कोविड- अनुभव वगैरे..
माझा ताजा ताजा अनुभव शेअर करतो.
मी एका कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो त्यामुळे मला महानगरपालिकेकडून कंपलसरी टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. काहीही लक्षणं नव्हती तरीही सल्ल्यानुसार प्रीकॉशन म्हणून, २५ मार्चला मी महानगरपालिकेच्या कोविड टेस्टींग सेंटरला जाऊन पोचलो. तिथली गर्दी, आणि कशाचा कशाला संबंध नसलेली व्यवस्था बघून मला अजिबात धक्का बसला नाही. कारण 'अपेक्षा हे सगळ्या दु:खांचं मूळ कारण आहे', हे तत्व डोक्यात फार पूर्वीच फिट्ट बसवून घेतलेलं आहे.