या फुलांच्या निरनिराळ्या रांगोळ्या, म्हणजे माझी गेल्या दहा वर्षात हळुहळू वाढत गेलेली साधना आहे...आज मिपा वर या विभागात पहिल्यांदाच या रांगोळ्यांचे फोटो टाकत आहे..सगळे फोटो मोबॉइल केमेय्रा वरुन काढलेले आहेत... त्यामुळे त्याची गुणवत्ता तेवढीच असणार... पण माझी कला सर्वांनी पहावी येवढीच या वेळी एक इच्छा आहे...(हे इतकं सगळं लिहिलय,पण पुढे फोटो येतात की नाहीये काय माहीती?... नाय तं आमचेच निघायचे.. :-) )
प्रतिक्रिया
26 Sep 2011 - 11:39 pm | जाई.
छान आहेत फुलांच्या रांगोळ्या
मस्त सुरेख
26 Sep 2011 - 11:51 pm | बहुगुणी
मन प्रसन्न करणार्या कलाकृती आहेत.
एखाद्या सुटीच्या दिवशी प्रदर्शन भरवायचा विचार करा, लोक नक्कीच प्रतिसाद देतील.
26 Sep 2011 - 11:55 pm | ५० फक्त
मस्त ओ पराग दिवेकर,
अवांतर - साबुदाण्याची फुलं नसतात का ओ ?
27 Sep 2011 - 1:11 am | अत्रुप्त आत्मा
@- अवांतर - साबुदाण्याची फुलं नसतात का ओ ? ... साबुदाण्याची फुलं नसतात.. फुललेलेच साबुदाणे असतात ;-)
27 Sep 2011 - 12:35 am | पाषाणभेद
व्वा! हि पण कला आपल्या अंगी असेल अशी कल्पना केली नव्हती.
देवाच्या ठिकाणी असे काही पाहीले की याच कारणामुळे मन प्रसन्न होत असेल काय?
दुसरा फोटोतली कलाकृती विशेष आवडली.
27 Sep 2011 - 1:13 am | अत्रुप्त आत्मा
@- देवाच्या ठिकाणी असे काही पाहीले की याच कारणामुळे मन प्रसन्न होत असेल काय?
@- अणखिन दुसरं कुठचं कारण असणार? ,,,, :-)
27 Sep 2011 - 2:31 am | Mrunalini
अप्रतिम... खुप आवडली तुमची कला. :)
27 Sep 2011 - 4:00 am | शिल्पा ब
छान.
27 Sep 2011 - 4:30 am | पिंगू
वाह.. दिलखुश रांगोळी... फुलांचा सुंदर सदुपयोग आणि इकोफ्रेंडली रांगोळी.
- पिंगू
27 Sep 2011 - 7:58 am | मनीषा
अतिशय सुरेख !!!
27 Sep 2011 - 7:59 am | पैसा
सुंदर पुष्पवल्ली.
27 Sep 2011 - 8:56 am | प्रचेतस
मस्त हो भटजी.
फुलांच्या रांगोळ्या फारच सुरेख आहेत. मन एकदम प्रसन्न झाले.
27 Sep 2011 - 9:10 am | मदनबाण
अप्रतिम... :)
27 Sep 2011 - 9:15 am | किसन शिंदे
मस्तच भटजी बुवा,
जबराच आहेत सगळ्या.
अंवातरः तुमच्याकडे अशा अंगठ्या आहेत तरी किती? ;)
27 Sep 2011 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा
@-अंवातरः तुमच्याकडे अशा अंगठ्या आहेत तरी किती? तुमच्या कडे जेवढी 'बोटं' आहेत... तेवढ्या ;-)
27 Sep 2011 - 9:52 am | सूड
भटजीब्वॉ रांगोळ्या (पुष्परचना) मस्तच हो.
27 Sep 2011 - 11:00 am | प्यारे१
काका,
एका पूजेबरोबर एक रांगोळी फ्री असे काही आहे का?
असल्यास त्वरीत संपर्क करतो....!
27 Sep 2011 - 5:08 pm | अत्रुप्त आत्मा
@-काका,
एका पूजेबरोबर एक रांगोळी फ्री असे काही आहे का?
असल्यास त्वरीत संपर्क करतो....!.... ह्ही ह्ही ह्ही ...
@ - काका मला 'पोचवा' ;-) ... तो आमचा पुजेचा फ्री पास आहे... तुंम्ही फक्त तिकिट काढायची खोटी,पास मिळालाच म्हणुन समजा... *नियम व अटी लागू ;-)
27 Sep 2011 - 11:06 am | उदय के'सागर
अप्रतिम!!! फोटो क्र. २ मधील रांगोळी विशेष अवडली :)
27 Sep 2011 - 11:09 am | रश्मी
फारच सुरेख फुलांचा रांगोळ्या आहेत.
27 Sep 2011 - 12:06 pm | मृत्युन्जय
सुंदर आहेत रांगोळ्या एकदम. रंगसंगती एक नंबर आहे.
27 Sep 2011 - 12:31 pm | जागु
खुपच सुंदर आहेत रांगोळ्या. ती दुर्व्याची आयडीया मला खुप आवडली. मी लेख टाकला आहे साखरचौथिचा त्यात मी रांगोळी टाकली आहे. आता मला तुमच्या रांगोळ्या पाहुन अजुन आयडीया मिळाल्या. धन्स.
27 Sep 2011 - 5:20 pm | अत्रुप्त आत्मा
@-आता मला तुमच्या रांगोळ्या पाहुन अजुन आयडीया मिळाल्या. .... धन्यवाद..
जागु ताइ ,एक सुचना-रांगोळ्यांसाठी फुलं नेहमी मुळ बाजारातून म्हणजे जीथे फुलांची घाउक विक्री होते तिथुन अणावीत...जसं मी पुण्याला मार्केटयार्ड मधुन अणतो...हल्ली तिथे जलबेरा,डच गुलाब, वगैरे तत्सम फेन्सी अएटमचा एक स्वतंत्र विभागच सुरु झालाय...अश्या ठीकाणी गेल्यामुळे व्हरायटी/क्वालीटी/ क्वाँटीटी सगळच हवं तसं मिळतं...
27 Sep 2011 - 1:27 pm | नरेश_
छान, सुंदर वगैरे शब्दही खुजे वाटावेत.
27 Sep 2011 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार
जबराट !
27 Sep 2011 - 1:40 pm | स्पा
सुंदरच रांगोळ्या आहेत.. पराग गुर्जी
सर्व आवडल्या
मन ओतून काम केलेलं वाटत
27 Sep 2011 - 1:44 pm | ऋषिकेश
फारच सुरेख!.. रंगसंगती आणि त्यासाठी वापरलेली फुले , आकार सारेच निव्वळ सुंदर!
27 Sep 2011 - 1:48 pm | गणेशा
निव्वळ लाजवाब ...
अमन प्रसन्न झाले ..
दूसरी रांगोळी सर्वात जास्त आवडली ...
आमची पण घ्या एखादी ऑर्डर भाऊ
27 Sep 2011 - 4:59 pm | अत्रुप्त आत्मा
@-आमची पण घ्या एखादी ऑर्डर भाऊ = :-) तुंम्ही द्या ...मग आंम्ही खाऊ... ;-)
27 Sep 2011 - 2:01 pm | स्मिता.
सर्वच रांगोळ्या सूंदर, अप्रतिम आहेत. फुलांची रंगसंगती तर क्या कहने.
दुसरी आणि चौथी रांगोळी विशेष आवडली.
27 Sep 2011 - 2:04 pm | दीप्स
अप्रतिम !! काय सुरेख रांगोळ्या काढतात हो तुम्ही या रांगोळ्या बघून माहेरची आठवण झाली.
27 Sep 2011 - 5:27 pm | अत्रुप्त आत्मा
@- या रांगोळ्या बघून माहेरची आठवण झाली. धन्यवाद... माझंही ते माहेरच आहे...कारण रांगोळी भोवती मला,नेहमी माझी जिवाभावाची माणसे भेटतात....
''माझीया मनाचे तेची गे माहेर
जेथे अंतरीचा ठाव लागे''
27 Sep 2011 - 2:21 pm | michmadhura
चौथ्या फोटोमधली रचना खूप आवडली.
खूपच छान.
27 Sep 2011 - 4:12 pm | मोहनराव
झकास!!
27 Sep 2011 - 5:09 pm | प्रास
मस्त हायेती बर्का तुम्च्या रांगोळीज्....... ;-)
आवल्ड्या.
:-)
27 Sep 2011 - 5:29 pm | अत्रुप्त आत्मा
@-मस्त हायेती बर्का तुम्च्या रांगोळीज्.... थेंक्युज... धन्यवाद्ज... ;-)
27 Sep 2011 - 6:11 pm | रेवती
भारी आहेत रांगोळ्या!
गुरुजी तुम्ही ग्रेट आहात.
रांगोळी काढायला किती वेळ लागला (अंदाजे) हे सांगाल का?
27 Sep 2011 - 7:06 pm | अत्रुप्त आत्मा
@-रांगोळी काढायला किती वेळ लागला (अंदाजे) हे सांगाल का?
चौरंगाभोवतीच्या रांगोळ्यांना साधारण पणे दिड ते दिन तास जातात...
पण वरती मधे १ सप्तपदीचा (पिवळा) गालीचा काढलाय, त्याला अधीचा फुलांचा कटींग/सॉर्टींगचा वेळ धरुन ६ ते ८ तास लागतात...यात भरपूर मेहेनत आणी कसब पणाला लागत,,,तेंव्हा कुठे त्या इतक्या आकारबद्ध व प्रेक्षणीय होतात...
27 Sep 2011 - 7:14 pm | रेवती
धन्यवाद!
27 Sep 2011 - 6:16 pm | सर्वसाक्षी
मन प्रसन्न करणार्या रांगोळ्या, अगदी संस्कार भारतीची आठवण करुन देणार्या. रंगसंगतीही उत्तम आहे.
27 Sep 2011 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा
सर्व प्रतिसादकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार... :-)
28 Sep 2011 - 6:39 am | मराठमोळा
खरच सुंदर आणि प्रसन्न रांगोळ्या आहेत.
आवडल्या.. :)
28 Sep 2011 - 8:21 am | अर्धवट
मस्त देवा..
एकदम झकास.. आधीच टवटवीत फुलं त्यात तुमची सौंदर्यदृष्टीही मस्तच आहे..
गडद फुलांत केलेलं काम जास्त आवडंलं. (चौथा फोटो.)
बायद वे याचं प्रदर्शन वगैरे भरवायचा विचार केलाय का कधी, प्रत्येके वेळेला कलाकृती तयार झाली म्हणजे त्याचे दोन तीन कोनांमधून फोटो काढून ठेवा की,
28 Sep 2011 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा
प्रदर्शन भरवण्याचं ठरवलय...पुढच्या वर्षी काही झालं तरी करणारच अहे... दोन तीन कोनातून फोटो काढण्यासाठी १ चांगला केमेरा घ्यायचा आहे... मोबॉ-इल-केमेरा :-( तेवढी साथ देत नाही... जमवू लवकरच...
11 Oct 2011 - 7:28 pm | जयंत कुलकर्णी
त्यासाठी थांबू नका. मी काढीन त्याचे फोटो. बहुदा चांगले येतील. मला सांगा केव्हा भरवताय ते !
11 Oct 2011 - 7:55 pm | अत्रुप्त आत्मा
जयंत काका नक्की कळवणार तुंम्हला... माझा १ मित्र आणी मी मिळुन भरवणार आहोत,,,तो पण रांगोळी मधला चांगला आर्टीस्ट आहे...आम्चं संयुक्त प्रदर्शन भरवायचा विचार आहे,,,फायनल झालं की कळवणार आहे,,,तत्पूर्वी संपर्क साधेन...
28 Sep 2011 - 1:07 pm | गणपा
फुलांच्या रांगोळ्या अतिशय आकर्षक आहेत. रंगसंगतीही उत्तम जपली आहे.
28 Sep 2011 - 1:47 pm | बिपिन कार्यकर्ते
रांगोळ्या ख्स्रंच सुरेख आहेत. मेहनत लागते.
यानिमित्ताने, माझी आई पूर्वी पाण्यावर आणि आता धान्ये, कडधान्ये, डाळी इत्यादी वापरून रांगोळ्या काढते, त्याची आठवण झाली!
28 Sep 2011 - 2:07 pm | वपाडाव
येक नवंबर आल्यात रांगोळ्या.....
गुर्जी, लैच कसब आहे की हो तुमच्याकडे.....
28 Sep 2011 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
@-गुर्जी, लैच कसब आहे की हो तुमच्याकडे..... मं$$ग ...आमाले जसा अत्तरांचा शौक,,,तसाच फुलांचा बी नाद है ना बाबा... ;-)
30 Sep 2011 - 7:50 pm | सोत्रि
अत्तराचा दिल्ली किचन मधे अनुभवला आणि फुलांचा आज अनुभवला!
दोन्ही नाद बघुन 'नादखुळा' असे म्हणावेसे वाटते ;)
- (नादिष्ट) सोकाजी
30 Sep 2011 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा
@-दोन्ही नाद बघुन 'नादखुळा' असे म्हणावेसे वाटते --- धन्यवाद... १ खुलासा-नाद खुळा'च असतो... ;-)
-(इष्ट-नादी) भटजी
28 Sep 2011 - 3:23 pm | श्यामल
मनमोहक रंगसंगती ! सुरेख आणि सुबक रांगोळ्या ! :smile:
28 Sep 2011 - 3:31 pm | सुहास झेले
जबरदस्त... ४,५,६,७ विशेष आवडले, सुंदर कलागुण आहे तुमच्यात :)
अजुन येऊ द्यात मालक.... H)
28 Sep 2011 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा
@-अजुन येऊ द्यात मालक.... >> आणणार हाय,,,दसय्रा परेंत थांबा.... या वर्षातल्या सगळ्या रांगोळ्याचे फोटू आणी हिडो क्लिपींग यकदमच टाकायचा ब्येत हाय... :-)
28 Sep 2011 - 3:57 pm | प्राजक्ता पवार
मन प्रसन्न करणार्या कलाकृती .
30 Sep 2011 - 1:52 pm | मानस्
मन प्रसन्न झाले आपल्या रांगोळ्या पाहून.या दिवाळीमधे नक्की प्रयत्न करुन पाहणार.
30 Sep 2011 - 10:56 pm | मितभाषी
छान रंगसंगती.
लै भारी!!!!!!
1 Oct 2011 - 12:03 am | पल्लवी
अतिशय नेत्रसुखद..खूपच छान !
1 Oct 2011 - 12:30 am | साती
अप्रतिम रांगोळ्या आहेत.
1 Oct 2011 - 3:29 am | पक्या
सु रे ख ! सर्वच रांगोळ्या मस्त काढल्या आहेत.
एका मध्यम रांगोळीसाठी फुलांचा किती खर्च येतो?
1 Oct 2011 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा
@-एका मध्यम रांगोळीसाठी फुलांचा किती खर्च येतो? ---ते सीझनवर अवलंबून आहे... ;-)
1 Oct 2011 - 2:12 pm | जयवी
अप्रतिम !! दुसरे शब्दच नाहीत !!
फारच कलात्मक रीत्या वापरली आहेत वेगवेगळी फुलं !!
तुमच्या कलेला सलाम :)
2 Oct 2011 - 12:50 am | श्रावण मोडक
वेधक रचना.
2 Oct 2011 - 8:23 am | प्राजु
छान, सुंदर, उत्तम... हे शब्द सुद्धा कमी पडतील.
खूपच आवडल्या!
खूप पेशन्स चं काम आहे हे. तुम्ही इतक्या आत्मियतेने करताय.. खरंच कौतुक आहे तुमचं.
वरती बहुगुणी म्हणतात त्याप्रमाणे प्रदर्शन भरवा. खूप चांगला प्रतिसाद मिळेल. :)
11 Oct 2011 - 5:30 am | राजहंस
खूपच सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत. रंगसंगती पण क मा ल :).
25 Apr 2012 - 1:39 pm | चिगो
अ आंच्या अंतरी, कला नानापरी.. :-)
सुंदर पुष्प-रांगोळ्या, अआ.. जांभळ्या फुलांची रंगसंगती तर खासच..
5 Feb 2013 - 7:35 am | दीपा माने
तुमच्या अंगच्या गुणांची प्रसंशा करताना डोक्यात विचार आला की तुम्ही नैवेद्याचे ताटही अशा रांगोळ्यांतून साकारु शकाल.
अशाच यापुढेही नवनविन विषय घेऊन रांगोळ्या काढण्यासाठी अनेक शुभेछा.
5 Feb 2013 - 3:21 pm | अत्रुप्त आत्मा
@ की तुम्ही नैवेद्याचे ताटही अशा रांगोळ्यांतून साकारु शकाल.>>> येस येस... व्हेरी थँक्यू फॉर धिस आयडिया. पुढल्या महिन्यात एकांकडे अन्नपूर्णेची वेगळी पूजा आहे...तेंव्हा ही आयडिया करणारच.. १ मस्त पॅटर्न दाखवलात तुंम्ही. धन्यवाद :-)
26 Jan 2024 - 1:14 pm | चौथा कोनाडा
व्ही-लॉगर दिवेकर भटजी पुण्याचे, उर्फ निष्णात पुष्परंगावली कलाकार उर्फ आमचे सर्वपित्री अमावस्यामित्र मित्र उर्फ मिपकरांचे लाडके अतृप्त आत्मा उर्फ आत्मुस बुवा यांना वाढदिवसाच्या लै लै भारी शुभेच्छा!
26 Jan 2024 - 8:47 pm | नठ्यारा
वेदशास्त्रसंपन्न परागशास्त्री दिवेकरांस आदरपूर्वक प्रणाम तथा वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन. जन्मतिथी समजली असती तर आजून एकदा अभीष्टचिंतन करता आले असते.
-ना.न.