जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो.
जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही. आणि रेताड, ओसाड शिवाय दुर्लक्षीत अश्या १३६० एकर जमिनिवर आपलं आयुष्य खर्ची घालत एक संपुर्ण अरण्य फुलवल्यानंतर तो, तुमच्या-आमच्यासारखा सामान्यही रहात नाही.
होय. आसाममधल्या जोरहट जिल्ह्यातल्या जादव पायेंगचं आयुष्य कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही. या भागावर राज्य चालतं ते 'ब्रम्हपुत्र' नदिचं. अ-कारान्त पुल्लींगी नाव असणारी कदाचीत ही एकमेव नदी असावी. वेग, विस्तार आणि विध्वंस करण्याची क्षमताही एखाद्या विर पुरूषालाच साजेशी. सागरासमान विशाल अश्या ब्रम्हपुत्रच्या पात्रात अनेक छोटीछोटी बेटे तयार झालीत. तीस वर्षापुर्वी याच ब्रम्हपुत्र नदिच्या पात्राजवळून सुरू झालेली जादव पायेंगचीही अरण्ययात्रा आज तब्बल ५५० हेक्टर जमीनीवर एक छोटं अभयारण्य तयार करण्य़ापर्यंत येऊन पोचलीय. हे एकमेवाद्वीतीय मनुष्यनिर्मित अरण्य आज चार वाघ, तीन गेंडे, शंभरेक हरणं, शेकडो माकडं, ससे आणि ईतर जनावरांचं हक्काचं घर आहे. कित्येक प्रवासी पक्षी पाहूणे म्हणुन ईथे येतात. जवळपास सव्वाशे जंगली हत्तींचा कळप येथे वर्षातले सहा महिने वास्तव्यास असतो. मात्र १९७९ साली सोळा वर्षाच्या एका पोरट्याने या बेटावर पाय ठेवला होता, तेव्हा परिस्थीती अगदीच वेगळी होती.
ब्रम्हपुत्र नदिच्या विद्धंसकारी पुराने सगळं काही वाहून नेलं होतं. अगदी छोटीछोटी झुडुपे देखील ठेवली नव्हती. बी रूजायला मातीच नव्हती. नजर जाईल तेथे रेती आणि रेती नसेल तेथे खडक. होते नव्हते ते सगळे जीव वाहून गेले. राहिले ते फक्त सरपटणारे प्राणी. पण पूर ओसरला, उन पडलं, आणि सावलीचा कुठेच पत्ता नसल्याने त्यांनीही उन्हाने पोळून निघून जीव सोडले. त्याच्या कबिल्यात ज्यांची पुजा व्हायची त्या शेकडो साप, अजगर आणि ईतर प्राण्यांचे तडफडून जीव गेलेले पाहून त्या सोळा वर्षाच्या मुलाला अश्रृ आवरले नाहीत. त्याने ठरवलं की, या बेटावर पुन्हा जंगल निर्माण करायचं. रोपटी मागायला तो वनविभागाच्या कर्मचा-यांकडे गेला. सहाजीक सगळ्यांनी त्याला मुर्खात काढलं. या ओसाड जागेवर बांबु उगवला तरी भरून पावलं, असा विचार करून कुणीतरी बांबुची रोपटी दिली. मग बांबुचं वन उभारण्याचा ध्यासच या पोराने घेतला. 'मुलई' म्हणायचे त्याला घरचे आणि गावचे लोक. म्हणुन मग त्याने उभारलेल्या जंगलाचं नाव पडलं 'मुलई कथोनी' म्हणजे मुलईचं जंगल. बांबुच्या बनापासुन सुरू झालेल्या या जंगलाला आज अभयारण्य दर्जा मिळण्याईतपत जैवविविधता ईथे आहे. मुलईच्या अथक परिश्रमाचंच ते फळ.
येथे अथक म्हणजे अगदी शब्दशः अथक! खडकाळ मातीत लाल मुंग्या राहिल्या तर मातीचा दर्जा बदलतो. ती सुपीक होते असा गावक-यांचा अनुभव लक्षात घेऊन मुलईने आपल्या खेड्यातून लाल मुंग्या पकडून आणुन त्यांचं पुनर्वसन या बेटावर करायला सुरूवात केली. गावापासुन बेटावर पोचण्यासाठी आधी तीस किलोमिटरचा चिंचोळा रस्ता, नंतर होडीत बसुन तासभर केलेला प्रवास आणि त्याहीनंतर तब्बल सात आठ किलोमीटरचा पाई प्रवास या मुंग्यांना जवळ घेऊन करत असतांना त्यांनी घेतलेले अगणीत चावे त्याने कसे सहन केले असतील? बांबुच्या या बनाला एक संपुर्ण अरण्य बनवण्यासाठी भटकंती करत वालकोल, अर्जुन, इजर, गुलमोहर, कोरोई, मोज आणि हिमोलू ची रोपटी जमवत फिरणा-या मुलईला सरकार, गावातले लोक आणि कुटुंबानेही मदत नाकारल्यावर कुणाच्या भरवश्यावर तो उभा राहिला असेल? लावलेली रोपटी जगावीत, म्हणुन तब्बल तीस वर्षापासुन न चुकता सकाळ-संध्याकाळ त्यांना नदिवरून आणून पाणी टाकणा-या मुलईला हे सगळं करत राहण्याची प्रेरणा त्या जंगलात कुठुन बरं मिळाली असेल?
विश्वास बसणार नाही ईतकं या जंगलाशी मुलईचं दृढ नातं आहे. ईथले वाघही त्याला ओळखतात आणि एकशिंगी गेंडेही. आजुबाजुच्या गावात विध्वंस करणारे जंगली हत्ती गावक-यांच्या प्रकोपापासुन वाचण्यासाठी याच जंगलात येतात. कारण त्यांना मारायला जमलेल्या गावक-यांना सामोरा जाऊन 'आधी मला मारा. मग हत्तींवर गोळ्या चालवा' असं जाहिर आव्हान हा शिडशिडित प्रकृतीचा बुटकासा माणुसच फक्त देऊ शकतो. एकशिंगी गेंड्यांच्या शिका-यांची तक्रार तो त्त्वरीत वनवीभागाकडे सोपवतो. अध्ये मध्ये गावक-यांना जंगल तोडण्याची हुक्की आली, की झाडांना कवटाळून बसतो. एखादा नवा पक्षी पाहूणा म्हणुन आलेला पाहिला की त्याचा पाहूणचारही करतो. गेल्या तीस वर्षापासुन मुलई हे काम निःस्वार्थ भावनेने करतो आहे. त्याच जंगलात त्याच्या जुन्या झोपडीतच तो अजुनही राहतो. बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो. प्रसिद्धी, पैसा किंवा सन्मान यांची त्याला दूरदूरपर्यंत पुसटशीही आशा नाही. पण पैसा आणि सन्मान सोडले, तरी प्रसिद्धी मात्र त्याच्या वाट्याला थोडीफार आली आहे. तेही अगदी अलीकडे २००८ नंतर.
त्याचं झालं असं, की जंगली हतींच्या कळपाच्या पाठलागावर आलेल्या वनविभागाच्या लोकांना नदिच्या मधोमध ईतकं संपन्न अरण्य पाहून धक्काच बसला. बेटावर मुलईचा शोध घेतल्यावर जुन्या वन अधिका-यांना त्याची ओळख पटली. जवळपास पंचवीस वर्षापुर्वी वनवीभागाने हाती घेतलेल्या एका योजनेसाठी काम करणारा एक साधा मजुर आपलं आयुष्य खर्ची घालतो, आणि हजारो एकरामध्ये एकहाती ईतक्या भव्य अरण्याची निर्मीती करतो, हा त्यांच्यासाठी कुतुहलाच तसाच अभिमानाचा विषय झाला. वनवीभागाच्या गस्ती मग या भागात वाढू लागल्या. गेंड्याची शिकार करणा-यांचं रॅकॅटच या भागात कार्यरत आहे. मुलईच्या मदतीने त्यांना या शिका-यांनाही अटक करता आली. सुंदरबन बघायला येणा-या पर्यटकांसाठीही 'मुलई कथोनी' हे 'हॅपनींग डेस्टीनेशन' बनलं. ब्रिटिश डॉक्युमेन्ट्रीकार टॉम रॉबर्ट याने या जंगलात काही काळ राहून एक अप्रतीम माहितीपटही बनवला. त्यामाध्यमातून मुलईचं नाव आणि कार्य जगभर माहिती झालं. बाहेर देशातल्या एनजीओ आणि जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली. मुलईच्या कार्याची दखल घेत त्यांनी त्याचा गौरव केला.
निसर्ग रक्षणाच्या गोष्टी करणा-या आणि भाषणे देणा-या पेज थ्री 'ईनव्हायर्नमेन्ट ऍक्टीव्हीस्टस' लोकांपेक्षा आपल्या कर्तृत्त्वाने आदर्श घालून देणा-या मुलईला आज देश विदेशांतून मार्गदर्शनासाठी बोलावलं जातंय. पण आपलं जंगल सोडून कुठेही जायला तो तयार नाही. सरकार आणि वनवीभागाने 'मुलई कथोनी' च्या संरक्षणाची संपुर्ण जबाबदारी घेतली, तर आपण देशातल्या ईतर ठीकाणी जाऊनही अरण्यनिर्माणाचा प्रयोग करू शकतो, असा त्याला विश्वास आहे. त्यासाठी या जंगलाला अभयारण्य घोषित करण्याची नितांत आवश्यकता आहे. सरकारी स्तरावर सरकारी गतीने ते प्रयत्न सुरू आहेत, पण मुलईचं त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही.
जगभर आज वसुंधरा दिवस साजरा होत असतांना आपल्या अवघ्या आयुष्याचाच वानप्रस्थ करून दररोजच वसुंधरा दिवस साजरा करणा-या या अवलीयाचं अरण्यक असंच सुरू राहणार आहे. जे असतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय!
प्रतिक्रिया
22 Apr 2012 - 11:05 pm | बहुगुणी
चै गो:
वसुंधरा दिवसाचं निमित्त साधून फार uplifting लेख लिहिलात, धन्यवाद!
जादव पायेंग ची दखल इतर देशातल्या लोकांनी जितकी घेतली तितकी भारतीयांनी नाही.
जालावर शोधून त्याचं प्रकाशचित्र इथे टाकतोयः
22 Apr 2012 - 11:06 pm | अन्या दातार
समयोचित लेखाबद्दल आभारी आहे. नेहमीप्रमाणे उत्तम ओळख करुन दिलीत.
23 Apr 2012 - 1:08 pm | मूकवाचक
+१
23 Apr 2012 - 12:20 am | श्रीरंग
सुंदर लेख! खूप खूप धन्यवाद!
असंख्य कतृत्वशून्य फडतूस तथाकथित सेलेब्रिटीजची टीव्ही वरची गर्दी दिसली, की अशा खरोखरच्या उत्तुंग लोकांकडे माध्यमांचं होत असलेलं दुर्लक्ष पाहून खंत वाटते.
23 Apr 2012 - 1:05 pm | कवितानागेश
....
23 Apr 2012 - 12:57 am | कौतिक राव
आप्ल्या राज्यात चान्गला स्कोप आहे जादवान्ना!!
या महापुरुशा ला आपल्या देशाचा पर्यावरण मन्त्री का करु नये.. अशी एक कारणे दाखवा नोटीस काढायला हवी..
23 Apr 2012 - 2:52 am | रेवती
माहिती फारच आवडली.
23 Apr 2012 - 4:04 am | चैतन्य गौरान्गप्रभु
सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!!
अन्या दातार, आणि सरपंच यांचे 'विषेश उल्लेखनिय' असे धन्यवाद!
23 Apr 2012 - 6:16 am | सहज
लेख आवडला.
23 Apr 2012 - 7:26 am | स्पंदना
बोलती बंद झाली . अरण्य ? अरण्य उभा केल यान? बापरे.
एकच सुचना 'ब्रम्हपुत्र' हा 'नद' आहे. या प्रवाहाचा पात्रविस्तार अन लांबी यावर आधारित हा एक्मेव 'नद ' म्हणुन ओळखला जाणारा प्रवाह .
24 Apr 2012 - 12:32 am | नेत्रेश
नद म्हणजे काय?
नदी पेक्षा नद वेगळा कसा?
14 Aug 2013 - 5:22 am | स्पंदना
नद हा अतिविशाल पात्र अन प्र्चंद ओघ असलेला प्रवाह असावा अस मला वाटतय. पण कायमच ब्रह्मपुत्र नदीचा उल्लेख नद असा ऐकला आहे.
http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20090408084705AAmCsMx
23 Apr 2012 - 8:14 am | यकु
तुमचे लेख नेहमीच हटके आणि प्रेरणादायक असतात.
धन्यवाद.
23 Apr 2012 - 9:02 am | VINODBANKHELE
आपल्या कचकड्याच्या दुनियेतील रिअल हिरो.
धन्यवाद
23 Apr 2012 - 3:02 pm | प्यारे१
सुपर्ब!
5 Sep 2013 - 9:43 pm | प्यारे१
पुन्हा वाचलं नि पुन्हा नखशिखांत शहारलो.
23 Apr 2012 - 3:42 pm | निश
चैतन्य गौरान्गप्रभु साहेब, अतिशय अप्रतिम लेख...
लेखात अतिशय थोर माणसाची ओळख करुन दिली आहात.
खुप खुप आभार .
18 Jul 2014 - 3:36 am | आयुर्हित
सहमत.
खुप खुप आभार!
24 Apr 2012 - 12:48 am | निशदे
फारच समयोचित आणि माहितीपूर्ण लेख. असे कितीएक ध्येयवेडे प्रसिद्धीची तमा न बाळगता आपल्या मार्गाने जात असतील.
धन्यवाद चैतन्य..... :)
24 Apr 2012 - 9:47 am | टुकुल
अतिशय उत्तम ओळख एका अविश्वनीय माणसाची.
--टुकुल
24 Apr 2012 - 5:16 pm | यशोधरा
वाचनखूण साठवली आहे. मस्त लेख आणि ओळख. धन्यवाद.
24 Apr 2012 - 7:16 pm | पैसा
अगदी समयोचित लेख आणि उत्तम ओळख. असे कितीतरी लोक हवे आहेत तरच आपली जंगलं वाचतील.
24 Apr 2012 - 7:39 pm | मन१
आभाळाएवढ्या कार्याला सलाम.
खरच कुणा एकट्याला एवधं सगळं जमेल ह्यावर विश्वास बसत नाही.
शंका:- त्याचा पोटापाण्याचा व्यवसाय सध्या काय?
तो पूर्वी (जंगल उभारणीच्या काळात) काय करायचा?
किंवा तो हे कसे करु शकला?
ह्याच सर्व शंका मला बिहारमधील "पहाडबाबा" ह्या थोर माणसाबद्दलही आहेत.
25 Apr 2012 - 12:37 am | चैतन्य गौरान्गप्रभु
बायको, दोन मुले आणि एक मुलगी अश्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ तो घरात पाळलेल्या गाई आणि म्हशिंचं दूध विकून चालवतो.
हे वाक्य त्या लेखात आहे. माझ्या मते आपल्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यात आहे.
25 Apr 2012 - 7:37 am | मदनबाण
अत्यंत मोलाचे कार्य !
सुंदर माहिती. :)
12 Feb 2013 - 10:19 am | यशोधरा
जादव पायेंग ह्यांच अरण्यक अजूनही सुरु आहे का?
12 Feb 2013 - 5:28 pm | चाणक्य
यशोधरा, बरं झालं हा लेख वरती आणलात.
13 Feb 2013 - 6:09 am | यशोधरा
मिपावरच्या काही अतिशय आवडत्या लेखांपैकी हा एक. अशा लेखांना भरपूर प्रतिसाद मिळत नाहीत ह्याचे वाईट वाटते.
13 Feb 2013 - 11:02 pm | एस
हे मात्र दुर्दैवाने खरे आहे.
12 Feb 2013 - 8:15 pm | शुचि
खरच वसवा जंगलं.
12 Feb 2013 - 9:57 pm | राघव
सुंदर माहिती. खूप खूप धन्यवाद.
12 Feb 2013 - 11:40 pm | एस
मिपावर पर्यावरणाबद्दल फारसे लेख आलेले वाचण्यात नाहीत. बहुसंख्य मिपाकर पर्यावरणाच्या बाबतीत 'मला काय त्याचे?' असे आहेत की काय असाही माझा ग्रह झालाय. पण हा लेख मात्र फार आवडला.
काही दुवे येथे देत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या खूपशा गोष्टी करण्याआधी आपण विचार करायला शिकूयात ही आशा.
http://www.storyofstuff.org/
लाखमालाची गोष्ट - http://vimeo.com/10132338
12 Feb 2013 - 11:46 pm | सुबोध खरे
चैतन्य गौरान्गप्रभु
आपल्याला सुंदर लेखाबद्दल सलाम
जादव पायेंग यांना साष्टांग दंडवत
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे आदर्श उदाहरण
14 Feb 2013 - 11:17 am | अक्षया
+ १
13 Feb 2013 - 2:06 am | अभ्या..
सुरेख, एकदम अप्रतिम अशी ओळख करुन दिलीत.
अत्यंत उत्तम अशा लेखनाबद्दल चैतन्य साहेबांना धन्यवाद.
14 Feb 2013 - 7:10 pm | बॅटमॅन
अप्रतिम कार्याचे वर्णन करणारा मस्त लेख. कसा सुटला नजरेतून काय माहिती. या अशा लोकांबद्दल आपण काहीही लिहिणे म्हणजे नळाने समुद्राचे वर्णन करणे होय. असो. काही मासिकांतून याबद्दल आधी वाचलं होतं, या लेखाच्या निमित्ताने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला, बहुत बहुत धन्यवाद :)
15 Feb 2013 - 9:16 am | नगरीनिरंजन
हा खरा जंगलवेडा. बाकीचे सगळे आयत्या जंगलात वाघ पाहायला जाणारे स्वतःच्या काल्पनिक जंगलप्रेमाच्या प्रेमात पडलेले नार्सिसिस्ट!
15 Feb 2013 - 11:31 am | अस्मी
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.
आपण कल्पनाही करू शकत नाही अशा परिस्थितीत ह्या मनुष्याने एवढं काही करून दाखवलं! खरंच सलाम!!
16 Feb 2013 - 12:56 am | NiluMP
एका अवलियाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद.
16 Feb 2013 - 4:01 pm | रजनिश
ऑरिसा नाहि , आसाम
13 Aug 2013 - 7:50 am | यशोधरा
पुन्हा एकदा लेख वर आणण्यासाठी हा प्रतिसाद.
संमं, दखलमध्ये घेता येईल का हा लेख?
14 Aug 2013 - 10:39 am | vrushali n
तोन्डात बोटे घालणारी बाहुली...
14 Aug 2013 - 12:46 pm | विटेकर
सुरेख !
तेथे कर माझे जुळती !!
17 Aug 2013 - 2:34 pm | पिशी अबोली
जंगल उभं केलं? एखाद-दुसरं झाड वाढवणं किती कठीण असतं...
______/\_______
साष्टांग
17 Aug 2013 - 2:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
माहितीबद्दल अनेक धन्यवाद !
अशी माणसेच खरे मानवतेचे काम करत आहेत... बाकीचे सगळे टिव्हीच्या शोधातले बगळे !
जंगलप्रेमींनी चौकशी केल्यावर मग ओरीसा सरकारलाही जाग आली
इथे बहुतेक "...आसाम सरकारला..." असे म्हणायचे असावे.17 Aug 2013 - 3:37 pm | उर्मिला००
तुमचे लेखन अतिशय सोप्या ओघवत्या भाषेत,प्रभावी असे आहे.सदर लेखातुन वाचकांना नक्की प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही
17 Aug 2013 - 6:27 pm | अनन्न्या
जादव पायेंगला सलाम!
18 Aug 2013 - 8:57 am | अर्धवटराव
_/\_
अर्धवटराव
19 Aug 2013 - 2:38 am | प्रभाकर पेठकर
आधी वाचनात आला नव्हता. आता यशोधराने उत्खनन करून हा लेख वर काढल्यावर नजर पडली. खूप छान आणि प्रेरणादायी माहीती आहे. आपापल्या शहरात, राहत्या जागेच्या आजूबाजूस किमान ५ तरी झाडे लावण्याचा (आणि वाढवण्याचा) संकल्प करूयात.
19 Aug 2013 - 8:17 pm | भ ट क्या खे ड वा ला
अत्यंत सुंदर लेख , काय अचाट माणूस आहे हा
अहो जंगल काय हा तर जग घडवणारा माणूस
20 Aug 2013 - 9:45 am | सुधीर
सुंदर माहिती. धन्यवाद!
23 Aug 2013 - 10:27 pm | जुइ
अप्रतिम लेख आणि कल्पनाही करू शकत नाही असे काम केलेल्या व्यक्ति ची ओळख करुन दिल्याब्दल अनेक धन्यवाद!!
26 Aug 2013 - 4:23 pm | Mrunalini
खुप सुंदर आणि माहितीपुर्ण लेख.. खरच त्याच्या कार्याला सलाम!!
26 Aug 2013 - 10:08 pm | किलमाऊस्की
हे कार्य आमच्यापर्यंत पोचवल्याबद्द्ल धन्यवाद.
31 Aug 2013 - 4:08 pm | रानवेडा सचिन
सलाम या महामानवाला
अश्या निसर्गप्रेमींची खरच खुप गरज आहे.
5 Sep 2013 - 1:55 am | मोदक
सलाम!!
__/\__
10 Sep 2013 - 10:31 am | जेपी
*****
10 Sep 2013 - 10:31 am | जेपी
*****
10 Sep 2013 - 10:12 pm | शिल्पा ब
goosebumps !!
13 Sep 2013 - 5:20 pm | निनाद मुक्काम प...
खूप दिवसांनी मिपावर आलो
हा लेख पाहून मी मिपावर इतके दिवस का नाही आलो ह्याबद्दल स्वतःला बोल लावले
30 Apr 2014 - 1:06 pm | मनिष
हा फार म्हणजे फारच आश्वासक लेख आहे! ह्या माणसाविषयी कुठेतरी वाचल्याचे आठवते..पण हा सविस्तर लेख खुपच आवडला.
फारसे प्रतिसाद मिळाले नाही म्हणून फार वाईट वाटायची गरज नाही. प्रतिसाद काय पुणे Vs. xyzपुर वरच्या कुठल्याही धाग्याला मिळतील...पण असे लेख आणि ती माणसे लक्षात राहतात, ते महत्वाचे नाही का?
30 Apr 2014 - 7:50 pm | यशोधरा
परवा पैसाताईने फेसबुकवर लिंक शेअर केली होती. तिथेफेबुआवर spiritual ecology असे सर्च करा, त्यांच्या भिंतीवर सापडेल. त्यावरुनच खाली दिलेला उतारा कॉपी केला आहे-
Indian man single-handedly plants a 1,360-acre forest (and changes the story)
Jadav Payeng turned a barren sandbar in northern India into a lush new forest ecosystem.
A little more than 30 years ago, a teenager named Jadav "Molai" Payeng began burying seeds along a barren sandbar near his birthplace in northern India's Assam region to grow a refuge for wildlife. Not long after, he decided to dedicate his life to this endeavor, so he moved to the site so he could work full-time creating a lush new forest ecosystem. Incredibly, the spot today hosts a sprawling 1,360 acres of jungle that Payeng planted — single-handedly.
The Times of India recently caught up with Payeng in his remote forest lodge to learn more about how he came to leave such an indelible mark on the landscape.
It all started way back in 1979, when floods washed a large number of snakes ashore on the sandbar. One day, after the waters had receded, Payeng, only 16 then, found the place dotted with the dead reptiles. That was the turning point of his life.
"The snakes died in the heat, without any tree cover. I sat down and wept over their lifeless forms. It was carnage. I alerted the forest department and asked them if they could grow trees there. They said nothing would grow there. Instead, they asked me to try growing bamboo. It was painful, but I did it. There was nobody to help me. Nobody was interested," says Payeng, now 47.
While it's taken years for Payeng's remarkable dedication to planting to receive some well-deserved recognition internationally, it didn't take long for wildlife in the region to benefit from the manufactured forest. Demonstrating a keen understanding of ecological balance, Payeng even transplanted ants to his burgeoning ecosystem to bolster its natural harmony. Soon the shadeless sandbar was transformed into a self-functioning environment where a menagerie of creatures could dwell. The forest, called the Molai woods, now serves as a safe haven for numerous birds, deer, rhinos, tigers and elephants — species increasingly at risk from habitat loss.
Despite the conspicuousness of Payeng's project, forestry officials in the region first learned of this new forest in 2008 — and since then they've come to recognize his efforts as truly remarkable, but perhaps not enough.
"We're amazed at Payeng," says Gunin Saikia, assistant conservator of Forests. "He has been at it for 30 years. Had he been in any other country, he would have been made a hero."
30 Apr 2014 - 1:30 pm | बाबा पाटील
या माणसाच्या चिकाटीला अन जिद्दीला सलाम.
30 Apr 2014 - 3:18 pm | उदय के'सागर
शब्दच नाहीत!
खुप खुप धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल.
30 Apr 2014 - 7:44 pm | मधुरा देशपांडे
असामान्य कार्य आहे हे. लेख आवडलाच.
आपल्या आजूबाजूची झाडे टिकवून ठेवण्यात आणि अगदी घरातल्या बागेत काही नवीन वाढवण्यात जरी यश आले तरी अंश रूपाने त्यांच्या कार्याला मदत होईल.
1 May 2014 - 9:58 am | चिगो
सालं घरासमोरच "गार्डन" वाढवायला जमत नाही आम्हाला, आणि हा ग्रेट माणूस जंगल निर्माण करतो? ग्रेटच !! जादव पायेंगच्या जिद्दीला सलाम..
6 May 2014 - 10:03 pm | सखी
असचं म्हणते. यशोधरा लेख वरती काढल्याबद्दल तुझेही आभार!
2 May 2014 - 1:55 am | सुवर्णमयी
लेख
आवडला.
2 May 2014 - 2:28 am | श्रीरंग_जोशी
जादव पायेंग यांची अविश्वसनिय कामगिरी येथे मांडल्याबद्दल अनेक धन्यवाद.
2 May 2014 - 3:15 am | बहुगुणी
जादव पायेंग विषयीचा हा व्हिडिओ; ४:१५-४:३५ या वेळात लक्ष देऊन पहा, रोमांच उठतील...
दोन वर्षांपूर्वी या लेखावर पहिली प्रतिक्रिया दिली होती, अजूनही वाचकांना हा लेख वाचावासा वाटतो यातच बरंच काही आलं. पण या निमित्ताने एक आवाहन करावंसं वाटतं...
मिपाकर जगभरात अनेक ठिकाणी कट्टे करतात. प्रत्येक कट्टेकर्याने येतांना एक रोपटं घेऊन यावं, आणि कट्ट्यानंतर जवळच्या मोकळ्या सार्वजनिक बागेत / जमिनीत (किंवा घर / हॉटेल मालकाची परवानगी असेल तर चक्क घराबाहेरच्या / हॉटेलाबाहेरच्या मोकळ्या जागेत) ही रोपं लावावीत. कुणास ठाऊक, कल्पना पटली आणि प्रत्यक्षात आली तर भविष्यात अगदी जादव पायेंगचं जंगल नाही तरी जगभरात बरीचशी मिपा-मिनी-उद्यानं तयार होतील :-)
6 May 2014 - 8:46 pm | डावखुरा
(य)
7 May 2014 - 8:11 pm | बबन ताम्बे
अलौकिक कामगिरी.
सलाम या महापुरुषाला !!
15 Jul 2014 - 6:35 pm | भ ट क्या खे ड वा ला
नुकतेच १३ वे गिरिमित्र संमेलन महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे संपन्न झाले.
जादेव पायेंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या निमित्ताने ज्या भटक्यांना त्यांच्या बद्दल माहिती नव्हती त्यांना अगदी जवळून त्यांच्याशी मोडका तोडका का होईना संवाद साधता आला.
त्यांच्या अफाट कार्याची माहिती सर्वाना झाली.
मिपावरील आपल्या लेखामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली होती ती पूर्ण झाली.
मिपाला आणि आपल्याला मनापासून धन्यवाद.
15 Jul 2014 - 8:13 pm | बहुगुणी
गिरिमित्र संमेलनाविषयीही लिहा, वाचायला आवडेल.
थोडंसं संबंधितः
कालच एक विरोप वाचायला मिळाला; त्यानुसार 'कल्पवृक्ष' ही संस्था 'सह्याद्री - एक अनमोल ठेवा' हे ४०० पानी पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे, प्रत्येकी २०० रुपये किंमतीस हे उपलब्ध असेल. याविषयीची आधिक माहिती विरोपातून खाली देतो आहे (ज्यांना या प्रकाशन प्रकल्पात काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी व्यनितून संपर्क केला तर त्यांची प्रकल्प-चालकांशी इ-गाठ घालून देउ शकेन):
We are happy to announce that our Marathi handbook on the Sahyadri region of Maharashtra - "Sahyadri - Nisargacha Anmol Theva" is ready to go to print.
The mountain ranges of the Western Ghats of Maharashtra – popularly known as the Sahyadris – is a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region.
This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.
1 Jan 2016 - 9:33 pm | यशोधरा
सह्याद्री - एक अनमोल ठेवा प्रकाशित झाले का?
13 Jan 2016 - 2:15 am | बहुगुणी
उपलब्धता:
BNHS India: http://bnhs.org/bnhs/index.php?option=com_virtuemart&view=productdetails...
बुकगंगा: http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5722580869706533510
Sahyadri - Nisargacha Anmol Theva Rs. 490/- 200pgs all photos in colour
Published by Sakaal Papers in Marathi
कल्पवृक्षच्या दुव्यावरून थोडी माहिती:
This handbook on the Sahyadri region of Maharashtra focuses on mountain ranges of the Western Ghats of Maharashtra , popularly known as the Sahyadri s , forming a unique landscape which harbours a huge variety of plant and animal life, some which are not found anywhere else in the world. They support several tribal groups which are leading traditional lifestyles. Due to rapid urbanization, there are several threats which are impacting the region. There are steps being taken by the government as well as communities to reduce these impacts, and to conserve the region.
This book offers information on various aspects like ecosystems, biodiversity, threats and conservation measures with specific focus on the Sahyadri region in Maharashtra.
An effort has been made to simplify scientific concepts as far as possible for a layperson’s understanding. Visually attractive with photos and illustrations, the book also contains sample activities after every chapter which could be adapted by users according to their context.
The book will be of interest to teachers, environment educators, the government officials (specially Education dept, Forest Department, and Tribal department), wildlife tourists, groups involved in tourism, NGOs and concerned individuals.
We would be happy to give a discount on bulk order (above 5) or if there is genuine need for a concession (for e.g. use in a rural school).
PDF Sampler (A selection of random pages): http://kalpavriksh.org/images/Publications/Sahyadribooksampler.pdf
13 Jan 2016 - 9:54 am | यशोधरा
धन्यवाद, हो, मध्यंतरी पगमार्क संस्थेनी पुरस्कृत केलेले एक प्रदर्शन पाहिले होते, तिथे ते पुस्तक पाहिले मी.
16 Jul 2014 - 12:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने जादेव पायेंग यांची म.टा. मधे प्रसिध्द झालेली मुलाखत.
पैजारबुवा,
17 Jul 2014 - 4:58 am | यशोधरा
हाच दुवा द्यायला शोधत होरे, पैजारबुवा, धन्यवाद.
22 Sep 2014 - 6:00 pm | असंका
वा! कित्येक शतके टिकणारा वारसा!! केवढे हे कर्तृत्व!!
(लेख सुचविल्याबद्दल स्वॅप्स यांचे आभार!)
23 Sep 2014 - 10:38 pm | सूड
माहितीपूर्ण!!
2 Jan 2016 - 12:47 am | भंकस बाबा
अप्रतिम लेख,
2 Jan 2016 - 1:07 pm | बोका-ए-आझम
एका अवलियाबद्दल तितक्याच संवेदनशीलपणे लिहिलेला लेख!
2 Jan 2016 - 2:04 pm | नीलमोहर
सलाम !!
3 Jan 2016 - 10:50 am | भाते
आजच्या मटामध्ये आलेला लेख
13 Jan 2016 - 8:50 am | कविता१९७८
अत्यंत मोलाचे कार्य !
सुंदर माहिती.
29 Mar 2017 - 12:45 pm | छोटा चेतन-२०१५
सुदंर लेख