गेले काही दिवस रिलायंस लाइफ इन्सुरन्स चे फोन येत आहेत , त्यांनी एक आकर्षक ऑफर माझ्यासमोर मांडली पण मला त्या विषयी पूर्ण खात्री /विश्वास नव्हता म्हणून इथे सल्ला हवा आहे ..
तर ऑफर अशी आहे - रिलायंस लाइफ इन्सुरन्स ची एक पौलीसी घ्यायची आणि हि पौलीसी रिलायंस कॅपिटल कडे मोर्गेज करून त्यावर एक ठरावीक रक्कम लोन म्हणून घ्यायची , लोन चा कोणताही हफ्ता भरायची गरज नाही , फक्त दर वर्षी पौलीसी प्रिमियम भरायचा सलग 15 वर्षे , नंतर २० वर्षांनी जेव्हा एक ठराविक रक्कम मिळेल त्यातून मूळ कर्ज तसेच ४.९९ % व्याज दराने व्याज रिलायंस कॅपिटल कापून घेईल व उरलेली रक्कम परत मिळेल ..... ह्या प्रकारची ऑफर कोणाला आली आहे का / ह्याची सत्य असत्यता कशी तपासून बघावी ....
जर ह्यात घोटाळा नसेल तर ४.९९ % व्याज दराने रक्कम उचलून होमे लोन चा भार थोडा हलका करता येईल ह्या विचाराने मी चौकशी करत आहे ...
नोट : माझा सिबिल स्कोर चांगला आहे .....
प्रतिक्रिया
23 Jul 2014 - 9:13 pm | वामन देशमुख
माझा श्रेयअव्हेर करून सल्ला:
कर्ज हवे असेल तर कर्जच घ्या, विमा हवा असेल तर टर्म विमाच घ्या. गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूकच करा.
या सर्वांची सरमिसळ करून नुकसानच होईल/ अपेक्षित फायदा होणार नाही.
24 Jul 2014 - 11:20 am | सुधीर
अगदी बरोबर!
24 Jul 2014 - 1:21 am | आयुर्हित
मला पडणारे प्रश्न (इतर सर्व मिपाकरांनाही हे प्रश्न पडलेच पाहिजेत, असे वाटते)पूढिलप्रमाणे:
अ) रिलायंस लाइफ इन्सुरन्स ची एक पौलीसी घ्यायची: म्हणजे नेमकि कोणती पौलीसी?
१)तिचे नाव काय? २)कोणत्या प्रकारची पौलीसी आहे? युलिप आहे कि एंडॉमेंट आहे? ३)तिचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष चार्जेस किती? ४)तिचे दरमहा प्रिमियम/हफ्ता किती? ५)किती हजाराचा/लाखाचा/करोडचा विमा मिळेल? ६)कोणत्या प्रकारचा विमा असेल तो? अपघाती कि जीवनविमा कि हॉस्पीटलायझेशन कि क्रिटीकल ईलनेस? ७)रिलायंस लाइफच का? ८)इन्सुरन्स पौलीसी हवी तर टर्म प्लान का नको?
ब)एक ठरावीक रक्कम लोन म्हणून घ्यायची: १)म्हणजे नेमकी किती रक्कम? २)लोन व प्रिमियम यांचे गुणोत्तर काय आहे? ३)पॉलिसी घेतल्यापासुन किती वर्षांनी किती रक्कम लोन म्हणुन मिळेल?
क)लोन चा कोणताही हफ्ता भरायची गरज नाही: पण कळला तर पाहिजे ना दरमहा किती हफ्ता बसतो ते?
ड)दर वर्षी पौलीसी प्रिमियम भरायचा सलग 15 वर्षे, नंतर २० वर्षांनी जेव्हा एक ठराविक रक्कम मिळेल: एवढी खात्री आहे जगायची? किंवा फक्त एवढीच खात्री आहे जगायची? त्यानंतर परत दुसरी पौलीसी घेणार का?
ई)४.९९ % व्याज दराने व्याज: १)यात हे व्याज दररोज आहे की दरमहा आहे की दरवर्ष? २)सरळ व्याज आहे की चक्रवाढ व्याज? ३)फ्लॅट अमाऊंटवर आहे की रेड्यूसिंग अमाऊंटवर आहे?
फ)उरलेली रक्कम परत मिळेलः नक्कि का? काय गॅरंटी आहे? नाहितर व्याज देणे बाकी आहे म्हणुन आपल्याकडेच परत मागतील?
ग)आपला सिबिल स्कोर चांगला आहे म्हणुन आपली बँकच डायरेक्ट लोन देईल की! आपली बँकेचे व्याजदर काय आहेत हे सुद्धा तपासुन पहावे.
ह)होमलोन चा भार थोडा हलका करता येईल: माझ्या मते होमलोन हे अगदिच/सर्वात स्वस्तातील लोन असते. त्याहुन महत्त्वाचे म्हणजे त्यावर करसुट ही मिळत असते.
आपल्याला वरिल सर्व माहिती असल्याशिवाय काहीही सुचविता येणार नाही!
मला आशा व खात्री आहे कि आपण स्वतः रिलायंस लाइफ इन्सुरन्सचे मालक/प्रवर्तक/मॅनेजर/सेल्स एजेंट नसाल.
तरी माझा सेल नंबर रिलायंस लाइफ इन्सुरन्स चे फोन करणार्या व्यक्तिला द्यावा, जेणेकरुन वरिल माहिती मी प्रत्यक्ष विचारू शकेल. (माझा सेल नंबर आपणास व्यनी केला आहे.)
धन्यवाद.
24 Jul 2014 - 11:55 am | आनन्दा
इथेच तर खरी गोम आहे - तुम्ही भरलेल्या प्रिमिअम च्या काही टक्के - म्हणजे तुम्ही जी रक्कम अगोदरच भरलेली आहे, त्याच्याच काही टक्के रक्कम हे लोक लोन म्हणून तुम्हाला देणार, आणि हाच त्या फ्रौडचा केंद्रबिण्दू आहे. कारण हीच गोष्ट ते लपवून ठेवतात. एकदा पॉलिसी काढली, की लोन तर गेलेच, पण कारणाशिवाय दर वर्षीचा अजून एक हप्ता मात्र आला.
जाता जाता,
पॉलिसी प्रिमिअम पेड ही लोनसाठी सिक्युरिटी म्हणून सर्वच बॅन्का घेतात, तेव्हा रिलायन्स यात काही वेगळे करतेय असेही नाही.
24 Jul 2014 - 6:27 pm | jaydip.kulkarni
पॉलिसीचे नाव : Guranteed Money back Policy
प्रीमियम : ४०,००० / दर वर्षी ( १५ वर्षा पर्यंत )
परतावा :१६ व्या वर्षापासून सुरु ..२० वर्षा अखेर जी रक्कम मिळेल (अंदाजे १७,५०,००० ) ह्यातून सुरुवातीला दिल्या जाणार्या लोन ची तसेच ४.९९ % वार्षिक व्याजाची रक्कम कापून उरलेली रक्कम मिळणार .( लोन अंदाजे ६ लाख मिळेल )
आपला भ्रमणध्वनी क्रमांक सदरच्या लोकांना कळवला आहे , कदाचित ते संपर्क साधतील ...
24 Jul 2014 - 6:28 pm | jaydip.kulkarni
पॉलिसीचे नाव : Guranteed Money back Policy
प्रीमियम : ४०,००० / दर वर्षी ( १५ वर्षा पर्यंत )
परतावा :१६ व्या वर्षापासून सुरु ..२० वर्षा अखेर जी रक्कम मिळेल (अंदाजे १७,५०,००० ) ह्यातून सुरुवातीला दिल्या जाणार्या लोन ची तसेच ४.९९ % वार्षिक व्याजाची रक्कम कापून उरलेली रक्कम मिळणार .( लोन अंदाजे ६ लाख मिळेल )
आपला भ्रमणध्वनी क्रमांक सदरच्या लोकांना कळवला आहे , कदाचित ते संपर्क साधतील ...
24 Jul 2014 - 7:04 pm | आयुर्हित
मी आत्ताच काही बोलत नाहि. शांतपणे वाट पहातो त्यांच्या फोनची.
अब आयेगा ऊंट पहाड के निचे!
धन्यवाद.
24 Jul 2014 - 6:08 am | कंजूस
घरासाठी कर्ज आणि विमा संबंध :समजा एखाद्याने घरासाठी दहा लाख रु कर्ज घेतले तर साधारणपणे पंधरा वर्षाँत वीस लाख रुपये परत करावे लागतात .समजा त्या कर्जफेडीची सुरक्षितता म्हणून दहा लाखांचा विमा(लाइफ) घेतला तर वर्षाला अंदाजे चाळीस हजार रु विम्याचा हप्ता बसेल .करा हिशोब .
24 Jul 2014 - 7:09 am | चित्रगुप्त
या असल्या ऑफरा फसव्या असतात, तेंव्हा त्यापासून दूर रहाणेच योग्य, अश्या प्रकारे फोन करून मागे लागून जे काही विकले जाते, त्यात फायदा फक्त त्यांचाच असतो. हा अगदी प्राथमिक, कॉमन सेन्स वाला सल्ला. बाकी आयुर्हित यांनी बरेच प्रश्न उपस्थित केलेले आहेतच, शिवाय अन्य जाणकार सल्ला देतीलच.
24 Jul 2014 - 9:47 am | सुबोध खरे
जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. फक्त बापाकडून मिळालेल्या गोष्टी सोडल्यास.
रिलायंस वाले आपल्याला कोणतीही गोष्ट त्यांचा फायदा असल्याशिवाय का देतील? पाच टक्क्यापेक्षा कमी दराने कर्ज आपल्याला कोणी का देत आहे हा विचार करा आणि त्यांच्या फोनला blocked लिस्ट मध्ये टाका
के बी सी (नाशिक) बद्दल वाचले नाहीत का?
24 Jul 2014 - 11:34 am | आनन्दा
महाराज हा फ्रॉड आहे... मीच ३ वर्षांपूर्वी मिपावर यासंबंधी धागा काढला होता. आता मिळत नाहीये तो. एक सोपे काम करा, पण हे पहा - उपयोग होईल.
24 Jul 2014 - 11:47 am | आनन्दा
अधिक माहिती हवी असेल तर मला फोन करा. व्य नि केला आहे.
24 Jul 2014 - 11:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
रिलायन्स सारख्या रक्तपिपासु कंपनीच्या कुठल्याही भानगडीमधे पैसे नं गुंतवणं हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.
24 Jul 2014 - 1:37 pm | बन्डु
मी गंडलोय एकदा... :( ३००००/- चा चुना लागला आहे. त्यामुळे या फंद्यात पडु नका.
24 Jul 2014 - 11:59 am | सुधीर
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये XIRR नावाचं एक फंक्शन असतं. त्याविषयी अधिक माहिती इथे. हे फंक्शन वापरून कुठल्याही प्रकारच्या कॅश-फ्लोजचा (कर्जाच्या वा गुंतवणूकीच्या स्किम्स) अंतर्भूत व्याज दर काढता येतो. (अर्थात सगळे छुपे चार्जेस -"निगेटिव्ह कॅश-फ्लोज"-आणि त्यांच्या वेळा तुम्हास माहित असाव्या लागतात) मग या व्याजदरावरून कुठल्याही प्रॉडक्टचा/स्किम्स्चा एक तौलनिक अंदाज तुम्ही बांधू शकता.
24 Jul 2014 - 2:07 pm | नाव आडनाव
व्याजाच्या गणिताचं मला जास्त कळत नाही, त्यामुळे सांगू शकत नाही कि ऑफर चांगली आहे की नाही, पण माझा एक अनुभव सांगतो. माझ्या दोन मित्रांना (जे वेगवेगळ्या भागात राहतात आणि त्यांचे नंबर पण एका सिरीज चे नाहीत) एच डी एफ सी मधून कॉल आला (असं त्यांना सांगण्यात आलं आणि हे खोटं होतं हे आम्हाला नंतर कळलं) कि तुम्ही वर्षाला ३०००० रुपये भरून एक पॉलिसी घ्या आणि असे १० हफ्ते १० वर्ष भरा. अकराव्या वर्षी आम्ही तुम्हाला ३३०००० परत करू आणि तोवर तुम्हाला बिनव्याजी ३००००० रुपयांचं कर्ज देऊ. अश्या तुम्ही एक पेक्षा जास्त पॉलिसी घेऊ शकता.
मी विचार केला ५ पॉलिसी घेतल्या तर माझं होम लोन मिटेल. दोन मित्रांना फोन आला म्हणून मला हे सगळा खरं वाटलं. त्या एजंट ने दोघांना सांगितलं होतं कि तो घरी येउन कागद पत्रावर सह्या घेणार होता. पण तरीही एकदा बँकेत जाऊन चौकशी करायची असं आमच्या मित्रांचं ठरलं. तिथे गेल्या नंतर कळलं कि हे सगळं खोटं आहे. आणि माझं होम लोन नील होता होता थोडक्यात राहिलं :)
24 Jul 2014 - 4:55 pm | विजुभाऊ
मला "ब्याग इट टू डे " नामक एका कम्पनी कडून एक ऑफर आले.
त्यांचे कडून कोणत्यातरी प्रॉडक्टच्या पर्चेस मुळे माझा २७ लकी ग्राहकात समावेश झाला आहे.
त्याचे बक्षीस सुमारे साडेचार लाख मिळेल. मात्र हे बक्षीस मला अकाउंट्स ट्रान्स्फर किंवा ब्याम्केचा डी डी स्वरुपात मिळेल.
मी ब्याम्केच्या ड्राफ्ट स्वरुपात हवे असे साम्गितल्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा त्याम्चा फोन आला. त्या नुसार कंपनी हे पेमेंट थेट देवू शकत नसल्याने मी रीलायन्स ची क्षयज्ञ पॉलिसी उतरावी. उद्या एकजण तुम्हाला रीलायन्स मधून फोन करेल . मात्र तुम्ही बक्षीसाबद्दल रीलायन्स च्या त्या माणसाला काही साम्गु नका. तुम्ही पॉलिसी घ्या. आणि त्या पॉलिसीचे प्रीमियम म्हणून कम्पनी ही रक्कम भरेल. तीन महिन्या नंतर तुम्ही पॉलिसी क्यान्सल करुन पैसे घ्या अशी ऑफर होती.
गेल्या वर्षी देखील असेच घडले होते. रीलायन्स च्या एजन्टाने फोन देखील केला होता. पॉलिसी चा हप्ता म्हणून २५ हजार रुपये सांगत होता.
रीलायन्स ची पॉलिसी उतरवायचा धीर झाला नाही. अर्थात पैसे मिळाले नाहीत.
नक्की काय करत असेल ही कम्पनी.
24 Jul 2014 - 5:29 pm | आयुर्हित
काही टेंशन घेवु नका, फक्त अशा वेळेला माझा सेल नंबर द्या त्या लोकांना, आणि म्हणा माझा पी ए च बघतो हे सर्व, त्याच्याशी बोला तुम्ही. (माझा सेल नंबर व्यनी केला आहे)
काय गोची असेल त्याची शहानिशा करुन आपल्याला मिपावर अपडेट केले जाईन.
धन्यवाद.
24 Jul 2014 - 8:35 pm | धन्या
नव्याने घेतलेली पॉलिसी कॅन्सल करुन पैसे हवे असतील तर तसे करण्याची ठराविक दिवसांची मुदत असते. या मुदतीला "कुलींग ऑफ पिरियड" म्हणतात. सर्वसाधारणपणे ही मुदत १४ दिवसांची असते. या चौदा दिवसात जरी पॉलिसी कॅन्सल केली तरी सर्वच्या सर्व पैसे परत मिळत नाहीत. काही रक्कम त्यांची फी म्हणून कापून घेतात ते.
तीन महिन्यांपेक्षा जास्त कुलींग ऑफ पिरियड म्हणजे गोलमाल आहे. :)
24 Jul 2014 - 6:48 pm | रघुपती.राज
हे वाचा:
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Reliance-Life...
तुम्हाला दीलेली ओफर फसवी आहे.
24 Jul 2014 - 8:26 pm | धमाल मुलगा
जीवनविमा म्हणजे नक्की काय ह्यात आपल्याकडं भयंकर घोळ आहेत. लोक सहजासहजी पैसे द्यायला तयार होत नाहीत म्हणून 'मनी बॅक पॉलिसी' आल्या. पुढे त्यातच आणि हजार घोळ घालत पैसे ओढायचे धंदे चालू झाले. विमा हा विम्यापुरता मर्यादीत ठेवाल तर उत्तम!
मला विचाराल तर जिवनविमा म्हणजे एकच - टर्म इन्शुरन्स. विमा आणि गुंतवणूक ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यांची आपण गल्लत करतो. ते टाळलं तर हा लफडा येणार नाही असं वाटतं.
त्यातून, समजा हे असं रिलायन्स लाईफ कडून रिलायन्स कॅपिटलकडे मॉर्गेज करणं, आणि नंतर व्याज कापून पैसे मिळणं हे अपसव्य करायचं असेल तर एकदा क्यालक्युलेशन करुन पहा, किती पैसे मिळतील आणि किती जातील ते.
जाताजाता: च्यायला! ही खुद्द रिलायन्सचीच गेम नसेल ना? असं केलं की एकीकडं पॉलिसीची विक्री वाढलेली दिसते, दुसरीकडं कॅपिटलचा क्लायंटबेस वाढलेला दिसतो.
24 Jul 2014 - 8:42 pm | धन्या
लाख मोलाची गोष्ट !!!
जीवनविमा हा फक्त टर्म इन्शुरन्सच असायला हवा. इतर कुठल्याही पॉलीसीचा विचारही मनात आणू नका. टर्म इन्श्युरन्स सोडला तर बाकीच्या पॉलीसीज आपल्याकडून पैसा ओरबाडतात आणि विमा कंपनी आणि एजंट लोकांच्या खिशात टाकतात.
24 Jul 2014 - 9:56 pm | प्यारे१
गाडीच्या इन्शुरन्स सारखा 'बाडी'चा इन्शुरन्स. जगलात तर पैसे गेले, मेलात नि पॉलिसी लाईव्ह असली तर चांदी. (मागं राहिलेल्यांची)
हाच खरा इन्शुरन्स.
-अॅक्सिडेन्टल रायडरसकट टर्म इन्शुरन्स घेतलेला.
25 Jul 2014 - 2:23 pm | ऋतुराज चित्रे
१००% सहमत
24 Jul 2014 - 9:34 pm | सुधीर
नक्की सांगता येणार नाही, पण मला वाटतं, या सगळ्या फसव्या मार्केटींग आणि मिस-सेलिंग मागे कमिशनमुळे मिळणारा पैसा असू शकेल. डायरेक्ट टू कंन्झ्युमर सेल मुळे या सगळ्या प्रकारावर कदाचित आळा बसेल. अर्थात काही कंपन्यांच्या विश्वासहार्तेवर पण तसा संशय असतोच.
25 Jul 2014 - 9:14 am | नाखु
a href="http://www.loksatta.com/arthvrutant-news/before-buying-an-insurance-plan..." title="loksatta">
25 Jul 2014 - 9:25 am | धन्या
आयुर्हीत यांचा सेल नंबर द्या त्या लोकांना, आणि म्हणा माझा पी ए च बघतो हे सर्व, त्याच्याशी बोला तुम्ही.
25 Jul 2014 - 11:32 am | कंजूस
विमा असल्यास घर खरेदीदार निवर्तल्यास(असे न होवो) कर्जाचा बोजा मागच्या व्यक्तीवर पडत नाही .विमा कंपनी पॉलिसीतून वळते करते .घर मोकळे बोजारहीत होते .आता यासाठी गुंतागुंत वाढवायची का एका कंपनीचा विमा आणि कर्ज दुसरीकडून ते ठरवा .
25 Jul 2014 - 7:17 pm | धन्या
माझ्या महितीप्रमाणे एल. आय. सी. हाउसिंग फायनान्सकडून गृहकर्ज घेताना त्या कर्जाचा विमाही उतरवावा लागतो. इतर गृहकर्ज देणार्या वित्तकंपन्यांमध्ये गृहकर्जाचा विमा ऐच्छिक आहे बहुतेक.