यापूर्वी इथे प्रदर्शित केलेल्या फुलांच्या रांगोळ्या...
http://www.misalpav.com/node/19262
http://www.misalpav.com/node/20308
http://www.misalpav.com/node/21612
खरं तर शीर्षकातच सर्व काहि आलेलं आहे. पण तरी गणपती पूजना सारखी थोडी प्रस्तावना करतोच...मी या पूर्वी फुलांच्या रांगोळ्यांचे जे ३ धागे टाकले.त्यातला पहिला धागा नवोदित होता.दुसरा अगदी '' तयार '' नसला तरी बराच शिकलेला होता.त्यानंतरचा ''सप्तपदी विशेष'' हा विशेष...नावातच होता,(कारण त्यात सगळ्या/जास्तीत जास्त-सप्तपदीच्या रांगोळ्या नव्हत्या).
अता (इथुन पुढच्या भागांमधून) मला तोच तो पणा टाळावासा वाटतोय... अर्थात ह्या फुलांच्या रांगोळ्या माझ्या कामाच्या '' रेट्यात '' तयार होत असल्यानी,कित्तीही नाही म्हटलं तरी त्यात थोडाफार पुनःप्रत्यय येणारच...नाइलाज आहे.पण जमेल तेवढं वेगळेपण द्यायचा मी प्रयत्न करतोय...यावेळच्या रांगोळ्यामधे प्रामुख्यानी गुलछडीच्या फुलांची-कट-कनेक्ट पद्धत,मुख्य आकार बनवण्यासाठी वापरली आहे... कश्या वाटतायत या रांगोळ्या...? पहा बरं :-)
१)वरती गणपती पूजनाचा उल्लेख केलाच आहे,तर सुरवात मोदकानी करावी , हे उत्तम ;-)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
=========================================================================
सर्व फोटोज.-कॅमेरा-फुजिफिल्म-एस.२९५०
=========================================================================
प्रतिक्रिया
4 Feb 2013 - 7:33 pm | अत्रुप्त आत्मा
कलादालनात धागा तय्यारच होत नैय्ये.... :-( म्हणून हितं टाकलाय... संपादक मंडळी ... बघा काय त्ये :-)
4 Feb 2013 - 7:35 pm | दिपक.कुवेत
सगळे फोटो फार सुंदर आलेत. समईची रांगोळि (नं ९) विशेष आवडली. साध्या रांगोळ्यामुळे फुलांच्या रांगोळ्या अजुन उठावदार झालेत.
4 Feb 2013 - 7:38 pm | जेनी...
अमेझिंग गुर्जि ....
लाजवाब .... एकसो एक रांगोळ्या आहेत ...
डीझाइन चोर्नार आणि थोडी कला पण ...
खुपच सुंदर आहेत :)
4 Feb 2013 - 7:39 pm | तर्री
सौंदर्य पूर्ण , भक्तीमय , मंगल , पवित्र अश्या सगळ्या भावना दाटून आल्या, ना खाताच "प्रसाद " खाल्ल्याचे समाधान.
धन्यवाद मालक.
4 Feb 2013 - 7:43 pm | जेनी...
सुंदर प्रतिसाद :)
4 Feb 2013 - 8:01 pm | अत्रुप्त आत्मा
@सौंदर्य पूर्ण , भक्तीमय , मंगल , पवित्र अश्या सगळ्या भावना दाटून आल्या, ना खाताच "प्रसाद " खाल्ल्याचे समाधान.>>> अतीशय निर्मळ दाद... मनः पूर्वक धन्यवाद.
5 Feb 2013 - 1:05 pm | स्पा
ह्येच बोलतो
बुवा झिंदाबाद
5 Feb 2013 - 2:49 pm | स्मिता.
अगदी असेच वाटले. मी तर गुर्जींनी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्यांची फॅन आहे. वेगवेगळ्या फुलांचे रंग, आकार, पोत ध्यानात घेऊन अश्या सुरेख रचना करणं सोपं काम नाही.
4 Feb 2013 - 7:46 pm | बॅटमॅन
रांगोळ्यांतील प्याटर्न्स मस्त आहेत हो आत्मूस. लै भारी!!
4 Feb 2013 - 8:06 pm | प्रभाकर पेठकर
भरघोस ताजी फुले आणि मनस्वी कलात्मकता. खास पर्यावरणप्रेमी रांगोळ्यांनी मनाला अगदी भुरळ पाडली आहे.
अभिनंदन.
4 Feb 2013 - 8:12 pm | रेवती
गुलछडी स्पेशल रांगोळ्या भारी आल्यात गुर्जी. आपल्या मिपाच्या मोदकाकड्ली कोंची म्हनायची ओ गुर्जी?
4 Feb 2013 - 8:39 pm | अत्रुप्त आत्मा
आपल्या मोदका कडची,7 नंबरची :-)
4 Feb 2013 - 8:42 pm | प्यारे१
प्रयोजन काय होते म्हणायचे? :)
4 Feb 2013 - 8:48 pm | अभ्या..
कलश दिसतोय म्हणजे वास्तुशांत केली दिसतेय मोदकाची.
4 Feb 2013 - 11:33 pm | मोदक
बरोब्बर. वास्तूशांतच होती.
फक्त तो कलश नाहीये.. तांब्याची कळशी आहे. :-)
5 Feb 2013 - 2:04 pm | प्यारे१
हे एक मस्तच झालं.
आता मुलगा लग्नाळू झालेला आहे हे उच्चरवाने सांगण्यास हरकत नाही.
हल्ली सोत्ताचं घर आहे ही मिनिमम एलिजिबिलिटी आहे. नाही का?
येणारी मुलगी काय आयत्या पीठावर... वगैरे.
असो!
तर मोदकाचं नवीन घराबद्दल अभिनंदन!
5 Feb 2013 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा
प्यारे काका... अता एक काम करा- मोदक,नव घर,आणी त्याचा विवाह असा नवा धागा काढा,म्हणजे तुमची पूर्ण सोय होइल.
5 Feb 2013 - 11:31 pm | मोदक
मोदकाचं नवीन घराबद्दल अभिनंदन!
धन्यवाद्स हो प्यारे काका.. :-)
4 Feb 2013 - 8:17 pm | सूड
सगळ्याच रांगोळ्या मस्त!!
सातव्या नंबरची त्यातल्या त्यात ओळखीची वाटतेय.
4 Feb 2013 - 8:20 pm | लीलाधर
नि:शब्द आहे धन्यवाद बुवा ----^----
4 Feb 2013 - 8:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अग्गागा, बुवा तेवडा दंड्वत घ्या आम्चा...
__/\___
4 Feb 2013 - 8:25 pm | चौकटराजा
अ आ इथं काहीच दिसत नाहीये तरी तुमच्या कंपूत दिवस काढायचे आहेत आमास्नी ... सबब मस्त च रे आत्त्मू असा
प्रतिसाद देतो. ( मिचकावी स्माईली )
4 Feb 2013 - 8:29 pm | जयवी
अहाहा....... इतकी प्रसन्न आरास बघून खरंच खूप पवित्र आणि तृप्त वाटलं.
तुमच्या प्रत्येक रांगोळीला अगदी मनापासून दाद !!
4 Feb 2013 - 8:38 pm | प्यारे१
ह्या रांगोळीसाठी परत एकदा .... सत्यनारायण घालावा म्हणतो!
खूपच छान रांगोळ्या परागबुवा!
4 Feb 2013 - 8:46 pm | अभ्या..
गुर्जी तुमची कला निर्विवाद श्रेष्ठ आहे. उपलब्ध रंगाची फुले त्यांचे आकार आणि पोत लक्षात घेऊन असे सुशोभन करणे सोपे नाही. त्यातल्या त्यात ७ आणि ८ नं. च्या रांगोळीत फरशीच्या रंगाचा पण करुन घेतलेला वापर अगदी ब्येस्ट.
अत्यंत नेत्रसुखद रंगसंगती व काम्पोझीशन. अप्रतिम केवळ अप्रतिम, गुरुजी.
आता अवांतरः यजमान खुष होत असणारच पण त्यांची खुषी पैशाच्या स्वरुपात मिळते का हो गुरुजी? का स्वान्तसुखाय?
4 Feb 2013 - 8:47 pm | शुचि
अहाहा नेत्रसुख!!! खूप आवडल्या.
4 Feb 2013 - 9:01 pm | मुक्त विहारि
छान..
4 Feb 2013 - 9:33 pm | श्रिया
रंगसंगती खुप सुंदर. सर्वच रांगोळ्या आवडल्या.
4 Feb 2013 - 9:37 pm | दिव्यश्री
अतिसुन्दर......:)
डोळ्याचे पारणे फिटले.
4 Feb 2013 - 9:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम ! खूपच सुंदर आहेत फुलांच्या रागोळ्या.
4 Feb 2013 - 9:51 pm | प्रचेतस
खूप सुंदर.
हातात कला आहे तुमच्या.
मोदकाकडची ७ नं. ची तर लगेच ओळखलीच पण ९ नं. ची पण.
ती राजेच्या चिंचवडमधल्या पुस्तक प्रदर्शनातली आहे. :)
4 Feb 2013 - 10:21 pm | पैसा
सगळ्या रांगोळ्या मस्त आहेत!
4 Feb 2013 - 11:10 pm | कवितानागेश
छानच आहेत रांगोळ्या.
तुमची परवाची फळांची रांगोळी पण छान होती. ;)
4 Feb 2013 - 11:38 pm | सोत्रि
हातात कला आहे बर का तुमच्या... (अंतू बर्व्याच्या 'नरड्यात मजा आहे हं तुमच्या' ह्या चालीत वाचावे)
- (गुर्जींच्या फुलांच्या रांगोळ्यांचा पंखा) सोकाजी
5 Feb 2013 - 1:37 am | मोदक
बा.डी.स.
आत्मूदाच्या रांगोळ्या लै भारी असतात..
5 Feb 2013 - 12:25 am | क्रान्ति
नतमस्तक व्हावं अशी कलाकारी आहे तुमच्या हातात!
5 Feb 2013 - 7:09 am | स्पंदना
आत्मा भाउ कलादालनात लेखन प्रकार जर नाही निवडला तर लेख वर चढतो.
रांगोळ्या खरच खुप छान आहेत.
5 Feb 2013 - 7:40 am | ५० फक्त
पुनश्च एकदा लई भारी ओ बुवा. धन्यवाद.
5 Feb 2013 - 8:47 am | किसन शिंदे
असेच म्हणतो.
लय म्हणजे लय भारी हो बुवा!
5 Feb 2013 - 7:41 am | नंदन
सगळ्याच रांगोळ्या मस्त!
5 Feb 2013 - 7:44 am | श्रीरंग_जोशी
पहिल्या फोटोतील मोदक पाहूनच पुढच्या मेजवानीची शाश्वती झाली.
5 Feb 2013 - 8:00 am | इन्दुसुता
मस्तच आहेत रांगोळ्या.
5 Feb 2013 - 8:07 am | गणामास्तर
नेहमीप्रमाणेचं लै भारी..
5 Feb 2013 - 9:07 am | नाखु
भाविकांचे मन प्रसन्न !
होता फुल्-रांगोळी दर्शन !
नाद असावा ऐसा (बुवांसारखा) जो "खुळा" करी सार्या जगा...
5 Feb 2013 - 9:51 am | पिंगू
बोले तो झक्कास.. एक नंबर..
- पिंगू
5 Feb 2013 - 11:27 am | मनराव
मस्त रांगोळ्या. गुर्जी...........जोरदार एकदम
5 Feb 2013 - 12:25 pm | अत्रुप्त आत्मा
@बालिका>>>
डीझाइन चोर्नार आणि थोडी कला पण ...>>> =)) बालिका....,,,ते तुला माझ्याकडे क्लास लावल्याशिवाय जमायचं नै =))
=========================================================================
@प्यारे १>>>
ह्या रांगोळीसाठी परत एकदा .... सत्यनारायण घालावा म्हणतो!>>> म्हणजे??? यापूर्वी कधि केलावता सत्य?नारायण आमचे कडून ?????
===========================================================================
@अभ्या..>>>
आता अवांतरः यजमान खुष होत असणारच पण त्यांची खुषी पैशाच्या स्वरुपात मिळते का हो गुरुजी? का स्वान्तसुखाय?>>> थोडिफार पैश्याच्या स्वरुपात,पण तसे जवळ जवळ,स्वान्तःसुखायच...! आपल्याकडे अजुनही कलेला मान मिळतो,पैसा म्हणावा तसा नाही... असो. :-)
=============================================================================
@वल्ली>>>
मोदकाकडची ७ नं. ची तर लगेच ओळखलीच पण ९ नं. ची पण.
ती राजेच्या चिंचवडमधल्या पुस्तक प्रदर्शनातली आहे.>>> बरोब्बर पैचान्या :-)
=============================================================================
@लीमाऊ>>>
तुमची परवाची फळांची रांगोळी पण छान होती. ;-) >>> =)) अस्सं काय??? ब्वार ब्वार...! पुढच्या वेळेस रांगोळीचाच केक देतो....... :-p
=============================================================================
5 Feb 2013 - 12:35 pm | प्रचेतस
वरील रांगोळी लग्नानिमित्त झालेल्या सत्यनारायणातील आहे काय?
नाही....बदामाची नक्षी काढलीय म्हणून विचारले.
8 Feb 2013 - 12:09 am | अत्रुप्त आत्मा
@बदामाची नक्षी काढलीय म्हणून विचारले.>>> आपला होरा चुकेल काय??? पुन्हा तीच प्रतिक्रीया देतो...बरोब्बर पैचान्या ;-)
5 Feb 2013 - 3:49 pm | अभ्या..
गुर्जी तुम्ही या स्पेशल आर्टची अॅप्लाईड आर्टच करुन टाका. कलेला मान मिळतो पण पैसा नाही हे जरी अगदी खरे असले तरी
बदलत्या काळात घ्या वसूल करून. अगदी धर्मकार्य म्हणून जरी पाहात असाल तरी कष्ट खूप आहेत हो. निदान याचा यूएसपी म्हणून फायदा होत असेल तरी नसे थोडके.
5 Feb 2013 - 3:53 pm | अत्रुप्त आत्मा
अॅग्री.... आणी तसंही कोणी फक्त फुलाची रांगोळी/सप्तपदी किंवा गोल चौकोनी नुस्ता गालिचा काढायची ऑर्डर दिलि,तर मी त्याचे पुरेपुर पैसे लावल्याशिवाय रहातच नाही, कारण सदभावनेनी काम करून हात पोळून घेतलेत मी बर्याचदा.
5 Feb 2013 - 12:38 pm | चिगो
सुंदर रांगोळ्या, अआ.. अत्यंत प्रसन्न वाटलं बघून..
मनीच्या बात : साल्या चिन्म्या, देव कला, रसिकता इ. गुण वाटत होता, तेव्हा काय हातात चाळणी घेऊन गेला होतास का काय त्याच्याकडे? :-(
5 Feb 2013 - 12:43 pm | मितभाषी
हेच बोल्तो
5 Feb 2013 - 1:45 pm | धनुअमिता
सुंदर, अप्रतिम, मस्त
रांगोळ्या बघुन मन एकदम प्रसन्न झाले.
5 Feb 2013 - 1:47 pm | मृत्युन्जय
सुंदर हो गुर्जी. मस्तच जमल्यात.
5 Feb 2013 - 2:38 pm | ऋषिकेश
फारच सुरेख!
5 Feb 2013 - 3:21 pm | महेशकुळकर्णी
वा! वंडर फूल रांगोळ्या
5 Feb 2013 - 3:38 pm | सुहास झेले
सहीच.. :) :)
5 Feb 2013 - 6:16 pm | अनन्न्या
वाचनखुणा साठवली तर पाहिजे तेव्हा डिझाईन चोरता येईल ना?
6 Feb 2013 - 1:23 am | सानिकास्वप्निल
सुंदर आहेत रांगोळ्या, बघून छान प्रसन्न वाटले.
आपल्या मोदकाच्या घरची रांगोळी सुरेख आहे :)
6 Feb 2013 - 12:06 pm | मृगनयना
खूपच छान आहेत रांगोळ्या.
मी काही वेगळा प्रकार केला होता यात फोटो काही ठीकसे काढले नाहीत तरी डकवत आहे .
6 Feb 2013 - 12:37 pm | अत्रुप्त आत्मा
@यात फोटो काही ठीकसे काढले नाहीत तरी डकवत आहे .>>>
6 Feb 2013 - 1:07 pm | मृगनयना
लिंक्स गंडल्या होत्या हो ...
6 Feb 2013 - 1:15 pm | अत्रुप्त आत्मा
@मृगनयना>>>
6 Feb 2013 - 2:42 pm | मृगनयना
धन्यवाद !!!
8 Feb 2013 - 2:04 am | दीपा माने
फुलांच्या सुंदर रांगोळ्यांसोबत त्यांचा मंद सुवासही मनात आणि घरात भरुन उरला असेल.
8 Feb 2013 - 7:59 pm | kanchanbari
अतिशय सुंदर आहे रांगोळ्या, पण एक प्रश्न पडला कि या मंगल कार्याची शोभा वाढवणार्या या सुंदर फुलांचे उपयोग झाल्या नंतर आपण या फुलांचे करतात काय?
9 Feb 2013 - 12:50 am | अत्रुप्त आत्मा
@या सुंदर फुलांचे उपयोग झाल्या नंतर आपण या फुलांचे करतात काय? >>> आंम्ही काहीच करित नाही...जे काय करायचं ते यजमानच करतात... ;-)
अता खरोखर काय करतात ते सांगतो... ज्या ज्या ठिकाणी मी आजपर्यंत या रांगोळ्या काढल्या.. त्या पैकी काहिं(चे) अपरिहार्य अपवाद वगळता.. बाकि सर्वांनी चौरंगावरच्या पुजा उचलून/आवरुन तिथे देवांचे फोटो/फ्लॉवरपॉट असे काहितरी ठेवून जितके दिवस राहतील,तितके दिवस रांगोळ्या राहू दिल्या,हेच माझ्या पहाण्यात आहे. :-)
9 Feb 2013 - 12:51 am | शुचि
खरे आहे. इतक्या सुंदर रांगोळ्या मोडवणारच नाहीत.
15 Feb 2013 - 9:59 am | इशा१२३
अप्रतिम...अतिशय देखण्या रांगोळ्या...
15 Feb 2013 - 10:30 am | स्मिता चौगुले
खूपच सुंदर.. अप्रतिम ...डिझाईन चोरण्याचा मोह आवरत नाहीये..:)
धन्यवाद