माहिती

माझे सरकार

आतिवास's picture
आतिवास in काथ्याकूट
30 Jul 2014 - 2:02 pm

नवं सरकार सत्तेवर येतं तेव्हा लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात – मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. लोकांच्या आशा-आकांक्षांशी नाळ जोडलेली असणं हे खरं तर सरकारला लोकाभिमुख कारभारासाठी आवश्यक आहे याबाबत मतभेद असू नयेत. असा प्रयत्न होत असतो; त्याला मर्यादा असतात आणि तरीही काही प्रमाणात त्याचा उपयोगही असतो.

मंत्रचळाच्या मागोव्यावर

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 7:40 pm

हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?

हे ठिकाणसमाजजीवनमानमाहितीविरंगुळा

जीवन विमा/आरोग्य विमा माहिती हवी

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in काथ्याकूट
25 Jul 2014 - 3:29 pm

येथे सध्या विम्यामध्ये होणार्‍या फसवणुकीविषयी चर्चा चालली आहे.
पण विमा म्हणजे केवळ कंपनीचा फायदा/एजंटचा फायदा, असं नाही. तर विचारपुर्वक गरजेनुसार घेतलेला विमा नक्कीच 'आपल्या' फायद्याचा ठरू शकतो.
मला थोडी माहिती: योग्य/अयोग्यः आहे, आणि थोड्या शंकाही आहेत, त्यावर चर्चा व्हावी असे वाटते. सर्वांच्या अनुभवातून (व वादविवादातून ...... ऊप्स! चर्चेतून!! ;) ) हा धागा नक्कीच माहितीपुर्ण होईल.

टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in काथ्याकूट
24 Jul 2014 - 4:11 pm

Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे.
(१) या क्षेत्रातले नोकर्‍यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय.
(२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी?
(३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्‍या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत?
आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk.

इन्सुरन्स विषयी माहिती हवी आहे

jaydip.kulkarni's picture
jaydip.kulkarni in काथ्याकूट
23 Jul 2014 - 9:00 pm

गेले काही दिवस रिलायंस लाइफ इन्सुरन्स चे फोन येत आहेत , त्यांनी एक आकर्षक ऑफर माझ्यासमोर मांडली पण मला त्या विषयी पूर्ण खात्री /विश्वास नव्हता म्हणून इथे सल्ला हवा आहे ..

...........काय बोलू.........

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
21 Jul 2014 - 9:04 pm

भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो.

इंग्रजी ही जागतिक भाषा आहे.
इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही.
आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच.
इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे...

ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण

इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते
खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते.
असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच...

संस्कृतीमाहिती

नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 12:20 pm

नमस्कार,

एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-)

नोकरीसल्लामाहितीचौकशीमदत

मदत हवी आहे. ग्रंथालय अमेरिके मध्ये

सिद्धार्थ ४'s picture
सिद्धार्थ ४ in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 12:39 am

नमस्कार लोकहो. गेली २ वर्ष मी अमेरिके मध्ये राहतो आहे. वाचनाच्या माझा छःअन्द मला स्वस्थ बसू देत नाही आहे. कृपया कोणाला अमेरिके मध्ये कोणी मराठी पुस्तकांचे ग्रंथालय चालवत असेल तर इथे कळवावे. माझे हे मिपा वरील पहिले लिखाण आहे, आणि गेल्या ५ वर्षा पासून मी मिपा चा सभासात आहे. इथले कमेंट्स मला पूर्ण माहिती आहेत तरीही daring करत आहे.

आपला लोभ असावा असे मी बिलकुल म्हणणार नाही कारण मला माहिती आहे के हे माझे लिखाण फाट्यावर मारले जाईल. तरीही प्लीज जमले तर मदत करा.

साहित्यिकमाहिती

ऑनलाईन मराठी कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या योगदानाची माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
6 Jul 2014 - 10:41 am

आंतरजालाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ऑनलाईन मराठी लोकांच्या कट्यांच्या आणि ग्रूप्सच्या मराठी आणि महाराष्ट्रासाठीच्या उल्लेखनीय योगदानाची माहिती हवी.

* कट्टे = यात मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारे कट्टे आले

* ग्रूप = यात जुने याहू ऑर्कूट ग्रूप नवीन काळातील फेसबूक ग्रूप इत्यादी तत्सम ग्रूप आले

* या धाग्यावर प्राप्त ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेली माहिती मराठी विकिपीडियासाठी वापरली जाऊ शकते म्हणून नेहमी प्रमाणे या धाग्यावरील आपले प्रतिसाद प्रताधिकार मुक्त गृहीत धरले जातील.

* दिल्या जाणार्‍या माहितीस इतर सदस्यांचा दुजोरा उपयूक्त ठरणारा असू शकेल.