माहिती हवी आहे - पुण्यात (हडपसर किंवा कोथरुड) छोटेखानी समारंभासाठी हॉल
नमस्कार,
ही माहिती कशी मिळवावी हा विचार करत होतो. सुलेखा.कॉमवर चौकशी टाकून झाली. काही विशेष हाती लागले नाही. आणि अचानक मिपा आठवले. आजकाल काही दुखलं-खुपलं तरी तोंडून 'आई गं' ऐवजी 'मिपा रे!' निघेल की काय असे वाटायला लागले आहे. :-) मिपावर माहिती आणि मदत नक्की मिळते हा अनुभव आहे. अमेरिकावारीच्या वेळी हा अनुभव घेतलाच आहे. मदतीची किंवा माहितीची अगदीच अडनिड 'नीड' असेल तरी मुबलक प्रमाणात हुरूप नक्कीच मिळतो. आणि हुरूप असेल तर ठरवलेले पार पाडणे खूप सोपे होते. :-) म्हणून हा पत्रप्रपंच!
