फुलांच्या रांगोळ्या-काहि तंत्र...!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
27 Jul 2013 - 12:41 am

आज मी आपल्या समोर सादर करणार आहे-फुलांच्या रांगोळ्या कश्या काढाव्या? याच्या काहि व्हिडिओ क्लिपिंग्ज आणी माहिती.होतं काय,की खूपजण ह्या रांगोळ्या बघतात.त्यांना त्या अवडतात,आणी ''गुर्जी आंम्हाला पण थोडं शिकवा की टेक्निक!'' अशी विचारणा सुरू होते. मग मी असा विचार केला की इथे मिपावरपण मी माझ्या फुलांच्या रांगोळ्या दाखवल्या आहेत. http://misalpav.com/node/23831 आणी त्यातंही "रांगोळ्यांच्या" तांत्रिकतेबद्दल,अगदी माफक का होइ ना...पण,चर्चा/विचारणा झाल्या होत्याच

म्हणूनच त्याचा पुढचा टप्पा किंबहूना त्या अधिचाच टप्पा म्हणून काहि मूलभूत तंत्र आज इथे सांगत आहे.कारण या रांगोळ्या काढण्यात तंत्राशिवाय ज्या गोष्टिंची गरज असते,अश्या गोष्टी म्हणजे अंगभूत कला/आवड(हौस नव्हे!)/रंगसंगतीचं उपजत ज्ञान/संयम आणी सगळ्यात महत्वाची-चिकाटी! बास्स...,या सर्व गोष्टी ज्याच्याकडे मुळातच आहेत, त्यानी यातली तंत्र शिकली,की तो यातला माश्टर झालाच!

फुलांच्या रांगोळ्यांमधे या रांगोळ्या आकर्षक/सुबक/प्रमाणबद्ध होण्याकरिता फुलांच्या कटिंगची काहि तंत्र आहेत,त्याचप्रमाणे फुलं कुठनं?कशी?किती घ्यावीत? ही पुढे पुढे आपोआप उमजणारी तंत्र आहेत. शहरांमधे छोट्या-फुलविक्रेत्यांकडून फुलं घेऊ नयेत.ते सर्वच दृष्टिनी नुकसानकारक होतं.फुलांचं,मोठ्ठं घाऊकविक्रिचं ठिकाण शोधावं,जसे की पुण्यामधे गुलटेकडीचं-मार्केटयार्ड,म्हणजे आमची फुलांची महामंडई! http://misalpav.com/node/20666 अश्या ठिकाणी फुलं घेण्याचा फायदा म्हणजे,प्रत/विपुलता/वैविध्य(कॉलिटी/काँटिटी/व्हरायटी) या फुलांच्या रांगोळीसाठी अत्यावश्यक अशा गोष्टी या ठिकाणी मिळतात.

चला तर मग...

अता आज आपण पाहू, फुलांच्या कटींगची २ तंत्र आणी १ रांगोळीचं छोटं प्रात्याक्षिक दाखवणार्‍या व्हिडिओ क्लिप...

१)लिलिच्या फुलांची कापण्याची पद्धत...

====================================
२)झेंडुच्या पाकळ्यां काढण्याची(विशिष्ट) पद्धत...

====================================
३)लिलिचं कमळ किंवा गोलावा(प्रात्याक्षिक...)

====================================
क्रमशः

कलामाहिती

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

27 Jul 2013 - 11:57 am | आदूबाळ

क्रमशः

धन्यवाद!

पिशी अबोली's picture

27 Jul 2013 - 12:05 pm | पिशी अबोली

भारीच आहे..पाऊस संपल्यावर एक एक ट्राय करेन..तोपर्यंत तुम्ही क्रमशः शिकवा... :)

त्रिवेणी's picture

27 Jul 2013 - 12:27 pm | त्रिवेणी

खुपच छान.

प्रभाकर पेठकर's picture

27 Jul 2013 - 12:32 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या संगणकावर चलचित्र (व्हिडिओ) दिसत नाहीएत. कोणीतरी मदत करा की रे! पूर्वी चालायचे, आता माहित नाही काय झालय.

प्रभाकर पेठकर's picture

27 Jul 2013 - 12:54 pm | प्रभाकर पेठकर

झालं सुरु एकदाचं.

अभ्या..'s picture

27 Jul 2013 - 7:13 pm | अभ्या..

श्री. पेठकर काका,
तुमचा पीशी पण गुर्जींच्या फुलांनेच व्हिडीऑ दाखवतो बहुतेक. आता एक फुलांच्या रांगोळी चे चित्र कायमचे वॉलपेपर म्हणून ठेवा. व्हिडीओ कायम दिसतील. :)
गुर्जी कळली ब्वा तुमच्या कलेची पावर. ;)

प्रभाकर पेठकर's picture

28 Jul 2013 - 1:54 am | प्रभाकर पेठकर

ही:..ही:..ही:.. खरं आहे.

तसंही 'इतर' व्हिडिओ पाहायचा शौक नाही. (म्हणजे आता उरला नाही).

अनिरुद्ध प's picture

27 Jul 2013 - 12:42 pm | अनिरुद्ध प

आत्माराम धन्स.

यशोधरा's picture

27 Jul 2013 - 12:51 pm | यशोधरा

अरे वा! सुरेख! शिकवणी का?
आम्ही मागल्या बेंचवरचे अडाणी विद्यार्थी आहोत :) शिकू शकलो नाही तरी उत्सुकतेने वाचत, बघत आहोत :)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2013 - 2:31 pm | अत्रुप्त आत्मा

@शिकू शकलो नाही तरी उत्सुकतेने वाचत, बघत आहोत >>> नाय नाय नाय...असं व्हनार नाय...तुम्ही व्हिडिओ क्लिप्स पहा आणी ऐका...फुलांची कटिंग करता करता त्याबद्दलचं सर्व काही सांगितलं आहे... त्यामुळे पहा व ऐका...अगदी सहज जमेल,अवड असेल त्याला-त्यात अवघड असं काहिही नाही...!!! :)

ओके :) नक्की प्रयत्न करुन पाहीन.

प्रचेतस's picture

27 Jul 2013 - 2:40 pm | प्रचेतस

अरे वा.
छानच.

हा धागा तुम्ही मागे एकदा टाकलेला ना?

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2013 - 2:48 pm | अत्रुप्त आत्मा

@हा धागा तुम्ही मागे एकदा टाकलेला ना?>>> होय..पण तो मिपा-लसीकरण मोहिमेत उडाला होता! :(

तेच काल लक्षात आलं,म्हणून पुन्हा टाकला! :)

अनन्न्या's picture

27 Jul 2013 - 4:05 pm | अनन्न्या

या गणपतीत नक्की प्रयत्न करणार!

मदनबाण's picture

27 Jul 2013 - 6:00 pm | मदनबाण

:)

ब्येस्ट गुर्जी. अप्रतिम कला हाये तुमच्या हातात.
बादवे तुम्ही प्रत्येक फुलांच्या रंगाच्या कात्र्या वापरता का हो? ;)
हिथे पिवळ्या फुलांना पिवळी कात्री दिसतेय.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2013 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा

@बादवे तुम्ही प्रत्येक फुलांच्या रंगाच्या कात्र्या वापरता का हो? >>> =)) कात्रीचं उत्तर-रात्री देणार होतो,पण अत्ताच देतो. ;-) रंग कोणताही असला तरी ब्लेड तेच असतं! :P

धमाल मुलगा's picture

27 Jul 2013 - 9:52 pm | धमाल मुलगा

साला...काय कला आहे बुवा तुमच्या हातात! बेष्ट बेष्ट! :)

निवेदिता-ताई's picture

27 Jul 2013 - 10:05 pm | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर

पक पक पक's picture

27 Jul 2013 - 10:07 pm | पक पक पक

मस्त हो बुवा.... :) एकदम झक्क्कास...

आतिवास's picture

27 Jul 2013 - 11:18 pm | आतिवास

सुंदर.

प्रभाकर पेठकर's picture

28 Jul 2013 - 2:19 am | प्रभाकर पेठकर

आवडली रांगोळी.

एक शंका आहे. हीच रांगोळी काढताना लिली, झेंडू किती किलो घ्यावीत? आणि एक - एक किलो घेतल्यास साधारण किती व्यासाचे कमळ तयार करता येईल?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jul 2013 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा

@ हीच रांगोळी काढताना लिली, झेंडू किती किलो घ्यावीत? आणि एक - एक किलो घेतल्यास साधारण किती व्यासाचे कमळ तयार करता येईल?>>> पुढच्या/पुढच्या भागात हे सगळं सविस्तर येणार आहे. :)

प्रभाकर पेठकर's picture

28 Jul 2013 - 9:33 am | प्रभाकर पेठकर

ठिक आहे. धन्यवाद.

दिपक.कुवेत's picture

28 Jul 2013 - 4:21 pm | दिपक.कुवेत

ईथे हापिसात काय तु नळि दिसत नाय.....दुसरा काय तो उपाय सांगा!

(गुर्जिंचा आ धारक विद्यार्थि) हा शिंचा ‘Nya’ कसा लिहायचा?

किसन शिंदे's picture

28 Jul 2013 - 4:25 pm | किसन शिंदे

dnya=ज्ञ

किसन शिंदे's picture

28 Jul 2013 - 4:27 pm | किसन शिंदे

छ्या!! हे विडिओ काही दिसत नाहियेत हापिसातनं.

प्रायवेट शिकवणी लावता का हो बुवा?? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Aug 2013 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा

@प्रायवेट शिकवणी लावता का हो बुवा?? smiley>>> पुण्याला आल्यास लावतो... ! http://www.sherv.net/cm/emo/happy/cheer-up-smiley-emoticon-1.gif

पैसा's picture

2 Aug 2013 - 8:44 pm | पैसा

मस्त हो बुवा!