मिपाकरांच्या वाचनखुणा.

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in जनातलं, मनातलं
31 Mar 2021 - 8:10 pm

नमस्कार मिपाकरांनो,

आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत.
पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे.
मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे.
आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती

सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे.

१) इब्न बतूत - भाग १
जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका.

२) मोसाद - भाग १
कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका.

३) मक्केतील उठाव १
हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका.

वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो!
आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂

आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.

मांडणीवाङ्मयप्रकटनविचार

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

31 Mar 2021 - 8:34 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान कल्पना आहे.
माझ्यासारख्या नव मिपाकरांना उपयोगी पडेल.

कुमार१'s picture

31 Mar 2021 - 8:39 pm | कुमार१

छान कल्पना आहे.

माझ्याकडे खुप म्हणजे खुप वाचनखुणा आहेत,
कोणाकोणाच्या कथा येथे देऊ? एकाचे दिले तर दुसरी पण भारी.

त्यामुळे मी पुन्हा वाचून, वेळ मिळेल तशी लिंक्स एक एक जुन्या पासून नविनकडे असे येथे सांगत जाईल.

आत्ताच एक होती वैदही हि वाचनखुण पाहतोय

टर्मीनेटर's picture

1 Apr 2021 - 10:30 am | टर्मीनेटर

ॲबसेंट माइंडेड, कुमार१, गणेशा
प्रतिसादासाठी आपले आभार.
कुमार साहेब तुमच्या वाचनखुणा आमच्या बरोबर शेअर कराव्यात हि नम्र विनंती.
गणेशा भाऊ तुमच्या सारख्या जुन्या मिपाकराकडे भरपूर वाचनखुणा असणे स्वाभाविक आहे. तुमच्या सवडीने त्या शेअर करा काही घाई नाही.

विश्वनिर्माता's picture

31 Mar 2021 - 11:00 pm | विश्वनिर्माता

माझे मिपावचन असावे तितके नाहीये.
हा एक लेख साठवलेला- तस्मै श्री गुरवे नमः- सतीश गावडे

हि कविता छान वाटलेली- दुर्वास

टर्मीनेटर's picture

1 Apr 2021 - 10:32 am | टर्मीनेटर

विश्वनिर्माता साहेब
तुम्ही शेअर केलेल्या वाचनखुणांसाठी आपले मनःपूर्वक आभार.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Apr 2021 - 9:53 pm | ॲबसेंट माइंडेड ...

तस्मै श्री गुरवे नमः हा लेख अतिशय आवडला. दुर्वास कविताही छान आहे.

सतिश गावडे's picture

2 Apr 2021 - 9:15 pm | सतिश गावडे

धन्यवाद विश्वनिर्माता साहेब __/\__

पाषाणभेद's picture

31 Mar 2021 - 11:12 pm | पाषाणभेद

असल्या सार्वजनिक वाचनखुणा, बुकमार्क, प्रसिद्ध धाग्यांची यादी, आवडलेले धागे यावर माझा कायमच आक्षेप असणार आहे. एक धागालेखक म्हणून मला हे अयोग्य वाटते आहे.
आता तुम्ही सकस लेखन कायमच वरती राहणार, अमूक असे मुद्दे उपस्थित करणार.
पण लक्षात घ्या की हा एक फोरम आहे. मला माझे बोलणे निट शब्दबद्ध करता येत नाही पण ही अनुचीत प्रथा आहे.

ज्यांना माझे बोलणे योग्य वाटत आहे त्यांनी हा मुद्दा अधीक विस्तारपूर्वक मांडावा.

टर्मीनेटर's picture

1 Apr 2021 - 10:34 am | टर्मीनेटर

प्रतिसादासाठी आपले आभार.
माझे विचार/मते सर्वांना पटलेच पाहिजेत असा माझा दुराग्रह अजिबात नाही. वॆचारिक मतभेद असू शकतात हे मला मान्य असल्याने तुमच्या मताचाही आदर आहे.
जमिनीवर लिहिलेला आकडा एकच असला तरी तुमच्या बाजूने तो 6 दिसेल तर माझ्या बाजूने तो 9 दिसेल. दोघांची उत्तरे तांत्रिकदृष्ट्या बरोबर असली तरी ती वेगवेगळी असण्याचे कारण हे आपले 'दृष्टिकोन' असल्याने माझ्या मताच्या समर्थनार्थ आणि तुमच्या मताचे खंडन करण्यासाठी पुढे कुठलेही मुद्दे उपस्थित करून निरर्थक वादविवाद/चर्चा करत बसण्यात वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याची चैन मला परवडणारी नाही.
कळावे, लोभ असावा.

तुषार काळभोर's picture

1 Apr 2021 - 11:04 am | तुषार काळभोर

किंचीत सहामत.
वाचनखुणा वाचून असे सुप्रसिद्ध धागे वरती राहतील आणि काही नवीन पण चांगले धागे खाली जातील.
पण हे नेहमीच होईल असं नाही.
उदा रामदास, फारएण्ड, जे पी मॉर्गन, बोका ए आझम, यांचं दर्जेदार लेखन कमी आहे का? ते कुठं वरती येतं? चार-पाच-सहा वर्षे जुन्या सदस्यांना कदाचित ते लेखन माहिती असेल. एखादा नवीन सदस्य आला तर मिपावरचे सुरुवातीपासून उत्तम, दर्जेदार, लोकप्रिय लेख जर त्या नवसदस्याला सापडले, तर तो आल्या पावली मिपाचा फ्यान होईल!
मला नऊ वर्षे झालीत. मी बर्‍यापैकी सक्रीय आहे. तरी अजून काही मोती अवचित सापडतात. मग अशा वाचनखूणा एकत्र असल्याचा फायदा हा तोट्यांपेक्षा जास्त असावा.
उदा रामदास यांची एक शृंगारिक कविता.
भडकमकर मास्तरांचा एक संपादकीय विशेष लेख - और कितना गिरना बाकी है?
ही मोत्ये नव्या सदस्यांना देणं हे जुन्या-जाणत्यांचं कर्तव्य नाही का?

गणेशा's picture

1 Apr 2021 - 11:48 am | गणेशा

बरोबर..

आता ह्या दोन्हीचा मध्य साधायचा असेल,
तर या धाग्यावर ज्या लिंक्स दिल्या जातील त्याला प्रतिसाद न देता ज्यांना वाचायचे आहे त्यांनी वाचले तर जुने धागे वरती न येऊन पाषाणभेद म्हणतात तसे हि होईल..
आणि तुम्ही आणि धागाकर्ता यांचा हेतू हि साध्य होईल..

फक्त याच एका धाग्याला प्रतिसाद लिंक देऊन वरती आणायचे बस..
एखादे खुप्पच आवडले तर येथेच सांगायचे..

( स्वगत : आजकाल मला सगळेच बरोबर का वाटायला लागलेत? काय माहित :-))

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 10:31 am | ॲबसेंट माइंडेड ...

और कितना गिरना बाकी है?
ळेख कालातीत आहे. आज देखील लोकांची मानसीकता बदलल्याचे आकडेवारी बघुन वाटत नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Apr 2021 - 12:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

फडताळातली पैठणी काढल्यावर जो आनंद एखाद्या गृहिणीला होत असेल तसेच काहीसे धागा वाचताना होणार आहे.

एखादे पुस्तक जर आपल्याला आवडले तर आपण ते आपल्या मित्रांना सुचवतो तसाच हा धागा आहे.

अशा प्रकारचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही. राष्ट्रकाकू गिरिजा यांनी सुध्दा अशा प्रकारचा प्रयत्न केला होता काही जुन्या लेखनांचे धागे

मोदकसरांनी काढलेला आम्हा घरी धन.. ह्या मलिकेचे सगळे धागे माझ्या वाखु मधे आहेत आणि त्यातला प्रत्येक प्रतिसाद वाचनिय आहे.

आम्हां घरी धन... (२)

आम्हां घरी धन.....(३)

हा इसम हल्ली मिपावर का येत नाही ते माहित नाही.

माझ्या वाखुमधला असाच एक धागा नांदेडियन यांनी काढलेला खाद्यभ्रमंती - पुणे

मारवा यांचा साज़ पण माझ्या वाखु मधे आहे.

या शिवाय टर्मिनेटर काकांचा स्मायली / Emoji आणि त्यांचीच फोटोयुक्त लेखनाची नवी रेसिपी वाखु मधे साठवलेली आहे.

पैजारबुवा,

राम्राम पैजारबुवा.. मला सर कधीपासून म्हणायला लागलात..?

****************

वाचनखुणांचा विषय सुरू आहे म्हणून... पैजारबुवांचा एक प्रतिसाद वाचनखुण म्हणून जपून ठेवला आहे.
खदाखदा हसण्यासाठी नक्की वाचा.. ;)

लोणीऽऽ..

धागा लयी भारी असा!!
:)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 11:13 am | ॲबसेंट माइंडेड ...

लोणीऽऽ..
धम्माल प्रतिसाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Apr 2021 - 12:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

लोणी विसरला नाहीस अजून?
पैजारबुवा,

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Apr 2021 - 12:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

शाहीर ते शाहीर !

आपल्या प्रा डॉ.नी लिहिलेला.

अशी दणक्यात सुरुवात झाल्यानंतर मिपा जे सुसाट सुटले ते सुटलेच.

पैजारबुवा,

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 10:59 pm | ॲबसेंट माइंडेड ...

शाहीर ते शाहीर !
माहीतीपुर्ण लेख आवडला.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 5:35 pm | ॲबसेंट माइंडेड ...

साज़
लेख आवडला आणी त्यावरचे जाणकारांचे प्रतिसाद सुद्धा आवडले.

माझ्या काही वाचनखुणा:
जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग
तिरंगा
शोध
शिव: मूर्तीशास्त्र
पेन्सिल शेडींग - स्मिता पाटील
हिममानव यती - सत्य की मिथक?
शल्या !
शाळेतील गमती जमती
पाऊस..

बाकी मिपा हॉल ऑफ फेम ची कल्पना उत्तमच. त्यासाठी खरंच एखादं वेगळं दालन असावं.
त्यात कोणते धागे डकवले जातील ते कसे ठरवायचे हा जास्त मोठा प्रश्न आहे. :-)
उदा:
- एक हॉल ऑफ फेम निवड समिती असावी ज्यात कमीतकमी २० तरी जाणते सभासद असावेत.
- हॉल ऑफ फेम मधे निवड होण्यासाठी सदस्य धाग्यावर रेकमेंडेशन देऊ शकतील.
- या रेकमेंडेशन्स ना बघून त्यावर निवड समिती त्यांच्या कार्यपद्धतीनं निर्णय घेऊ शकेल.
- ही कार्यपद्धती निवडसमितीनं स्वतः ठरवावी आणि प्रसिद्ध करावी. त्यांचा निर्णय अंतीम असेल.
हे केवळ एक उदा आहे. असेच व्हावे असे म्हणत नाही. काही वेगळेही धोरण असू शकेल.

राहिले जुने धागे वर येण्याचा प्रकार. त्यात मला खरेतर काही चूक वाटत नाही.
पण अगदीच नको वाटत असेल तर हॉल ऑफ फेम मधल्या धाग्यांवरील प्रतिसादांनी, केवळ त्या दालनातच ते धागे खालीवर व्हावेत. अशाने मुख्य नवीन लेखनाच्या दालनात ते येणार नाहीत. यासाठी काही खास सुविधा तयार कराव्या लागतील, पण त्या तशा केल्यास जास्त चांगले. उदा: डेटाबेसमधे हॉल ऑफ फेम चा वेगळा टेबलच ठेवला आणि त्याचे प्रतिसाद तेथेच वेगळे ट्रॅक केले तर हे होऊ शकेल. अर्थात् हा केवळ एक अंदाज आहे म्हणा.

पण हे सर्व काम एक खूप मोठं आणि वेगळं प्रोजेक्ट आहे. भरपूर वेळ लागेल असं. आपले व्याप सांभाळून हे करणं बरंच जिकिरीचं असणार. साधा आराखडाच बनवायला २-३ महिने सहज लागतील. :-)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Apr 2021 - 12:06 pm | ॲबसेंट माइंडेड ...

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग
राघव साहेब तुमची हि वाचनखुण अतिशय आवडली.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Apr 2021 - 12:37 pm | ॲबसेंट माइंडेड ...

तिरंगा
अफाट निरीक्षणशक्ती व सेन्स ॲाफ ह्युमर लाभले आहे फारएंड साहेबांना.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Apr 2021 - 2:35 pm | ॲबसेंट माइंडेड ...

शिव: मूर्तीशास्त्र
काय अफाट व्यासंग म्हणायचा प्रचेतस साहेबांचा. हॅट्स ॲाफ.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Apr 2021 - 5:00 pm | ॲबसेंट माइंडेड ...

हिममानव यती - सत्य की मिथक?
वाचनीय लेख. माहीती संकलनावर घेतलेली मेहनत प्रशंसनीय आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

3 Apr 2021 - 10:17 pm | ॲबसेंट माइंडेड ...

शल्या !
सुरेख व्यक्तीचित्र.

शल्या मलापण आवडला..मारा सिनेमा आठवला..

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 11:24 am | ॲबसेंट माइंडेड ...

मारा हा सिनेमा माहीत नाही. युट्युबवर आहे का? असे कथानक असेल तर बघायला नक्की आवडेल.

प्राइमवर आहे. मारा या दक्षिण भाषीय सिनेमा आहे,चार्ली या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे.
त्याचाच देवा हा मराठी रिमेक सिनेमा आहे. (मी देवा नाही पाहिला.)
शल्या म्हणजे वेल्लया वाटतो.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 1:42 pm | ॲबसेंट माइंडेड ...

प्राईमवर हिंदीत असेल तर बघतो आज.

मक्केतील उठाव फारच सुन्दर आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 9:44 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मक्केतील उठाव
हो खरंच फार सुंदर आहे.

चौथा कोनाडा's picture

1 Apr 2021 - 1:13 pm | चौथा कोनाडा

प्रचेतस वल्लीचे भटकंतीचे सर्वच धागे आवडतात.
पण वल्लीच्या प्रतिभेचा विलक्षण अविष्कार असलेली कार्ल्यांच्या लेण्यांवरील ही अप्रतिम कथा खुपच आवडली

मामाडे लेनेस वलुरकेस

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 12:50 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मामाडे लेनेस वलुरकेस
सुरेख लेख.

प्रचेतस's picture

2 Apr 2021 - 2:43 pm | प्रचेतस

धन्यवाद मालक :)

वाह!!
खुपचं सुंदर लेखनशैली!
एकविरा आईमुळे मलापण कार्ला खुप मनातलं ठिकाण आहे.
लेखात सांगितल्याप्रमाणे खरच चैत्यगृह खूपच शांत आणि अनोखं आहे,मलापण प्रचिती आली.
मला वाटलं होतं अजिंठा ह्या सर्वात जून्या लेण्या आहेत,कार्ला त्याहून जून्या आहेत हे समजलं.. फोटो अत्यंत सुंदर आहेत.

सिरुसेरि's picture

1 Apr 2021 - 1:42 pm | सिरुसेरि

लक्षात राहिलेले लेख / कथा / कविता - काटे कोरांटीची फुले , मोकलाया दाही दिशा .

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 3:16 pm | ॲबसेंट माइंडेड ...

यांच्या लिंक्स मिळतील का?

गणेशा's picture

2 Apr 2021 - 3:25 pm | गणेशा

http://misalpav.com/node/4488
काटे कोरांटीची फुले - रामदास.

माझी पहिल्या ३ मधली हि वाचनखुण होती..:-)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 4:04 pm | ॲबसेंट माइंडेड ...

काटे कोरांटीची फुले
अतिशय मनस्पर्षी कथा. खुप आवडली.

गणेशा's picture

1 Apr 2021 - 1:43 pm | गणेशा

एक होती वैदही - नीधप..२००९

---
रोज वहीचे नविन पान.. नविन आयुष्य..
आणि रोज नंतर कायम बरोबर एकच बुरसटलेले अस्तित्व

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

2 Apr 2021 - 1:38 pm | ॲबसेंट माइंडेड ...

एक होती वैदेही
अनवट कथा मनाला भिडली. असे आयुष्य जगणे कथेत ठीक पण वास्तवात कुणाच्या नशीबी येउ नये.

प्रचेतस's picture

1 Apr 2021 - 4:35 pm | प्रचेतस

उत्तम धागा.

माझ्या काही वाचनखुणा अशा

छायाचित्रण भाग १२. प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्त्वे
एस यांची छायाचित्रणकलेविषयक ही उत्तम लेखमाला. (जी त्यांनी अजूनही अर्धवट ठेवली आहे :) )

शिव तांडव स्तोत्र - मराठी अनुवाद
नरेन्द्र गोळे यांनी केलेला शिवताण्डव स्तोत्राचा हा सुरेख मराठी अनुवाद.

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.- ६
लेखक जयंत कुलकर्णी-फक्त नावच पुरेसे आहे, त्यांचे कुठलेही वाचा, उत्तमच आहे.

इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)
मनोबाची ही अर्धवट राहिलेली एक उत्तम लेखमाला

असा हा पूर्वांचल
विश्वास कल्याणकरांचा पूर्वांचलावरील एक उत्तम लेख.

तुमचं आमचं सेम नसतं - भाग १२
५० फक्त यांची एक कथामालिका

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

9 Apr 2021 - 9:36 am | ॲबसेंट माइंडेड ...

इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग ४)
या माहीतीपुर्ण लेख मालिकेचे चारही भाग आवडले. लेखकाने पुढचे भाग लिहुन ती पुर्ण करावी असे वाटते.

नीलस्वप्निल's picture

1 Apr 2021 - 10:57 pm | नीलस्वप्निल

छान कल्पना आहे.

गणेशा's picture

1 Apr 2021 - 11:04 pm | गणेशा

http://misalpav.com/node/14394
नॉर्वेच्या दरीखोऱ्यातून - मितान

गणेशा's picture

2 Apr 2021 - 8:49 am | गणेशा

http://www.misalpav.com/node/18907

करण आणि फ्रेंड्स - विनित संखे

सरीवर सरी's picture

2 Apr 2021 - 12:28 pm | सरीवर सरी

हा धागा सागर मंथनासारखाच आहे.
दुर्वास (करूण रस) आणि एक शृंगारिक कविता (शृंगार रस)
अतिशय भावविभोर कविता आहेत.

गणेशा's picture

2 Apr 2021 - 2:38 pm | गणेशा

http://misalpav.com/node/15344

दास्तान.. ए.. आवरगी
- गगन विहारी अर्थात गवि.

( ह्या धाग्याचा सर्वात जास्त फायदा मला झालाय, कारण मागच्या माझ्याच वाचनखुणा.. त्या कथा मी पार विसरून गेलो होतो..
पुन्हा वाचुनच लिंक देतोय.. फक्त वरची ३२-३४ भागाची नाही वाचली पुन्हा )

गवि यांनी लिहिलेली विमान दुर्घटना झालेली आणि मानसिक आजारी असलेल्या माणसाची कथा माझ्या विशेष आवडीची होती..
वाचनखूण असेल.. नसेल तर कोणी दिली तरी चालेल..

प्रचेतस's picture

2 Apr 2021 - 2:41 pm | प्रचेतस

हा गवि नामक इसम हल्ली लिहित का नाही हे समजेनासं झालंय. :(

Bhakti's picture

2 Apr 2021 - 3:45 pm | Bhakti

दास्ताए ए आवारगी..
सिनेमा पाहतेय असंच वाटल..खुपचं छान गवि!!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 11:13 am | ॲबसेंट माइंडेड ...

दास्तान.. ए.. आवरगी
कथा आवडली. गवि साहेबांना एक प्रश्न विचारावासा वाटतोय. फॅाक्सीलेडी म्हणजे समंथा बाई का?

जयंत कुलकर्णी यांचा धागा

http://www.misalpav.com/node/12910

http://www.misalpav.com/node/12927

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Apr 2021 - 1:55 pm | ॲबसेंट माइंडेड ...

दोन भाग वाचले.
भाषा बोजड वाटल्याने ब्रेक घेतला आहे. सावकाशीने पुढचे भाग वाचीन नाहीतर सगळे डोक्यावरून जाइल.

तुषार काळभोर's picture

3 Apr 2021 - 5:18 pm | तुषार काळभोर

मागील चार एक वर्षात वाखु साठवण्याची सवय जवळजवळ मोडलीच आहे. ज्या काही ५०-६० खुणा आहेत त्या २०१७ पुर्वीच्या. अगदी २००८ पर्यंत.
त्यापूर्वीच्या पैकी, निम्म्या वाचनखुणा पाककृतींच्या आहेत.
इतर धाग्यातील जे लेख आणि/किंवा प्रतिसाद वाचनीय, संग्रहणीय असतात ते साठवले आहेत. काही धाग्यातून अन प्रतिसादातून 'कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला?' या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं.

बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा... - जयंत कुलकर्णी

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१ - खेडूत

भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट - प्रचेतस

जागो ग्राहक जागो.... - मोदक

खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स - वेल्लाभट

चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे? - संदीप डांगे

अफगाणिस्थान.......... - जयंत कुलकर्णी

ब्रह्मांड - मराठे

एक लघुकथा.....अमान - जयंत कुलकर्णी

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग - अजया

एक विलक्षण अनुभव - सुबोध खरे

ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये? - स्वमग्नता एकलकोंडेकर

एक झुंज तणावाशी! - वेल्लाभट

रेजोल्यूशन - वेल्लाभट

मांडवाखालून !! - सूड

आपण असं विचित्र का वागतो? - मन

पुत्र व्हावा ऐसा गुंडा... - पिलीयन रायडर

पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१ : प्रस्तावना - डॉ सुहास म्हात्रे

निमित्त कॉफीचं - आतिवास

गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन - सुधीर

पर बंदे अच्छे है .......... १ - सुहास..

कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध) - लाल टोपी

अहो चहा घेताय ना? (कथा) - मी_देव

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा - स्पा

आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर - आतिवास

चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. - मोदक

यु आर लेट यु फुल - मिसळलेला काव्यप्रेमी

त्रागा धागा... वैताग..... - मन

४८ तास - सुबोध खरे

धोबीपछाड - स्पंदना

आज तो जीने की तमन्ना है........... - विजूभाऊ

विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२ - जयंत कुलकर्णी

मूलांची शेती....भाग १ ...तोंडओळख.. - मुक्तविहारी

"......आर्जव ....." - जेनी

राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट ! - मालोजीराव

सरस्वती-१ - शरद

ग्रो अप बेब्ज..!! - गवि

मनस्वी - परीकथेतील राजकुमार

सौदागर - फारएण्ड

मराठा लाईट इनफंट्री - भाग - १ - जयंत कुलकर्णी

आय पील - विनायक प्रभू

एक शृंगारीक कविता - रामदास

मिपा संपादकीय - "अब और कितना गिरना बाकी है "? - भडकमकर मास्तर

तुषार काळभोर's picture

5 Apr 2021 - 6:09 am | तुषार काळभोर

वरील वाचनखुणा मिपावरील 'वाचनखूण साठवा' सोय वापरून केलेल्या आहेत.
त्याशिवाय काही गुगल शीट मध्ये ठेवलेल्या मिपाच्या वाचनखुणा -
https://www.misalpav.com/node/18782 ६) एका खेळियाने - वन ब्रिक अ‍ॅट अ टाईम !
https://misalpav.com/node/16844 विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन
https://www.misalpav.com/comment/564228#comment-564228 मिपावरील क्रिकेटचे उत्तम लेख
https://misalpav.com/user/994/authored जे पी मॉर्गन यांचे लेखन. मुख्यत्वे खेळ.
https://www.misalpav.com/user/185/authored रामदास यांचे लेखन
https://misalpav.com/node/21004 एक होता राजा
https://www.misalpav.com/comment/351564#comment-351564 गवि यांच्या कोकण सहलीच्या टिप्स
https://www.misalpav.com/user/4013/authored आळश्यांचा राजा यांचे लेखन
https://www.misalpav.com/user/3288/authored?page=1&order=comment_count&s... फारएन्ड यांचे लेखन movies special
https://misalpav.com/user/9199/authored जयंत कुलकर्णी यांचे सर्व लेखन

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 12:51 pm | ॲबसेंट माइंडेड ...

अफगाणिस्थान.....
उत्कंठावर्धक मालीकेचे पुढचे भाग नाही सापडले. लिंक्स द्याल का प्लीज.

तुषार काळभोर's picture

5 Apr 2021 - 6:08 am | तुषार काळभोर
Bhakti's picture

5 Apr 2021 - 10:20 am | Bhakti

नथ.. खुप आवडली.
जबरदस्त लेखमालिका आहे.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Apr 2021 - 12:12 pm | ॲबसेंट माइंडेड ...

नथ
झपाटल्यासारखी एका दमात वाचुन काढली कथा. या सुंदर लेखनाचे कौतुक करावे तेवढे कमीच.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 9:09 pm | ॲबसेंट माइंडेड ...

सौदागर
कहर आहे हे समीक्षण. वाक्या वाक्याला हसलो.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Apr 2021 - 12:23 am | ॲबसेंट माइंडेड ...

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …
फार छान आहे ही मालीका. खेडुत साहेबांनी CBSE आणी ICSE वरतीही अशीच वास्तवदर्शी मालीका लिहावी अशी विनंती.

शशिकांत ओक's picture

3 Apr 2021 - 9:28 pm | शशिकांत ओक

जयंत जी नेहमी सुंदर सुंदर फोटो, लेख सादर करतात. पण कधी त्यांचा फोटो पाहण्यात येत नाही. सहज पाहता पाहता एक मिळाला...
अगदी गुडघ्यावर बसून शरण आलेल्या स्थितीत महा दैत्य म्हणून जगात दरारा असलेला वाघ - इदि अमिन आपल्या पुर्ण आर्मीच्या वेषात बसलेले, त्यांच्या सह जयंतजी? सत्य साईबाबांच्या सिंहासनाच्या सभोवती... दोघांनी आपले हात साईबाबांच्या पंजात धरून आपुलकी व्यक्त करताना दादा इदी अमिन अगदी मांजर होऊन वसलेला पाहून जयंतजीं बद्दल दरारा वाढला...!
त्यांना ओळखणाऱ्यांपैकी कोणी या फोटोबद्दल अधिक माहिती काढून सांगितली तर आवडेल

1

मराठा लाईट इनफंट्री - भाग - १ - जयंत कुलकर्णी

प्रकाश घाटपांडे's picture

3 Apr 2021 - 9:44 pm | प्रकाश घाटपांडे

समजल नाहि काही??

तुषार काळभोर's picture

3 Apr 2021 - 9:58 pm | तुषार काळभोर

१. इदी अमीन ला भारतीय वंशाच्या (भारत - पाकिस्तान - बांगलादेश) लोकांचा तितकाच तिटकारा होता जितका हिटलर ला ज्यू विषयी होता.
२. इदी अमिन भारतात आल्याचे ज्ञात नाही.
३. इदी अमीन चा मृत्यू २००३ मध्ये, अठरा वर्षांपूर्वी झाला. फोटोतील डावीकडील व्यक्ती फोटोत किमान ६५-७० वर्षांची वाटते. म्हणजे आता ८३-८८. जयंत कुलकर्णी इतक्या वयाचे नक्की नसावेत.
४. सत्य साईबाबा यांनी युगांडाच्या गुजराती वंशीय जनतेसाठी १९६८ मध्ये युगांडा ला भेट दिली होती. त्याला ही आता ५३ वर्षे होतील. फोटोतील व्यक्ती विशीतील असेल तर आता सत्तरीत असेल. पण ती व्यक्ती विशीतील वाटत नाही. आणि जयंत कुलकर्णी शतकोत्तर नक्की नसावेत.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Apr 2021 - 8:12 pm | प्रकाश घाटपांडे

करेक्ट

गणेशा's picture

4 Apr 2021 - 11:43 am | गणेशा

http://misalpav.com/diwali2012/baap

बाप - रामदास

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 12:06 pm | ॲबसेंट माइंडेड ...

बाप..
कथा खुप आवडली. हायक्लास लेखनशैली आहे रामदास साहेबांची.

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2021 - 6:06 pm | चौथा कोनाडा

रामदासजींच्या या हायक्लास कथेचा मी केलेला अभिवाचनाचा प्रयत्न इथे ऐकायला मिळेल.

कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो) : https://misalpav.com/node/47321

रंगीला रतन's picture

5 Apr 2021 - 6:23 pm | रंगीला रतन

There was a problem playing this audio file
असा मेसेज येतोय.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Apr 2021 - 8:10 pm | ॲबसेंट माइंडेड ...

मला एरर नाही येत पण ॲाडीओ प्ले हेत नाहीये.

सतिश गावडे's picture

5 Apr 2021 - 11:58 pm | सतिश गावडे

हे वाक्य मी वाचन खूण म्हणून साठवून ठेवणार आहे, कसलं भारी वाक्य आहे :)

गणेशा's picture

5 Apr 2021 - 6:35 pm | गणेशा

Mi लिंक देताना तुमच्या धाग्याची आठवण आलेली..
आणि हा धागा मी नंतर देणार होतोच..पाहिल्यान्दा दोन्ही एकत्र नको द्यायला म्हणुन थांबलेलो...

आणखिन करा असे प्रयोग वेळ असेल तर.. आम्ही ऐकायला तयार आहे :-)

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 5:19 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद गणेशा !

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2021 - 8:29 pm | चौथा कोनाडा

रंगीला रतन, ॲबसेंट माइंडेड ...

थोडा वेळ लागतो, मग ऑडियो बार दिसायला लागतो आणि मग प्ले होईल
किंवा
चित्रात दाखवलेले पॉपअप बटन (उजव्या बाजुस वर) क्लिक केल्यास नविन टॅब मध्ये ऑडियो प्ले होईल.

प्लिज प्रयत्न करा अन सांगा,
(माझ्या इथे प्ले करायला काहीच अडचण येत नाहीय)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Apr 2021 - 8:44 pm | ॲबसेंट माइंडेड ...

नविन टॅब मध्ये वरील प्रमाणे एरर येतोय आणी डाउनलोडचा ॲाप्शन येतो. पण डाउनलोड होत नाही आणी प्ले पण होत नाहीये.
तुम्ही गुगलचे तुमचे लॅागीन नसलेल्या डीव्हाइसवर तपासुन बघा एकदा.

चौथा कोनाडा's picture

6 Apr 2021 - 5:18 pm | चौथा कोनाडा

अ‍ॅमा, गुगलचे लॅागीन नसलेल्या डीव्हाइसवर तपासुन पाहिले, प्ले होतेय.
गणेशा म्हणतोय त्या प्रमाणे "थोडावेळ थांबल्यावर mp३ player बार येतो "

तुमच्या इथे वेगळा इश्यू असावा, तपासून पहायला हवे.

गणेशा's picture

5 Apr 2021 - 9:09 pm | गणेशा

मला error येत नाही आणि play पण होते आहे..

थोडावेळ थांबल्यावर mp३ player बार येतो..

गणेशा's picture

4 Apr 2021 - 12:21 pm | गणेशा

७.

https://misalpav.com/node/15493

एका हरंण्याची गोष्ट - नीधप ( लेख लिहितोय सो आता वाचली नाही.. सन्ध्याकळी वाचेल पुन्हा)

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

4 Apr 2021 - 1:38 pm | ॲबसेंट माइंडेड ...

एका हरण्याची गोष्ट
वा. कमाल लिहीतात या नीधप. त्यांची वाचलेली ही दुसरी कथाही आवडली.

प्रसाद_१९८२'s picture

4 Apr 2021 - 8:23 pm | प्रसाद_१९८२

धाग्याच्या निमित्ताने बरेचशे माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाले, जे आधी वाचले नव्हते.
---
हा धागा काढल्याबद्दल, धागालेखकाचे आभार.

गणेशा's picture

5 Apr 2021 - 12:32 am | गणेशा

http://misalpav.com/node/16063

चल चांदण्यात जाऊ.. अरुण मनोहर

हि माझ्या आवडत्या कथेपैकी एक कथा..चित्रदर्शी कथा..

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

5 Apr 2021 - 2:20 pm | ॲबसेंट माइंडेड ...

चल चांदण्यात जाउ...
कथा चागली आहे पण आवडली असे म्हणता येत नाही. संमिश्र भावना आहेत.

रंगीला रतन's picture

5 Apr 2021 - 12:31 pm | रंगीला रतन

एक नंबर धागा!
मोसाद वाचली आहे. बाकीचे सर्व वाचायला किती दिवस लागतील या विचारात पडलोय :)

मुक्त विहारि's picture

5 Apr 2021 - 4:52 pm | मुक्त विहारि

मिपा, आयुष्यभरासाठी चिकटलेले व्यसन आहे ....

चौथा कोनाडा's picture

5 Apr 2021 - 5:56 pm | चौथा कोनाडा

बरोबर आहे मु वि साहेब !

रंगीला रतन's picture

5 Apr 2021 - 6:11 pm | रंगीला रतन

मिपा, आयुष्यभरासाठी चिकटलेले व्यसन आहे ....
+१११

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Apr 2021 - 9:23 am | ॲबसेंट माइंडेड ...

हरे राम. परवा याच कवींची प्राणिपात कोटि कोट ही कवीता वाचली होती. आज मोकलाया दाहि दिश्या वाचली. अत्युच्च विनेदी टायपिंग आणी सवाई विनोदी प्रतिक्रीया वाचुन दिवसाची सुरूवात प्रसन्न झाली.