माहिती

सेव द डील्स डॉट इन

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
11 Sep 2014 - 11:11 pm

इशारा: फसव्या साईट्स बद्दल सावध करण्यासाठी हा धागा लेखकाने काढला आहे. वाचक सूज्ञ आहेतच. या धाग्यातील उल्लेख केलेल्या साईट्स वर जाऊन कोणीही फसू नये.)

****************

आज मला एक ईमेल आलाय, त्यात लिहिले आहे.....

फक्त ५०/- रुपयात १७००/-किमतीचे व्हावुचर! आणि तेही कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये चालणारे!!

पोरं vs मुलं

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
11 Sep 2014 - 10:56 am

नमस्कार!

मराठी भाषा, तिचा उगम, तिची व्याप्ती, तिचा प्रवास, तिची शुद्धता, लोकं कसं अशुद्ध मराठी बोलतात, आता मराठी लोप पावणार का इत्यादी प्रस्तावना गाळून सरळ मुद्द्यावर येत आहे.

'पोरबाजार' चित्रपटाच्या नावावरून आठवलं. अनेकजण अनेकदा सर्रास 'पोरं', 'पोरगा', 'पोरगी' हे शब्द वापरतात. अगदी रोज. माझ्या माहितीप्रमाणे पोर या शब्दाची व्युत्पत्ती 'पोरका' शब्दापासून झालेली असून त्याचा अर्थही तसाच होतो. 'मुलं, मुली, मुलगा, मुलगी' असा चांगला शब्द त्या जागी वापरणं मला योग्य वाटतं. किंबहुना, वरील अर्थ माहीत असल्याने चटकन 'तो पोरगा' 'ती पोरगी' असं माझ्या तोंडात येतच नाही.

तंत्रदर्शन्-भाग२

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
10 Sep 2014 - 8:03 am

तंत्र भाग २. भारतातील तंत्रविकास

आजच्या भागात आपण भारतात तंत्राचा विकास किंवा प्रसार कसा झाला ते पाहू. तंत्र ही सज्ञा
तन् (विस्तारणे, वृद्धी करणे) या धातूवरून आली आहे. वैदिक कालात यज्ञ हा एकच धर्म होता व अर्चनेचे साधन होते. जनसामान्यांच्या अर्चनेच्या कल्पनांना वाव देण्यासाठी जास्त विधींची गरज होती व तंत्राने त्याला वाव दिला. पहिल्या भागात पाहिल्याप्रमाणे स्त्रीसृजनतेचा पगडा जनांवर होताच. तो भागही तंत्रात सामावला गेला. पण तेथे जाण्याआधी आपण यज्ञसंस्थेतील तंत्र पथम पाहू

संस्कृतीमाहिती

पेरू : भाग ११ : लोकजीवन

समर्पक's picture
समर्पक in जनातलं, मनातलं
8 Sep 2014 - 12:37 am

या भागात पेरूच्या समाजाचे जवळून दर्शन. कुठल्याही प्रदेशात नुसतं 'बघायला' न जाता अनुभवायला जायचं असेल तर स्वत:च्या 'फॉरेनर टॅग' चा उपरेपणाचा रंग उतरवून उत्सुक, जिज्ञासू रंगाचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आजुबाजूच्या लोकांशी शक्य तितका संवाद साधत आपला अनुभव अधिकाधिक गडद व सखोल करता आला तर अभ्यास व आनंद दोन्ही वृद्धिंगत होतात. प्रत्येक समाजाची एक वैशिष्ट्यपूर्ण वीण असते, पोत असतो, त्याविषयी जाणण्याचा, ज्या ज्या लोकांना भेटण्याचा योग आला त्यातून या समाजाविषयी जाणण्याचा केलेला हा प्रयत्न, व बरोबरच काही साधी चित्रे.

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मइतिहासभाषासमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरअर्थकारणराजकारणशिक्षणचित्रपटछायाचित्रणप्रकटनअनुभवमाहिती

मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीकांची माहिती हवी

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
5 Sep 2014 - 11:10 pm

दहावीच्या वर्गातील मूलांना शिक्षकाची भूमीका वठवण्याची संधी मिळत असते पण यात नाट्यापेक्षा प्रात्यक्षीक अधीक असत, त्या आधी अगदीच लहानपणी डॉक्टर डॉक्टर हा खेळ खेळला जाताना दिसतो, तसा टिचर टिचर हा खेळही काही वेळा रंगलेला दिसतो.

फेसबुकची वचवच- आणि वचावचा करणारं फेसबुक!

अन्नू's picture
अन्नू in जनातलं, मनातलं
5 Sep 2014 - 3:52 pm

सध्या सोशल नेटवर्किंगची क्रेझ चालू आहे मग ती ट्वीटरवरची टीवटीव असो नाहीतर, फेसबुकवरची गपशप असो. सगळीकडेच अगदी या साईट्स हातपाय पसरत असलेल्या दिसत आहेत. त्यात ट्वीटरचा विचार केला तर तिथे जास्तकरुन सेलिब्रिटीजचीच टीवटीव आपल्याला ऐकायला येते. सामान्य माणुस मात्र जास्त टीवटीवत नाही, त्यामुळेच कदाचित तो फेसबुकवर पडीक असतो!

मांडणीवावरमुक्तकशब्दक्रीडाविनोदसमाजमौजमजाप्रकटनविचारसद्भावनालेखअनुभवमतमाहिती

सुतक

स्वतन्त्र's picture
स्वतन्त्र in जनातलं, मनातलं
29 Aug 2014 - 4:30 pm

गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो.

मांडणीधर्मजीवनमानराहणीअनुभवमतसल्लामाहितीचौकशीप्रश्नोत्तरे

ब्रु.म.मं २०१५: अधिवेशन गीत स्पर्धा

बीएमएम२०१५'s picture
बीएमएम२०१५ in जनातलं, मनातलं
28 Aug 2014 - 8:01 pm

BMM 2015 Media and Marketing Committee सहर्ष सादर करीत आहे
अधिवेशन गीत स्पर्धा
हि स्पर्धा उत्तर अमेरिकेतील रहिवाशांसाठी खुली आहे
गीताचा विषय “मैत्र पिढ्यांचे” या अधिवेशनाच्या संकल्पनेशी निगडीत असावा. सादर केले जाणारे गीत ही पूर्णपणे नवीन कलाकृती असावी - गीत, संगीत, गायन तसेच वादन. पूर्ण झालेल्या गीताची ध्वनिमुद्रित प्रत प्रवेशिका म्हणून पाठवावी. विजेत्या संघाची निवड परीक्षक मंडळ, तसेच BMMकडून केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

कलाकविताबातमीमाहिती

सप्ताहिक सकाळ-२ लेख!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
26 Aug 2014 - 11:31 am

साप्ताहिक सकाळमधे मध्यंतरीच १ लेख प्रकाशित झाला होता.तो मि इथे शेअर केलेला आहे. आता त्याच्यापुढील प्रवास.. गेल्या दोन अंकात अजून २ लेख आलेत. हे दोन्ही लेख तसे गणेशोत्सवाशी संबंधीत आहेत.

संस्कृतीकलाधर्मलेखमाहिती