गणपती विद्येची देवता.विघ्न दूर करणारा.त्याचा आज पासून १० दिवस उत्साहात सर्वत्र साजरा होणारा उत्सव. आमच्या घरात दिवाळी इतक्या उत्साहाने नाही होत जितका दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो.
गणपती आज बसणार तोच आमची ऑस्ट्रेलिया ला असलेल्या चुलत चुलत आज्जी वारल्या . चुलत आज्जी म्हणजे आजोबांची चुलत भावजय. त्याच दहा दिवस सुटक पाळायच असा आदेश घरातल्या मोठ्यांकडून आले. सुटक पाळायच म्हणजे गणपती मूर्ती च्या जवळ जायचा नाही . गणपती दुसर्याकडून बसवून घ्यायचाय़. य़ा निमित्तानं बर्याच गुरुजी लोकांची मते घेतली. एक गुरुजी तर म्हणाले गणपतीच बसवू नका तरकाही म्हणाले गणपती दुसर्याचा हातून बसवावा व १० दिवस देवाची रोजची पूजा आरती दुसर्यांकडून करून घ्यावि. आमच्या चुलत चुलत आजी राहायला ऑस्ट्रेलिया ला असल्यामुळे त्यांचे दिवस त्यांचे जवळचे नातेवाईक तिकडेच करणार आहेत. तर या निमित्ताने मला पडलेले काही प्रश्न.
१. सुतक family tree मध्ये कोणत्या लेवेल पर्यंत पाळावे लागते ?
२. सुतकाच्या दिवसात काय काय नियम पाळावेत आणि ते गरजेचे आहेत का ?
३. उलट सुलट काही करू नका असे मोठे सांगतात,पण जर गणपती विघ्नेश्वर आहे तर त्याची पूजा अर्चा करण्याने, त्याचे स्वागत करण्याने विघ्न कशी काय निर्माण होऊ शकतील ?
ह्या गोष्टीत किती तत्थ्य आहे ?
प्रतिक्रिया
29 Aug 2014 - 5:06 pm | विलासराव
तुमच्या विचाराने तुम्हाला पटेल ते करा.
मला विचाराल तर असं काही पाळायचं नसतं.
29 Aug 2014 - 7:30 pm | दादा कोंडके
सहमत. गणपती बसवू नका.
29 Aug 2014 - 5:13 pm | एसमाळी
सुतक जुण्या काळातले विचार आहेत,आता पाळण्यात काही अर्थ नाही.(पुर्वी लोक रोगराई ने जास्त दगावयाची.त्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबाला समाजापासुन काही दिवस दुर ठेवले जात असे)
29 Aug 2014 - 5:38 pm | टवाळ कार्टा
१००+ होतील???
29 Aug 2014 - 5:48 pm | आदूबाळ
टैमिंग चुकलंय.
29 Aug 2014 - 5:57 pm | किसन शिंदे
कोणाला कशाचं तर बोडकीला केसाचं. :D
29 Aug 2014 - 6:18 pm | टवाळ कार्टा
या अशा केसेसमध्ये बरेच लोक जनरीत म्हणुन जसे ४ लोक करतात तसेच करतात...उगाच "लोक काय म्हणतील" या विचाराने
लेखकाने मिपावर सल्ला विचारला म्हणजे कदाचित इथे "testing the water"चा प्रकार असावा असे वाटले...पण लेखात कुठेही लेखकाचे स्वताचे मत दिसले नाही त्यामुळे लेखक कदाचित धोपटमार्ग स्विकारेल असे वाटले... :)
29 Aug 2014 - 7:47 pm | संजय क्षीरसागर
उद्या सकाळी उठल्यावर गप्पगप्प राहा. कुणी काय झालं विचारलं तर काही बोलू नका. मग थोड्या वेळानं सगळे काळजी करायला लागतील. तेव्हा पुन्हा कुणी विचारलं तर म्हणा,
`मी आज फार अस्वस्थ आहे, काय करावं कळत नाही'.
यावर घरचे हमखास विचारतील, `नक्की काय झालं?'
तर सांगा, `रात्री गणपती माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला, `तू इतक्या वर्षांची परंपरा मोडणं बरं नाही'... आणि मी काही बोलायच्या आत अंतर्धान पावला. मला लगेच जाग आली आणि आता काय करावं तेच समजत नाही'.
सगळ्यांचे गणपती बसवून झाल्यानं तुम्हाला उद्या हाफ रेट मधे गणपती मिळेल. तो बसवा आणि आरती करा!
29 Aug 2014 - 8:47 pm | vikramaditya
तुमचा सदस्य काळ बघता 'ह्या" विषयावर कशा प्रकारचे मार्गदर्शन (?) "इथे" मिळेल ह्याची तुम्हाला कल्पना असेलच. असो. अश्या प्रकारच्या धाग्यांची आतुरतेने वाट बघणा-या व मग प्रकट होणा-या सदस्यांची तुम्ही सोय करुन दिलीत. त्यांनाही 'मोकळे' वाटेल.
You made their day.
29 Aug 2014 - 10:08 pm | धर्मराजमुटके
१. सुतक family tree मध्ये कोणत्या लेवेल पर्यंत पाळावे लागते ?
उत्तर : हे मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्यावर अवलंबून आहे. चुलत आजी म्हणजे आजोबांची चुलत भावजय यातून ते मातृकुलाकडून आहे की पितृकुलाकडून त्याचा अर्थबोध होत नाही.
२. सुतकाच्या दिवसात काय काय नियम पाळावेत आणि ते गरजेचे आहेत का ?
उत्तर : काही विशेष नियम नाहित. पण जनरीत म्हणून किंवा आपले आप्त दु:खात असतात म्हणून कोणतेही मंगल कार्य सुतक काळात करु नयेत असा प्रघात आहे.
नियम पाळणे गरजेचे आहे का ? यावर उत्तर असे की जर तुम्हाला निधनाचे खरोखरच तीव्र दु:ख असेल आणि ती व्यक्ती तुमची अतिशय आवडती असेल तर तुम्ही कोणत्याही शंका विचारल्याविना तुम्हाला जे जे नियम सांगीतले जातील ते विचार न करता पाळता. केवळ लोकलज्जेस्तव पाळायचे असतील तर दृष्टीआड सृष्टी या न्यायाने वागणारीही बरीच मंडळी आहेत.
प्रश्न क्र. ३ : पूजा अर्चा किंवा भगवंतासंबंधी कोणतेही कार्य करण्यास काहिही अडचण नाही. पण त्या गोष्टी साधेपणाने करण्याकडे कल राहू द्या.
बाकी ऐकावे जनीचे करावे मनीचे !
30 Aug 2014 - 1:37 am | खटपट्या
+१
बाकी "ऐकावे मनीचे" च्या ऐवजी "मनाचे" पाहिजे का ?
30 Aug 2014 - 2:35 am | धर्मराजमुटके
मुळ म्हण : ऐकावे जनाचे करावे मनाचे.
सुधारीत म्हण : ऐकावे जनीचे करावे मनीचे.
30 Aug 2014 - 1:16 pm | vikramaditya
मूळ विषयाला धरुन आपले विचार मांडलेत.
29 Aug 2014 - 10:57 pm | प्यारे१
मुळात दु:ख झालंय का? झालं असेल तर सुतक पाळलं जाईलच. दु:ख नसेल तर साधेपणानं गणपती साजरा करावा. बाकी लोकांचं नेमकं देवाबाबतच सगळं पाळापाळीचं असतं.
30 Aug 2014 - 10:37 pm | कवितानागेश
सुतकाचे नियम पंचांगात शेवतच्या २-३ पानांवर दिलेले असतात, पण त्यातही स्पष्टपणे हे "जुने" शास्त्रार्थ आहेत, केवळ जन्तुसंसर्गासाठी पुर्वी पाळले जात असत.
तसेही दुसर्याकडून गणपतीची पूजा करुन घेण्यात त्रास काही नाही. शिवाय आपण स्वतःदेखिल हिन्दी सिनेमात दाखवतात तसे वारंवार मूर्तीला कवटाळून देवाला धमक्या वगरै देत नाही, तर लांबूनच पायाशी फुले वाहतो. त्यामुले काही बिघडेल असं वातत नाही.
अर्थात, हे सगळं करायचं ते आपल्या मनाला रुखरुख लागू नये म्हणून....
31 Aug 2014 - 12:43 am | संजय क्षीरसागर
धाग्यावर सुत-कताई केली.
1 Sep 2014 - 4:30 pm | विजुभाऊ
मला लहानपणी सूतकताई या शब्दाचा अर्थ " सुतकात असलेली ताई " असा वाटायचा
2 Sep 2014 - 12:33 am | संजय क्षीरसागर
सोवळ्यातली ताई म्हणायचे!
31 Aug 2014 - 11:09 pm | आयुर्हित
गरुड पुराणातिल प्रेतकांड यात या बद्दल अगदी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
जंगलात लागलेल्या आगित जळून किंवा विदेशात झालेल्या मॄत्युचे सुतक फक्त एकदा आंघोळ केल्याने सुटते.
आता आपल्या प्रश्नांची उत्तरे:
१)सुतक सात पीढ्यांपर्यंतच पाळावे, जर अंत्ययात्रेला गेले नसाल तर.
२)सुतकाच्या दिवसांमध्ये धार्मिक ग्रंथाचे वाचन करावे पण वेद शास्त्राचा अभ्यास करु नये.यज्ञ व दानपुण्य करु नये.
३)कोणत्याही देवाच्या पुजेला मनाई नाहि परंतु मंदिरा/सार्वजनिक ठिकाणी जावुन इतरांची अशुद्धि करु नये.
1 Sep 2014 - 9:28 am | ब़जरबट्टू
धाग्याचा विषय बघुन पावल्या गेलो आहे...
1 Sep 2014 - 2:26 pm | सूड
तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा!!