चला..सप्तपदी करु या!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
28 Apr 2014 - 6:47 pm

माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार.
फुलांची सप्तपदी
============================

हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ;) ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही! तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?

तर होतं त्याचं ते अस्सं.. आमच्या एखाद्या यजमानाकडनं लग्न-लावण्या बरोबरच अगदी अवर्जून केलेली रिक्वेस्ट असते.
"गुरुजी ती..त्यांच्या लग्नात केलीवतीत ना..तशी फुलांची सप्तपदी हवी बरं का! काय लागयचा तो वेळ लागू दे,पण कार्यक्रम कसा..दणक्यात झाला पायजे..!!!" अता हे एव्हढं जोरात रॉकेट पडल्यावर..नाही कुठनं म्हणा! मग मी त्यांच्या लग्न मुहुर्ताच्या आदला दिवस डायरीत बघतो..आणि त्या दिवसापासून ही सप्तपदी सुरु-होते! म्हणजे...आधी दिवस कोणत्या सिझन मधला आहे त्याचा विचार,नंतर अदला दिवस आपल्या कामा'चा फुल्ल आहे की नुस्ताच फू...ल आहे याचा विचार,मग फुलांच्या कटिंग साठी,कुणि बरोबर मॅनेज होइल का? हा विचार, झालच तर 'कितीत-होइल' :D हा ही विचार,नाही झालं तर आदल्या दिवशी किती वेळ आपल्यालाच ही पुष्प-कात्रणांची बुंदि-पाडायला बसावं लागेल हा विचार! (बुंदी पाडणे! =)) काय शब्द सुचलाय..व्वा! =)) ..पण लोकहो..हाच शब्द बरोब्बर आहे. तुंम्ही फक्त १ किलो झेंडू..आमच्या मागे इथे http://misalpav.com/node/25283 सांगितलेल्या धाग्यातल्या..झेंडू कापणी-तंत्रानुसार कापुन बघा..मायला..जाम रग लागते,पाठीला!!!)

तर..असं होता होता..मग अखेर तो लग्नाच्या आदला दिवस उजाडतो..एकदाचा आणि मग मी प्लॅन केल्याप्रमाणे,सकाळी किंवा दुपारी पळतो आमच्या मार्केटयार्डात..फुलांच्या महा-मंडईमधे..इथे- http://misalpav.com/node/20666 आणि मग..तासाभरात सगळी खरेदी होऊन घरला येतो.. आणि मग थोड्याच वेळात सुरु होते..पूर्व तयारी! आता,आपण आज जी 'काढलेली सप्तपदी पहाणार आहोत..ति कशी होते...हे (थोड्ड्सं..) रेसिपी श्टाइलनी बघू

प्रथम फुलं:-
१)लिली:-मिनिमम १० गड्ड्या..गुलाबः-अर्धा किलो..गुलटोक-२ गड्ड्या,जरबेरा:-२ गड्ड्या..
https://lh4.googleusercontent.com/-5w_DCkPsD70/U14XfIctyZI/AAAAAAAACuk/pt0N1M26O0A/w702-h570-no/lahan+cinga+260.jpg
२)स्प्रिंगल गवतः- ६ गड्ड्या..
https://lh3.googleusercontent.com/-HY2vXxTgfuE/U14YCFIlbMI/AAAAAAAACuw/zo4HAvboPWI/w702-h533-no/lahan+cinga+262.jpg
३) मोगरा:-१किलो,कामिनी(पाला):-३ ते ५ गड्ड्या,तुळजापुरी झेंडू:-१ किलो.
https://lh6.googleusercontent.com/-YI4mbxKuY4w/U14YSYsQ3kI/AAAAAAAACu4/u4p6t7hpthw/w702-h530-no/lahan+cinga+263.jpg
४)झेंडू:- ७ ते १० किलो..
https://lh3.googleusercontent.com/-x2IeeZNRl-w/U14aVHENVLI/AAAAAAAACvA/Mk-9xwxWFl8/w497-h585-no/IMG_20130910_130327.jpg
------------
हे झालं साहित्य..
आता मी ऑनस्टेज करतो काय? त्याचा थोडासा वृत्तांत. सगळ्यात आधी दिशा पाहाणे..कारण..ही कित्तीही रांगोळी म्हणून असली तरी ती सप्तपदी आहे.त्यामुळे पूर्वगमनी आणि होमाच्या उत्तरेला अशी दिशा व जागा पाहून सुरवात करायची. जागा फिक्स झाली की आधी त्याच्या चहूबाजूनी ७/८ खुर्च्या लाऊन,भस्सकन-आत येणार्‍यांसाठी तटबंदी आणि ती तटबंदी टिकायला आमच्या यजमान पार्टीतला कोणितरी रांगोळीप्रेमी रक्षक अथवा रक्षिका (सुद्धा! :D ) ...त्याला/तिला..जरा(कार्यालयातलाच! ;) ) चहा वगैरे मागवून "तुमच्या सारख्यांमुळे या रांगोळ्या होतात हो..नायतर कसलं काय आलय? :D .. असं जरा चढवून एका खुर्चीवर अडवुन किंवा अ‍ॅडवून ठेवायचा. (फक्त या कामी हौशी व्यक्तिस घेऊ नये..कारण,सारखा त्यांना 'मदती'ला यायचा मोह होतो...आणि दर अर्ध्या तासानी बुरुज सोडून ते मैदानाकडे येतात. ) मग सर्व प्रथम कट केलेल्या लिलीची पिशवी घेउन साधारण १ वीतीच्या अंतराने ..एकापुढे-एक अशी,त्याची ७ कमळं करून घ्यायची. मग कमळाच्या बॉर्डरला तुळजापुरी झेंडू हा .देठाकडून कमळाच्या बाहेरच्या परिघाला एकेक एकेक असा प्रेस करत लावायचा.मग मधे झेंडूच्या पाकळ्या इतरत्र पडणार नाहीत अश्या टाकायच्या(या कमळ बनवायचा समग्र व्हिडिओ..या- http://misalpav.com/node/25283 लिंकेत आहे) नंतर मग बाहेरनं मोगरा लाऊन आधी ही सप्तपदीमाळ पूर्ण करायची.

मग थोडा(ऑन द स्पॉट कारावा लागणारा)कुटीर उद्योग...

गुलटोक..गुलाब..जरबेरा हे डेखाकडून फुलाला डेख चिकटत तिथे हलक्या हतानी (कात्री वापरू नये) तोडायचे. अगदी गुलाबाच्या पाकळ्यां अलिकडे असणार्‍या देठाच्या ५ हिरव्या..सपोर्टिंग पाकळ्याही नखानी उडवायच्या..(म्हणजे नंतर तो गुलाब/गुलटोक..पाकळ्यांच्या थरामधे न हलता/कलंडता शंभर टक्के स्थानापन्न होतो) ही तयारी एका ताटात लाउन..मग परत जरा चहा(आणि तंबाखू :D ) करून..फ्रेस्स होऊन यायचं.मग सगळा शोभेचा पाला.. त्याचे बुडखे उडवून कटवून घ्यायचा... मग फायनली खुर्च्यांच्या तट-बंदीच्या आत..पाला/जरबेरा ठेऊन..त्याच्या आत झेंडू-पाकळ्यांची पिशवी,आणि त्याच्या आत गुलाबाच्या ताट आणि अक्षतेच्या वाटिसह आपण!!! अशी रचना झाली की मग पुढचा खेळ चालू..मगाशी पूर्ण केलेल्या कमळामधे,मध्यभागी आधी १ गुलाब ठेऊन..त्याच्या पाकळ्यांमधे १ चिमूट अक्षता टाकायच्या,तद् नंतर कमळाच्या आतल्या परिघावर गुलटोकासारखी फुलं लावायची.(आपल्याला हवी तितकी) मग सप्तपदीमाळेच्या भोवती शेवटच्या लेअरकडून बाहेर असा.अंदाजे अर्ध्या फुट रुंदिचा झेंडू-पाकळ्यांचा (दाट) थर हाताने सारखा करत टाकायचा. अर्धा/१फुटाचा थर टाकुन झाला. की मग बाहेरनं वर दाखवलेलं स्प्रिंगल-गवत बाहेरनं लागून घ्यायचं. त्यात वरनं..गुलाव जरबेर्‍याचं टॉपिंग करायचं.

आणि सगळ्यात शेवटी यायचं ते मास्टरपिसवर! ..सप्तपदा'च्या.. कमळा बाहेर जो कलश ठेवतात,त्याच्या बाहेरच्या डिझाइनवर...! (हे डिझाइन मी नेहमी मला सुचेल तसं गोल..दिल-शेप आकारात/चौकोनी/अष्टदली असं त्याक्षणी सुचेल तसं करतो.) यातही फुलं लावण्याची सगळी कृती वरील प्रमाणेच आहे...(आणि तसंही मी वर जी कृती-कथन केलेली आहे,ती निव्वळ कशानंतर काय? हे ध्यानात याव म्हणून! एरवी रांगोळ्यांना "शिकवणे" हा प्रकार तंत्रोक्ताच्या पलिकडे लागूच पडत नाही.) तर...अश्या एकंदर ४/५ तासाच्या मेहेनती नंतर तयार होते ..........................
ती
........ही
.................फुलांची
..................................सप्तपदी!
https://lh3.googleusercontent.com/-wdMXOjfvj2Q/U14dDkqe_II/AAAAAAAACvg/asT-nrcZ1CQ/w670-h585-no/lahan+cinga+266.jpg
https://lh4.googleusercontent.com/-zsR8FmyHM24/U14beGkjw-I/AAAAAAAACvI/3FdTEj1CIsI/w524-h585-no/lahan+cinga+272.jpg
https://lh5.googleusercontent.com/-9Om1hScpWIs/U14cnbpo4xI/AAAAAAAACvY/BfCEoJDKHss/w702-h531-no/lahan+cinga+276.jpg
https://lh6.googleusercontent.com/-St5RHppi2b0/U14cB3_hsAI/AAAAAAAACvQ/CVhhOJAQHTk/w702-h531-no/lahan+cinga+275.jpg
https://lh3.googleusercontent.com/-9Aw4-QcIXmM/U14daBMl6RI/AAAAAAAACvo/KbgWQXTHpe4/w702-h531-no/lahan+cinga+274.jpg
==============================================
ही सप्तपदी (एकट्यानी)काढायला लागणारा एकंदर वेळ:- आदल्या दिवशी फुलं-कटिंग साठी जाणारे ६ ते ७ तास+दुसर्‍या दिवशी सप्तपदी काढायला जाणारा वेळ ३ ते ४ तास = कमितकमी ८ ते १० तास.
==============================================
आता अज्जुन एक मज्जा!!! बरेचदा ..वधू'चे सप्तपदी-वरून-चालून झाल्यावर,मी यजमान पार्टिला सगळी फुलं वेगवेगळ्या पिशव्यांमधे भरून घरी पायघड्यांसाठी न्यायला सांगतो. फुलं तिथे वापरली जातातच. पण काहिवेळा बरीचशी टाकुन दिली जातात.कारण.. हे सर्व तिथे असलेल्या उप-स्थितांच्या उत्साहावर अवलंबून असतं. मग लोकं फारच कंटाळलेले असले..तर मग यजमान परत मलाच गळ घालतात..."गुरुजी तुम्म्हीच चला ना..प्ली..............ज!!!
आणि मलाही त्यादिवशी संध्याकळी दुसरीकडे "वर्णी" नसली. तर मग मी त्यांचा कार्यालयातला सगळा धार्मिकविधिंचा कार्यक्रम अवरून...जेऊन घरी जाऊन १ मस्त पडी लावतो..आणि संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांच्या घरी जातो..
आणि मग सकाळच्याच सप्तपदिच्या फुलांचं री-सायकलींग होऊन तयार होतात........त्या...या..

नवपरिणितां-साठीच्या
..........गृहप्रवेशनीय..अश्या
.................प्रसन्नोत्सुक-पायघड्या!
https://lh3.googleusercontent.com/-woa7L-rYgrs/U14d__6AUrI/AAAAAAAACvw/7Xty-gpk3mk/w702-h577-no/lahan+cinga+283.jpg
https://lh3.googleusercontent.com/-96KGWjszps0/U14eU_FMEeI/AAAAAAAACv4/MwhQwYl-UcU/w702-h531-no/lahan+cinga+286.jpg
https://lh6.googleusercontent.com/-sCdynzPqSKo/U14e-hnIkqI/AAAAAAAACwI/JYBtNyq9Lk8/w702-h531-no/lahan+cinga+288.jpg
https://lh6.googleusercontent.com/-2rpgakYKA4k/U14ewH-4k6I/AAAAAAAACwA/z9X4Tt55fzA/w702-h531-no/lahan+cinga+287.jpg
==========================================================

संस्कृतीकलाविरंगुळा

प्रतिक्रिया

काव्यान्जलि's picture

28 Apr 2014 - 6:52 pm | काव्यान्जलि

खूप सुन्दर......

झकासराव's picture

28 Apr 2014 - 6:52 pm | झकासराव

जबरदस्त कलाकार आहात राव. :)

शुचि's picture

28 Apr 2014 - 6:56 pm | शुचि

I have spread my dreams under your feet;
Tread softly because you tread on my dreams. W.B. Yeats

अहाहा काय त्या मृदुल पायघड्या.... किती रसिक अन राजस सोहोळा!!!

प्यारे१'s picture

28 Apr 2014 - 6:56 pm | प्यारे१

___/\___

गुर्जी, तुमच्यातल्या कलाकाराला सा.न.

बाकी टायटलनं गंडवलंन!

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2014 - 7:01 pm | दिपक.कुवेत

मलाहि तेच वाटलं गुर्जी सप्तपदि करतायत कि काय! अर्थात ते हि बघायला आवडेल म्हणा....गुर्जी आणा बाबा तो योग लवकर. बाकि सप्तपदि आणि पायघड्यांची रांगोळि नेहमीप्रमाणेच झकास. फारच कल्पक बुवा तुम्हि!

गुरुजी क्काय भारी केलंय सगळं.. मस्त.!

पण इतक्या देखण्या रांगोळीवर पाय द्यावासा वाटतो का लोकांना?. माझा तर जीव च होणार नाही..

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2014 - 7:10 pm | अत्रुप्त आत्मा

@पण इतक्या देखण्या रांगोळीवर पाय द्यावासा वाटतो का लोकांना?.>>> हा प्रश्न इथे.. पूर्वीपण एकदा रांगोळीच्याच धाग्यावर आलावता...
बर्‍याचश्या वधू.. तयार नसतातच..मग मीच त्यांना पहिल्या पावलावर..ईषे..एकपदी भव..चा काहितरी भावुक अर्थ सांगतो,आणि गाडी करतो चालती ! ;)
.
.
.
.
.

(काय करणार...? खेळ पुढे सरकायला हवा ना!!! :D ..)

श्रीरंग_जोशी's picture

29 Apr 2014 - 8:51 am | श्रीरंग_जोशी

एवढ्या सुंदर कलाकृतीवर चालत जावेसे कुणालाच वाटणार नाही.

पण यशस्वीपणे संसार करताना काही वेळा स्वतःच्याही नाजुक भावनांना असेच चिरडुन पुढे चालावे लागते ;-).

फटु अन लेखनशैली नेहमीप्रमाणे अप्रतिम!!

तुमचा अभिषेक's picture

28 Apr 2014 - 10:41 pm | तुमचा अभिषेक

पण इतक्या देखण्या रांगोळीवर पाय द्यावासा वाटतो का लोकांना?

अगदी हेच मनात आले, पण लोकांनाच्या जागी बाईमाणसांना ..

भारी कलाकारी, स्वताच्या लग्नात मिसला हा प्रकार म्हणायचा.

यसवायजी's picture

28 Apr 2014 - 7:04 pm | यसवायजी

बुवा, अ प्र ती म मास्टरपिस.
रच्याकने, घरी सोडायला पायघड्या घातल्यात.. पुढची सजावट? ;)

प्यारे१'s picture

28 Apr 2014 - 7:10 pm | प्यारे१

आपली आपण करायची... गुर्जी बिनकामाचे असतात.

तुला 'अणुभव' नाही काय? ;)

यसवायजी's picture

28 Apr 2014 - 8:11 pm | यसवायजी

@ आपली आपण करायची... >>
मी फक्त सजावट म्हणालो, धूळवड नाही काही.

@गुर्जी बिनकामाचे असतात >>
तुमचा पेर्सोनल 'अणुभव' वाट्टं ? :)) (ह.घ्या)

@तुला 'अणुभव' नाही काय? >>
चार-चौघात असल्या चौकश्या करताय काका?? ;)

बॅटमॅन's picture

29 Apr 2014 - 12:28 am | बॅटमॅन

ळॉळ @ धुळवड =)) अगागागागा =))

>>मी फक्त सजावट म्हणालो, धूळवड नाही काही.

ह्या वाक्यासाठी दंडवत घ्या मालक !! रादर सबंध प्रतिसादासाठीच.

प्यारे१'s picture

29 Apr 2014 - 3:51 pm | प्यारे१

=)) =))

__/\__

तरी सजावट सुद्धा स्वतःच केलेली बरी. उगाच गुर्जी एखादा गुलाब काट्यासकट ठेवायचे. ;)

सूड's picture

28 Apr 2014 - 7:08 pm | सूड

एकच नंबर !!

बरेच मेहनतीचे काम आहे. सजावट सुरेख झालीये.

सखी's picture

28 Apr 2014 - 7:16 pm | सखी

सुरेख सप्तपदी आणि त्याच्याच शेवटी व्हॅलटाईन डे सारखे ते हार्ट बघुन जुन्या नव्याचा संगम म्हणतात तो हाच असावा. री-सायकलींग पायघड्याही सुंदर दिसतात.

रुस्तम's picture

28 Apr 2014 - 7:27 pm | रुस्तम

__/\__

मुक्त विहारि's picture

28 Apr 2014 - 7:27 pm | मुक्त विहारि

झक्कास...

सुबोध खरे's picture

28 Apr 2014 - 7:36 pm | सुबोध खरे

वा गुरुजी
परत एकदा बोहोल्यावर उभे राहावे आणि सप्तपदी करावीशी वाटते आहे. बायकोला सुद्धा दाखविले तिचीही तयारी आहेच. फारच सुंदर.

सुरेख आहेत सगळ्याच कलाकृती.

भाते's picture

28 Apr 2014 - 7:52 pm | भाते

इतक्या अप्रतिम रांगोळीवर पाय ठेवायला कोणालाही जिवावर येईल.

किसन शिंदे's picture

28 Apr 2014 - 7:53 pm | किसन शिंदे

अप्रतिम रांगोळी आहे! लै आवडली.

एक शंका, बुवा तुमच्या 'सप्तपदी'ला कोण काढणार ही सप्तपदी? ;-) :-D

प्रचेतस's picture

28 Apr 2014 - 7:56 pm | प्रचेतस

म्हणून तर धागा टाकलाय ना बुवानं.
तुलाच बोलावणार आहे तो खास ठाण्याहून.

पियुशा's picture

29 Apr 2014 - 4:13 pm | पियुशा

@ किसन भाउ
एक शंका, बुवा तुमच्या 'सप्तपदी'ला कोण काढणार ही सप्तपदी?
आपण सगळे मिळुन काढुया की , अर्थात गुर्जीनी आवतन दीले तर :) बाकी सप्तपदी सुरेख !

चौकटराजा's picture

29 Apr 2014 - 5:23 pm | चौकटराजा

१००० टक्के मी बुवांची सपपदीची फुलांची रांगोळी काढणार . बुवा, मला "ती" सजावट करण्याचाही अनुभव आहे बरं का ! नाही म्हणजे उगीच कुठे पयशे घालवू नका .
आमची कुठेही शाखा नाही.

प्रचेतस's picture

28 Apr 2014 - 7:55 pm | प्रचेतस

मस्त.
ते स्प्रिंगल गवत म्हणजे शोभेची कोथिंबीर ना? =))

रेवती's picture

28 Apr 2014 - 8:19 pm | रेवती

आणि तो कामिनी पाला तर कढीपत्त्यासारखा दिसतोय.

प्रचेतस's picture

28 Apr 2014 - 8:22 pm | प्रचेतस

अगदी अगदी.

पैसा's picture

28 Apr 2014 - 8:21 pm | पैसा

काय सुंदर काढल्यात दोन्ही रांगोळ्या! पण खरंच यावर पाय ठेवायला जीव होणार नाही कोणाचा!

मधुरा देशपांडे's picture

28 Apr 2014 - 8:23 pm | मधुरा देशपांडे

सुंदर. आमच्या घरात अशी बरीच उत्साही मंडळी असल्याने घरच्या प्रत्येक लग्नात या सजावटी असतात. त्यामागे किती मेहनत आहे हेही त्यामुळे जाणून आहे.

अप्रतिम रांगोळी.. पाय द्यायला जीवावर येईल..

प्रसाद गोडबोले's picture

28 Apr 2014 - 9:02 pm | प्रसाद गोडबोले

कला आहे बै कला आहे !!

बुवा तुम्ही ऑलराऊंडर गुरुजी दिसता ... हळदीची , जेवळाची, रुखवताची सोयही तुम्ही करत नाही ना ? ;)

मराठे's picture

28 Apr 2014 - 9:05 pm | मराठे

अप्रतीम!

साती's picture

28 Apr 2014 - 9:13 pm | साती

अतिशय सुरेख रांगोळी!

गुर्जी तुम्ही किती पैसे चार्ज करता हो याचे?

पिवळा डांबिस's picture

28 Apr 2014 - 9:46 pm | पिवळा डांबिस

सुरेख!
सुरेख!!
सुरेख!!!

nasatiuthathev's picture

28 Apr 2014 - 10:15 pm | nasatiuthathev

१च नम्बर .....

अजया's picture

28 Apr 2014 - 10:18 pm | अजया

अप्रतिम !

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2014 - 10:18 pm | अत्रुप्त आत्मा

@प्रशांत आवले >>> :D (धाग्याचे!) टायटल..क्लिअर आहे. तुम्हीच गंडलात! ;)

@दिपक.कुवेत @गुर्जी आणा बाबा तो योग लवकर. >>> :D आले एखादीच्या मना!,तरच आपले तन्ना..त ना..ना!!! http://www.easyfreesmileys.com/smileys/grin-0003.gif

@यसवायजी @घरी सोडायला पायघड्या घातल्यात..पुढची सजावट?>>> आमच्या नावे योग्य(भरीव) वजावट-काढल्यास पुढची सजावटंही पुरवतो! (खर्रर्रच! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-041.gif )

@प्रशांत आवले @आपली आपण करायची... गुर्जी बिनकामाचे असतात. >>> =))
थांब हं तुला आता....
प्रशांत आत्मू!
http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/hitting.gif

@सुबोध खरे @परत एकदा बोहोल्यावर उभे राहावे आणि सप्तपदी करावीशी वाटते आहे.>>> वाह! सुंदर भावना! :)

@किसन शिंदे @बुवा तुमच्या 'सप्तपदी'ला कोण काढणार ही सप्तपदी?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-039.gif अरे अजून म्हैस तर पाण्यात'पण नाय! आणि हे एव्हढे हिशोब कुणि करायचे आधी पासनं! ;)

@वल्ली @म्हणजे शोभेची कोथिंबीर ना? >>> नाही.......................ते गवत म्हणजे...................................मार्केटयार्डातील...............
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असो....च्च! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

@रेवती @आणि तो कामिनी पाला तर कढीपत्त्यासारखा दिसतोय.>>> हम्म्म्म...तसाच दिसतो तो! रांगोळी करत असताना बरीच लोकं येऊन "हा काय कढीपत्ता का हो?" असच विचारतात. :)

@मधुरा देशपांडे @त्यामागे किती मेहनत आहे हेही त्यामुळे जाणून आहे.>>> हम्म्म..धन्यवाद! आपण माझा या धाग्यात उल्लेख केलेला फुलं-कटिंगच्या तंत्राविषयीचा धागाही पहा. आणि कसा वाटला ते कळवा. :)

@प्रसाद गोडबोले @बुवा तुम्ही ऑलराऊंडर गुरुजी दिसता>>> हां जी! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif @हळदीची,जेवळाची,रुखवताची सोयही तुम्ही करत नाही ना?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-059.gif आपणास करावी... असे वाटत असेल,तर करतो! आणि करू नये,असे वाटत असेल...तर करत नाही! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/stuck-out-tongue-smiley-emoticon.gif

@ आदूबाळ >>> व्य.नि. पहा. :)

आपणास करावी... असे वाटत असेल,तर करतो! आणि करू नये,असे वाटत असेल...तर करत नाही!

=)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2014 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

हळदीची,जेवळाची,रुखवताची सोयही तुम्ही करत नाही ना

रुखवताची सोय करतात वाट्टे... वरती बघा ना आवल्यांना हातातल्या ' लाटण्यानेच ' टेंगुळ येई पर्यंत मारलंय. :) :)

@ गुर्जी :- जोरात घ्या..

अत्रुप्त आत्मा's picture

28 Apr 2014 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा

@आवल्यांना हातातल्या 'लाटण्यानेच' टेंगुळ येई पर्यंत मारलंय.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

@गुर्जी:-जोरात घ्या..>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-stargate007.gif आ..........नन्दिता!!! :-/ दुष्ट....छळू.....वगैरे..वगैरे...........!!!http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2014 - 10:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

अ प्र ति म !!!!!!!!!!!!!!!!

फुलांच्या रांगोळीवर पाय द्यायला जरासं जिवावर आलं तरी तो अनुभव मात्र जन्मभर आठवणीत राहण्यासारखा असणार हे नक्की !

खटपट्या's picture

28 Apr 2014 - 10:59 pm | खटपट्या

जबरी आहे !!!! याचे वेगळे किती पैसे आकारता ते सांगितले नाही !!!

गुर्जी, तुमच्या हातात कला आहे बॉ _/\_ लै म्ह. लैच भारी.

बाकी शोभेच्या कोथिंबिरीचे नामकरण करणारा मी पयला =))

विजुभाऊ's picture

29 Apr 2014 - 1:58 am | विजुभाऊ

गुर्जी..... इतकी मस्त सप्तपदी पाहिल्यावर पुन्हा एकदा ती " तप्तपदी " चालायला हरकत नाही असे वाटायला लागलय. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Apr 2014 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो हो पुन्हा एकदा आपलाच 'पसारा' घेऊन सप्तपदी आणि पायघड्यावरुन चालायचा विचार यावा इतक्या मनमोहक फुलांची रांगोळी. गुरुजी बाकी कला आहे राव तुमच्या हातात.

(आपल्या कलेवर फिदा होऊन मी त्या सारख्या मधे मधे येणा-या स्मायल्यांना क्षमा करतो. ;) )

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2014 - 9:15 am | अत्रुप्त आत्मा

@मधे मधे येणा-या स्मायल्यांना क्षमा करतो. >>> =))

स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे..त्यांच्या शिवाय लेखन करणं बिकट आहे! =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2014 - 12:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे

अंहं...वरीजनल आयुष्यात हस-या स्मायली सारखं गोड काही नाही.

-दिलीप बिरुटे
(हस-या स्मायलींचा चाहता) :)

अहो तिखट म्ह. मसाला असं समजा की प्राडॉ.

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2014 - 3:19 am | सानिकास्वप्निल

सुरेख!!
__/\__

नंदन's picture

29 Apr 2014 - 5:13 am | नंदन

अप्रतिम!

स्पंदना's picture

29 Apr 2014 - 7:34 am | स्पंदना

वाह ! गुर्जी ! वाह!
सप्तपदी, पायघड्या तर सुरेख आहेतच, पण प्रतिसादात बॅटींग सुद्धा एकदम दमदार.
धागा तर आवडलाच पण प्रतिसादसुद्धा आवडले.

सौंदाळा's picture

29 Apr 2014 - 9:56 am | सौंदाळा

अप्रतिम कलाकारी
रेसिपी स्टाइलने पेश करायची कल्पनासुध्दा मस्तच

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Apr 2014 - 10:15 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मस्त मस्त,

गुरुजींचे कसब आणि कष्ट दोन्हीला मनापासुन नमस्कार.

फुलांचे रीसायकलिंग करण्याची आयडिया आवडली.

माहितगार's picture

29 Apr 2014 - 10:34 am | माहितगार

लय भारी !!

मृत्युन्जय's picture

29 Apr 2014 - 10:35 am | मृत्युन्जय

देवा दंडवत स्वीकारा. अजोड कला आहे तुमच्या हातात.

दिव्यश्री's picture

29 Apr 2014 - 3:29 pm | दिव्यश्री

अर्र्रे सहीच काय फोटो आहेत . मस्त . काय कला आहे व्वा !!!
पारण फिटलं डोळ्याचं . :)

कवितानागेश's picture

29 Apr 2014 - 3:44 pm | कवितानागेश

आहा. दोन्ही रान्गोळ्या अगदी गालिच्यासारख्या दिसतायत.
फारच सुंदर. :)

अनन्न्या's picture

29 Apr 2014 - 4:31 pm | अनन्न्या

__/\__

बाळ सप्रे's picture

29 Apr 2014 - 4:44 pm | बाळ सप्रे

लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात???
आम्हाला भेटलेले सगळे गुर्जी एकदम grumpy old men होते!!

गुर्जींकडुन जास्तीत जास्त कलाकुसर म्हणजे आंब्याच्या पानातनं रांगोळी काढणे ही पाहिली आहे!!

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2014 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा

@लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात??? >>> सामान्यतः कुणिही करत नाहीत.कारण हा धर्मशास्त्राचा भाग नाही.
ही फुलं..ह्या रांगोळ्या..सप्तपदी,,ही आपली माझी वैयक्तिक कला आहे. तिचा मी काहि वेळा फक्त कला म्हणून तर काहि वेळा..पूर्ण व्यावसाइक-कलाकारी म्हणून वापर करत असतो.

हां.... अता आमच्या क्षेत्रातली काहि मंडळी उत्तम रांगोळ्या काढतात..माझा एक मित्र-गणेश खरे हा तर भटजी आहे,शिवाय प्रोफेशनल चित्र-रंगावलीकार सुद्धा आहे. पण फुलांच्या रांगोळ्या..या अश्या (माझ्या पद्धतीच्या) इतरत्र होत नाहीत. माझे काहि मित्रही या फुलरांगोळ्या काढू शकतात/काढतातही..पण अगदी म्हणजे..अगदी क्वचित..(बरेचदा..स्वतःच्या घरच्या कार्यक्रमांना) त्यांचं म्हणणं-याची(नेहमी) गरज काय????? असंही असतं. :)

आमच्यातल्या अनेकांना या (कले)चा पोथि-बाहेरचं म्हणून (खरच!) तिरस्कारही आहे. तरिही मी गेल्या ५ वर्षात आलेल्या नविन गँग पैकी काहि जणांना मार्केटयार्डात फुलं खरेदीला वारंवार पाहिलं आहे. आणि त्यांच्या रांगोळ्या'ही पाहिल्या आहेत. हा नवप्रकार हळूहळू जम धरतो आहे..आणि मला त्याचा आनंद आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-smiley-emoticon-emoji.png
========================
गणेश खरे..यानी रांगोळी/रंगांनी काढलेली ही काहि चित्र...
https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/p720x720/1001026_576297372409045_2124437758_n.jpg
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/q77/s720x720/1150253_664132550292193_1630623020_n.jpg

दोन्ही रांगोळ्या सुंदर आल्यात. बाळ शंकर म्हणजे गोडुलं बाळ आहे.

स्पंदना's picture

30 Apr 2014 - 7:16 am | स्पंदना

हो ना! फारच गोड बाळ्या आहे.
दुसरं चित्रपण मस्तच.

बाळ खरे चुकून भटजीच्या लायनीत गेलेत असं वाटतंय ! किंवा पुरोहीत्य हा त्यांचा जोडधंदा असावा…

खटपट्या's picture

30 Apr 2014 - 2:56 am | खटपट्या

सॉरी, गणेश खरे !!

यशोधरा's picture

30 Apr 2014 - 7:29 am | यशोधरा

दुसरं रांगोळी-चित्र फारच आवडलं!

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Apr 2014 - 12:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

दोन्ही रांगोळ्या मस्त आहेत.

पण दोन्ही रांगोळ्यांच्या खाली केलेल्या सह्यां मधे बराच फरक आहे.

शंकराजीपंत इतके अ‍ॅडोरेबल इ. कधी नस्तात फारसे. तशा रूपात पाहून मजा वाटली.

बाकी दुसरे चित्र लैच जबरी.

मनीषा's picture

29 Apr 2014 - 10:26 pm | मनीषा

अप्रतिम

अत्रुप्त आत्मा's picture

6 May 2014 - 8:24 pm | अत्रुप्त आत्मा

सर्वांचे मनःपूर्वक आभार! *yes3*

एकदम सुंदर !ह्या सप्तपदीचा चांगला प्रसार व्हावा 😃
घरात सगळ्या पाहिलं माझच उरकल्यामुळे अशा बर्याच कल्पक गोष्टी राहून गेल्या.नंतर मात्र जिथे जमेल त्या कार्यात मी माझी कल्पकता वापरते ,आता ही वापरणार :)... एवढ्या सुंदर सप्तपदीवर कोणतीही वधू फिदा होईल एक सुंदर आठवण तयार होईल :)

अत्रुप्त आत्मा's picture

17 Dec 2021 - 3:43 pm | अत्रुप्त आत्मा

धन्यवाद.