साप्ताहिक सकाळमधे मध्यंतरीच १ लेख प्रकाशित झाला होता.तो मि इथे शेअर केलेला आहे. आता त्याच्यापुढील प्रवास.. गेल्या दोन अंकात अजून २ लेख आलेत. हे दोन्ही लेख तसे गणेशोत्सवाशी संबंधीत आहेत.
माझे मित्र आणि सा.सकाळचे उपसंपादक :- अभिजीत सोनावणे यानी मला श्रावणाच्या पहिल्या अठवड्यात सदर दोन्ही विषयावर लेख हवेत,म्हणून सांगितले होते. यातल्या फुलांच्या रांगोळ्यांवरील लेखनासाठी मी निश्चिंत होतो.कारण मागे इथे सप्तपदी'च्या निमित्तानी आणि त्यापूर्वी याच विषयावर फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...! म्हणून लेखन करून झालेले होते. त्यामुळे निश्चिंत होतो.पण गणपति आणि मोदक हा लेख लिहायला,माझं (श्रावणी-कामांनी भरलेलं) डोकं मोकळं मिळेल की नाही? याची मलाच चिंता होती.कारण यावर शास्त्रीय माहिती पुरावे म्हणावे असं विशेष काहिही नाही.आणि तरी त्यातलं नातं सांगायचं म्हणजे लोकपरंपरा आणि समाजमानसाचा आधार घेण्यावाचुन गत्यंतर नाही,हे जाणून होतो.आणि या मुळेच छोटा जरी लेख लिहायचा तरी(माझ्या बुद्धीच्या मानानी) मोठ्ठी जबाबदारी असल्यासारखं वाटत होतं.पण घाईघाईत टाकलेल्या घावना सारखा तो बर्यापैकी जमून आल्याचं मला माझ्या ओळखिच्या लोकांच्या फोनवरनं समजलं,आणि मनात म्हटलं ..चला जमल ब्वॉ कसंबसं. :)
१) "मोद' वाढविणारा मोदक...
मोदक हा गणपतिचा नैवेद्य कसा (झाला) ? या विषयावर यात माहिती लिहिण्याचा,किंवा उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकतर यावर शास्त्रीय नोंदी अश्या फारश्या नाहीत. (वल्लींकडून वेरूळ लेणीतील १ संदर्भ मिळाला.{त्याबद्दल धन्यवाद हो वल्ली.:) } ) या व्यतिरिक्त गणपति मूर्ती स्वरूपात आपल्यात आला,त्याच्या अधी पासून गणहोमात दिलेल्या आहुतींच्या पदार्थांचा एक सांधा मोदकाशी बराच जुळणारा आहे. बास्स. याशिवाय इतर म्हणावा असा आधार याला नाही.बाकिची जी काहि संगती मी लावली आहे,ती माझ्या अंदाजानुसार. आणि शेवट केलाय तो लोकपरंपरेत काय होत असतं? या गृहीतकावर.
२) फुलपंखी रांगोळ्या !
हा लेख मि.पा.करांना परिचित विषयावरचा आहे. गणपतिउत्सवात पारंपारिक रंग/रांगोळ्या आता मोठ्ठ्या प्रमाणात होतात.तश्याच या माझ्या फुलांच्या रांगोळ्याही लोकांनी शिकाव्या/उचलाव्या .इतकाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन त्यातली तंत्र यथामती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा लेख मूळ छापिलात अधिक फोटोंसह आहे. eअवृतीत फक्त एकच फोटो आलाय.पण मांडणी सगळी आली आहे.
==========================
तेंव्हा हे सदर २ लेख आपल्यासाठी इथे देऊन या कामाची खरी सांगता करतो..वाचा आणि कसे वाटले? ते सांगाही.
प्रतिक्रिया
26 Aug 2014 - 11:40 am | प्रमोद देर्देकर
मी पयला.
आता लेख वाचतो.
26 Aug 2014 - 11:51 am | प्रचेतस
आत्मूसकडून लेख येणं हे श्रावण संपल्याचे निदर्शक मानावे काय? ;)
26 Aug 2014 - 4:25 pm | अत्रुप्त आत्मा
आगोबा :-/
26 Aug 2014 - 11:59 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त आहेत दोन्ही लेख ! गुळखोबरे ते मोदक या प्रवासाची अंदाजप्रक्रिया छान आहे.
26 Aug 2014 - 12:37 pm | धन्या
दोन्ही लेख वाचले. मस्त लिहिले आहे.
26 Aug 2014 - 1:30 pm | सौंदाळा
दोन्ही लेख आवडले हो बुवा.
मोदकाचा जास्त आवडला कारण रांगोळ्याबद्दल तुमचे मिसळपाववरील विस्त्रुत लेख आणि सुंदर फोटो आधी पाहीले आहेतच.
अजुन काही लिहिलत तर कळवत चला
26 Aug 2014 - 1:35 pm | गवि
मस्त लेख हो आत्मूबुवा... लगे रहो.
26 Aug 2014 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर
दोन्ही लेख वाचले. मोदकाचा प्रवास आणि फुलांच्या रांगोळीची तंत्र आणि मंत्र वाचनिय आहेत ह्यात शंका नाही. मिपावरील फुलांच्या रांगोळीचा लेख जास्त विस्तृत होता.
26 Aug 2014 - 1:54 pm | सुहास झेले
मस्त बुवा... दोन्ही लेख मस्तच.... तुमच्या फुलांच्या रांगोळ्यांचा तर मी पंखा आहे... लगे रहो :)
26 Aug 2014 - 2:28 pm | सूड
दोन्ही लेख आवडले. फोटो नाय छापलंनीत तुमचा??
26 Aug 2014 - 2:35 pm | मुक्त विहारि
अभिनंदन..
दोन्ही लेख नंतर वाचीन..
बादवे,
लेख प्रकाशित झाल्याबद्दल, एक कट्टा तो बनताही हय....
26 Aug 2014 - 4:26 pm | अत्रुप्त आत्मा
१)सौंदाळा
@अजुन काही लिहिलत तर कळवत चला>>> येस्स स्सर!
२)प्रभाकर पेठकर
@मिपावरील फुलांच्या रांगोळीचा लेख जास्त विस्तृत होता.>>> तिथे व्हिडिओनी किमया साधलेली आहे. आणि साप्ताहिकात पण बर्याच गोष्टी डिटेंलिंग म्हणून दिल्यावत्या.पण त्यांना जागेची मर्यादा होती.
३)सूड
@फोटो नाय छापलंनीत तुमचा?? >>> मोदकाच्या लेखावरील पानात आहे. तो ही छापिला५त नेटीय अवृत्तीत नाही.
४)मुक्त विहारि
@लेख प्रकाशित झाल्याबद्दल, एक कट्टा तो बनताही हय.... >>> जी हां..जी! आप पुना तो आइये। :)
=================
26 Aug 2014 - 11:37 pm | मुक्त विहारि
हम आकुर्डी में आयेंगा और कट्टा मनायेंगा...
अब की बार..पुणे कट्टा...
26 Aug 2014 - 6:19 pm | अनन्न्या
छान आहे माहिती! दुसरा पण वाचते सवडीने!
26 Aug 2014 - 11:19 pm | खटपट्या
रान्गोळिचा लेख आधिच वाचला होता .
मोद्काचा आता दिसत नाहि आहे.
रान्गोळीचा लेख अप्रतिम
27 Aug 2014 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा
मोद्काचा आता दिसत नाहि आहे. >>> कहि तरी तात्पुरता बिघाड असावा. आता दिसतोय. :)
29 Aug 2014 - 10:32 am | चौकटराजा
बुवांचा लेख वाचण्यापूर्वीच त्यांचे " गुलछडी" व "लिली" यांचे वरचे प्रेम कलाकृति मधून दिसत होतेच. पण रेखा म्हणून त्यांचा उपयोग फार अपरिहार्य असतो हे लेखातून कळले. कार्नेशन, झेंडू, जरबेरा व अॅस्टर या फुलांमधून अतिशय विविध रंगाच्या पाकळ्या उपलब्ध होतात. ज्युनिपर ,बॉटल ब्रश, क्रिसमस यांच्या पालवीतून रेखा दर्शविण्यासाठी मदत होते.बुवाना रम्गसंगतीचे ज्ञान उपजतच असल्यासारखे आहे. निसर्गाची आवड असल्याने असेल. त्यामुळे बुवांची रांगोळीला मिळलेली दाद ही मनापासून असते. चेपूवरच्या लाईक मधील क्लिक सारखी नाही.
वि सू वरील पहिल्या ओळीतील फुलांची नावे " ती" या सदरातील आहेत हा एक योगायोग समजावा.
29 Aug 2014 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा
@रांगोळीला मिळलेली दाद ही मनापासून असते. >>> अत्यंत मन:पूर्वक धन्यवाद :)