अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.
या अध्यायातील विषयवस्तू प्रबंधात सविस्तर लिहिली आहे म्हणून इथे संक्षिप्त रूपात सादर केली आहे.
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी
1.व्यवस्था
अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५
"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम."
"काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?"
"कळवतो म्हणाले."
"हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच."
"हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?"
"विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी"
"कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?"
"अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?"
"काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?"
हौसेला मोल नसतं आणि निराशे इतकी स्वस्ताई शोधून सापडायची नाही. दोन्ही मनाचेच खेळ अगदी दोन टोकांवरले. हौसेत जगणं कृतार्थ झाल्याचा भास आणि निराशेत त्याच्या अंताचा. या दोन मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजे जीवन. या रेषेवरचा प्रवास मोठा गमतीदार. पण इथले बरेचसे प्रवासी भरपूर वजन घेऊन या प्रवासाची सुरुवात करतात. आणि त्याचा व्हायचा तोच अपेक्षित परिणाम होतो. रेषेवर कुठेही असला तरी त्या माणसाची जीवनातली दमछाक काही थांबत नाही. हां सांगायचं राहिलं.. ओझं पडद्यांचं. हो पडदे.. अनेकवचनी! एका स्थिर रंगमंचावर एकाच वेळी अनेक प्रयोग सादर करायचे असतील तर काय करावे लागेल?