मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फुलांची महामंडई-मार्केट यार्ड-पुणे

अत्रुप्त आत्मा · · जनातलं, मनातलं
मार्केट यार्ड...पुणे हे एक संपुर्ण वेगळं जग आहे...त्या विषयीचा लेख लिहायचा म्हणजे कमितकमी तिथला १वर्षाचा(१२महिने/२४तसाचा) परिपुर्ण अनुभव हवा...पण आज आपण जी सचित्र ओळख करुन घेणार आहोत तो या अ-खंड मार्केटयार्डचा शतांश आहे असं मानलं तरी चालेल...हे आहे फुलांचे मार्केट ऊर्फ फुलांची महामंडई(माझा या अफाट जगाताशी संमंध आला,तो या फुलांच्या रांगोळीच्या वेडापायी..)---तर चला मग मारायचा फेरफटका....१)हे कॉमन पेड पार्किंग..हा फटू टाकण्याचं कारण...ही सामान्य दिवशी असलेली वाहन गर्दी आहे,,फुल्ल सिझनला इथे खरच गाडी ठेवायला सुद्धा जागा नसते.. २)ही आमच्या मार्केटची येंट्री..--- ३)हम्मम्म...चला अता इथुन आत घुसायचं(हा फोटो श्रावणात कधीही मिळणार नाही..अत्ता स्लॅकचे दिवस म्हणुन आला) ४)(आंम्हा) गिर्‍हाइकांची रोजची घासाघीस--पुढचे दोन फोटो.. ५)अता हा बघा गोल्डन (फुलांना दिलेली सगळी नावं आम्च्या मार्केटयार्ड मधली आहेत..ती तशीच ठेवत आहे नाय तर चव बिघडेल ;-) ) ६)ही आली बघा तुळजापुरी/उर्फ कापरी... आणी हे बघा..कसं हळदी कुंकवावानी वाटतय की नै..? हाय का नै तुळजापुरी कुंकवावानी...मंsssग... ७)आता बिजली..बिजली हां..का..!(नाय तर म्होरल्या टायमाला रुसल माज्याव..ती..!) हा...हितं बगा कशी पाल्याच्या अन..गोंड्याच्या फुड सवताला जागा करुन घेतलीये..लांबुनच खुणावतीये हाय का नै..? ८)अता ह्यो बगा ह्यो अश्टर..याचा खरा सिजन नाय अत्ता..पन आला की कदी कदी येकदम फुलटोस फ्रेस असतो,, नाय तं हा खाली हाय तसा मुडदुसावानी पडल्येला...(याला खरा जोर श्रावणात चढतो) ९) आता छडी..छडी..मै गुल-छडी बर्का... १०)आन ह्यो मोगर्‍याचा भाऊ काकडा..(बिन वासाचा..पन साल्याची मार्केटवर पकड काय जबर हाय...चांगला दिसतो ना...सलमान खान सारखा....!) ११)आनी ह्ये त्याचे हुजरे---आपलं सॉरी...गजरे स्वतः उठुन दिसावं..म्हणुन बघा कसा माझ्या अबोली बायांच्या मधेच जाऊन बसलाय.. ही आम्ची लाजरी/बुजरी अबोली बाय वैतागलीये पार लटकुन..लटकुन हितं बी त्येच...गरिबाघरच्या पोरिवानी सद् गुणी असुन बी लवकर खपत नाय हो पोर...! १२)हा पाला...मंजे शो ची कोथिंबिर हे फुडचे सगळे प्रकार सजावटीच्या गवत-पाल्यांचे...नावं..?मलाच न्हाय ठावं,त तुमाला कुटुन सांगू.. १३) हा आता या फुडं गुलाबा पासुन सगळे फ्यान्सी आयटम बर्का...म्या फकस्त नावं सांगनार हाय...वळख/बिळख काढुन रेट काढायचा असल,तर आपलं आपन जायाचं बरं का... ;-) गुलाब... ह्यो डच गुलाब हा बघा चाल्ला गावाला... अता आला जलं-बेरा... हा बुक झालेला(आमच्या मार्केट भाषेत-गेलेला...) हा म्हमैला चालला... आन ह्यो पार्सल होऊन इमानातनं जानार बर्का...पेशल....पेशल सर्विस म्हनत्यात न्हव का...त्ये त्ये त्ये... ;-) आता हे बघा ऑर्किड---जांभळं आणी हे सफेद... अता ह्ये पान...बर्का...पान...सिझन ला दिडशे रुपायला यक जातं---त्येबी दुपारी बारा नंतरचा रेट.. ;-) अता ह्ये बुके....वल्यांची सामग्री इकनारे दुकानं बघा... ह्ये आम्चं आतल्या गोटातलं जुनं हार/तोरणाची सामग्री इकनारं दुकान ही फुलातुन--फळाकडे जाण्याची एकेकाळची चोर वाट,म्हणजे अत्ताचा राजमार्ग.. ही आमची मार्केट मधली आवडती श्रम-परीहाराची जागा...पुरी-भाजी आणी खास करुन चहा,,,एकदा येऊनच पहा.... :-) आणी अश्या तर्‍हेनी सगळं मार्केट पालथं घालुन नी फुलाच्या पिशव्या गाडीला मारुन थकुन/भागुन आंम्ही घरला येऊन जे पडतो...ते सांजच्याला उठतो आणी दुसर्‍या दिवशी एखाद दोन यजमानांकडे रांगोळी साठीच्या फुलांचं बरचसं कटींग करायला बसतो...आणी मग तयार होते...ही अशी....... फुलांची रांगोळी... :-)

वाचने 16982 वाचनखूण प्रतिक्रिया 41

प्रचेतस 11/02/2012 - 23:16
मस्त हो भटजीबुवा, टवटवित फुलांचे ढीगच्या ढीग पाहून मन अगदी प्रफुल्लित झालं. पुण्यातल्या एका वेगळ्याच जगाचं दर्शन तुम्ही घडवलंत. मार्केटयार्डात आंब्याच्या सीझनला फळबाजारात कित्येकदा गेलोय पण आता फुलांचे हे राज्य पाहायला जायलाच हवं. फुलांचे वर्णनही एकदम मजेदार. :)

अन्या दातार 11/02/2012 - 23:27
मार्केटमधली सफर आवडली हो भटजीबुवा. एकदा वाशीच्या मार्केटमध्ये (कृषी उत्पन्न बाजार समिती) गेलेलो होतो, त्याची आठवण झाली. आता असाच एक लेख तिथल्या व्यवहारांवरपण येऊद्यात.

In reply to by अन्या दातार

@आता असाच एक लेख तिथल्या व्यवहारांवरपण येऊद्यात.>>> नक्कीच...ते मनात आहेच...फक्त जरा मोकळा वेळ असेल तेंव्हा... :-)

अन्नू 12/02/2012 - 03:15
फोट्टु जाम आवडले बरं का! वेगवेगळ्या कलरची फुलं बघुन "दिल बागबान हो गया च!!" बाकी ते मार्केटच्या इंट्रीची वाट दाखवणार्‍या फोट्टुत फुलांचा बाजार विभाग बोर्डाच्या वर सावधान! प्रवेश बंद!! अशा पाट्या का बरं लावल्या आहेत? Smiley

In reply to by अन्नू

@अशा पाट्या का बरं लावल्या आहेत?>>> छोट्या गाड्या आत घुसुन गर्दी ऊडू नये म्हणुन.. :-) टू व्हिलरचे पार्किंग स्वतंत्र आहे...तरी स्थळ/काळ न बघता घुसणार्‍यांसाठी लावलेली पाटी आहे ती.. ;-)

पैसा 12/02/2012 - 10:06
सकाळी सकाळी फुलांचे मस्त फोटो बघून प्रसन्न वाटलं हो गुर्जी! रांगोळी पण एकदम झक्क!!

सोत्रि 12/02/2012 - 12:16
गुर्जी लैभारी! - (गुर्जींची रांगोळीकला प्रत्यक्ष अनुभवलेला) सोकाजी

५० फक्त 13/02/2012 - 00:00
लकडी पुल आणि सदाशिव पेठेच्या पुढच्या पुण्याबद्दल बोलल्याबद्द्ल धन्यवाद भटजीबुवा, अवांतर - आता या न्यायानं मला बुधवार पेठेवर लेख लिहावा लागेल की काय ?

In reply to by ५० फक्त

@आता या न्यायानं मला बुधवार पेठेवर लेख लिहावा लागेल की काय ?>>> लिहा..लिहा.. आंम्ही तोही वाचू ;-) ज्याचा त्याचा व्या-संगं ... ;-)

मी-सौरभ 13/02/2012 - 10:58
तुमच्यामुळे पुण्यातल्या अनवट जागांची माहिती मिपाकरांना होत आहे. तुमचे लेख हे लेखमालेतले एक एक पुष्पच वाटत आहेत. पु.ले.शु.

In reply to by विजुभाऊ

कट्यासवे कळ्यांचा शेजार पाहीला शेर भावपूर्ण आहे, छानच आहे...पण तो इथे का शेअर केला ते नाही कळ्ळं..? विशेषतः दुसरी ओळ...

तर्री 15/02/2012 - 12:40
चांगले फोटोनां व समर्पक वर्णनची जोड मिळाली. त्या शोभेच्या कोथिंबीरीला "झिप्री " म्हणतात का ? जर्बेरा ( जल-बेला झकासच ) चे फोटो सुरेखच. ऑर्किड भारतात पिकतात/ फुलतात का ?

In reply to by तर्री

@त्या शोभेच्या कोथिंबीरीला "झिप्री " म्हणतात का ?>>> असेल तेही एक नाव..पण आम्चं यार्डातलं नाव-पाला @ऑर्किड भारतात पिकतात/ फुलतात का ?>>> होय...ग्रीन(पॉली) हाऊस मधे फुलतात...ती आणी तशी अनेक विदेशी फुलंही... जर्बेरा,डच गुलाब,पान इ.इ.इ.

किसन शिंदे 15/02/2012 - 16:15
५)अता हा बघा गोल्डन (फुलांना दिलेली सगळी नावं आम्च्या मार्केटयार्ड मधली आहेत..ती तशीच ठेवत आहे नाय तर चव बिघडेल Wink )
ओ भटजी बुवा, या फोटोंच्या रांगेत गोल्ड्नच्या नावावर तुम्ही पिवळ्या गोंड्याला(झेंडू) खपवताय. आणि हा त्याच्यावर सरळ सरळ अन्याय आहे. :)

In reply to by किसन शिंदे

@!आणि हा त्याच्यावर सरळ सरळ अन्याय आहे.>>> हा अन्याय नाही हा *अ-न्याय आहे... तुमच म्हणणं बराब्बर असलं,तरी आमच्या मार्केट यार्डात जो फुलाचा रंग ते त्याचं नाव,आणी जे फुलांचे अंग त्ये त्याच गाव... बस्स...! :-) *अ-न्याय--- अत्रुप्त आत्म्याचा न्याय.. ;-)

इरसाल 16/03/2012 - 14:42
मिपात अजुन एक संस्थानिकेची भर.......(आधीच एक संस्थानिक आहे.)