधे मिळाली होती. एक जिनिअस माणूस गेला.... इट इज सॅड.
23 May 2014 - 5:13 pm | पैसा
श्रद्धांजली. तसे अकाली गेले म्हणायचे.
23 May 2014 - 5:15 pm | आत्मशून्य
:(
23 May 2014 - 5:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
:(
23 May 2014 - 5:23 pm | विकास
भावपूर्ण श्रध्दांजली.
23 May 2014 - 5:30 pm | सस्नेह
भावपूर्ण श्रध्दांजली !
23 May 2014 - 5:30 pm | तिमा
त्यांच्या संगीतामागे विचार होता.
आदरांजली!
23 May 2014 - 6:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
आदरांजली !
23 May 2014 - 6:27 pm | तुषार काळभोर
आवडती गाणी: अलवार तुझी चाहूल (सरकारनामा)
आणि
शब्दाविना ओठांतले (तू तिथं मी)
23 May 2014 - 9:19 pm | शिद
भावपूर्ण श्रध्दांजली.
23 May 2014 - 9:24 pm | मुक्त विहारि
आदरांजली
24 May 2014 - 12:16 pm | प्यारे१
भावपूर्ण आदरांजली.
24 May 2014 - 12:34 pm | सन्दीप
भावपूर्ण आदरांजली.
24 May 2014 - 6:54 pm | मदनबाण
भावपूर्ण श्रध्दांजली...
25 May 2014 - 3:49 pm | आशु जोग
आजचा लोकसत्तामधला
नरेंद्र भिडे यांचा लेखही वाचण्यासारखा आहे
http://www.loksatta.com/vishesh-news/anand-modak-introduced-different-mu...
25 May 2014 - 3:50 pm | आशु जोग
हे मोडक स्वतःसूद्धा फार छान लिहीत असत
25 May 2014 - 4:38 pm | तुमचा अभिषेक
भावपूर्ण श्रध्दांजली !