फुलांची महामंडई-मार्केट यार्ड-पुणे

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
11 Feb 2012 - 11:04 pm

मार्केट यार्ड...पुणे हे एक संपुर्ण वेगळं जग आहे...त्या विषयीचा लेख लिहायचा म्हणजे कमितकमी तिथला १वर्षाचा(१२महिने/२४तसाचा) परिपुर्ण अनुभव हवा...पण आज आपण जी सचित्र ओळख करुन घेणार आहोत तो या अ-खंड मार्केटयार्डचा शतांश आहे असं मानलं तरी चालेल...हे आहे फुलांचे मार्केट ऊर्फ फुलांची महामंडई(माझा या अफाट जगाताशी संमंध आला,तो या फुलांच्या रांगोळीच्या वेडापायी..)---तर चला मग मारायचा फेरफटका....१)हे कॉमन पेड पार्किंग..हा फटू टाकण्याचं कारण...ही सामान्य दिवशी असलेली वाहन गर्दी आहे,,फुल्ल सिझनला इथे खरच गाडी ठेवायला सुद्धा जागा नसते..
२)ही आमच्या मार्केटची येंट्री..---

३)हम्मम्म...चला अता इथुन आत घुसायचं(हा फोटो श्रावणात कधीही मिळणार नाही..अत्ता स्लॅकचे दिवस म्हणुन आला)

४)(आंम्हा) गिर्‍हाइकांची रोजची घासाघीस--पुढचे दोन फोटो..


५)अता हा बघा गोल्डन (फुलांना दिलेली सगळी नावं आम्च्या मार्केटयार्ड मधली आहेत..ती तशीच ठेवत आहे नाय तर चव बिघडेल ;-) )




६)ही आली बघा तुळजापुरी/उर्फ कापरी...

आणी हे बघा..कसं हळदी कुंकवावानी वाटतय की नै..?

हाय का नै तुळजापुरी कुंकवावानी...मंsssग...

७)आता बिजली..बिजली हां..का..!(नाय तर म्होरल्या टायमाला रुसल माज्याव..ती..!)

हा...हितं बगा कशी पाल्याच्या अन..गोंड्याच्या फुड सवताला जागा करुन घेतलीये..लांबुनच खुणावतीये हाय का नै..?

८)अता ह्यो बगा ह्यो अश्टर..याचा खरा सिजन नाय अत्ता..पन आला की कदी कदी येकदम फुलटोस फ्रेस असतो,,

नाय तं हा खाली हाय तसा मुडदुसावानी पडल्येला...(याला खरा जोर श्रावणात चढतो)

९) आता छडी..छडी..मै गुल-छडी बर्का...


१०)आन ह्यो मोगर्‍याचा भाऊ काकडा..(बिन वासाचा..पन साल्याची मार्केटवर पकड काय जबर हाय...चांगला दिसतो ना...सलमान खान सारखा....!)

११)आनी ह्ये त्याचे हुजरे---आपलं सॉरी...गजरे

स्वतः उठुन दिसावं..म्हणुन बघा कसा माझ्या अबोली बायांच्या मधेच जाऊन बसलाय..

ही आम्ची लाजरी/बुजरी अबोली बाय

वैतागलीये पार लटकुन..लटकुन

हितं बी त्येच...गरिबाघरच्या पोरिवानी सद् गुणी असुन बी लवकर खपत नाय हो पोर...!

१२)हा पाला...मंजे शो ची कोथिंबिर


हे फुडचे सगळे प्रकार सजावटीच्या गवत-पाल्यांचे...नावं..?मलाच न्हाय ठावं,त तुमाला कुटुन सांगू..





१३) हा आता या फुडं गुलाबा पासुन सगळे फ्यान्सी आयटम बर्का...म्या फकस्त नावं सांगनार हाय...वळख/बिळख काढुन रेट काढायचा असल,तर आपलं आपन जायाचं बरं का... ;-)
गुलाब...

ह्यो डच गुलाब

हा बघा चाल्ला गावाला...

अता आला जलं-बेरा...


हा बुक झालेला(आमच्या मार्केट भाषेत-गेलेला...)

हा म्हमैला चालला...

आन ह्यो पार्सल होऊन इमानातनं जानार बर्का...पेशल....पेशल सर्विस म्हनत्यात न्हव का...त्ये त्ये त्ये... ;-)

आता हे बघा ऑर्किड---जांभळं


आणी हे सफेद...

अता ह्ये पान...बर्का...पान...सिझन ला दिडशे रुपायला यक जातं---त्येबी दुपारी बारा नंतरचा रेट.. ;-)



अता ह्ये बुके....वल्यांची सामग्री इकनारे दुकानं बघा...




ह्ये आम्चं आतल्या गोटातलं जुनं हार/तोरणाची सामग्री इकनारं दुकान

ही फुलातुन--फळाकडे जाण्याची एकेकाळची चोर वाट,म्हणजे अत्ताचा राजमार्ग..

ही आमची मार्केट मधली आवडती श्रम-परीहाराची जागा...पुरी-भाजी आणी खास करुन चहा,,,एकदा येऊनच पहा.... :-)

आणी अश्या तर्‍हेनी सगळं मार्केट पालथं घालुन नी फुलाच्या पिशव्या गाडीला मारुन थकुन/भागुन आंम्ही घरला येऊन जे पडतो...ते सांजच्याला उठतो आणी दुसर्‍या दिवशी एखाद दोन यजमानांकडे रांगोळी साठीच्या फुलांचं बरचसं कटींग करायला बसतो...आणी मग तयार होते...ही अशी.......

फुलांची रांगोळी... :-)

वावरसमाजजीवनमानविचारअनुभवमाहितीआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

11 Feb 2012 - 11:16 pm | प्रचेतस

मस्त हो भटजीबुवा,
टवटवित फुलांचे ढीगच्या ढीग पाहून मन अगदी प्रफुल्लित झालं.
पुण्यातल्या एका वेगळ्याच जगाचं दर्शन तुम्ही घडवलंत.
मार्केटयार्डात आंब्याच्या सीझनला फळबाजारात कित्येकदा गेलोय पण आता फुलांचे हे राज्य पाहायला जायलाच हवं.
फुलांचे वर्णनही एकदम मजेदार. :)

लय भारी वर्णन हाये य्कदम हाउस फुल्ल!!! शेवाट्ली रांगोळी तर झक्कासच.... :)

अन्या दातार's picture

11 Feb 2012 - 11:27 pm | अन्या दातार

मार्केटमधली सफर आवडली हो भटजीबुवा. एकदा वाशीच्या मार्केटमध्ये (कृषी उत्पन्न बाजार समिती) गेलेलो होतो, त्याची आठवण झाली. आता असाच एक लेख तिथल्या व्यवहारांवरपण येऊद्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2012 - 2:11 pm | अत्रुप्त आत्मा

@आता असाच एक लेख तिथल्या व्यवहारांवरपण येऊद्यात.>>> नक्कीच...ते मनात आहेच...फक्त जरा मोकळा वेळ असेल तेंव्हा... :-)

कुंदन's picture

12 Feb 2012 - 1:17 am | कुंदन

आत्मा तृप्त झाला फुले बघुन.

मराठे's picture

12 Feb 2012 - 2:10 am | मराठे

नुसते फोटो बघुनच सगळ्या फुलांचा मिश्र वास मनात रुंजी घालायला लागतो.
शेवटची रांगोळीपण झकास. (वॅलेंन्टाईन स्पेशल दिसतेय)

चिंतामणी's picture

12 Feb 2012 - 2:15 am | चिंतामणी

लै भारी रे गड्या.

प्राजु's picture

12 Feb 2012 - 2:23 am | प्राजु

मस्त!
अशी ढीगभर फुलं बघून एकदम फ्रेश वाटलं.

अन्नू's picture

12 Feb 2012 - 3:15 am | अन्नू

फोट्टु जाम आवडले बरं का! वेगवेगळ्या कलरची फुलं बघुन "दिल बागबान हो गया च!!"
बाकी ते मार्केटच्या इंट्रीची वाट दाखवणार्‍या फोट्टुत फुलांचा बाजार विभाग बोर्डाच्या वर

सावधान! प्रवेश बंद!! अशा पाट्या का बरं लावल्या आहेत? Smiley

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2012 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

@अशा पाट्या का बरं लावल्या आहेत?>>> छोट्या गाड्या आत घुसुन गर्दी ऊडू नये म्हणुन.. :-)

टू व्हिलरचे पार्किंग स्वतंत्र आहे...तरी स्थळ/काळ न बघता घुसणार्‍यांसाठी लावलेली पाटी आहे ती.. ;-)

वपाडाव's picture

12 Feb 2012 - 5:09 am | वपाडाव

क ड क ... फ टु...

रेवती's picture

12 Feb 2012 - 5:38 am | रेवती

एकदम छान!
जलं बेरा भारी.;)
रांगोळी नेहमीप्रमाणे फर्मास!

शिल्पा ब's picture

12 Feb 2012 - 8:48 am | शिल्पा ब

वाह!!!

पैसा's picture

12 Feb 2012 - 10:06 am | पैसा

सकाळी सकाळी फुलांचे मस्त फोटो बघून प्रसन्न वाटलं हो गुर्जी! रांगोळी पण एकदम झक्क!!

मयुरपिंपळे's picture

12 Feb 2012 - 11:55 am | मयुरपिंपळे

अजुन फोटु चे दर्शन नाही झाले. Smiley

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2012 - 2:21 pm | अत्रुप्त आत्मा

@अजुन फोटु चे दर्शन नाही झाले >>> समय और भाग्य से अधिक कुछ नही मिलता ;-)

सोत्रि's picture

12 Feb 2012 - 12:16 pm | सोत्रि

गुर्जी लैभारी!

- (गुर्जींची रांगोळीकला प्रत्यक्ष अनुभवलेला) सोकाजी

छान माहिती
फुलांचे फोटो पाहून प्रसन्न वाटलं

पाषाणभेद's picture

12 Feb 2012 - 3:34 pm | पाषाणभेद

सुंदर फोटो

किचेन's picture

12 Feb 2012 - 7:36 pm | किचेन

फोटो सुन्दर.माहिति भारि

लकडी पुल आणि सदाशिव पेठेच्या पुढच्या पुण्याबद्दल बोलल्याबद्द्ल धन्यवाद भटजीबुवा,

अवांतर - आता या न्यायानं मला बुधवार पेठेवर लेख लिहावा लागेल की काय ?

अत्रुप्त आत्मा's picture

13 Feb 2012 - 9:10 am | अत्रुप्त आत्मा

@आता या न्यायानं मला बुधवार पेठेवर लेख लिहावा लागेल की काय ?>>> लिहा..लिहा.. आंम्ही तोही वाचू ;-)
ज्याचा त्याचा व्या-संगं ... ;-)

अत्रुप्त आत्मा's picture

13 Feb 2012 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा

मार्केटयार्ड भेटीस आलेल्या/येणार्‍या सर्वांचे मनःपूर्वक आभार.. :-)

दादा कोंडके's picture

13 Feb 2012 - 12:49 am | दादा कोंडके

एकदा जाउन यायला पाहिजे.

सुहास झेले's picture

13 Feb 2012 - 7:02 am | सुहास झेले

व्वा व्वा भटजीबुवा... दिल गार्डन गार्डन हो गया. शेवटची रांगोळी तर झक्कास!!!

प्यारे१'s picture

13 Feb 2012 - 10:14 am | प्यारे१

जबरा भटजी....!

अप्रतिम फोटू हो गुर्जी
तुमची फुलांच्या रांगोळ्या काढण्याची कला तर खासच
जियो

इरसाल's picture

13 Feb 2012 - 10:23 am | इरसाल

तुमची रान्गोळी कला वाखाणण्याजोगी आहे महाराज.....................
व्रुत्तान्तही छान.

मी-सौरभ's picture

13 Feb 2012 - 10:58 am | मी-सौरभ

तुमच्यामुळे पुण्यातल्या अनवट जागांची माहिती मिपाकरांना होत आहे.
तुमचे लेख हे लेखमालेतले एक एक पुष्पच वाटत आहेत.

पु.ले.शु.

विजुभाऊ's picture

13 Feb 2012 - 3:10 pm | विजुभाऊ

आज मी फुलांचा बाजार पाहीला
कट्यासवे कळ्यांचा शेजार पाहीला

अत्रुप्त आत्मा's picture

14 Feb 2012 - 7:08 pm | अत्रुप्त आत्मा

कट्यासवे कळ्यांचा शेजार पाहीला

शेर भावपूर्ण आहे, छानच आहे...पण तो इथे का शेअर केला ते नाही कळ्ळं..? विशेषतः दुसरी ओळ...

धनुअमिता's picture

14 Feb 2012 - 12:52 pm | धनुअमिता

फोटो आणि वर्णन अप्रतिम.

गुलाब तर खुपच छान दिसत आहेत.

वाह. मस्त वाटल फोटो पाहुन.

तर्री's picture

15 Feb 2012 - 12:40 pm | तर्री

चांगले फोटोनां व समर्पक वर्णनची जोड मिळाली.
त्या शोभेच्या कोथिंबीरीला "झिप्री " म्हणतात का ?
जर्बेरा ( जल-बेला झकासच ) चे फोटो सुरेखच.
ऑर्किड भारतात पिकतात/ फुलतात का ?

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2012 - 12:42 am | अत्रुप्त आत्मा

@त्या शोभेच्या कोथिंबीरीला "झिप्री " म्हणतात का ?>>> असेल तेही एक नाव..पण आम्चं यार्डातलं नाव-पाला
@ऑर्किड भारतात पिकतात/ फुलतात का ?>>> होय...ग्रीन(पॉली) हाऊस मधे फुलतात...ती आणी तशी अनेक विदेशी फुलंही... जर्बेरा,डच गुलाब,पान इ.इ.इ.

कडक ..

आणि

फुलांच्या दुकानात आत गेल्या गेल्या जे पहिले दुकान लागते , तेथे माझा पाहुणा काम करतो बर का ..

मदत हवी असेल तर सांगणे..

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2012 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा

@मदत हवी असेल तर सांगणे.. >>>धन्यवाद..गनेसभाऊ... त्याचे नाव आणी नं व्यनीत कळवा..प्लीज.. :-)

किसन शिंदे's picture

15 Feb 2012 - 4:15 pm | किसन शिंदे

५)अता हा बघा गोल्डन (फुलांना दिलेली सगळी नावं आम्च्या मार्केटयार्ड मधली आहेत..ती तशीच ठेवत आहे नाय तर चव बिघडेल Wink )

ओ भटजी बुवा, या फोटोंच्या रांगेत गोल्ड्नच्या नावावर तुम्ही पिवळ्या गोंड्याला(झेंडू) खपवताय. आणि हा त्याच्यावर सरळ सरळ अन्याय आहे. :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2012 - 12:44 am | अत्रुप्त आत्मा

@!आणि हा त्याच्यावर सरळ सरळ अन्याय आहे.>>> हा अन्याय नाही हा *अ-न्याय आहे... तुमच म्हणणं बराब्बर असलं,तरी आमच्या मार्केट यार्डात जो फुलाचा रंग ते त्याचं नाव,आणी जे फुलांचे अंग त्ये त्याच गाव... बस्स...! :-)

*अ-न्याय--- अत्रुप्त आत्म्याचा न्याय.. ;-)

अरुणा's picture

16 Mar 2012 - 12:02 pm | अरुणा

खुपच छान लिहिलय ..... मस्त .... अन् हे जग तर माहितच नव्ह्ते आम्हाला ... :)

इरसाल's picture

16 Mar 2012 - 2:42 pm | इरसाल

मिपात अजुन एक संस्थानिकेची भर.......(आधीच एक संस्थानिक आहे.)